प्रचारपत्रकातील नित्याचेच गुळगुळीत विरोधाभास

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Oct 2019 - 12:05 pm
गाभा: 

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांच्या अनेकांपैकी एक गुळगूळीत प्रचार पत्रक हाती पडले. तशी सगळीच निवडणूक प्रचारपत्रके भाबडी असतात त्यांच्या गुळगुळीतपणावर भाळून मतदारराजा किमान काही मते आपल्या झोळीत टाकणार असा त्यांचा विश्वास असतो. निवडणूका म्हणजे हे चालायचेच.

माझ्या वाचनात आलेले ह्या एका निवडणूक पत्रातले एक वाक्य विरोधाभासाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही या अदम्य विश्वासाने छापले आहे. आणि भारतिय मतदारांचे दुर्लक्ष करण्याची पद्धत पहाता हा विश्वास अगदिच चुकीचा म्हणणेही अवघड जाते. असो.

आपल्याच …..परिसराचा स्थानिक आणि घराणेशाही विरहीत सर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा …..परिसराचा स्थानिक कार्यकर्ता!

राजकीय उमेदवार पक्ष आणि मतदारसंघ हे नमुद केले नाहीत कारण रिकाम्या जागा अनेक नावांनी भरता याव्यात.

सर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणार आणि तर घराणेशाही उमेदवारांच्या बोलण्यात सर्वसामान्य हा शब्द राजकीय अपरीहार्यतेमुळे पोपटपंचीच्या स्वरुपात येतो आणि सर्वसामान्य जगणे कमी वाट्यास आल्याने त्यांच्या सर्वसामान्यांच्या समस्या विषयक जाणीवा कित्पत खर्‍या अर्थाने प्रगल्भ असतात या बद्दल मी साशंक असतो. माझा तसा तर्क असतो.

त्यामुळेच राजकीय घराणेशाही विरुद्ध कुणि चुकून बोलले दिसले की मला भावतेच. पण ह्या प्रचारपत्रकात हेच वाक्य खूपच अधिक भावले कारण आपण ज्या राजकिय पक्षात काम करतो आहोत त्याचेही नेतृत्व घराणेशाहीचाच वारसा चालवते या विरोधाभासाकडे दुर्लक्ष करून वाक्य दणकून सोडून दिले. भाबडा मतदार अशा आपल्या बोलण्या आणि वागण्यातील विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतो ह्या बद्दल राजकीय उमेदवारांच्या दुर्दम्य विश्वासाचे कौतुक वाटते.

एकतर सदर उमेदवाराने राजकीय घराणेशाही नेतृत्वास सामाजिक समस्या आणि जाणीवांचा प्रत्यक्ष अनुभव कमी पडतो हे स्विकारताना जो नियम प्रतिस्पर्ध्यास लागू पडतो तोच आपल्याही पक्षाच्या नेतृत्वास लागू पडतो हे स्विकारावयास हवे. पण हे आपले मिपावर व्यक्त होणे याने उमेदवार आणि मतदारराजा दोघांनाही फरक पडत नाही आणि कोणत्याच पक्षातील राजकीय घराणेशाही संपत नाही. पण न व्य्क्त करण्यापेक्षा व्यक्त करणे अधिक उत्तम.

असो.

* व्यक्तिगत टिका शुद्धलेखन आणि व्याकरणचर्चा टाळण्यासाठी अनेक आभार .

प्रतिक्रिया

बुद्धीमंतांच्या बुद्ध्यांकाचा सामान्य मतदारावर शष्प (बरोबर लिहिलाय ना?) परिणाम होत नाहीत.
पुर्वी वृत्तपत्रीय शहाणे बर्‍यापैकी मते फिरवायचे. आता सोशल मिडियाने डायरेक्ट वृत्तपत्रीय शहाण्यांच्या शहाणपणावरच प्रश्नचिह्न उभे केले आहे, त्यामुळे सगळा गोंधळच आहे.
बदलत्या काळात निवडणूका जिंकणे हा पुर्ण वेगळा गेम बनला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Oct 2019 - 4:58 pm | प्रकाश घाटपांडे

+१
मिडियाला गोबेल्स पुरस्कार दिला पाहिजे.

सगळे हुशार लोक लेन बदलतात. सर्व नेत्यांनी या निवडणुकीत विचार फिरवले आहेत.

पण ह्या प्रचारपत्रकात हेच वाक्य खूपच अधिक भावले कारण आपण ज्या राजकिय पक्षात काम करतो आहोत त्याचेही नेतृत्व घराणेशाहीचाच वारसा चालवते या विरोधाभासाकडे दुर्लक्ष करून वाक्य दणकून सोडून दिले.
हा.हा.हा... घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणार्‍या पक्षात देखील घराणेशाहीच असते ! आम्ही नाही, तुम्हीच त्याला निवडले आहे हे रबर स्टँप वाक्य म्हणत रहायचे म्हणजे घराणेशाही नसल्याचा खोटा आव आणण्याचा प्रयत्न करता येतो. युवा नेतॄत्वाला वाव द्यायला हवा असे म्हणायचे आणि घरच्याच व्यक्तीला पुढे करायचे ! कार्यकर्ते बसता तंबु लावत आणि सतरंज्या उचलत ! पोलिसांचा मार देखील कार्यकर्ते मंडळीना बसतो, कोणत्या नेत्याला गेला बाजार नगर सेवकाला पोलिसांची मार दिल्याची घटना माझ्या तरी वाचनात नाही अन् असल्याचे ते अति दुर्मिळ उदाहरण ठरावे.

बाकी, सोवळ्यात राहुन सत्ते बाहेर बसुन पक्षाला हवा असलेला अजेंडा राबवता येत नाही त्यामुळे थोडे ओवळे होवुन सत्तेत राहणे उत्तम हे बीजेपीला समजलेले दिसतेय, थोडक्यात बिजेपीची बिनघराणेशाही नेतॄत्व असलेली कॉग्रेस झाली आहे ! :)

घराणेशाहीवर वाचनात आलेली बातमी :-
राजकारणातील घराणेशाहीला महाविद्यालयीन तरुणांचा विरोध

अवांतर :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coca-Cola's plastic secrets | DW Documentary

प्रकाश घाटपांडे's picture

8 Oct 2019 - 5:02 pm | प्रकाश घाटपांडे

पुरोगामी विचारान्च्या विवेकी कार्यकर्त्यास विजयी करा असा प्रचार दिसत नाहि कुठे?

जॉनविक्क's picture

13 Oct 2019 - 11:22 am | जॉनविक्क

धागा वाचून आनंद झाला

दुर्गविहारी's picture

14 Oct 2019 - 9:00 pm | दुर्गविहारी

निवडणुकीचे प्रचारपत्रक दिसले कि तातडीने फेकून देतो, वाचायचे कष्टही घेत नाही

नाखु's picture

15 Oct 2019 - 7:41 am | नाखु

असे न वाचता टाकू नये,गुळगुळीत कागद असेल तर तेलाच्या डब्याच्या खाली ठेवावे, थेट गेलात तेल लावत हे प्रात्यक्षिकात दाखविल्याचे समाधान मिळते आणि तेलकट डाग पडत नाहीत जमीनीवर!!!

सर्वसामान्य माणसाला असलेले प्रश्न भेडसावत असलेला अतिसामान्य पांढरपेशा निखु