रोजची आंघोळ करणे

आंबट चिंच's picture
आंबट चिंच in काथ्याकूट
7 Dec 2020 - 6:33 pm
गाभा: 

खुप दिवसांनी काथ्याकुटा करावासा वाटातोय म्हणुन म्हंटलं धागाच काढावा.

मला सांगा तुम्हा सर्वांना रोजची आंघोळ नाही झाली तर काहीतरी चुकल्याचुकल्यासरखं किंवा कसंतरीच वाटंतं का?

मला रोजंच पुजाअर्चा करायचीच असतेच असं नाही म्हणजे मी कधी कधी एकदम देवभक्त बनतो आणि चांगलं शुचिर्भुत झाल्यावर मन लावुन पुजा करतो. प्रसन्न वाटतं. तर कधी कधी आठवडाभर करतही नाही. मन का राजा.

पण आंघोळ ही रोज केलीच पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. रोज आपली आन्हिकं वेळच्या वेळी झाली पाहिजे म्हणजे आटोपलं की झालं.

घामामुळे किंवा सकाळी शौचास जावुन आलो तर आता शुचिर्भुत व्हावे असे वाटाते म्हणुनही वाटत असेल पण आपण आंघोळ करतो.

पण काही कारणाने जर का उशिर झाला म्हणजे संध्याकाळ पर्यंत कं नीच्या कामात अडकलो किंवा पालिकेने काही कारणास्तव पाणी पुरवठा बंद केला आणि घरातले पाणी संपले तर आंघोळ तशीच राहते अशा वेळी "अरे रे आज आपण आंघोळ नाही केली म्हणुन काहीतरी मनासारखं नाही झालं असं वाटत राहते". तुम्हाला तसे जाणावते का?

कधी कधी आठवड्यातुन एक दोनदा घराची झाडालोट , साफसफाई करतो म्हणौन जरा उशिरा होतो तेव्हा चालते कारण अंग घामाजलेले असते म्हणुन करावी लागतेच.

पण एरव्ही माझा काटाक्ष असतो की रोज सकाळीच आपली आन्हिक उरकले की दिवसभर काही कसला तणाव नाही.

आणि एकदा वेळ टळली की संध्याकळी कंटाळा येतो आणि आंघोळ राहिली म्हणुन पण मनावर तणाव येतो जास्त नाही पण हलका.

तुम्हाला काय वाटते तुम्ही रोजच न चुकता आंघोळ करता का?

प्रतिक्रिया

सवयीचा भाग असल्याने असे होते. पूर्वी अंगणात खेळून दिवेलागणीच्या वेळी घरात येताना हात पाय धुण्याची सवय होती.. आता दिवसभर बाहेर गेलो नाही तरीही अनेक वर्षानंतर ही ती सवय कायम आहे.

पाषाणभेद's picture

13 Dec 2020 - 11:47 pm | पाषाणभेद

आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.

हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
..........
आंघोळ: एक कंटाळवाणी क्रिया: पुढे वाचा

कंजूस's picture

14 Dec 2020 - 9:53 am | कंजूस

बंबाची गोळी.