प्रिय निलेश साबळे

सरनौबत's picture
सरनौबत in काथ्याकूट
8 Mar 2018 - 6:15 pm
गाभा: 

प्रिय निलेश साबळे,

जागतिक महिला दिनाच्या 'चला हवा येऊ द्या' टीम ला शुभेच्छा. सगळ्या कलाकारांमध्ये केवळ श्रेया बुगडे ही एकमेव महिला असूनही पूर्ण टीम ला का शुभेच्छा दिल्या ते तुम्हाला समजलं असेलंच. पत्रास कारण कि Women's Day हा केवळ ८ मार्च पुरता मर्यादित न ठेवता तुम्ही आणि तुमची गुणवान टीम 'वर्षभर' साजरा करत असते. सुरुवातीला क्वचितच पुरुष बाईचा वेष घेऊन गमती-जमती करायचे ते तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. गेले अनेक महिने मात्र पुरुष कलाकार बाईच्या भूमिकेतच जास्त दिसायला लागलेत. इतके गुणी कलाकार असताना विनोदनिर्मितीसाठी तुम्हाला असल्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो त्याचं वाईट वाटतं. हा कार्यक्रम बघताना अनेक दशकं मागे गेल्यासारखं वाटतं - जेव्हा स्त्रियांनी नाटकात काम करणं कमीपणाचं समजलं जायचं म्हणून पुरुष पार्टी स्त्री चा रोल करायचे.

सागर कारंडे ला पुण्याची महिला, कुशल बद्रिके कोल्हापुरी स्टाईल म्हातारी आणि (सर्वात किळसवाणी!) भाऊ कदम ची शांताबाई ह्या गोष्टी दाखवल्या नाही तर सेन्सॉर बोर्ड प्रक्षेपणाला परवानगी देत नाही बहुधा. भरीस भर म्हणून भारत गणेशपुरेला देखील मिश्या भादरायला लावून स्त्री-पार्टी बनवलात! अधून-मधून दिसणारा दाक्षिणात्य चित्रपटात शोभणारा 'काळा गेंडा' एकदाचा साडीत दाखवल्यावर तुमच्या जीवाला शांतता लाभणार आहे कि काय?

असला अगतिक महिला दिन कृपया लवकरात लवकर थांबवा, नाहीतर आम्हा प्रेक्षकांना देखील म्हणावं लागेल कि 'चला, हवा येऊ द्या'.

~ सरनौबत

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

8 Mar 2018 - 6:57 pm | प्रसाद_१९८२

इतका भिकार कार्यक्रम मराठी वाहिन्यांवर दुसरा कोणता नसेल.

तुषार काळभोर's picture

8 Mar 2018 - 7:00 pm | तुषार काळभोर

निलेश साबळे यांच्या पासून झाडून सगळे इतके गुणी लोक असताना कार्यक्रमाचा दर्जा आणि विनिदाची पातळी खूप घसरलीये. अगदी परदेश दौरासुद्धा 'केविलवाणी धडपड'वाटला.

मला वाटतं, नवं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात, जुनं हरवलंय आणि नवं गवसत नाहीये, असं काहीतरी झाल्यासारखं वाटतंय.

हवा येउद्या मंडळाला लवकरच जुनं-नवं काहीतरी गवसावं आणि ते रुळावेत यावेत, यासाठी शुभेच्छा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Mar 2018 - 7:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तद्दन भिकार मालिका आहे असे ह्यांचे मत. सध्या ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील लोकांना पकवायचा प्रोग्रॅम चालू आहे. भरीस भर म्हणून परवा स्थानिक गोर्या ऑस्ट्रेलियन माणसालाही स्टेजवर नाचायला लावले.
मराठी मालिका बनवणार्यांना झालय तरी काय? तेच कळत नाही."तुझे माझे ब्रेकप' नावाची एक अत्यंत कंटाळवाणी मालिका. त्यातल्या त्यात 'गाव गाता गजाली' जरा तरी बरी.

सतिश गावडे's picture

8 Mar 2018 - 10:36 pm | सतिश गावडे

'गाव गाता गजाली' जरा तरी बरी.

या मालिकेने प्रमोशनच्या वेळी खुप हवा केली होती. माझी प्रिय व्यक्ती मालवणी असल्याने आमच्या घरी या मालिकेची चातकाच्या वाट पाहिली जात होती. मालिका सुरु झाली आणि लक्षात आले हा एकदम फुसका बार आहे. आधीच्या "रात्रीस खेळ चाले"च्या प्रसिद्धीवर स्वार होण्याचा या मालिकेचा प्रयत्न ठार फसला.

उपदेशाचे डोस देणाऱ्याला "तां काय माका शिकवतला" म्हणून फाट्यावर मारणाऱ्या मालवणी लोकांना ही प्रत्येक भागात उपदेशाचे डोस पाजणारी मालिका आवडली नाही. (असे आमच्या हीचे मत ;) )

तेजस आठवले's picture

8 Mar 2018 - 7:36 pm | तेजस आठवले

तुम्ही अजून हा कार्यक्रम बघता ?
ज्या वेगाने हा कार्यक्रम वर चढला त्याचवेगाने दाणकन खाली आलेला आहे. आपण काहीही केलेलं चालतंय अश्या भ्रमात सगळी मंडळी आहेत. परदेश दौरा केविलवाणा ,भिकार आणि सपशेल फसला आहे.

गुप्ते तिथे खुपते इतके बरोबर वेळेत आटोपते घेतले तसे करा.

बिटाकाका's picture

9 Mar 2018 - 1:53 pm | बिटाकाका

गुप्ते तिथे खुपते?? हाहाहाहा!

सतिश म्हेत्रे's picture

8 Mar 2018 - 9:02 pm | सतिश म्हेत्रे

म्हणून म्हणतो बंद करा.

राजीव मासंदचा कार्यक्रम खरंच उत्कृष्ट म्हणावा लागेल. असाच गप्पांचा अजून एक दर्जेदार कार्यक्रम म्हणजे रजत कपूरचा लाऊंज. वीर सांघीचा कार्यक्रम बरा असावा असे त्याच्या पूर्वीच्या प्रसिद्धीवरून वाटते. विक्रम गोखलेंचा कार्यक्रमही बरा असायचा पण सहभाग घेणारे कलावंत बऱ्याचवेळेला त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे मनमोकळे बोलत नसावे असे वाटायचे. गप्पांविषयी कार्यक्रमामध्ये काहीही सटरफटर गोष्टी नसाव्यात असे वाटते. तसेही 'चला हवा येउद्या' जेंव्हा जोरात होता तेंव्हाही फक्त भारत गणेशपुरेंचा सत्कार हाच एक बघावासा वाटणारा भाग असायचा.

बिटाकाका's picture

9 Mar 2018 - 1:54 pm | बिटाकाका

तुमच्या मतांशी सहमत पण "काळा गेंडा" तेवढं नको होतं. विनोद म्हणून पण बरोबर वाटत नाही असं आपलं माझं मत!

जव्हेरगंज's picture

9 Mar 2018 - 2:20 pm | जव्हेरगंज

लेखाशी सहमत!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Mar 2018 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

पटले तर बघा नैतर फाट्यावर मारा. आदेश भावजी १२ वर्षे पैठण्या वाटत फिरतायत, कोणी बोलतेय का त्यांना?

संभाजी,हम तो तेरे आशिक, गाव गाता गजाली बघा, नाहीतर सरळ डिस्कव्हरी /नॅट जिओ/ एपिक्/ ट्रॅव्हल एक्स पी बघा की. काहितरी नवीन बघायला मिळेल दरवेळी. कशाला मराठीच पाहिजे सारखे?

बबन ताम्बे's picture

9 Mar 2018 - 3:54 pm | बबन ताम्बे

अजून बकवास !!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Mar 2018 - 6:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आदेशचा होम मिनिस्टर बरा असतो रे राजेंद्रा.कार्यक्रमाचा विषय कोणताही असो, पाच़कळ/शालेय विनोद्,अक्राळ-विक्राळ हास्य चालू झाले मालिका बघवत नाही. आदेशची भाषा सभ्य-सुसंस्कृत असते.

जेम्स वांड's picture

9 Mar 2018 - 3:32 pm | जेम्स वांड

मुळातच कार्यक्रम चालत नसल्याचं चिन्ह आहे. वीणा वर्ल्ड ने जाहिरात करायला वापरून घेतलाय पूर्ण संच अन संकल्पना असे वाटते.

रुस्तुम's picture

10 Mar 2018 - 2:36 pm | रुस्तुम

वास्तविक पाहता चला हवा येऊ द्या टीमने ब्रेक घेतलेला/दिलेला कारण repeatativeness मुळे TRP घसरायला लागलेला. पण झीचा सारेगमप सूर नवा ध्यास नवा पुढे साफ आपटले आणि त्याला उत्तर देण्यासाठी झीला दुसरी संकप्लना समोर नसल्याने चला हवा येऊ द्या टीम ला कदाचित पाचारण करावे लागले.आणि चला हवा येऊ द्या टीमही कदाचित शॉर्ट नोटीस वर पुन्हा यायला लागल्याने काहीतरी सादर करतात पण त्याने दर्जा व नाव खालावत चाललेय.