ऑफिसातलं ईलू-ईलू...!

पारोळेकर's picture
पारोळेकर in काथ्याकूट
25 Oct 2008 - 4:46 pm
गाभा: 

आजच्या ग्लोबल युगात केव्हा, कुठे काय होईल, हे सांगने कठीन ! आपल्या ऑफिसात कुठल्या तरूण- तरूणीचे ईलू- ईलू सुरू असेल तर त्यात ते काय चुकीचे करीत आहेत. 'प्रेम' हे जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. ते फूल कॉलेजात तर कधी जॉब करत असलेल्या ऑफिसातही उमलते. कारण प्रेमाला कुणाचेही बंधन नसते.

ग्लोबलायझेशनमुळे शासकिय असो अथवा खाजगी कार्यालयात पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात. शिक्षण व आधुनिकतेने युगाचा पार चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या आजी-आजोबांच्या जमान्यात स्त्रीचं जीवन म्हणजे 'चूल आणि मूल' ऐवढेच होते. घराच्या चौकटीतून पाऊल बाहेर काढायचे नाही तर मुलींना गावात ज्या इयत्तेपर्यंत शाळा आहे त्या इयत्तेपर्यंत शिकविले जात होते. मात्र आजच्या आधुनिक ‍स्त्रीने बुरसटलेल्या चालीरिती व परंपरेने मढवलेली घराची चौकट कधीच ओलांडून पुरूषवादी संस्कृतीला 'ओव्हर टेक' करत पुरषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्याच्यापुढे एक पाऊल टाकत जॉब करत आहे. आज प्रत्येक कार्यालयात तरूण-तरूणी सोबत काम करताना दिसतात. त्यामुळे ऑफिसातील वातावरणात कमालीचा बदल होत असतो.

आजच्या तरूणी घरातील वातावरणात जास्त वेळ घालवण्यापेक्षा घराबाहेरच जास्त वेळ राहणे पसंत करतात. फॅशनेबल राहणीमान, हातात मोबाईल ही आधुनिक तरूणीची ओळख झाली आहे. आज जवळ-जवळ सर्वच आधुनिक ऑफिसांमध्ये 'बॉसगिरी' नसल्याने तरूण- तरूणी बिंधास्त ईलू- ईलू सुरू असते. स्मार्ट वर्क व फॅशनेबल राहणीमाणाने तरूणी तर बॉसवर एक प्रकारची मोहिनी टाकतात. अगदी खिळीमिळीच्या वातावरणात कार्यालयीन काम सुरू असते. प्रेमासाठी तर हेच वातावरण पोषक असते. ऑफिसात युवा पीढी मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. समवयस्क सहकार्यामध्ये आकर्षण निर्माण होते व प्रेमाचे फूल ऑफिसाच्या चौकटीतच उमलायला सुरवात होते.

अशाच 'तो' आणि 'ती' यांचं ऑफिसातलं ईलू-ईलू....
'तो' आणि 'ती' एकाच शहरातील, मात्र यांनी कधी एकमेकांना पाहिलेले नव्हतं. एकदा ते दोघं मारूती शोरूममध्ये इंटरव्हूसाठी आले होते. जागा तशी एकच भरायची होती. मात्र दोघांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांना थोडे थांबायला सांगण्यात आले होते. आणि आश्चर्य दोघांचे सिलेक्शन झाले. अन् झालं तेथेच ते एकमेंकांच्या प्रेमात पडले.
त्या दिवशी ते ऑफिसातून सोबतच बाहेर पडले.... अन् मग झालं गुटूर गू... सुरू! सोबत येणे, ऑफिस टायमिंग मधले फूरसतीचे क्षण वेचून इंटरकॉमवरून एकमेंकांशी गप्पा मारणं, लंचला सोबत तर ऑफिस सुटल्यानंतर एकाच बाईकवर कातरवेळी लॉंग ड्राव्हूवर जाणं, हा प्रोग्राम तर त्यांचा नित्याचाच ठरलेला असायचा! पण काम कुठल्याच प्रकारचा कामचूकार पणा ते करता नव्हते. मात्र, त्याचं प्रेमप्रकारण पार मॅनेजरपर्यंत पोहचलं, व त्यांना नोकरीवरून एके दिवशी त्यांना कमी करण्यात आलं आणि अन् दोन्ही पाखरं भुर्रररर उडून गेली...

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

25 Oct 2008 - 4:55 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
खिळी = कडी
खिळी घालुन मिळी होते ते कार्यालयिन काम कसे?
बॉसगिरी आणि इलु इलु चा संबंध काय?
ज्याना इलु इलु करायचे असते ते बॉसला फाट्यावर मारुन करतात की.
आता सिप्ला चा शेअर घेणार.

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 4:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>आता सिप्ला चा शेअर घेणार.

;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 4:59 pm | जैनाचं कार्ट (not verified)

पोपट उडाला ...

***
चुकुन दोनदा आलेला होता !

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:00 pm | अवलिया

चुकुन दोनदा आलेला होता !

कोण पोपट?

अवलिया's picture

25 Oct 2008 - 4:58 pm | अवलिया

खिळी घालुन मिळी होते ते कार्यालयिन काम कसे?
ते कार्य लयीने असते

बॉसगिरी आणि इलु इलु चा संबंध काय?
बॉसला चानस नाही मिळाला ना...

ज्याना इलु इलु करायचे असते ते बॉसला फाट्यावर मारुन करतात की.
जावु द्या ते नवीन असतील या क्षेत्रात...

आता सिप्ला चा शेअर घेणार.
मागेच सांगितले तुम्हाला.. पण तुम्ही नानाचे ऐकत नाही.

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 4:56 pm | जैनाचं कार्ट (not verified)

ह्यात काथ्याकुट कोणावर करायाचा आहे ?

त्या कबुतर जोडीवर ?
त्या मॅनेजर वर ?
की ईलु ईलु वर ?

:?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

25 Oct 2008 - 4:59 pm | अवलिया

लेखकाच्या हेतुवरच करुयात...

हा लेख का लिहिला असेल?

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:01 pm | जैनाचं कार्ट (not verified)

उडालेल्या कबुतरांचा पुन्हा शोध घेण्यासाठी :?

**
सिप्लाचा भाव काय आहे भाउ !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:02 pm | अवलिया

पाकिटाचा की शेअरचा?

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:03 pm | जैनाचं कार्ट (not verified)

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:02 pm | जैनाचं कार्ट (not verified)

पुन्हा आला पोपट !

**
तात्या काही तरी अडचण आहे... दोन दोनदा प्रतिसाद प्रकाशित होत आहे हो !

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:06 pm | अवलिया

वरच्या कथेतले कबुतरे बहुधा झेरोक्स मशीन चालुच ठेवुन पळालेले दिसत आहेत.
त्यामुळे दोन दोनदा येत आहेत.

फटू's picture

26 Oct 2008 - 8:16 am | फटू

आपल्याला तर बाबा हा प्रतिसादच मुळ लेखापेक्षा कितीतरी उजवा वाटला :)

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

विनायक प्रभू's picture

25 Oct 2008 - 5:02 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
नविन कनिक्सन झाले असावे.

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:04 pm | अवलिया

नविन कनिक्सन झाले असावे.

म्हणुन यांचे निक्सन झाले असे ... का य ते नी ट सां गा ना वि प्र...

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:05 pm | जैनाचं कार्ट (not verified)

क्रिप्टीक आहे ते .. नाना !
समजा करो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विनायक प्रभू's picture

25 Oct 2008 - 5:12 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
घ्या पारोळेकर आता तुम्हाला दिवाळीला फराळ भरपुर मिळ्णार. स्मार्ट वर्क, फॅशनेबल
राहणीमान आणि बॉसवर मोहिनी एवढे डायरेक्ट.

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:14 pm | जैनाचं कार्ट (not verified)

प्रभु ! देवा ! स्वामी !

विमान लई वरणं गेलं ! वाईच जरा खाली घेता का ? आमच्या टक्कु-यात काहीतरी येऊ द्या की ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:18 pm | अवलिया

क्रिप्टीक आहे ते .. राजा !
समजा करो !

(मगाचा बदला =)) )

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:19 pm | जैनाचं कार्ट (not verified)

च्यामायला !

लई भारी !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

फटू's picture

26 Oct 2008 - 8:18 am | फटू

हे सुदधा भारी नाना... =))

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

अवलिया's picture

25 Oct 2008 - 5:27 pm | अवलिया

मंडळी

हे लेखक पारोळेकर महाशय यांच्या व्यवसायाचे/कामाचे स्वरूप प्रोफाईलमधे दिले असे

उपसंपादक ,
मराठी पोर्टल,
वेबदुनिया डॉट कॉम प्रा.लि.
इंदूर (मध्यप्रदेश)

http://marathi.webdunia.com/miscellaneous/lovestation/

इथे बघाल तर यांचे मागील लेख इथुनच कट पेस्ट केलेले होते.

तात्या किंवा संपादक मंडळी , जरा बघा बरे ...

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

नाना ,

पोपट झाला की रे साहबांचा =))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

फटू's picture

26 Oct 2008 - 8:19 am | फटू

पारोळेकर साहेबांचा सुदधा पोपट झाला...

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

वेताळ's picture

25 Oct 2008 - 7:19 pm | वेताळ

ऑफिस टायमिंग मधले फूरसतीचे क्षण वेचून इंटरकॉमवरून एकमेंकांशी गप्पा मारणं,
म्हणजे नेमके कोणते फुरसती क्षण ऑफिस मध्ये मिळतात.(महिनाभर बॉस तिचा फोन ट्राय करत असणार ,पण सदा बिझी लागत असणार)
लंचला सोबत

मग बॉस काय शिपायाबरोबर लंच घेणार काय?
ऑफिस सुटल्यानंतर एकाच बाईकवर कातरवेळी लॉंग ड्राव्हूवर जाणं

मग बॉस ला चांदनी बार शिवाय जवळचा पर्याय नाही.
त्याचं प्रेमप्रकारण पार मॅनेजरपर्यंत पोहचलं, व त्यांना नोकरीवरून एके दिवशी त्यांना कमी करण्यात आलं

जे काम करायला स्टाफ घेतलेला तर तेच काम जर बॉस लाच स्टाफ असताना करायला लागत असेल तर त्याना कामावरुन कमी करायला काय हरकत?
एकदा ते दोघं मारूती शोरूममध्ये इंटरव्हूसाठी आले होते. जागा तशी एकच भरायची होती. मात्र दोघांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांना थोडे थांबायला सांगण्यात आले होते. आणि आश्चर्य दोघांचे सिलेक्शन झाले.

एकाच जागेसाठी दोघाना घेतले..बॉस चा उदांत हेतु त्याच्या लक्षात आला नाही.म्हणुन हाकलले.
वेताळ

विनायक प्रभू's picture

25 Oct 2008 - 7:25 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मंदी मुळे पगार द्यायला पैशे नाय म्हणुन काढले. ईलु ईलु चा संबंध कायच नाय.

नीधप's picture

25 Oct 2008 - 8:54 pm | नीधप

काय येडेपना हे राव?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 7:52 pm | सखाराम_गटणे™

तुम्ही जे सांगितले आहे, ते इलु इलु साधेच आहे.
त्यापेक्षा भारी इलु इलु आम्ही बघितले आहेत.

---

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

विनायक प्रभू's picture

26 Oct 2008 - 8:23 pm | विनायक प्रभू

गटणे आता किती दिवस बघे राहणार

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 8:26 pm | सखाराम_गटणे™

खवतील संदेश वाचा.

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

१.५ शहाणा's picture

28 Oct 2008 - 7:27 pm | १.५ शहाणा

आता सिप्ला चा शेअर घेणार.
मागेच सांगितले तुम्हाला.. पण तुम्ही नानाचे ऐकत नाही.

ची ची गरज आहे का ? (आय पील हे सिप्लाचे उत्पदन आहे )