करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
16 Mar 2018 - 9:52 am
गाभा: 

नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या.

अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा

धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा

ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला ! मुंबईत ते लोकल मध्ये जाहिरात करणार्‍या गोल्ड मेडालिस्ट बाबा #वशीकरणस्पेशालिश्ट "मेरे किये काम को काटने वाले को नगद ईनाम" फेम साईबाबांनाचा ट्रेडमार्क पैसे न देता वापरणार्‍या बाबांचे लोण प्रत्यक्ष पाहिले होते पण ही लाट आमच्या पुण्या पर्यंत पोहचली असेल असे वाटले नव्हते !

बाकी रंगीबेरेंगी जादु चे आम्ही आधीपासुनच फॅन आहोत ! मिपावर आल्यापासुन आम्ही लाल जादु नक्की शिकलो , मित्रांच्या कट्ट्यांमध्ये चीअर्स म्हण्त सोनेरी रंगाची जादु शिकलो , पण महत्वाचा शौक म्हणुन आम्ही आमची गणिताची नीरस जादुच शिकत राहिलो. त्यानिमित्ताने हिरव्या रंगाची जादु अशी जमली की बास , मजा आगया ! गुलाबीरंगाची जादुही अगदीच एक्स्पर्ट नाही पण, सांगता येईल इतक्या बर्‍यापैकी जमुन गेली ! पण ह्या सार्‍या नादात काळ्याजादुचा अभ्यासच करायचा राहुन गेला !

ते असो !

नुकतेच मराठी वृत्तपत्रात ह्या बातम्या वाचल्या पासुन काळ्याजादुचे मार्केट वर आल्याचे जाणवते, तसेहि इकडे हिरव्या जादुचे गारुड आमच्या मनावरुन उतरायला लागले असल्याने आम्ही काळी जादु शिकायचे मनावर घेतले आहे . मिपावर सर्व विशयांचे जाणकार आहेतच ! सवज्ञही होते पण त्यांच्यावर परत एकदा भानामती झाल्याचे ऐकीवात आले आहे ! म्हणुन गुगल करण्या आधीच इथे विचारावे म्हणले !
क्रुप्या सर्वांनी गांभीर्याने मदत करावी . काळीजादु कशी करावी, संदर्भग्रंथांची नावे लिन्का सुचवाव्यात . प्रयोग सुचवावेत . भानामतीची पाककृती द्याव्यात .
अगदीच काहीच खात्रीलायक माहीती नसल्यास जानापावट्यास्टाईल अर्धवट माहीतीवरुन दिलेले अर्धवट लेखन प्रतिसादही चालतील , बाकीचे आम्ही शोधु.

आता काळी जादु शिकायची मनावरच घेतले आहे तर प्रयत्न तर केचे पाहिजेत ना !

अभ्यासपुर्ण प्रतिसादांच्या प्रतिक्शेत ...

#हस्ताक्षरास_हस_नये

प्रतिक्रिया

चिर्कुट's picture

16 Mar 2018 - 10:00 am | चिर्कुट

आफ्रिकेच्या जंगलात मुक्काम हलवावा... तिथेच एखादा गुरु मिळेल.
ही विद्या गुरुकडूनच शिकावी लागते, स्व-अभ्यासाने करायला जाल आणि भलतंच करुन बसाल.

नाहीच तर 'ब्लॅक लेबल'चा सहारा घ्या. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2018 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.

-दिलीप बिरुटे
(मिपा मांत्रिक) ;)

पगला गजोधर's picture

16 Mar 2018 - 10:08 am | पगला गजोधर

एखाद्या ओळखीच्या डॉ शी संपर्क करा...

काही डॉ शिक्षित असतात सुशिक्षित असतीलच याची खात्री नाही. आता आपण आजूबाजूला पाहतोच आहोत.
सर्वसामान्य लोकं डॉ म्हणतील त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात, सगळ्याच डॉ ना सगळ्याच गोष्टीतले सगळे कळते असे नसतानाही.
का तर त्यांच्या नावापुढे डॉ असं लिहिलेलं असते.
काही डॉ याचाच फायदा घेऊन, शाहजोग पणे मिरवत असतात.
. असो आता,
आपल्या अंधःकारमय बुरसटलेल्या विचारांच्या मनोवृत्तीत खोलवर डुंबणारे लोक्स, आता आपल्या गटारी शब्दांचे टोर्पिडो माझ्यावर डागण्याआधीच, प्रतिक्रिया संपवतो.

गणामास्तर's picture

16 Mar 2018 - 10:14 am | गणामास्तर

अमावास्येच्या रात्री गावापासून लांब बाहेर झाडावर बसावे. रानातून गुरे,मेंढरे गावाकडे परतत असताना एडक्यावर बसून भैरवनाथ येतो, त्याची टोपी काढून घ्यावी आणि परत देऊ नये. भैरवनाथाने टोपी परत मागितल्यावर पाहिजे ते - पैसा,परदेशवारी, इच्छित स्त्री, वशीकरण विद्या वैग्रे वैग्रे मागून घ्यावे.
जोवर टोपी तुमच्याकडे आहे तोपर्यंत कसलीही कमी पडणार नाही.
नाय तर पुढच्या वेळी वारीला चालत चालत जा आणि तिथून 'इंद्रजाल' हे पुस्तक विकत आणा.

सिद्धार्थ ४'s picture

16 Mar 2018 - 1:59 pm | सिद्धार्थ ४

त्यांना पुरुष हवा असेल तर?

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 9:26 pm | प्रसाद गोडबोले

भैरवनाथ टोपी ह्या प्रकरणावर जरा डिटेल मध्ये प्रकाश टाकता मास्तर ? आम्हाला काहीच माहीत नाही !

नि३सोलपुरकर's picture

16 Mar 2018 - 10:27 am | नि३सोलपुरकर

मार्क ,
व्हाट्स अप ग्रुप बनवूया का इच्छुकांचा .

नि३
('ब्लॅक लेबल' ची जादु शिकण्यास इच्छुक असणारा )

जेम्स वांड's picture

16 Mar 2018 - 11:31 am | जेम्स वांड

१. स्मिता पाटील
२. चित्रांगदा सिंह
३. बिपाशा बासू

बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल

ओम शांती

जेम्स वांड's picture

16 Mar 2018 - 11:33 am | जेम्स वांड

१. स्मिता पाटील
२. चित्रांगदा सिंह
३. बिपाशा बासू

बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल

ओम शांती

पगला गजोधर's picture

16 Mar 2018 - 12:00 pm | पगला गजोधर

ak

माहितगार's picture

16 Mar 2018 - 12:11 pm | माहितगार

शारिरीक अथवा आर्थिक दुखापत होत नाही तो पर्यंत अशुद्ध लेखन चालते त्याच प्रमाणे शारिरीक अथवा आर्थिक दुखापत करणार्‍या मार्कटास वर आणण्याची मार्केटास कायद्याची अनुमती नाही हे लक्षात घ्या, अन बाकी चालू द्या.

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 9:24 pm | प्रसाद गोडबोले

जादुटोणा विरोधी कायदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे माहीतगार साहेब !

जर जादु करतो म्हणुन एखद्यवर कारवाई करत असाल तर जादु नावाची गोष्ट असते हे मान्य करा ,

जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ? लोकांचे आपले स्वात्मरंजन चालु आहे त्या साठी?

माहितगार's picture

18 Mar 2018 - 8:04 pm | माहितगार

....जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ?

खरे आहे असा खोटा विश्वास निर्माण करून आर्थिक फसवणूक अथवा शारिरीक इजा पोहोचवल्या जाऊ नयेत हा उद्देश , मला वाटते रास्त असावा.

आता सध्या चर्चीत केस मध्ये सध्याच्या दृष्यातून फक्त दृष्ट काढण्याजोगी क्रिया दिसते. ते तेवढेच मर्यादीत असेल तर संबंधीत कायद्याचा आक्षेप नसावा ( मिडियाने राळ उडवणे वेगळे) . पण केवळ दृष्ट काढण्याने व्यक्ती बरी होणार आहे असे सांगून आर्थिक फवणूक केली गेली अथवा शारिरीक इजा कुणासही पोहोचवली गेली तर कायदा अ‍ॅप्लिकेबल होऊ लागेल.

मला वाटते घरच्या व्यक्तीने तीट लावणे अथवा घरच्या व्यक्तीने नजर उतरवण्याच्या अघोरी नसलेल्या अथ्वा शारिरीक इजा न पोहोचवणार्‍या कृतीना (जसे तीट लावणे भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणे इत्यादी) कायद्यातून स्पस्।ट पणे अपवाद दिले जावयास हवे असे वाटते.

शारिरिक इजा बाबत सहमत , आर्थिक फसवणुकी बाबत असहमत !

आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! अगदी सत्यनारायण सारखी तत्वहीन पुजा घालणार्‍या पासुन ते लेटर ऑफ क्रेडिट्स घेवुन करोडोंचे घोटाळे करणार्‍यांपर्यंत सर्वच जण ह्या ना त्या प्रमाणात कोणाची ना कोणाची तरी आर्थिक फसवणुक करत असतातच !

काही उदाहरणे देत आहे :

महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ? इंजिनियर्स ची ही कथा तर बाकिच्यांची काय ?

आम्ही इतका कचकुन टॅक्स भरतो पण आमच्या हिंजवडीला जायचा रस्ता कायम खड्डेदार ! कोपर्‍याव्र हवलदार कायम चाय पाणी वस्सुल करायला उभा ! ही आमची आर्थिक फसवणुक नाही काय ? शिवाय आमचे लोन माफ करायसाठी कोणी मोर्चेही काढत नाही , उलट इतरांच्या मोर्च्यातल्या नुकसानाचा आर्थिक भुर्दंड आम्ही टॅकस च्या वाढीव रुपाने इन्डायर्क्टली आम्हीच भोगत असतो .

आमच्या कासवर पर्यावरण च्या बचावाच्या निमित्ताने १०० रुपये प्रवेश फी , इतकी तर ताजमहललाही नाही ! शिवाय कॅमेराची वर्णव्यवस्था लावुन त्यांना फी ! कॅमेराने काय प्रदुषण होते देव जाणे ! बर फी घेतलीत , सुविधा काय दिल्या ? डोंबल ? ही आर्थिक फसवणूक नाही का ?

डबल टॅक्सेशन विषयी बोलायला लागलो तर तो एक वेगळा विषयच होइल !

थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच !

सगळे करतच आहेत तर मग मांत्रिकांनी काय घोडे मारले आहे ? त्यांनाही करु दे . जे अक्कल हुशारीने वाचतील ते वाचतील , बाकीची वाचले काय न वाचले काय काहीही फरक पडत नाही !!

Survival of the fittest !
ॐ डार्विनाय नमः !!

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 6:18 pm | पगला गजोधर

महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ?

इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ?

इंजिनियरिंग च्या सीट्सची फी ह्या इंजिनियरिंगचे ज्ञान फॅसिलिटेट करून देण्याबद्दल घेण्यात येते, असं माझे एक मत.

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2018 - 5:08 am | प्रसाद गोडबोले

इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ?

पॉईंट टेकन !

सध्याचे मांत्रिक जे लेखी ग्यॅरंटी देतात तो त्यांनी प्रकार बंद केला पाहिजे , अगदीच द्यायची असेल तर * लाऊन कंडीशन अ‍ॅप्लाईड असे लिहुन ग्यॅरंटी द्यावी !

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 6:21 pm | पगला गजोधर

थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच !

उद्या तुम्ही हनिमूनसाठी हॉटेल बुक कराल, व नंतर काही काळाने मूल झालं नाही म्हणून, त्या हॉटेलवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवायला सांगाल...

माहितगार's picture

19 Mar 2018 - 6:27 pm | माहितगार

:)

मार्कस माझ्या प्रतिसादाला महत्व देऊन मोठा प्रतिसाद लिहिण्याचा विचार करण्या साठी आभारी आहे. तुमच्या मुद्द्यात दम आहे. त्यासाठी तुम्हाला पुरेसे मार्क्स . या कायद्याखालचे बरेच खटले व्यवसाय स्वातंत्र्य आणि धार्मीक स्वातंत्र्यांच्या मुद्द्या खाली सर्वोच्च न्यायालया पर्यंत जाण्याची शक्यता आहे हे खरेच आहे.

सालदार's picture

16 Mar 2018 - 12:18 pm | सालदार

थोडी मेहनत घ्यावी लागेल. जंगलात जा, काळ्या रंगाचा कोतवाल पक्षी शोधा आणि त्याच्या शेपटीला स्पर्श करा. असे केल्याने तुम्हाला काळी शक्ती प्राप्त होईल. त्या शक्तीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही.
हे नसेल जमत तर, त्याच जंगलात शिंगे असलेला घोडा शोधा, त्याच्या दर्शनाने तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. त्या सिद्धीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही.

सूड's picture

16 Mar 2018 - 12:38 pm | सूड

एकशिंगी घोडा?

सालदार's picture

16 Mar 2018 - 1:34 pm | सालदार

होय, तोच तो.

एखादे वे.शा.संपन्न बाबा, बुवा, गुरुजी बघा.

गवि's picture

16 Mar 2018 - 10:52 pm | गवि

हुर्रर्रर्रर्र, दुदुदुदु, गैगैगैगैगैगैगैगै असे काही मंत्र शिकून घ्या.

लंडनला किंगक्रोस स्टेशनवर जा. तिथे प्लॅटफॉर्म नं ९ आणि १० च्या मध्ये ट्रॉलीसकट काही मुले गायब होताना दिसतील, त्यांच्या पालकांना गाठा. ट्रॉलीवर घुबड असलेला पिंजरा असलेली ही मुले हॉगवर्टला जातात. त्यांच्या आईवडिलांपैकी एकाला तरी जादु येतच असते. तेव्हा तेच मार्गदर्शन करतील.

करणी संबंधी माहितीसाठी इथे पहा.
सगळी माहिती आपल्या भारतीय शास्त्रांत आहे.

चौकटराजा's picture

16 Mar 2018 - 6:36 pm | चौकटराजा

आम्ही एक गृहस्थ पाहिलेत. ते फुलाची मस्त रांगोळी सत्य नारायणा पुढे काढतात. त्याची जादू सत्यनारायणावर होते की नाही पण दर्शना ला येणार्या वर होते . आपोआप दोन चार पूजा पदरात पडतात .( खरे तर धोतरात ! ) .

हा विषय का सुचला? नको त्या व्यक्तिकडे ओढले जात आहात का? त्यातून खसकायचा मार्ग शोधताय?

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Mar 2018 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

काळी जादू एखाद्या गोऱ्या मुलीवर करता येते का???

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 9:39 pm | प्रसाद गोडबोले

काळी जादू एखाद्या गोऱ्या मुलीवर करता येते का???
>>>
प्रयत्न चालु आहेत ;)
यश आल्यावर मिपावर लेख पाडन्यात येईल !!

नाखु's picture

16 Mar 2018 - 11:18 pm | नाखु

काही टपाली दूरस्थ अभ्यासक्रम​आहे का ते चौकशी करून कळवतो
प्रत्यक्षातही आत्मापीडक अगोबा ओळखीचे आहेत त्यांनाच माहीत असावे तोवर संसदीय कामकाज व बँकातील वशीकरण शिकून घेणे आणि तिथली कार्यसिद्धी होताच इकडे येणे.

बरोबर एक सहाय्यक असतोच (तो चेहर्यावरून भोट) तेव्हा मी उपलब्ध आहे

बाकी पुढील अमोश्येला

नाखु

एक कायप्पा फॉरवर्ड

XXXकर हॉस्पीटल मध्ये खालील पदे भरणे आहेत...

MD.--जादूटोणा
MD.-- वशीकरण
MD.--करणी

विनोद म्हणून ठिक आहे. XXXकर हॉस्पीटल मध्ये बाहेरचा डॉक्टर सुरक्षा भेदण्यात यश मिळवखाप, बाहेरच्यांच्या अयोग्य कृत्याचे खापर दर्जेदार XXXकर हॉस्पीटल वर हकनाक फोडून X XXकर हॉस्पीटल चे काय नुकसान होईल माहित नाही पण चुकीच्या बदनामीने अजून काही सोनवणे दर्जेदार इस्पितळे सोडून भोंदू डॉक्टरांच्या सापळ्यात पडली तर ...

त्यामुळे अफवा पसरवण्यापूर्वी माहितीची अधिक शहानिशा करण्याची गरज असावी किंवा कसे

अगदी अगदी ...

निशा शहा कडून आलेल्या या बातमीची शहानिशा करणे गरजेचे आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

उपयोजक's picture

17 Mar 2018 - 8:50 am | उपयोजक

त्यातला हिरोला आयडिया माहित असावी.म्हणूनच तो म्हणत असवा
"काळी कोंबडी घावाय पायजे लका"

काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी.
काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला.
पिक्चर सोडून चला हवा येयू द्या पाह्यलं की असं होतंय पघा.

काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला.

किंमत ऐकल्यावर कांदा हुंगवावा लागतोय.

विशुमित's picture

17 Mar 2018 - 6:20 pm | विशुमित

आता कडकनाथच अंडं मिळतं. कोंबडी बसवा. मग कडकनाथच कडकनाथ..

हि कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक आहे म्हणे !!

मागे एकदा हि कोंबडी खाल्यावर यंव आजार बरा होतो आणि त्यंव आजार बरा होतो अशी एक कायप्पा फॉरवर्ड वाचल्याचे स्मरते.

कोणी चाखली आहे का?

आणि किंमत ऐकल्यावर हुंगवावा लागलेला कांदा त्याच कोंबडीच्या सागुती बरोबर हाणायचा, कसे?

अभिजीत अवलिया's picture

18 Mar 2018 - 7:16 pm | अभिजीत अवलिया

ही कोंबडी चाखायची आहे. पण 'आणली तरी करणार नाही' अशी ताकीद मिळालेली आहे. त्यामुळे आता बाहेरच बेत आखावा लागेल.

बाकी कोंबडीचे जाऊ दे. एकदा एक अंडी विक्रेता सासवड हडपसर पीएमपीएमल मध्ये भेटला होता. ही अंडी १०० रु. २ ह्या भावाने विकली जातात असे म्हणाला. ही ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

एकविरा's picture

17 Mar 2018 - 12:17 pm | एकविरा

नन्दिता दास राहिलि की , काली नैनो वाली बघा ,मग कदाचित शिकाल

जगात नव्वद टक्के मानव जात हि घाबरी असल्याने तुम्हाला ज्याची वाजवायची असेल तर खालील प्रयोग करून पाहावे ... काळा जादूगार हे बिरुद अभिमानाने मिरवू शकाल

प्रयोग १ ) अमावास्येच्या आदल्या दिवशी भरपूर झोपा जेणेकरून अमावास्येची रात्रभर जागं राहाता येईल .. अमावास्येच्या रात्री एक ओरडणारी कोंबडी ( अशी कि हात लावला कि कॉक कॉक कॉक कॉक करून केकाटत बसेल ) आणा .. तिला घरात सोडा आणि तिच्या मागे लागा ... शक्यतो मंत्रोच्चार जोरजोरात चालू ठेवा ... शक्य झाल्यास घरात चहाची बुक्की असेल तिला ओले करून जाळा .. दोन फायदे होतील फायदा १ ) घरातले कीटक सर्व पळून जातील २ ) त्या घाणेरड्या वासाने शेजारी पाजारी भीतीने विचारायला येणार नाहीत .. जरी आलेच तरी खबरदारीचा उपाय म्हणून उंबरठ्यावर अबीराची अशी रेषा काढा कि शेजारी जरी नास्तिक असला तरी त्याच्या घराचे त्याला उंबरठा ओलांडू देणार नाहीत ... दुसर्या दिवशी भल्या पहाटे पिशवीत काहीतरी भरून नेतोय असे भासवा. बाहेर पडताना दरवाज्या जोरात आपटा जेणेकरून शेजारी पाजारी तुम्ही बाहेर पडण्याची वर्दी मिळेल ... अजून एक संपूर्ण कपाळ अबीराने काळे करा आणि त्या पिशवीकडे बाहेर पडल्यावर असे काही बघा कि लोकांची आपोआप फाटली पाहिजे ... लक्षात असू द्या पिशवी नाही तर लोकांची फाटली पाहिजे ...

प्रयोग २ ) प्रयोग १ आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व घराच्या खिडक्यांना काळ्या फिल्म लावून घ्या .. घरात सूर्यप्रकाश येता काम नये ... बाहेरून एक कुठलाही नत्रयुक्त खात विकत घ्या .. त्याचे दोन थेम्ब प्रत्येक खोलीत टाका जेणेकरून एक कुबट वास घरभर पसरेल आणि सोबत काहीतरी काळंबेरं असल्याची दहशतही ...

प्रयोग ३ ) हळूहळू चर्चा सुरु होऊ लागेल .. आणि एक भीतीयुक्त दरारा पसरू लागेल तुमच्या कृत्यांचा ... मग काय आपले काम सुरु करा ... फक्त काळे कपडे घालून इथेतिथे भटकायला सुरु करा ... तोंडावर मात्र असा काही गं लावा कि आता या संस्थळावर हा असला प्रश्न विचारलात ना ,, तस्सा चुकूनही कुणाला विचारू नका ...

प्रयोग ४ ) गिर्हाईक आपोआप वाढू लागतील .. तुम्ही शाकाहारी असाल तर फळफळावळ आणायला सांगा .. अगदी भाज्यासुध्दा ... लोक आधीच नाना विकारांनी त्रस्त असतात , पण त्यांना हे काळात नाही कि कुठलेही प्रश्न त्यांच्या नियोजित वेळेनुसारच सुटत असतात जर त्यांनी ते सोडवायचे प्रयत्न केले तर ... तुम्ही फक्त माध्यम बना.. मांसाहारी असाल तर अधिक सांगणे नलगे ... हो महत्वाचं .. मांसाहारी असला तर जोडव्यवसायही सुरु करता येईल .. एखादा खाटीक पकडून ठेवा किंवा हॉटेलवाला .. त्याला निम्म्या किमतीत सर्व विकत सुटा ...

अजून काही मार्गदर्शन हवे असल्यास सांगा ... मंडळ तत्पर आहे ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा चालेल का ?

नाखु's picture

17 Mar 2018 - 11:01 pm | नाखु

अण्णा ला सांभाळायला लागेल म्हणजे तो अण्णा वरडा चालू ठेवतो

सह्याद्री दूरदर्शन प्रेक्षक नाखु

अधिक माहिती घेता असे निदर्शनास आले आहे कि तो कोंबडा आण्णा, आण्णा असे ओरडत नसून आणा, आणा असे ओरडतो.

त्याला त्याच्या आण्णाने दारू प्यायची सवय लावली असून दारूची झिंग कमी झाली कि तो कोंबडा आण्णाच्या मागे आणा, आणा असे ओरडायला लागतो असे कळते.

खरे खोटे तो कोंबडा आणि त्याचा आण्णाचं जाणे !!

तेव्हा तो कोंबडा बरोबर घेऊन जाणार असाल तर त्याच्या साठी अधिकच्या दारूची व्यवस्था केलेली बरी, ऐनवेळी कमी पडायला नको.

प्रचेतस's picture

17 Mar 2018 - 2:09 pm | प्रचेतस

किर्रर्र रानात बसून ह्यावर चर्चा करूयात

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 9:37 pm | प्रसाद गोडबोले

बेस्ट आयडीया!

आसपास भैरवाचे मंदिर असेल तर एखादं कोंबडं पण कापायची तयारी आहे आमची ! ;)

तर एखादं कोंबडं पण कापायची तयारी आहे आमची !

नुसतं कापणार? की पुढे रस्सा, सुक्कं काही रुपांतरही करणार? नायतर काय उपेग?

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 10:25 pm | प्रसाद गोडबोले

करणार ना राव ! असं कसं !

मस्त चुल पेटवुन झणझणीत रस्सा शिजवु! भाकर्‍या बाहेरनं च आणु ! वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल .

अहाहा , नुसता प्लॅन करुनच तोंडाला पाणी सुटले !

जय महाकाल जश तेरा बिशाल !!

गवि's picture

17 Mar 2018 - 10:48 pm | गवि

आम्हालाही बोलवा. आठवण ठेवा.

नच जमल्यास उत्तरेकडे दोन थेंब उडवूनच सुरुवात करा.

वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल

.

ओल्ड माँकसाठी खालील फॉर्म्युलाच हवा राव.

कोंबडी नव्हे, बकरा.

मटण रटारटा चुलीवर रश्शासहित शिजत पडलेलं असताना जवळच आगीच्या उबेला जंगलातल्या बंगल्यावर / गेस्ट हाऊसवर / फार्म रिसॉर्टवर / शेतावर पैकी एका जागी बैठक असावी. रीजन प. महाराष्ट्र. मदतीला भडंग, कोल्हापुरी चिवडा वगैरे प्राथमिक (प्रथम पेगास फक्त) चखणा असावा.

म्हातारा साधू उघडलेला असावा. बैठकीतल्या ज्युनियर मेंबरला उठवून उकळत्या पातेल्यातून मटणाचे तुकडे सुक्के सुक्के उचलून ताटलीत भरून आणायला पाठवावे.

ते सुकया मटणाचे तुकडे वृद्ध साधूसोबत खात खात शेवटी चुलीवर फक्त रस्सा (विना पीसेसवाला) शिल्लक उरावा आणि तो सर्वांनी शेवटी भातासोबत
विनातक्रार ओरपावा.

क्या बोलते सर?

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2018 - 11:25 pm | प्रसाद गोडबोले

खंप्लीट अणुमोदन !

पण मालक , बकरा कापायचा म्हणजे मोठ्ठे अनुष्ठान करणे आले , २-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल !
गेस्ट हाऊस पेक्क्षा रानातच असले बेत उत्तम जमु शकतात ! फार पुर्वी सीनीयर दादा लोकांच्या गटा सोबत वासोट्याचा ट्रेक केलेला , तेव्हा कुसापुर गावात दोन कोंबड्यांचा बेत जमुन आलेला ते आठव्ले ! ( अर्थात तेव्हा मी लिंबुटिंबु होतो हि बात अलहिदा )

पण ह्या सार्‍या जमवा जमवीत मुळ मुद्दा काळी जादु शिकण्याचा तो मागेच पडतोय , त्याचे काय ... लोल

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2018 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमी काळजी नगा करू. दोन दोन पेग पोटात गेल्यावर काळ्या जादूचे प्रकार, ते करण्याच्या पद्धती आणि त्यासंबंधीचे किस्से... सगळे कसे बैजवार घडाघड बाहेर येतील =))

२-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल !

या सर्व गोष्टी मान्यच. रानांतच असले बेत जमून यावेत हेही योग्यच. प्रश्न फक्त तारखेचा आहे.

म्हाताऱ्या साधूचे चार मोठे पेग आत गेल्यावर
काळी जादु शिकण्याचा मुद्दाच काय पण सर्वच बारा गडगड्यांच्या विहीरीत जाईल अशी अपेक्षा...!!!

अभिजीत अवलिया's picture

18 Mar 2018 - 7:34 pm | अभिजीत अवलिया

हे असले आयुष्यात दोनदा अनुभवले. कडाक्याची थंडी, घरून नेलेल्या भाकऱ्या, चंद्राच्या प्रकाशात शेतात शिजवलेले मटण आणि ....
ह्याच्या नखाची पण सर हॉटेल/बार मधे बसण्यात येत नाही. कितीही हायफाय असो.

आता सगळ्यांची लग्ने झाली. त्यामुळे हा आनंद पुढे कधी घेता येईल असे वाटत नाही. गेले ते दिवस.

काळी जादू , पलंगावरुनच मिश्री ची पिंक बाथरुम मधे थेट टाकणार्‍या काळी मावशी आणि चोराला विचारा.
ते सांगतील तुम्हाला....