मदत हवी आहे

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
12 Mar 2018 - 1:36 pm
गाभा: 

वडीलांना रात्री आरामात गाणी ऐकता यावीत म्हणुन टॅब वर अनेक गाणी भरुन दिली. टॅबची मेमेरी मर्यादित असल्याने एक मोठा संग्रह एस डी कार्डवर चढवला. मात्र टॅबवर निर्माण केलेल्या फोल्डरवर दिसली तरी गाणी प्रत्यक्षात लावता येत नाहीत. हे कशामुळे असावे? जर मेमरी कार्डवर्ची माहिती वापरता येत नसेल तर त्याचा उपयोग काय? टॅब सॅमसंग ए सहा आहे.

२) मोबाईलवर अंतर्गत मेमरी व्याप्त होउ नये म्हणून आपण कार्ड वापरतो, पण टिपलेले व्हिडिओ फक्त अंतर्गत मेमरीतच जातात केवळ टिपेलेले फोटो कार्डवर जातात. असे का? हे बदलण्याचा पर्याय सापडला नाही.

जाणकारांकडून मदत हवी आहे

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Mar 2018 - 2:34 pm | कंजूस

हा टॅब का ?
a7/6 tab

spreadtrum processorवाला, 8 gb internal mem, android 5.1 lollipop?

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2018 - 5:58 pm | चौथा कोनाडा

या इश्शु बद्दल नेटवर शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला काही सापडले नाही.
दुकानदार अथवा सर्विस एक्सपर्ट्ला विचारून पहा.

मराठी कथालेखक's picture

12 Mar 2018 - 7:02 pm | मराठी कथालेखक

समोर बघून सांगता येईल.. पिंपरी चिंचवड मध्ये रहात असाल तर भेटून मदत करु शकेन

1) कार्ड दुसय्रा फोनात तपासा
२!) दुसरे कार्ड टाकून हाच प्राब्लेम येतो का पाहा.
३) ओटिजी वापरून पाहा.
४) कार्ड कोणते आहे?
५)दुकानातले लोक कधी प्रत्येकालाच फॅक्ट्री रिसेट करायला सांगतात तसे लगेच करू नका.
६) फोन मेमरीतले विडिओ कार्डात मुव करायला बराच वेळ लागत असेल तर प्रसेसर स्लो आहे/ कार्डाचा क्लास १० नाही.

प्लेअर कोणता वापरता ?
कार्डातील गाणी कोणत्या फॉरमॅट मधील आहेत ?
प्लेअर ला sd कार्ड वापरायची परवानगी दिलीये का ?

प्लेअरमध्ये लिस्ट येते पण गाणं वाजत नाही असं होत? का कार्डातली गाणीच दाखवत नाही? sagarpdyचा मुद्दा बघा.

अंतु बर्वा's picture

14 Mar 2018 - 10:59 pm | अंतु बर्वा

वीएलसी प्लेयर इंस्टॉल करुन पहा. त्यात डिरेक्टरी नुसार गाणी पाहण्याची आणि वाजवण्याची सोय आहे. माझ्याकडे टॅब नाही पण सॅमसंगच्या फोन मधे एसडी कार्ड वरची गाणी चालतात.

नूतन's picture

16 Mar 2018 - 6:37 pm | नूतन

प्रथम एस डी कार्डावरील गाण्यांच्या फोल्डरमधील एम पी 3 किंवा ऑडीओ फाॅरमॅट खेरीजच्या फायली हटवा.
म्युझीक प्लेअरच्या सेटींग्ज मधे जाऊन इनबिल्ट ऐवजी एक्सटर्नल स्टोरेज निवडा
आता म्युझीक प्लेअरवर जाऊन लायब्ररी मधे साॅन्ग पर्याय निवडा
या रीतीने एस डी कार्ड वरची गाणी मी ऐकू शकते
लिहीताना पर्यायी मराठी शब्द शोधत बसले नाही

कंजूस's picture

16 Mar 2018 - 7:13 pm | कंजूस

म्युझिक प्लेअरस बय्राच प्रकारचे असतात. फोल्डर प्लेअरही असतात.

१) एसडी कार्ड( external storage) ओपन करून त्यातल्या कोणत्याही गाण्यावर क्लिक केल्यावर अँड्राइड सिस्टिमचा बिल्टिन प्लेअर( google play music) ते गाणं वाजवतो. जर का हेच होत नसेल तर खरा प्राब्लेम आहे.