रसम पुरी

Primary tabs

रमेश आठवले's picture
रमेश आठवले in पाककृती
13 Aug 2019 - 10:19 pm

आपण सर्वजण पाणी पुरी आवडीने खातो. दक्षिण भारतात जेवणात रसम वाढतात, आणि काही हॉटेलात रसम वडा असा प्रकार ही मिळतो. ह्या रसम ची द्रवता पाणी पुरीतल्या पाण्या सारखी असते.
आज माझ्या पत्नीने घरी रसम बनवले होते. एम टी आर चे मद्रास रसम चे पॅकेट वापरले . त्यावर दिलेल्या कृती प्रमाणे हे रसम बनवले. त्याच्यात चिंच आणि गुळाचे पाणी घालायलाही सांगितले आहे. त्यांनी मसूर डाळ वापरायला सांगितले आहे. पण आपण साधे वरण किंवा बेसन वापरून हे रसम बनवु शकतो.पाणी पुरीच्या पुरी मध्ये हे रसम नेहमीच्या पाण्या ऐवजी घालून खाल्ले. हा वेगळा उपक्रम मला आवडला. आपणही अजमावून पहा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Aug 2019 - 11:18 am | ज्ञानोबाचे पैजार

पाणीपुरीच्या पुरीत अजूनही बरेच पदार्थ घालून खाता येईल. जसेकी गोडं वरण, कटाची आमटी, मिसळीचा कट, तांबडा पांढरा रस्सा इत्यादी.

सणासुदीला पुरीत पियुष, वाडीची (सु)प्रसिश्द बासुंदी, अंगुर मलाई, सुधारस, केळ्याची शिक्रण इत्यादी घालुन खाता येईल.

पाणी पुरीच्या पाण्यात "वृध्द संन्यासी" मिसळावी. आहाहा.. पाणी पुरीखायची वेगळीच मजा येते.

पैजारबुवा,

जालिम लोशन's picture

14 Aug 2019 - 3:20 pm | जालिम लोशन

आणी?

मदनबाण's picture

14 Aug 2019 - 11:05 pm | मदनबाण
रमेश आठवले's picture

15 Aug 2019 - 1:21 am | रमेश आठवले

माझ्यावतीने रसम चा फोटो आपण टाका.

पैलवान's picture

15 Aug 2019 - 2:30 pm | पैलवान

रस्सम हे एक स्वर्गीय पेय आहे.
एक वर्ष मद्रदेशी काढल्याने ऑथेंटिक तामिळ जेवण प्रचंड आवडते. अजूनही जेव्हा जाणं होतं, तेव्हा आवर्जून स्थानिक जेवण करतो.

अवांतर - आंध्र मेस मधलं जेवणसुध्दा छान असतं. मगरपट्टाच्या DC मधलं आंध्रा मेस भारी आहे.

मनिम्याऊ's picture

20 Aug 2019 - 10:01 am | मनिम्याऊ

रस्सम हे एक स्वर्गीय पेय आहे.
+++ infinity

अनिंद्य's picture

20 Aug 2019 - 5:24 pm | अनिंद्य

....रस्सम हे एक स्वर्गीय पेय आहे....

बरोबर !

शेखरमोघे's picture

15 Aug 2019 - 10:43 pm | शेखरमोघे

रसम वापरणे हा छान आणि सोपा बदल!

एकदा उपहारगृहातली पाणी पुरी तिखट लागली म्हणून मुलीने आमच्या थाळीतली शेवयाची खीर पाणीपुरीतल्या पुरीत भरून खाल्ली. ती तिला अतिशय आवडल्याने तिने आम्हालाही आग्रहाने त्याच प्रकारे खायला लावली. एकूणच प्रकार मस्त लागला.

जॉनविक्क's picture

15 Aug 2019 - 10:45 pm | जॉनविक्क

अमृताची गोडी म्हणतात ती हीच असा अनुभव येईल. (अमृता कोण हे विचारु नए)

मृणमय's picture

1 Oct 2019 - 11:08 am | मृणमय

रस्सम चे अनंत प्रकार आहेत, मी चेन्नई ला ५ वर्ष राहिली असल्याने खूप वेगवेगळ्या प्रकारचे रस्सम चाखायला मिळाले.
शुक्रवारी हॉस्टेल मध्ये भजन असायचे आणि त्यानंतर पुरी भाजी आणि पायसम असायचे, अक्ख्या हॉस्टेल मध्ये मी एकटीच रस्सम पुरी आणि पायसम खाणारा नमुना होते.