दिवाळी अंक २०२० - आवाहन

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
5 Sep 2020 - 11:46 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स,

सालाबादप्रमाणे श्रीगणेशोत्सव साजरा झाला आहे, गणपती विसर्जन झालंय आणि मिपा श्रीगणेश लेखमालासुद्धा यशस्वीरित्या सुफळ संपूर्ण झालेली आहे. आता वेध लागलेत मिपाच्या दिवाळी अंकाचे. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी घरांमध्ये फराळ, आकाशकंदील, फटाके यांच्याइतकीच उत्सुकतेने वाट बघितली जाते दिवाळी अंकाची. तितकीच उत्सुकता ऑनलाइन जगात असते मिपाच्या दिवाळी विशेषांकाची.

यंदा मिसळपाव दिवाळी अंकाचं दहावं वर्षं. मिपाच्या दिवाळी अंकाची दखल वृत्तपत्रांमध्येसुद्धा घेतली जाते. हे शक्य होतं ते अर्थातच तुमच्यामुळे. तुमचे दर्जेदार लेख, कथा, कविता, पाककृती, फोटो यांमुळे आपला दिवाळी अंक भरजरी होतो. त्यामुळे याही वर्षी आम्ही आवाहन करत आहोत तुम्हाला. तुमच्या लेखण्या, मोबाइल, कळफलक, कॉम्प्युटर, म्याक सरसावून बसा आणि तुमचे लेख आम्हाला पाठवा.

यंदाच्या दिवाळी अंकासाठी एक विशेष थीम असणार आहे.
अर्थात, विषय दिला, म्हणजे फक्त त्यासंबंधित साहित्य स्वीकारणार असं नाही. विषयाधिष्ठित किंवा आपल्याला सुचलेल्या विषयावर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची आम्ही वाट बघत आहोत.

तर, यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!
वाचूनच मन रोमांचित झालं ना? होणारच! कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ते मायलेकात असतं, बापलेकीत असतं, भावंडात असतं, मित्रांत असतं, प्रेमी युगुलात असतं, नवरा-बायकोेत असतं, आजी-नातवंडात असतं आणि तरीही ते सेम नसतं.
प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखाबरोबर प्रकाशचित्रं द्यायची असल्यास ती शक्यतो स्वतः काढलेले फोटो, स्वतः काढलेली चित्रं किंवा जालावर मुक्त उपलब्ध असलेली असावीत, अशी अपेक्षा आहे. प्रकाशचित्रं स्वतंत्रपणे स्टोअर करून लेखात समाविष्ट केली जातील. काही अडचणी असल्यास तुम्ही प्रकाशचित्रं आम्हाला ईमेलने पाठवू शकता. आम्ही ती लेखात समविष्ट करू.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. ईमेलने लेखन पाठवताना ईमेलमध्ये लिहून, किंवा MS Word docx फाइल attach करून पाठवू शकता. फाईल attach करताना फोटो (असल्यास) ते वर्ड फाइलमध्ये न देता, स्वतंत्रपणे attach करावेत. कृपया पीडीएफ फाइल स्वरूपात लेखन पाठवू नका.

काही प्रश्न, अडचणी, शंका असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंकासाठी आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या.

यंदा अधिक मास असला, तरी १५ ऑक्टोबरला केवळ चाळीस दिवस राहिलेत.

तेव्हा, लागा लिहायला!

टीप : आलेल्या साहित्यापैकी दिवाळी अंकासाठी निवडलेलं लेखन प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. तसंच मिपा दिवाळी अंकात आपलं लिखाण प्रकाशित झाल्यानंतर, ते लिखाण लगेचच इतरत्र प्रकाशित करू नये, अशी विनंती.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Sep 2020 - 12:09 pm | प्रचेतस

विषय भारीच आहे एकदम.

ह्यावेळचा दिवाळी अंकही भारीच होणार यात शंकाच नाही.

प्रचेतस's picture

7 Sep 2020 - 9:38 pm | प्रचेतस

इथं कपाळावर हात मारल्याची स्मायली मिळेल काय?

कुमार१'s picture

5 Sep 2020 - 12:30 pm | कुमार१

आणि शुभेच्छा !

कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ते मायलेकात असतं, बापलेकीत असतं, भावंडात असतं, मित्रांत असतं, प्रेमी युगुलात असतं, नवरा बायकोेत असतं, आजी नातवंडात असतं आणि तरीही ते सेम नसतं.
मस्त थीम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2020 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकात लेखन करण्याचे आवाहन आवडले. मस्त. क्युट. विषय अहाहा.....रोमॅन्टीसिजम सालं आपल्यात जन्मजातच आहे. जिथं गेलो तिथे प्रेमात पडतो. सुंदर गच्च बैचं मुख्यपृष्ठ ठेवा. (चावटपणा सोडून द्या ) पण भारी निवडा राव. कसंय, प्रेम विषय आहे, तर जुन्या सिनेमातली दोन फूलं एकमेकाला चिकटलेली दाखवू नका. आता काळाची पावलं ओळखून ठेवा.

तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती
तुम इस बात पे हैरां होती, तुम उस बात पे कितनी हँसती
तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं

आई गं...! आठवणीने नुसती कळ. आता तुझ्याबद्दल लिहितो गं....!
आपण पहिल्यांद कुठे भेटलो ? तु काय बोलली होती ?

मजबूर ये हालात, इधर भी है उधर भी
तन्हाई के ये रात, इधर भी है उधर भी.

लिहु की नको, तुझा होकार कळव. वाट पाहतोय. पहिला पाऊस, पहिली भेट. अहाहा....!

हां हमको मुहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत है
अब दिल में यही बात, इधर भी है, उधर भी

-दिलीप बिरुटे
(प्रियकर)

विजुभाऊ's picture

5 Sep 2020 - 1:31 pm | विजुभाऊ

वा .लगे रहो बिरुटे सर.
होऊन जाऊ देत

बाकी कसे का असेनात, पण या वयातही सरांचं मन अगदी हिरवंगार आहे... !!

विजुभाऊ's picture

5 Sep 2020 - 6:00 pm | विजुभाऊ

अहो असणारच की. शेवटी मराठवाड्याची म्हणून काही माती आहे की नाही

पैलवान's picture

5 Sep 2020 - 3:11 pm | पैलवान

नुसत्या आवाहनालाच एवढा कडक प्रतिसाद! विशेषांक रंगणार यात शंका नाही..

Bhakti's picture

5 Sep 2020 - 4:49 pm | Bhakti

हो ना..क्या बात!

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2020 - 5:15 pm | चौथा कोनाडा


+१


सरांच्या रोमॅन्टीसिजमची नांदी जबरदस्त आहे !

दुर्गविहारी's picture

5 Sep 2020 - 1:26 pm | दुर्गविहारी

शक्य तितक्या लवकर लेख देतो आहे. आमचे प्रेम थोडे वेगळे आह,, त्यामुळे त्याला अनुसरून लिहितो. :-)

कंजूस's picture

5 Sep 2020 - 2:19 pm | कंजूस

आम्ही बाद.

गणेशा's picture

5 Sep 2020 - 3:49 pm | गणेशा

हा हा हा..

मी पण शक्यतो बादच आहे..

जालिम लोशन's picture

8 Sep 2020 - 5:24 pm | जालिम लोशन

तुमच्या हिरवाईवरच्या प्रेमाची लिहान एखादी स्टोरी.

गणेशा's picture

5 Sep 2020 - 3:47 pm | गणेशा

विषय छान..

पण आता आठवणी लिहितानाच प्रेम लिहिले.. काव्य स्पर्धेला पहिलीच असेल माझी ती प्रेम कविता दिली..
आता आणखिन प्रेम लिहायला.. प्रेमच करावे लागेल :-))

संपादक मंडळ आजकाल युवा झालेले आहे हे नक्की...

प्रचेतस's picture

5 Sep 2020 - 4:36 pm | प्रचेतस

इतर लेखनही चालणार आहेच रे :)

सस्नेह's picture

5 Sep 2020 - 4:05 pm | सस्नेह

सलामीतच लढाई जिंकली !

टर्मीनेटर's picture

5 Sep 2020 - 4:16 pm | टर्मीनेटर

झकास थीम...मजा येणार अंक वाचायला.
नव-मिपाकरांनी श्री गणेश लेखमालेत आपल्या लेखणीची ताकद नुकतीच दाखवली आहे त्यामुळे त्यांच्याकडुन अपेक्षा फार वाढल्या आहेत.
सर्व लेखक/लेखीकांना आणि टिम मिपाला मन:पुर्वक शुभेच्छा!

-शेवटी उगाचंच एक प्रेमावरचा शेर :)

पूछते थे ना कितना प्यार है हमें तुम से,
लो अब गिन लो… ये बूँदें बारिश की…...!!!

वाह!!
मजा आला..

अजून येऊ द्या शेर.. मस्तच

संजय पाटिल's picture

9 Sep 2020 - 2:46 pm | संजय पाटिल

पूछते थे ना कितना प्यार है हमें तुम से,
लो अब गिन लो… ये बूँदें बारिश की…...!!!

क्या बात.... क्या बात!

प्रेम - शृंगार - रोमान्स ... या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे, आणि प्रत्येक (जिंदादिल) व्यक्तीला यावर काही ना काही सांगण्यासारखे, लिहीण्यासारखे, दाखवण्यासारखे असतेच.
या अंकात कथा, कविता तर याव्यातच, याशिवाय शृंगार या विषयावर अभ्यासपूर्ण लेखही यावेत. वात्सायनाचे कामसूत्र, भर्तृहरी शृंगार शतक, रसिकप्रिया, अष्टनायिका, Giacomo Casanova, खजुराहो, जगभरातील विविध संस्कृतींनी निर्मिलेली, जपलेली शृंगारिक चित्रे, मूर्ती आणि अन्य कलावस्तू यांनी समृद्ध असा हा दिवाळी अंक असावा.

सुंदर गच्च बैचं मुख्यपृष्ठ ठेवा. (चावटपणा सोडून द्या ) पण भारी निवडा राव.... जुन्या सिनेमातली दोन फूलं एकमेकाला चिकटलेली दाखवू नका. आता काळाची पावलं ओळखून ठेवा.

या बिरुटे सरांच्या आग्रहाशी पुर्णपणे सहमत. उगाचचा सोवळेपणा निदान या विषयात तरी नको.

'जगभरातील विविध संस्कृतींनी निर्मिलेली, जपलेली शृंगारिक चित्रे, मूर्ती आणि अन्य कलावस्तू ' या विषयावर मी सचित्र लेख लिहू इच्छितो. पॅरिसमधे बघितलेल्या 'इरॉटिक म्यूझियम'मधे काढलेले फोटो आहेत, ते आता हुडकावे लागतील.

विषय वाचून उत्साह आला आहे राव. लवकरच सत्तरावे लागणार आहे, त्यानिमिताने उडवून देऊ बार.
नमुन्यादाखल काही चित्रे:

.

.width="400" alt="." />

अनिंद्य's picture

5 Sep 2020 - 9:22 pm | अनिंद्य

लय भारी !
अंक गाजणार ;-)

चौकटराजा's picture

6 Sep 2020 - 9:35 am | चौकटराजा

प्रेम --- एखाद्या गोष्टीतील गुणाचा साक्षात्कार होताना दोषांचेही ज्ञान होऊन आकर्षण निर्माण होणे त्याअनुशन्गिक काळजी व कौतुक निर्माण होणारी मनाची अवस्था म्हणजे प्रेम .साहजिकच प्रेम ही द्वेषाच्या मानसिक अवस्थेची दुसरी बाजू आहे . जगातील अनेक समस्या प्रेमाने सोडविल्या आहेत व प्रेमानेच त्या निर्माण केल्या आहेत असे मानवी इतिहास सांगतो.

रोमान्स - कोणत्याही लहान सहान गोष्टीतही आनंद शोधण्याची मानसिक अवस्था म्हणजे रोमान्स.

शृंगार- कोणत्याही साधारण दिसणार्या गोष्टीला सजवून नटवून उत्तम कसे दाखवता येईल असा प्रयत्न प्रथम मनाकडून मग शरीराकडून होणे म्हणजे शृंगार.

वरील सर्व गोष्टीत कुठे स्त्री आली का ? नाही ना ?

@ चौरा:
तुम्ही सांगितलेले प्रेम, शॄंगारादिचे वर्णन खूप भावले, परंतु त्याहिपलिकडे खूप काही आहे, असेही जाणवते.

वरील सर्व गोष्टीत कुठे स्त्री आली का ? नाही ना ?

प्रेम आणि शॄंगार या फक्त मानवी भावना नसून त्यांची व्याप्ती फार मोठी आहे. चराचरात त्यांचे अस्तित्व असून त्यांचे कार्य निरलसपणे सुरूच असते. ग्रहतारे अणूरेणू वृक्षवल्लीं पासून स्त्री पुरुष किन्नर गंधर्व देवलोक पाताळलोक सर्वत्र प्रेमाचे साम्राज्य पसरलेले आहे, मानवी मनाची मूळची निरागसता लयाला जाऊन ते नाना प्रकारच्या व्यावहारिक गोष्टींनी व्याप्त, बधीर झाल्याने या गोष्टीची प्रचिती फार कमी लोकांना येत असते.
जाकी रही भावना जैसी। प्रभु मूरत तनु देखही तैसी।।
जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां ।
.... हेच प्रेमाविषयी सुद्धा म्हणता येईल.

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील ('बॉलिवुड' ही उथळ संज्ञा रुढ होण्यापूर्वीचा काळ) संगीतकार, कवी, गायक, वादक, अरेंजर इत्यादिंनी आपण वर्णिलेल्या सोज्वळ प्रेमाचे सांगीतिक सादरीकरण कसकसे केलेले आहे, त्यात कोणकोणती वाद्ये कोणकोणी वाजवलेली आहेत, प्रेम, शृंगार इत्यादि भावना कोणत्या शब्दातून, कोणत्या प्रकारच्या संगीतातून व्यक्त केल्या आहेत, यावर एक सुंदरसा लेख, त्या त्या गीतांच्या दुव्यांसह अवश्य या विशेषांकासाठी लिहावा, अशी आग्रहाची विनंती करतो.

अगदी ! प्रेम हे वैश्विक सत्य कोणत्याही नात्यात असेल तर ते फुलते.
आम्हा बायकांचच पहा ना.. घरातल्या डब्यापासून माहेरच्या साडी पर्यंत निर्जीव वस्तूंवर प्रेम असते.मग चालत्या बोलत्या विश्वासू माणसांवर नितळप्रेम करताना कुचराई नसते.:).

आणि हो संगीत ही प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रभावी माध्यम आहे.

https://youtu.be/Cp_T1KVBWGs

अनया बिर्ला हीचे हे गाणं पाहा ..हेच सांगतेय ती.
'let there be love'

चौकटराजा's picture

8 Sep 2020 - 7:20 am | चौकटराजा

@ चित्रगुप्त .. मला अभिप्रेत असलेले प्रेम चित्रसृष्टीत फारसे नाहीच ! एक काबुलीवाला नावाचा बलराज सहानीचा चित्रपट आला होता त्यात एक पठाण काबुली विकणारा व एका मध्यमवर्गीयाची एक छोटी आठेक वर्षाची मुलगी यान्चे प्रेम त्यात होते. पण त्यातही एक असे होते की आपल्या अफगानिस्थानातील मूळ गावी त्याच वयाची त्याची मुलगी असते तिला तो या मुलीत पहात असतो. म्हणजे याला मायेचा अ‍ॅन्गल आला. माया व प्रेम या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत असा माझा अनुभव व निरिक्षण ही आहे. तशी माझी फिलासफी ही आहे. आईला मुलाबद्द्ल वाटते त्याला मी थेट अर्थाने प्रेम म्हणत नाही. प्रेमासाठी कुठलेही नाते नसताना केवळ " मनाचे " नाते असणे आवश्यक असते. सबब प्रेम हे एकतर्फी असले तरी ते अतिशय स्वर्गीय अनुभव देणारे आहे असा माझा अनुभव आहे. उदा माझे एम एस धोनीवर प्रेम असणे म्हणजे नक्की काय ? पुलंवर महाराष्ट्राने प्रेम केले म्हणजे काय ? आपला क्रिकेट सन्घ हरला की काही माणसे निराशेने आत्महत्या करतात म्हणजे काय ? याचा मागोवा घेतला तर आपल्याला कळेल की इथे कोणतेही नाते नाही परिचय नाही , लिन्ग नाही ,जात नाही ,तरीही प्रेम आहे. सबब प्रेमात प्रथम स्थान आहे ते कौतुकाला म्हणजेच गुणग्राहकतेला. " गुणरसपान हेचि सुख प्रेम तया नाम जगी " हे मला पटले आहे ! जी ए कुलकर्णी व सुनिताबाई यान्चा अशा प्रकारच्या गुणरसपान प्रेमाचा सम्बध असावा असे मला वाटते. दुसरे उदाहरण माझ्या ऐकिवात आहे ते असे की सी के नायडू व गुणी शास्त्रीय सन्गीत गायक व संगीतकार मास्तर कृष्णराव फुलम्ब्रीकर . एक गाण्याचा कान असलेला प्रख्यात सिक्सरपटू क्रिकेटर तर दुसरा क्रिकेटचे वेड असणारा गायक . ज्या सामन्यात नायडू खेळत इथे शक्य असले की मास्तर हजेरी लावत. एक सिक्सर मारला की नायडू प्रेक्षकात बसलेल्या मास्तरांकडे एक बोट वर करून सान्गत आज सायंकाळी तुमच्याकडून एक बन्दिश लागू झाली. इथे तर आउ लव्ह यू टू चा साक्शात्कार ! केवळ कौतुक हेच नाते. सबब आत्मरत माणसे प्रेम करू शकतच नाहीत. असा माझा दावा आहे. नवराबायकोचे नाते अनेक पदर असलेले नाते आहे .पण त्यात मी म्हणतो ते प्रेम असेलच असे नाही ,सहवासातून माया तर आपल्याला घरच्या मांजरा कुत्र्याबरोबर देखील असतेच ना ? शेजार्याबद्द्ला ही असतेच ना ? प्रेम करण्यासाठी कवतिकाची द्रुष्टी असावी लागते तसे मनही मोठे असावे लागत. " तू माझा मित्र म्हणून मला आवडतोस ...पण प्रेम नाही माझे तुझ्यावर ! " किंवा " तू जर लग्न करणार नसशील ना ...तर माग आपलं प्रेम आपण इथेच सम्पवू " अशी म्हणनारी व्यक्ती आयुष्यात फक्त प्रेमाचे काही हिशेब मांडू शकते प्रेम करू शकत नाही.

Bhakti's picture

8 Sep 2020 - 9:56 pm | Bhakti

मस्त..

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2020 - 11:26 am | प्राची अश्विनी

विषय एकदम भारी. मेजवानी असेल.

विदेश's picture

23 Sep 2020 - 3:52 pm | विदेश

हार्दिक शुभेच्छा मिपा दिवाळी अंक २०२० साठी !!!

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Sep 2020 - 11:07 pm | बिपीन सुरेश सांगळे

शुभेच्छा !
दिवाळी अंक हा मराठीतला एक ग्रेट प्रकार .
यंदा दिवाळी अंकांची ( मुद्रित ) परिस्थिती खूप अवघड आहे .
त्या पार्श्वभूमीवर मिपाचा दिवाळी अंक हा फारच महत्त्वाचा ठरतो .
खूप लोकांना त्यामुळे वाचनाचे समाधान लाभणार आहे . ही फार महत्त्वाची गोष्ट .
त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा अन प्रतीक्षा .

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2020 - 11:51 am | चौथा कोनाडा

बिपीन सुरेश सांगळे,
आपण छापील दिवाळी अंक व्यवहाराशी संबंधित आहात का ? आपले या मागचे अनुभव आणि या वर्षाचा अनुभव यावर वाचायला आवडेल.

अनिंद्य's picture

28 Sep 2020 - 10:57 am | अनिंद्य

+१

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Sep 2020 - 11:10 pm | बिपीन सुरेश सांगळे

संपादक मंडळ ,

खूप उशिरा प्रतिसाद देतोय . यासाठी मनापासून क्षमा मागतो .

मी कथा दिली तर चालेल का ? कृपया कळावे .
आभार

नावातकायआहे's picture

25 Sep 2020 - 3:24 pm | नावातकायआहे

लेखन देण्याची मुदत : १५ ऑक्टोबर, २०२०.

सुधीर मुतालीक's picture

29 Sep 2020 - 10:49 pm | सुधीर मुतालीक

...पण दिवाळी अन्क सोड्णार नाहीय. कथा पाठवतोय.

चौथा कोनाडा's picture

6 Oct 2020 - 5:13 pm | चौथा कोनाडा

आगामी दिवाळी अंक २०२० च्या लेखक, चित्रकार, संपादक यांना हार्दिक शुभेच्छा !

HDNFH123