वढू, काही शिल्लक चिंतन, काही शिल्लक चर्चा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 Jan 2018 - 3:36 pm
गाभा: 

१ जानेवारी २०१८ ला पुण्या जवळच्या भीमा नदी परिसरात जे काही घडल्याचे ऐकण्यात आणि वाचनात आले त्या बातम्यांची सुरवात होताना आणि नंतरही कोरेगाव-भीमा हेच नाव घटनांवर कोरल्या गेल्या सारखे झाले कारण वढू हे गाव निव्वळ योगा योगाने कोरेगाव - भीमा जवळ आहे. तूळापूर - वढू मधील संभाजी महाराजांचा मृत्यू आणि कोरेगाव-भीमा लढाईचे स्मरण यांचा अर्था अर्थी संबंध नाही नव्हे तर तब्बल ११० वर्षांचे अंतरही आहे.

तरीही आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणी प्रमाणे योगा योगाने कोरेगाव - भीमाची कथित लढाई वढू पासून जवळच्या अंतरात झाल्यामुळे वढूची १ जाने २०१८ ची समस्या कोरेगाव भीमात स्पील ओव्हर झाली आणि वढू सर्वसाधारणपणे चर्चेतून बाहेर राहीले. कोरेगाव भीमाबद्दल इतर मिपा धाग्यातून चर्चा होऊन गेली आहे तेव्हा इथे ती तुर्तास बाजूस ठेऊ.

या चर्चेचा उद्देश सामाजिक दरी वाढवणे नाही तर ती आज २१व्या शतकापर्यंत का शिल्लक राहीली याची चर्चा करणे आहे. ज्या दरीचा फायदा समाजकलहकांना ( जे कोणी असतील ते त्यांनाग) घेता आला. यात ज्या काही तीन किंवा अधिक बाजूंवर शंका आहेत त्या तीनही बाजू -त्यांच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये पाहता- किमान उघडपणे तरी आज जातीय वादाचे समर्थन करत नसाव्यात.

बाहेरून बातम्या पहाणार्‍यांना तरी तेथील (वढू परिसरातील) त्यांदिवशीची दंगल अंशतःतरी पुर्व नियोजीत असल्याचे जाणवते आणि जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोनच्या स्वरुपात तंत्रज्ञान असूनही असे काही करणारे करवणारे नेमके मागे कोण आहे याची सबळ पुष्टी न होता राहू शकतात हे २१ व्या शतकात बुचकळ्यात टाकणारे वाटते.

आता ही आणि अशा दै. सकाळच्या इतर संबधीत बातम्या पहा. असा काही परस्पर सामाजिक अविश्वास आहे - हे वार्तापत्र म्हणते की गेली तीनेक वर्षा पासून तरी आहे - ह्याची भनक पुण्यातील दै सकाळ सारख्या मातब्बर दैनिकाच्या वार्ताहरांना संपादकांना आणि त्यांच्या करवी जाणत्या मालकांना लागू नये ? इतिहासत नेमक काय घडल यावरून अविश्वास आहे तर जाणत्या मालकांना चार इतिहासकार तेथे पाठवून दोन्ही समुदायांना विश्वासात का घेता आले नाही ? मूळात प्रश्न हा आहे की हिंदूत्ववादी असोत अथवा त्यांचे विरोधक किमान रोटी बेटी व्यवहारातील बेड्या तोडून जाती विरहीत समाजाचे लक्ष्य असताना मूळात त्यांना हा समाज जाती विरहीत बनवण्यात यश न येण्यात हि सर्वच नेते मंडळी कुठेतरी स्वतः कमी पडली हे ते स्वतः का स्विकारत नाहीत . फक्त अमूकच जातीचे तरुण तरूणी लग्नास पाहीजेत हे त्यांना स्वतःच्या वृत्तपत्रातील छोट्या जाहीरातीतून दिसत नाही की समाजात होणार्‍या होऊ घातलेल्या लग्नाची निमंत्रणे यांच्या पर्यंत आणि कर्तव्य असलेल्या तरुण तरुणींची माहिती यांच्या कार्यकर्त्यां पर्यंत पोहोचत नाहीत ?

प्रत्येक सत्ताकारण्याने (कोणत्याही पक्षाचे असोत) आपण सत्ताकारण करतो ते दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यासाठीच करतो का ? दुसरीकडे बोट दाखवताना तीन बोटे स्वतःकडे निर्देश करतात ह्याचे स्मरण करावयास नको का ?

दैनिक सकाळचा वार्ताहर या बातमीत हिंदूत्ववादाकडे बोट दाखवण्यासाठी तीन वर्षा पासून असे म्हणतात . ब्रिगेडचे एक माजी वरीष्ठ कार्यकर्ते त्यांच्य युटूट्यूबवर उपलब्ध मुलाखतीत १५ वर्षांपासून तो परिसर हिंदूत्ववाद्यांच्या प्रभावात आहे म्हणतात . कूणाचे खरे मानायचे ? मग ३ अथवा १५ वर्षापुर्वी कोणाच्या प्रभावात होते स्वातंत्र्यानंतर हिंदूत्व वाद्यांचा तुम्हाला न पटणारा प्रभाव निर्माण होण्याच्या जातीय दरी आधीच का मिटलेली नव्हती ? आधीच मिटलेली असती तर आज ही संधी कुणाला आणि का मिळू शकली असती ? हाच प्रश्न हिंदूत्व वाद्यांनाही आहे. त्यांच्याही टिव्हीवरील मुलाखतीत त्यांनाही जातीय दरी मान्य नसल्याचे म्हणतात पण सावरकरांनी केलेले हिंदू जातीतील रोटी बेटी बेड्या तोडण्याचे काम तुम्ही का नाही केले ? आणि हाच प्रश्न आंबेडकरी जनतेस ही तुमचे वितुष्ट फार फारतर ब्राह्मणांशी असेल - तसे स्वतः डॉ. आंबेडकरांनी मांडलेला आदर्श पहाता विवाहा मधे जात धर्माचा अडथळा यावयास नको - पण किमान मराठा समाजा सोबतची दरी -वरवरची नव्हे- पूर्णतः महाराष्ट्रातील बहुसंख्य गावातून का संपवता आलेली नाही ? इतरांना प्रश्न विचारून झाल्या नंतर मराठा नेतृत्वास आणि मतदारासही पुन्हा एकदा प्रश्न की असे ऐकुन आहेकी ८५ विधानसभा मतदार संघात मराठेतर आमदार बर्‍याच दशकात निवडून आलेला नाही . ८५ चा आकडा खालीवर असेल समजा तो ८५ चुकीचा आहे केवळ ५ चा आहे तरी प्रश्न शिल्लक राहतो की नाही ? जिल्हापरिषदा, जिल्हा सहकारी बँका , साखर कारखाने आणि आरक्षण नसलेल्या जागांवर तुम्ही जाती भेद विसरुन किमान इतर ब्राह्मणेतरांसोबत सत्ता किती शेअर करत आहात ? आणि मतदार राजा पक्ष कोणतेही असोत नेपोटीझम आण घराणेशाहीस आजून किती काळ पाठीशी घालणार आहेस ? परदेशातून आलेल्या सूना आणि जावयांचे चित्र्पटाचे निर्माते आणि प्रेक्षकहो युरोपीय अप्रुप बाजूस ठेवा आधी आमच्या शेजारच्या मुला मुलींची जाती न पाहता विवाह होण्या बद्दलचे चित्रपट काढणार आणि पहाणार की नाही ? आणि ग्रामीण भागातील वार्ताहरांनो सगळ्यांनी सगळ्याच बातम्या दिल्या नाहीत तरी बर्‍याच गावातील स्मशानभूम्या सुद्धा अद्याप जातीवार वाटलेल्या आहेत असे २१ व्या शतकातील काही बातम्यातून दिसते . हे मुद्दे वृत्तमाध्यमे उचलणार की नाही ? कि पुढची दंगल होऊन पुढच्या राजकीय बातम्या छापण्यासाठी आपण वाटलावून असता की ज्यावर तुमची रोजी रोटी चालते !

पुन्हा एकदा राजकारण्यांकडे येऊ; -तुमचे राजकीय पक्ष कोणतेही असू द्यात - जी तुमची विरोधक मंडळी ज्या ठिकाणी उपस्थीतच नाहीत त्यांच्या वर आगळीक केल्याचे प्रसार माध्यमातून आरोप करताना किमान ते तिथे उपस्थीत नव्हते एवढी वस्तुस्थिती स्पस्।ट झाल्यावर तरी जनते समोर कधी तरी स्विकारणार की केवळ तोंडा समोर प्रसार माध्यमांचे माईक आले म्हणून निराधार आरोप केवळ राजकीय पॉईंट स्कोअर करण्यासाठी करत रहाणार ? बरे तुम्ही मंडळी तेवढेच करून थांबत नाही ज्याच्या वर आरोप करावयाचे त्याच्या अखंड जातींवर सरसकट संशय उत्पन्न होतील समाजातील दरी वाढेल असे सामाजिक संघर्षास खतपाणी देणारे बोलत राहणार ? हाताशी प्रत्यक्ष पुरावे नसताना परस्परांविरुद्ध गरळ ओकण्यास आरोप करण्यास काही तरी मर्यादा काही संयम हवी की नको ?

सकाळच्या वृत्तांचे दुवे दिलेतच, दुसरी बाजू कव्हर करण्यासाठी या मटा वृत्तात नरेश कदम
तर या विवेक वृत्तात सागर शिंदे काही वेगळी भूमिका मांडताना दिसतात .

वढूच्या बाबतीत वस्तुतः दोन्ही बाजूंकडे कोणतीही प्रमाण ऐतिहासिक साधने / पुरावे नसल्याचे संजय सोनवणी त्यांच्या दोन युट्ञ्यूब मधून पुढे आणताना दिसतात. सोनवणींच्या मता नुसार सिवले पाटील हे आडनाव छ. संभाजी महाराज पूर्व काळापासून ऐतिहासिक दस्त एवजात दिसते.

मी स्वतः शिवले या ग्राम नामासाठी भारतातल्या काही राज्यांचे जनगणना डाटाबेस चेक केले तर शिवले हे ग्रामनाम कर्नाटक महाराष्ट्र ते उत्तरप्रदेश पर्यंत दिसते. तरीही कुणाचे दावे आस्था आणि श्रद्धा नाकारायच्या आहेत असे नाही आपापल्या विश्वासाने लोक एखाद्या गोष्टीशी स्वतःस जोडून घेत असतील तर वावगे नाही. पण संजय सोनवणी नव मिथक निर्मिती बाबत साशंकता दर्शवताना म्हणतात तसे इतिहासाच्या नावाने टाळता येणारे संघर्ष वर्तमानात करून नव्या पिढ्यांचे भविष्य डावावर लावण्यात काय हशील असावे ?

संजय सोनवणींच्या युट्यूब अधिक चर्चेसाठी

* मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास! -संजय सोनवणी

संजय सोनवणींचे सर्व आधार अथवा सर्व निष्कर्ष अचूकच असतात असे नव्हे पण केवळ विचार अथवा तथ्य पटले नाही म्हणून संजय सोनवणी चर्चेतून पूर्ण घालवावे वाटत नाहीत म्हणून चर्चेसाठी त्यांचे विचार मिपाकरांसमोर पुन्हा एकदा ...

चुभूदेघे . चर्चा सहभागा साठी आभार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Jan 2018 - 5:41 pm | आनन्दा

बरे झाले हा धागा काढलात.. अभिनिवेशरहिस साधक बाधक चर्चा यावर होणे आवश्यकच आहे.

अर्धवटराव's picture

17 Jan 2018 - 12:54 am | अर्धवटराव

७०-८०-९० च्या दशकातील सिनेमे बघा. स्त्रीयांचे अधिकार, हुंडाविरोध, भांडवलशाहीविरोध, धार्मीक सलोखा, गरीब-श्रीमंत दरी निवारण वगैरे वगैरे अनेक मुद्दे मसाला लावुन त्यावर चित्रपट बनवण्यात आले. अगदी प्राणीमात्रांबद्दल भूतदया वगैरे मुद्देही आलेत. जातीभेद निर्मुलनावर मात्र फारसं कुणी काम केलेलं दिसत नाहि. काहि डाकुपट निघालेत. ठाकुर, जमीनदार, मंदीरचे पुजारी, महाजन वगैरे लोकांचे अत्याचार सुद्धा दाखवुन झालेत. पण जातीकडे न बघता फक्त माणसाच्या क्वालिटी, आवड-निवड, स्वभाव बघुन मैत्री संबंध निर्माण झाल्याचे ठाशीव पद्धतीने कुणी फारसं दाखवलं नाहि. एकुणच सवर्ण हिंदु याबाबतीत फार उदासीन असल्याचं जाणवतं. बाकी राजकारण्यांबद्दल न बोललेलच बरं.

माहितगार's picture

17 Jan 2018 - 11:16 am | माहितगार

सहमत आहे