सोसायटी - अतिरेकी सुविधा आणि त्याचा मेंटेनन्स

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
2 May 2018 - 6:54 pm
गाभा: 

अनेक ठिकाणी लक्सरी सोसायटी होत आहेत आणि त्यात भन्नाट सोइ सुविधा दिल्या जात आहेत . स्विमिंग पूल अनेक ठिकाणी कॉमन आहेत . आता एक क्लब हि असतो ज्यात जिम बरोबर सॉना आणि जाकुझी हि असते. चाक चकित लॉबी असते. अनेक लोकांची सेक्युरिटी असते. काही ठिकाणी छान ग्राउंड , टेनिस कोर्ट , बास्केटबॉल कोर्ट आणि अगदो छोटा गोल्फ कोर्स असलेली घरे येत आहेत .

आता एक लक्षात घ्या कि "फुकट काही हि नसते" आणि या सर्व सुविधा तर नक्कीच नाही . याना प्रचंड मेंटेनन्स कोस्ट असू शकते. तसेच अनेक सुविधा काही वर्षात प्रचंड खर्च काढू शकतात . काही उपकरणे नियमित वापरली नाहीत किंवा मेंटेन केली नाहीत तर प्रचंड खर्च काढतात किंवा नवीन च घ्यावी

आणि महागाई वाढत असल्याने कधी कधी अशा सोसायटी चा मेंटेनन्स काही वर्षाततच प्रचंड वाढू शकतो . काही पटीत सुद्धा . आता ज्यांना परवडत नाही त्या बाबतीत दोन गोष्टी होऊ शकतात - अनेक श्रीमंत लोकांना हे परवडते आणि ज्यांना परवडत नाही त्या वर दबाव येतो . काही वेळा लोकांनी घरे विकली हि आहेत , आणि ते योग्य हि असू शकते.

किंवा जिकडे बहुसंख्य लोकांना परवडत नाही तिकडे या असुविधा पडून रहातात . एके काळी घर शोधत असताना अशा अनेक सोसायटी पहिल्या होत्या ज्यात स्विनींग पुल कोरडे होते , जिम गन्जत पडल्या होत्या , सोसायटी घाण झाली होती !

तेंव्हा

१) जर परवडत असतील आणि वापरणार असाल तर अशा ठिकाणी घर घ्या
२) खूप मेंटेनन्स पडत असेल याची तयारी ठेवलं , आणि तो वाढणार याची तयारी ठेवा
३) फार त्रास होत असेल तर घर बदलणे हा पर्याय असू शकतो
४) अशा सुविधा वाल्या सोसायटीत पूर्ण बनल्यावर घर घेत असाल आणि सुविधा पाहिजे असेल तर या सुविधा कशा मेंटेन केल्या आहेत ते बघा . कोरडा स्विमिंग पूल , घाणेरडे आवार , गांजलेली जिम हे या सुविधा बिलकुल मेंटेन होत नाही याची लक्षणे आहेत . आणि त्या लवकर परत सुरु होतील या वर विश्वास ठेवू नका .. बंद सुविधा कधीरी फार घाण दिसतात किंवा धोकादायक ठरू शकतात ( कोरडा स्विमिंग पूल)

मेंटेनन्स एव्हडा वाढला आहे कि मुंबई काही ठिकाणी १५ ते ३० हजार मेंटेनन्स येऊ शकतो !!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 May 2018 - 9:25 pm | कंजूस

खरं आहे पण सुटका नाही.
फुकट काही नाही हे बरोबर पण कमिशनच्या,मार्केटिंगच्या जाळ्यात सर्वच ओढले जातात.

खटपट्या's picture

3 May 2018 - 11:40 am | खटपट्या

घर घेताना जर स्विमिन्ग पूल आणि जीम यासारख्या सुविधा असतील तर त्याचा मेंटेनेन्स कीती आहे याची विचारपूस करुन तेवढा मेन्टेनन्स आपण दर महिन्याला देउ शकतो का हे पाहून घर घ्यावे.
कोरडा स्विमिंग पूल आणि गंजलेली जीम यासाठी अन्य कारणे असू शकतात.
१. स्विमिंग पुलाला लागणारे पाणी उपलब्ध नसणे. सद्या प्यायला पाणी मिळताना मारामार
२. गंजलेली जीम - नवीन सोसायटी असते तेव्हा बरेच लोक हौसेने तरणतलाव आणि व्यायामशाळेचा वापर करतात. नंतर फक्त १० टक्के लोक नियमीत येत रहातात. मग बाकीच्या ९० टक्के लोकांच्या पोटात दुखू लागते. या १० टक्के लोकांसाठी आम्ही का खर्च करायचा? हा खर्च कमी केला तर मेन्टेनन्स कॉस्ट कमी होउ शकते वगैरे विषय पुढे येतात. ९० टक्के लोकांची सरशी होते. आणि जीम आणि तरणतलाव यांच्यावर होणार्‍या खर्चाला काट मारली जाते. ''ज्यांना गरज आहे त्यांनी खर्च करावा'' असे सल्ले दिले जातात. परिणामी खूप खर्च करून बांधलेल्या या सुविधा तुला न मला घाल कुत्र्याला या उक्तीने पडून रहातात. यात ज्या ग्राहकाने जीम आणि तरणतलाव बघून घर घेतलेले असते त्याची घोर निराशा होते. वर बाग, तरणतलाव आणि जीम या सुविधा ओस पडल्याने सोसायटीतील घरांचे भाव खाली येतात हे ९० टक्के लोकांना उमगत नाही.
यावर उपाय म्हणून आजकाल काही विकासक एक ठराविक रक्कम आधीच फ्लॅटधारकाकडून घेउन बँकेत ठेवतात व त्याच्या व्याजावर या सुविधांची देखभाल करतात.

अनिंद्य's picture

3 May 2018 - 1:17 pm | अनिंद्य

दिल्ली-मुंबईत अनेक मोठ्या संकुलांमध्ये क्लबहाऊस - स्विमिंग पूल वगैरेची देखभाल आउटसोर्स केलेले बघितले आहे. त्यामुळे देखभाल, स्टाफनियुक्ती आणि नियमांचे पालन सोपे पडत असावे.

मराठी कथालेखक's picture

3 May 2018 - 12:42 pm | मराठी कथालेखक

स्विमिंग पूल तर सर्वात त्रासदायक आहे.. हे मेंटेन केले तरी सोसायटीतले अनेक लोक नियम पाळत नाहीत (स्विमिंग सूट , डोक्यावर टोपी ई) त्यामुळे खूप घाण होत रहाते.
जिम असल्यास मोजकीच पण उपयोगी पडणारी आणि कमी खर्चिक उपकरणे असावीत

सोसायटीत स्विमिंग पूल असावा बायकांची भारी हौस असते पण लज्जे कारणाने माझ्या पाहण्यात कोणीही त्याचा सहसा उपयोग करत नाहीत.
नोकरी हमालाला तर खायची फुरसत नसते तो काय पोहायला जायचा!

चिनार's picture

5 May 2018 - 2:46 pm | चिनार

सहमत

अभिजीत अवलिया's picture

5 May 2018 - 3:10 pm | अभिजीत अवलिया

१५ % ऍमेनिटी स्पेस ठेवणे सोसायटीला बंधनकारक झाल्याने जिम, स्विमिन्ग पूल, बाग, क्लबहाउस अशा सुविधा निर्माण केल्या जातात. दर वर्षीचा १ जानेवारी ते ५ जानेवारी हा नवीन वर्षाचा संकल्प करण्याचा काळ उलटला की दोन चार टाळकी सोडली तर कुणीही जिमकडे ढुंकून बघत नाहीत. स्विमिन्ग पूल तर फक्त उन्हाळ्याचे २-३ महिने वापरला जातो. मग वर्षभर २-४ लोकांसाठी खर्चाचा भार सगळ्यांनी का उचलायचा ह्यावर वादावादी सुरु होते. त्यातच सोसायटीत निवृत्त लोक असतील तर अशा लोकांचे बजेट बऱ्याचदा स्वाभाविकपणे टाईट असते. त्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत राहतो. लहान मुले असतील तर त्यांच्यावर खूप लक्ष ठेऊन राहावे लागते. त्यामुळे ऍमेनिटी स्पेस मध्ये जिम किंवा स्विमिन्ग पूल करण्यापेक्षा हवे तर फक्त मोठं मोठी झाडे लावावीत किंवा तशीच ओपन स्पेस ठेवावी खेळायला व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दर २ किमी त्रिजेच्या परिसरात लोकसंख्येच्या घनतेनुसार बाग, स्विमिंग पूल ह्या सुविधा विकसित करता येईल असे पाहावे.