पुन्हा एकदा मोढेरा सूर्यमंदिर

Primary tabs

DAGDU's picture
DAGDU in भटकंती
6 Dec 2017 - 12:57 pm

अहमदाबाद ला ऑफिस च्या कामानिमित्त बऱ्याच वेळा जायचा योग येतो, मग वेळ मिळाला कि जवळपासच्या प्राचीन ठिकाणांना भेट देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, अशीच एक भेट मोढेरा येथील प्राचीन सूर्य मंदिराची.

modhera sun temple 1

माझ्या कामाचे ठिकाण हे अहमदाबाद - मेहसाणा हायवे वरच होते, दुपारी १२ ला काम आटोपल्या नंतर छात्राल GIDC मधून मेहसाणा साठी इको गाडीने मेहसाणा गाठले. मेहसाणा मध्ये मोढेरा चौक येथून मोढेरा साठी गुजरात महामंडळाची बस मिळाली, मेहसाणा पासून मोढेरा अंदाजे २५ किमी आहे, पण एकंदरीत रस्त्यांची व्यवस्थित असलेली अवस्था, त्यामुळे प्रवास महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक गतीने होतो (अपवाद मुंबई-पुणे, मुंबई - सातारा, आणि नॅशनल हायवे चा काही भाग ).

Modhera Sun Temple 2

Modhera Sun Temple 3

रविवार किंवा सुट्टीचा दिवस नसल्यामुळे आणि भर दुपारी रखरखीत उन्हात मी पोचल्यामुळे संपूर्ण मोढेरा सूर्य मंदिरात कोणीच नव्हते, पण नंतर लक्षात आले कि मंदिराच्या मागे असलेल्या उद्यानात एक प्रेमी युगल त्याच एकांताचा लाभ घेत आहे.

Modhera Sun Temple 4

modhera 32

मोढेरा येथील सूर्य मंदिर हे इसवी सन १०२६ मध्ये सोळंकी राजवंशातील भीमदेव सोळंकी या राजाने बनवले होते, सोळंकी राजवंश हा चालुक्य राजवंशाचीच एक शाखा होती.

modhera 35

modhera 36

modhera 37

modhera 38

modhera 39

पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर कर्कवृत्तावर आहे, मंदिराची रचना हि ३ विभागात केली गेली आहे, सूर्यकुंड, सभामंडप आणि गृहमंडप. सभामंडप हा कलाकुसर केलेल्या ५२ खांबावर तोलून धरला आहे, हे ५२ खांब एका वर्षातील ५२ आठवडे दर्शवतात असे गाईड ने सांगितले, तसेच सूर्यकिरणे सभामंडपामधून गर्भगृहातील मुख्य देवता असलेल्या सोन्याच्या मूर्तीवर पडत असत आणि मुकुटामध्ये बसवलेल्या हिऱ्यामुळे संपूर्ण गर्भगृह उजळत असे हि सांगितले.

modhera 40

सभामंडप हा रामायण महाभारतातील विविध प्रसंगाने अलंकृत केलेला आहे, अतिशय सुंदर कलाकुसरीने तोरण बनवलेले आहेत, संपूर्ण मंदिर परिसर हा मूर्तिभंजकांनी केलेल्या विध्वंसानंतर प्राचीन भारतीय शिल्पकलेची आणि वास्तुशास्त्रात असलेल्या उत्तुंग प्रगतीची साक्ष देत होता.

modhera 41

प्रतिक्रिया

आता लेख जमला. फोटो आवडले. एकदा सिद्धपुर - पाटण ( साडी केंद्र ) - मोढेरा - रानी की वाव असं जायचं आहे. अंबाजि पाहून झालं आहे अबू ट्रीपमध्ये. दिलवाडासारखे कोरीव काम आहे.
कसं जायचं वगैरे माहिती लिहाच. इको बस/ट्रेन आहे का?

गेली ४-५ वर्षे नियमित पणे मिसळपाव चा वाचक आहे, प्राचीन शिल्पकलेचा वारसा असलेल्या ठिकाणी भेट देत असतो, प्रचेतस(वल्ली) यांच्या लेखामधून बर्याच गोष्टी कळाल्या. पाटण ला पण भेट दिली होती. राणी कि वाव पाटण मध्येच आहे

आदिजोशी's picture

6 Dec 2017 - 3:13 pm | आदिजोशी

फोटो आणि वर्णन छान जमले आहे. असेच लिहित रहा.

आवडले. छायाचित्रे छान काढली आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2017 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आणि माहिती आवडली. लिहित राहा...!

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

6 Dec 2017 - 7:05 pm | दुर्गविहारी

खुपच उत्तम फोटो. माहिती थोडी कमी वाटली. मात्र मोढेराला जाण्यासाठी नेमका मार्ग व इतर सोयी-सुविधा यांची माहिती दिली असती तर बरे झाले असते. एकुण मंदिरावरची शिल्पकला बघता पुर्ण एक दिवस हाताशी ठेवूनच इथे गेले पाहिजे असे दिसते.

चौकटराजा's picture

6 Dec 2017 - 7:23 pm | चौकटराजा

मी येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणाला सहकुटुम्ब भेट देण्याचे योजले आहे. अहमदाबाद॑ हून मात्र सोयीची रेल्वे मेहसाणा येथे जाउन एक दिवसात पाटण मोढेरा करून यावी अशी नाही. सबब " मोटर गाडी" भाड्याने घेऊन जावे लागेलसे दिसतेय. आपल्या फोटो वरून माझी उत्सुकता मात्र ताणली गेलीय हे नक्की ! धन्यवाद !

कंजूस's picture

7 Dec 2017 - 10:04 am | कंजूस

पुणे (18:40) ते मेहसाना (Mahesana 09:30) शनिवारसोडून रोज गाडी आहे. तिथे मुक्काम करून मागे येत अहमदाबाद/बडोद्याहून ट्रेन पकडण्याचा प्लान बनवला होता.
अबुरोडला उतरून - अंबाजी (११किमि) - सिद्धपुर - महेसाणा - वाव - गांधिनगर ( स्वामिनारायण मंदिर) अहमदाबाद - ट्रेन. १४ जानेवारी संक्रांतच्या पुढेमागे ठरवू नका.

चौकटराजा's picture

7 Dec 2017 - 6:08 pm | चौकटराजा

सहकुटुम्ब जाणार असल्याने लगेज कुठे कुठे न्यायचे असा प्रश्न आहे. दुसरे असे की इन्दुरला गेलो असताना फक्त पेट्रोल आपले या प्रमाणे एक गाडी मेहुण्याने करून दिली होती त्यावेळी मांडू महेश्वर अशी एक दिवसात मस्त सहल झाली. आता मेहुण्याची किरपा झाली तर .. अहमदाबाद पाटण मोढेरा अशी सहल करता येईल अशा आशेने चाललो आहे. एकूण सात दिवसाचा बेत आहे. नाहीतर आपली सूचना १८ ४० ची बरोबरच आहे.

प्रचेतस's picture

7 Dec 2017 - 8:37 am | प्रचेतस

असं कुणीही नसताना मंदिर निरखण्याचा आनंद विरळाच.

छान लिहिलंय. छायाचित्रे अजून हवी होती, विशेषतः मंदिरातील मूर्तींचे क्लोजअप्स. मंदिर अगदी भरजरी कलाकुसरीने नटलेलं आहे. पुष्करणीदेखील अप्रतिम.

अनुप ढेरे's picture

7 Dec 2017 - 11:31 am | अनुप ढेरे

मस्तं फोटो!

पद्मावति's picture

7 Dec 2017 - 12:06 pm | पद्मावति

अप्रतिम.

अनिंद्य's picture

7 Dec 2017 - 12:37 pm | अनिंद्य

सुंदर फोटो.

फोटोत लोकांची गर्दी नसल्यामुळे अजूनच छान आलेत.

ही देवळं अनेक वर्षे जमिनीखाली गाडली गेल्यामुळे सुस्थितीत आहेत असे वाचले होते.

मस्तय हो,
फोटो पण छान काढलेत

सूड's picture

7 Dec 2017 - 6:35 pm | सूड

मस्त!!

रीडर's picture

7 Dec 2017 - 9:19 pm | रीडर

एक प्रश्न - बहुतेक खूप बेसिक असेल
सूर्य मंदिर कसे ओळखतात? विशिष्ट रचनेवरून का?

रीडर's picture

7 Dec 2017 - 9:19 pm | रीडर

एक प्रश्न - बहुतेक खूप बेसिक असेल
सूर्य मंदिर कसे ओळखतात? विशिष्ट रचनेवरून का?

रुपी's picture

8 Dec 2017 - 4:43 am | रुपी

सुरेख! मस्त फोटो.