दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

लेपाक्षी- हम्पी व परत भाग २

Primary tabs

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
21 Apr 2020 - 11:19 am

भाग 1

.

.

.

लेपाक्षी तसे एक लहांन गाव आहे. गावात मोठे असे स्मारक म्हणजे वीरभद्र मंदिर . तत्पूर्वी या गावाचे विहंगम दृष्य पहाण्यासाठी येथील टेकाडावर जावे लागते.
श्रीरामचंद्र लंकेच्या वाटेवर असताना येथे त्यांची जटायू शी भेट झाली. इथे " त्या" जटायूचे स्मारक व पर्यटनसाठी अतिरिक्त आकर्षण म्हणून एक धोंड्यावर जटायू ची स्थापना केली आहे.
.

शेजारीच असाच एक मोठा धोंडा आहे. प्रथम दगडी पायऱ्या व नंतर लोखंडी जिन्याने वर जाता येते . पण प्रत्यक्ष जटायू ला हात बीत लाऊन पहाता येत नाही .लोखंडी जिन्याने तिथे नेणारे दार बंद असते.
.

.
.

.

.
मी आजूबाजूच्या बागेचे निरीक्षण करीत वर गेलो. दूरवर धोंड्याच्या टेकड्या हंपी प्रमाणेच याही भागात असलेल्या नजरेस पडत होत्या.
खाली हिरवे गार लेपाक्षी गाव दिसत होते.
.

.
.

.
धोंडाटेकडी वर थोडे फोटो काढल्यानंतर मी मोर्चा वीरभद्र मंदिराकडे वळवला. रस्त्यावरून अनेक पायऱ्या चढून गेल्यावर मंदीराचे बाहेर एक आंगण आहे . इथे पारावर सावलीत बसायला छान जागा आहे. मंदिराचे प्रवेश द्वार आकर्षक आहे. मंदिर एका कातळा वरच बांधले आहे. मंदिरात अनेक खांब असलेला मंडप एका पातळीवर असून आणखी पाचेक फुटाच्या जोत्यावर गर्भ गृह उभे केले आहे.
.

.

मंदिराच्या सीमाभिंतीच्या आत पुढे काही आवार नाही पण दोन्ही बाजूला व मागे मात्र भरपूर जागा आहे .डाव्या बाजूने सुरु झालेला ओटेवजा मार्ग पार मागून जाऊन उजव्या कोपर्यापर्यंत येतो .( टिपिकल दक्षिण भारतात मंदिर शैली ).
.
या वीरभद्र मंदिरात , गणपती ची मोठी मूर्त आहे
.

.
तसा खडकातून कोरलेला नागनाथ पण आहे !
.

मंदिराच्या मंडपातील एक खांब तरंगता आहे असे पसरवून मंदिराला काहीतरी दैवी पण जोडण्याचा प्रयत्न पूर्वीपासून झाला. त्यावर असे म्हणतात की एक ब्रिटिशाने त्याचा शोध घ्यायचा ठरविले व तो खांब तरंगता वगरे काही नाही हे सिद्ध केले. मी एकाला विचारले " तो" खांब कोणता . त्याने बोटानेच खांब दाखविला जमीनीवर लोळून पाहिले तर तो एका ठिकाणी जमीनीवर टेकलेला आहे . पण वरून पाहिल्यास तो तरंगता आहे असे वाटते. मी माझी पनामा कॅप खांबाखाली सरकवली तर ती अर्थी अधिक आत गेली.

.

.

.

.

देवळात पेटीत नोट टाकली पण मला गंध लावणाऱ्या भटजी बुवांची मी तबकात पुन्हा पैसे टाकावे अशी अपेक्षा दिसली ,बहुदा तबकातील रकम त्याची निजी कमाई असावी .
.

.

.

.

.

,

देवालयाच्या मागे पण अंगणातच आता नुसते खांब उभे असलेले दिसतात . तरीही ते खूप देखणे आहेत .रात्रीच पाऊस पडून गेला असल्याने सगळे पाण्यात उभे ! त्यांची प्रतिबिंबे उन्हात फार छान दिसत होती. बारा साडे बाराच्या सुमारास या भव्य मंदीराचा निरोप घेऊन परत हिदूंपुरला जाण्यासाठी मार्गस्थ झालो. खाजगी बसे ने केवळ १० रुपयात १३ किमी पार करून रेलवे स्टेशन ला जवळ असलेल्या चौकात उतरलो. अर्ध्या किमी वर स्टेशन आहे असे सांगण्यात आल्यावर एका सावलीदार आणि स्वच्छ मार्गाने चालत निघालो. मी श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यंत भारत पाहिलाय . माझया मते दक्षिण भारतीय हा अधिक स्वच्छता पाळणारा आहे असे दिसते. महाराष्ट्र व उर्वरित भारत फार अस्वच्छता वाला आहे असे माझे ठाम मत झाले आहे. भारतातील रेलवे स्टेशन स्वच्छातेची गुणांकने देखील दक्षिण भारतीय पाटकावून जात असतात. ( भारतातील अत्यंत अस्वच्छ स्थानका पैकी कल्याण जंकशन हे एक मान(?) राखून आहे ! )
.
वीरभद्र मन्दिर . लेपाक्षी .

हिंदूपूर स्थानकात मी पोहोचलो तेंव्हा दुपारचा दीडेक वाजला असावा. मला रात्री बाराचे सुमारास होस्पेट ला नेणारी ट्रेन म्हैसुरू वरून येणार होती. म्हणजे सुमारे ११ तास काहीतरी वेळ घालवत काढावे लागणार होते. फलाटावर एक तरुण बाई आपल्या मुलाला ट्रेन पाहायला आवडतात म्हणून त्या दुपारच्या वेळी तिथे येऊन बसली होती. " तुम्हाला इंग्लिश येते का ?" असे विचारल्यावर तिने होकार दिला . " मग इथे कुठे जवळ थिएटर आहे का ? असे मी विचारल्यावर तिचे मलाच उलटा प्रश्न विचारला " तुम्हाला तेलगू येते का .... नसेल तर काही फायदा नाही ....इथे आम्ही फक्त तेलगू सिनेमे पाहतो ! " तीन तास वेळ घालवायची माझी आशा संपुष्टात आली., मग गावात चक्कर मारून यावे म्हणून रिक्षा करून गावात मार्केट भागात घुसलो . उगीचच हे कसले दुकान आहे ते कसले असे करीत आणखी दोन तास घालवले. गावाचे नाव हिंदुपूर असले तरी वस्ती जास्त करून मुस्लीमांची दिसली. शेवटी कंटाळून संध्याकाळचे सहाचे सुमारास मुख्य लगेज ताब्यात घेऊन रात्रीच्या ट्रेन ची वाट पाहू लागलो .मला उद्या हंपी या माझ्या आवडत्या गावी जायचे होते ना ....?

क्रमशः

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2020 - 11:30 am | चौथा कोनाडा

व्वा हा ही भाग मस्तच ! मागच्या भागात जटायू स्मारक यांचे काही फोटो पाहिलेलेच होते !
वीरभद्र मंदिर खूपच सुंदर. नक्षीवाले स्तंभ खूपच सुंदर आहेत !
पाऊस-साचीव पाण्यातल्या फोटो तर खासच !

एकंदरीत अतिशय रोचक भटकंती !

अनिंद्य's picture

21 Apr 2020 - 12:30 pm | अनिंद्य

सुंदर फोटो.

Camera त्या गरुडशिल्पाच्या प्रेमात पडलाय जणू:-)

विरूपाक्ष मंदिराचे मुख्य द्वार मात्र विजोड दिसते आहे- कालांतरानी बांधल्या सारखे.

प्रचेतस's picture

21 Apr 2020 - 1:42 pm | प्रचेतस

एकदम सुंदर लिहिलंय. इथल्या दगडांवर माझे फार प्रेम आहे.

हंपीतल्या मंदिरांमध्ये असलेले एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरांतले मंडप ते येथेही फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आपण गेलात तो अगदी योग्य सीजन होता. पावसाळ्यात ह्या मंदिरांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पाण्यात प्रतिंबिंबीत झालेले स्तंभ उत्कृष्ट दिसत आहेत. आता विजयनगरची वाट बघत आहे. लवकर लिहा.

कंजूस's picture

21 Apr 2020 - 2:35 pm | कंजूस

आखणीत काही गडबड झाली का? लेपाक्षी - हिंदुपूर दोन दिवस? आणि तेलगू चित्रपट पाहिलेत?

>> अस्वच्छ स्थानकांपैकी कल्याण जंक्शन हे एक पहिला मान(?) राखून आहे ! ) >>>
हो. होते म्हणावे लागेल. आता नाही. कारण मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या इथे येतात, थांबतात. दोन वर्षांपूर्वी रेल्वेडब्यांत बायो टॉईलेट लावले गेल्यानंतर दुर्गंधी गेली. पूर्वी पुण्याचीही हीच परिस्थिती होती.
पुढचे भाग लवकर टाका.
काश्मीर ते कन्याकुमारी कधी लिहिणार?

चौकटराजा's picture

21 Apr 2020 - 4:19 pm | चौकटराजा

लेपाक्षीला एकच दिवस होतो .भाग दोन टाकलेत.

किल्लेदार's picture

21 Apr 2020 - 5:50 pm | किल्लेदार

दहा वर्षांपूर्वी बंगलोरहून सरळ हंपीला गेलो होतो. आता वाटतंय हे सुटून गेलं. असो परत कधीतरी.

जटायूचा एक अतिभव्य पुतळा केरळ मधेही आहे. तोही बघायचा राहून गेलाय. इथल्या पुतळ्याबद्दल काही कथा आहे का?

रच्याकने... माझ्या माहितीत जटायू हा एक गिधाड जातीतला पक्षी होता पण इथला पुतळा काय किंवा केरळचा काय त्याला गरुड दाखवला आहे. राजा रविवर्म्यांच्या चित्रात सुद्धा जटायूला गिधाड म्हणूनच दाखवले आहे.

माझी माहिती चुकीची असेल तर आनंदच आहे आणि बरोबर असेल तर.... आपल्याकडे सगळ्याचाच "आनंद" आहे.

प्रचेतस's picture

21 Apr 2020 - 7:17 pm | प्रचेतस

अगदी.
हाच प्रश्न मनात आला होता. जटायू गिधाड (गृध्र).

ऋतु हिरवा's picture

21 Apr 2020 - 7:06 pm | ऋतु हिरवा

वा छान वर्णन आणि फोटो. आमचा हा भाग बघायचा अजून राहिला आहे

गृध्र म्हटले असले पुराणात तरी एक मोठ्या पक्ष्याचा जातिवाचक शब्द असेल. कारण गिधाड हल्ला करत नाही. गरुडसुद्धा पायांच्या नख्यांचा वापर अगोदर करतो सावजावर. चोचीने वार करत नाही.