मिपा की मायबोली की मिपा आणि मायबोली ? ?

गबाळ्या's picture
गबाळ्या in काथ्याकूट
29 Nov 2017 - 8:00 am
गाभा: 

मी मिपाचा नवीन सदस्य आहे.
मिपावर चे काही साहित्य वाचता वाचता प्रतिक्रियांमध्ये बऱ्याचदा मायबोली (https://www.maayboli.com) चा उल्लेख आढळला. म्हणून मला प्रश्न पडला आहे कि मिपा आणि मायबोली मध्ये काय फरक आणि साम्य आहे?
दोन्ही ठिकाणचे सदस्यत्व असण्याची काय कारणे असावीत ?

प्रतिक्रिया

भीडस्त's picture

29 Nov 2017 - 11:38 am | भीडस्त

मलाही हेच प्रश्न पडले आहेत .

उद्बोधन करणारा कुणी त्राता आहे का ???

खरं म्हयी एकाच टिकटात समदी गाणी वाजाय पायशेन. वायली वायली टिकटा घ्याया नाय लागली पायशेंन ....

मिपा, माबो, ऐसी सगळीकडे अकाउंट काढून १-२ महिने रेंगाळून बघा. जे जास्त आवडेल तिथे जास्त बागडा.

ज्योति अळवणी's picture

1 Dec 2017 - 6:04 pm | ज्योति अळवणी

+१

गबाळ्या's picture

29 Nov 2017 - 8:40 pm | गबाळ्या

ऐसी काय आहे? दुवा देऊ शकाल का?

दे दान सुटे गिराण असे एकाच कोपय्रावर ओरडून काय होणार? गल्लीगल्लीत वरडायला लागतं.

मलाही हा नेहमीच प्रश्र्न पडतो.

पिवळा डांबिस's picture

29 Nov 2017 - 10:41 pm | पिवळा डांबिस

मिपा हे मित्रांच्या कट्ट्यासारखं आहे. इथे प्रसंगी कायपण भंकस मारायला अनुमती आहे.
मायबोली आणि आयशी ह्यांच्या नांवातच आई असल्याने तिथं सारखं उपदेशाचं अमृत प्यायची तयारी ठेवावी लागते!
आमाला अमृतापेक्षा मिसळीचा जास्त ओढा असल्याने......
:)

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2017 - 1:38 pm | चौथा कोनाडा

<<< मायबोली आणि आयशी ह्यांच्या नांवातच आई असल्याने तिथं सारखं उपदेशाचं अमृत.....>>>
.
:-)))

मिपा हे मित्रांच्या कट्ट्यासारखं आहे.
+१००१
हेच लिहिणार होतो.

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 11:28 am | रंगीला रतन

+१

सुजल's picture

30 Nov 2017 - 2:39 am | सुजल

फरक असा आहे कि हि दोन वेगवेगळी संकेत स्थळ आहे आणि साम्य असं कि सगळे लेखक दोन्ही कडे आपले तेच तेच लेख टाकतात . त्यामुळे दोन्ही कडे त्याच त्याच लेखांची ( रिपीट ) संख्या खूप आहे . तुम्हाला जे आवडत असेल तिथे बागडावे .

त्यामुळे दोन्ही कडे त्याच त्याच लेखांची ( रिपीट ) संख्या खूप आहे. >> मलातरी असेकाही वाटले नाही. फक्त माबोवर किंवा फक्त मिपावर लिहिणारे बरेच आहेत.

===
गबाळ्या,
ही घ्या ऐसीची लिंक http://www.aisiakshare.com/

माहितगार's picture

30 Nov 2017 - 12:29 pm | माहितगार

तुम्ही संकेतस्थळांची अधिकृत धोरणे मानत असाल तर मिपा आणि माबो धोरणात जरासा फरक आहे. दोहोंची धोरणे लक्षात घेतलीतर मिपावर टोपणनावाने लेखन करण्याची मुभा अधिक सोईस्कर आहे -त्यामुळे लेखनात अधिक मोकळेपणा येतो -त्यामुळे मी माबोवर न लिहिता केवळ मिपावर लिहितो. माबोच्या अधिकृत धोरणानुसार बहुधा तुमचे व्यक्तिगत माहिती देणे अधिक बंधनकारक आहे, आणि डूआयडी परवानगी नाही. मिपावर डूआयडीने संपादक मंडळास अमान्य गोंधळ केला तरच अडचण - मिपाचे मूळ संस्थापक लेखन स्वातंत्र्याच्या बाजूने होते ती संस्कृती इथे अद्यापही कमी अधिक प्रमाणात मूळ धरून आहे.

ऐसि अक्षरे वैचारीक दृष्ट्या मिपापेक्षा हुच्च प्रस्थापित असल्यामुळे असेल कदाचित लेखन स्वातंत्र्य हुच्च लोकांसाठी तांत्रिकदृष्ट्या मिपापेक्षा अधिक आहे पण प्रत्यक्षात प्रत्येक विषयावर आपला स्वतःचा वेगळा धागा काढण्याचे स्वातंत्र्य मिपावर अधिक आहे.

ऐसि आणि मिपात आणखी एक सांस्कृतिक फरक ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे शिवाय -वाचक मिपापेक्षा कमी आहेत. मिपावर भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीत असल्यासारखे वाटते आणि वाचकही मिपाला अधिक आहे. या दोन कारणांनी मी ऐसिपेक्षा मिपा प्रीफर करतो.

समयांत's picture

30 Nov 2017 - 12:33 pm | समयांत

भारीच, आवडलं आपल्याला!

माबोच्या अधिकृत धोरणानुसार बहुधा तुमचे व्यक्तिगत माहिती देणे अधिक बंधनकारक आहे, आणि डूआयडी परवानगी नाही. >> असं काही नाहीय. संयुक्ता चे सदस्यत्व घ्यायला फोन करून वेरिफाय करायचे खरे नाव वगैरे (जे आता अनाहितासाठी पण असेल) पण इतरवेळी कोणीही कसलीही व्यक्तीगत माहिती मागत नाही.

डुआयडी ला 'परवानगी' इथेतरी कुठे आहे? पण ते असतातच! तिकडेही आहेत. गोंधळ घातला कि उडवतात. परत येतात. ते चालूच असतं. चालूच राहणार.

पण माबो आता बरीच clean झालीय. राजकीय हणामार्या कमी झाल्यात. त्यांनी ज्या नव्या सोयी आणल्या आहेत त्यापण चांगल्या आहेत.

===
ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे शिवाय -वाचक मिपापेक्षा कमी आहेत. >> +१

फारएन्ड's picture

2 Dec 2017 - 8:24 pm | फारएन्ड

अ‍ॅमी यांचे बरोबर आहे. माबो वर लिहायला तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही. काही स्पेसिफिक उपक्रमांत तर स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा असेल तर द्यावी लागते, तीही सर्व उपक्रमांना नाही.

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2017 - 2:55 pm | टवाळ कार्टा

ऐसिवर भारतीय संस्कृतीशी प्रामाण्य तोळामासा आहे

म्हणजे नक्की काय?

+१ केल्यानंतर मीपण कंफ्यूज झाले 'नक्की काय म्हणायच आहे'

'ऐसीवर भारतातील चालू घडामोडीबद्दल चर्चा फारशी नसतेच' असा काहीतरी अर्थ मी काढला होता... बहुतेक चुकला...

+१ केल्यानंतर मीपण कंफ्यूज झाले 'नक्की काय म्हणायच आहे'

'ऐसीवर भारतातील चालू घडामोडीबद्दल चर्चा फारशी नसतेच' असा काहीतरी अर्थ मी काढला होता... बहुतेक चुकला...

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2017 - 9:27 pm | चौथा कोनाडा

प्रमाण तोळामासा आहे म्हण्जे :

तोळा = १२ ग्रॅम (आजच्या मेट्रिक नुसार १० ग्रॅम)
मासा = १ ग्रॅम

तोळामासा म्हण्जे समजा मिपा वाचक संख्या १२ असेल तर ऐसि अक्षरे वाचक संख्या १ (एकच) आहे.
(संदर्भ : आयुर्वेदिक मोजमापे पद्धत)

हे वरील ठीक किंवा कसे यावर जाणकारांनी खुलासा करावा.

असे फक्त तेच समजतात !
ऐसी म्हणजे शोभा डे !

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2017 - 4:09 pm | टवाळ कार्टा

त्या हिशोबाने मिपावर बरीच गटारेसुद्धा बघितली आहेत...मग मिपाला "मुंबै" म्हणायचे का?

माहितगार's picture

30 Nov 2017 - 4:42 pm | माहितगार

ऐसी म्हणजे शोभा डे !

अगदी
या वरून सोशल मिडियावर फिरणारी एक मराठी कविता आठवली- कॉपीराईट आणि कवि माहित नसल्यामुळे पूर्ण देता येणार नाही पण सारांशात देण्याचा प्रयत्न करतो.

"
दोस्ता, कुठे बेपत्ता झालास ?

बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही !
भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

अगदी डिलक्स नाही,
पण शोभेलसा बार पाहू,
....
...
अर्धा सोडा, अर्धे पाणी;
संगतीला विल्स घेऊ,

.... ....
... ...
डावे-उजवे करीत करीत,
आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन,
कवितांचे तेच तेच,
कथांमध्ये तर नाहीच दम,
कादंबरीत ना कस,
असंतोष यांच्यात नाही दिसत,
नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

... ....
फैज आणि गालीबची
फेरउजळणी एकदा करू,
शहरीकरणात सांस्कृतिकतेची,
नवी जाणीव जमवून पाहू...
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

चौथा पेग होईल तेव्हा
.....
जेवणाची गरज नसेल म्हणून
आणखी एक निप मागवू,
उठताना क्रेडिट कार्डाऐवजी,
बिल दोघंही शेअर करू,
आपल्याच 'सच्चेपणा'ला
आपणच सलाम ठोकू,

अन्
दोस्ता,
भेट पुन्हा एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू !!!"

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Nov 2017 - 2:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मिपा व मायबोली म्हणजे दादर-गिरगावसारखे आहे रे गबाळ्या. खरेदीसाठी लोक दोन्ही ठिकाणी पूर्वी जायचे. पण काहीना दादर-रानडे रोडच आवडायचा तर काहींचे 'प्रार्थना समाज' शिवाय पान हलायचे नाही.

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2017 - 2:55 pm | टवाळ कार्टा

आयला माई आहेत अज्जून....आम्हाला वाट्ले....असो
ख्या ख्या ख्या

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

माई अष्टचिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत!

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2017 - 9:31 pm | चौथा कोनाडा

आईच्च्या गावात ..... साक्षात माईसाहेब .... डोळ्यावर विश्वास बसनां !

माईसाहेब सप्रेम नमस्कार ! कश्या आहात ?

प्राची अश्विनी's picture

30 Nov 2017 - 6:39 pm | प्राची अश्विनी

ऐसीवर मोजून आठ दहा डोकीच लिहीत असतात.

तिन्हीकडे कॉमन असणारे आणि तिन्हीकडे तितकेच फेमस असणारे फार लोक नसावेत.

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2017 - 10:16 pm | टवाळ कार्टा

बॅटमन्ना

एमी's picture

1 Dec 2017 - 7:14 am | एमी

एकही नाहीय!
प्रत्येक फेमस आयडीने आपापली साईट ठरवून टाकलीय आणि तिकडेच लिहितात.

रुस्तम's picture

1 Dec 2017 - 10:50 am | रुस्तम

उदा. माबो वर अक्कलशून्य आणि इथे सिंथेटिक जिनिअस आहेत की.

पुंबा's picture

1 Dec 2017 - 7:02 pm | पुंबा

जव्हेरगंज मला आठवतात त्याप्रमाणे एकमात्र तिन्हीकडे लिहिलेले..
माबो+मिपा, मिपा+ऐसि असे बरेच आहेत. मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत.

मला आठवतंय त्यानुसार:

• जव्हेरगंज मअंजावर नवीन असताना त्यांनी ऐसीवरदेखील काही कथा टाकलेल्या. फारसे प्रतिसाद न आल्याने ३-४ धाग्यानंतर तिकडे फिरकले नाहीत. माबोवर अधूनमधून लिहितात; नियमीत नाही.
• बॅटमॅन माबोवर कधीच दिसला नाही. मिपावर एकदा ब्लॉक झाल्यानंतर परत इकडे फिरकला नाही. सध्या फक्त ऐसीवर असतो.
• सिंजी माबो, मिपा नियमित. ऐसी अधूनमधून.

===
माबो+मिपा, मिपा+ऐसि असे बरेच आहेत. मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत. >> नावं?

ऐसी आणि मिपा दोन्हीकडे असणारे भारी आयडी म्हणजे नंदन, आदूबाळ, बिकासेठ, कंजूस (तिकडे आचरट बाबा) आणि मनोबा.
गब्बर, अनुराव, अमी, बापट, हे भारी आयडी आहेत पण फक्त ऐसीवर रमतात.
ब्याट्याला मिपावर येणे का जमत नाही ते सांगता येत नाही पण तो ऐसीवर फुल रमलेला असतो.
काही आयडीना फक्त स्वतःचे लेखन टाकून त्यावरचे छान छान प्रतिसाद पाहून थांक्यु थांक्यु करायचे असते ते रेग्युलरली दोन्हीकडे रतीब टाकतात.
आमचं आता वय झालं, कथेकरी कोण ते बघायचे अन मंदिरात कीर्तनाला बसायचे. बासस्स.

"नावं?" लिहिल्यानंतर थोडा अजून विचार केल्यावर आदुबाळ आणि अभ्या मिपा, ऐसी दोन्हीकडे असतात हे आठवलं होतं :D

नंदन, बिका दोन्हीकडे फक्त वामा असतात असे मी म्हणेन. वर्षातून एखाददुसरा प्रतिसाद....

मनोबा नाहीय मिपावर! वामादेखील नाही.

गब्बर, अनुराव, अमी, बापट >> अमी कोण? हो बाकीचे तिघे आणि बॅटदेखील फक्त ऐसीवर असतात.

बरेच मिपाकर ऐसी नियमीत वाचत असतात असा अंदाज आहे.
आणि बरेच माबोकर मिपा नियमीत वाचतात.

===
एकही नाहीय!
प्रत्येक फेमस आयडीने आपापली साईट ठरवून टाकलीय आणि तिकडेच लिहितात. >> असे लिहिताना माझ्या डोळ्यासमोर बेफी, विद्या, चैतन्य, ऋन्मेष असे माबोवरचे आयडी होते...

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2017 - 8:30 am | श्रीगुरुजी

ऐसी वर फक्त गब्बरचे प्रतिसाद अभ्यासू व वाचनीय असतात. तो मिपावर यायला हवा.

पुंबा's picture

4 Dec 2017 - 11:06 am | पुंबा

+११
अनु राव पण..

ऐसी आणि मिपा दोन्हीकडे असणारे भारी आयडी

गवि, अभ्या हे राहिले.
तिन्हीकडे लिहिणारे फारएन्ड राहिले की..

अभिजीत अवलिया's picture

2 Dec 2017 - 9:12 am | अभिजीत अवलिया

मिपा आणि ऐसी दोन्हीकडे वजन राखून असणारे पण बरेच आणि खुप भारी आयडी आहेत.

सचिन काळे साहेब आहेत दोन्हीकडे. रविवारच्या त्यांंच्या लेखाची दोन्हीकडे उत्सुकतेने वाट बघितली जाते.

मार्मिक गोडसे's picture

2 Dec 2017 - 10:12 am | मार्मिक गोडसे

सचिन काळे साहेब मिपा,माबो आणि ऐसी ह्या तिन्ही ठिकाणी आहेत.

अभ्या..'s picture

2 Dec 2017 - 12:10 am | अभ्या..

मी लिहिलेले तिन्हीकडे,
ऐअसीवर बरे प्रतिसाद मिळाले, मायबोलीवर सुखद धक्का म्हणजे बरेच चांगले प्रतिसाद पहिल्याच अन एकमेव कथेला मिळाले.
मिपावर मात्र हक्काने बोलतात, बरेच प्रतिसाद अगदी अपेक्षित मिळतात.

मायबोलीवर सुखद धक्का म्हणजे बरेच चांगले प्रतिसाद पहिल्याच अन एकमेव कथेला मिळाले. >> हो ते पाहिलेलं :) पण तुदेखील तिकडे नंतर दिसला नाहीस....

मला वाटतं फेमस लेखकांनी आपापली साईट निवडून घेतलीय. जव्हेरगंजनापण माबोवर चांगले प्रतिसाद येतात; पण ते तिकडे रमलेत असं वाटत नाही; त्यांना मिपाच आवडत!

कंजूस's picture

1 Dec 2017 - 12:48 pm | कंजूस

बॅटमन्ना माबोवर? अगागा शान्तंपापम्।

तिन्हीवर पिंका टाकतो मी.

गबाळ्या's picture

30 Nov 2017 - 11:30 pm | गबाळ्या

उत्सुकतेपोटी मी अलेक्सा रँकिंग वरून हि माहिती गोळा केली

maayboli
misalpav
aisiakshare

Overall Statistics

Global Rank
111,909
196,557
451,795

Rank in India
9,325
18,225
182,226

Daily Pageviews per Visitor
7.5
3.7
8.4

Daily Time on Site
10:17
5:53
8:02

Visitor Distribution

India
87.80%
76.80%
45.00%

United States
11.20%
7.60%
52.10%

Colombia
-
9.80%
-

United Arab Emirates
-
5.90%
-

माहितगार's picture

30 Nov 2017 - 11:58 pm | माहितगार

अलेक्सा मराठी मधील रँकपण पुरवते मायबोलीचा मराठी संकेतस्थळातील ओव्हर ऑल रँक ११ वा आहे तर संवाद साधण्याची सुविधा असलेल्या मराठी संकेतस्थळात पहिला आहे. मिपा ओव्हर ऑल १५ व्या क्रमांकावर तर संवाद साधण्याची सुविधा असलेल्या संकेतस्थळात दुसर्‍या क्रमांकावर येईल . (उपक्रम सध्या चर्चेस बंद असूनही ओव्हर ऑल मध्ये २५ व्या क्रमांकावर दिसते आहे) माझ्या आठवणी प्रमाणे मनोगतची स्थिती मी मागच्या वेळी पाहिली त्या पेक्षा
सुधारली असेल ते ओव्हर ऑल २८ व्या क्रमांकावर दिसत आहेत. (मला वाटते त्यांच्या मालकांचा पब्लिक संपर्क अलिकडे वाढण्याचा बेनिफीट होत असेल का चुभूदेघे)

ऐसी अक्षरे मराठीच्या ओव्हर ऑल पहिल्या पन्नासाच्या यादीत दिसत नाहीए.

हि अलेक्सा रँकींग काळाच्या ओघात काही वेळा महिना परत्वे- बरीच खालीवर होत रहातात. अवांतर : मराठी विकिपीडियाचे रँकींग ३४ पर्यंत खाली गेल्याचे दिसत आहे. सम्दर्भ

केवळ फरक जाणून घ्यायचा उद्देश आहे का?
आपापल्या आवडीचे विषय चर्चा करणारे जिथे मिळतात तिथे तो विषय काढणे हा उपाय असतो.
तिनही ठिकाणी पिंका टाकत फिरणारा कोण रे तो?

गबाळे तुम्ही काहीच लिहिलं नाही. चर्चा घडवायला तुमची चार मतं टाका.

मागचे काही दिवस मी या तिन्ही साईट्स चे निरीक्षण केले व त्यावरून मला जाणवलेल्या काही गोष्टि.

१. सभासद नोंदणी, लिहिण्याचे स्वातंत्र्य, साईट ची एकंदरीत मांडणी या सर्व गोष्टी तिन्ही कडे जवळपास सारख्याच आहे (प्रथमदर्शनी तरी)
२. काही सभासद (मुख्यत्वे सक्रिय) दोन्ही किंवा तिन्ही ठिकाणी समान आहेत.
३. मिपा हे जरा सर्व समावेशक आणि नवीन सदस्यांना प्रोत्साहित करणारे व्यासपीठ वाटते तर बाकी दोन्ही ठिकाणी जरा कंपूबाजी वाटते (हे माझ्या स्वतःच्या लिखाणाला तसेच इतरांच्या लिखाणाला मिळालेल्या प्रतिसादावरून वाटले. इथे मला सकारात्मक, नकारात्मक तसेच तटस्थ प्रतिसाद मिळाले आणि तोंडदेखल्या कौतुकापेक्षा आणि उगाच केलेल्या टीकेपेक्षा मला ते निःपक्षपाती प्रतिसाद आवडले)
४. मिपावर मात्र कधीकधी प्रतिक्रिया अगदी भरकटत जातात आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे खच्चीकरण कारण्यापर्येंत पोहोचतात. बाकी दोन्ही ठिकाणी मला हे प्रमाण कमी वाटले.
५. तिन्ही साईट्स ची रचना फक्त नवीन लिखाणाला जास्त महत्व देणारी वाटली. परंतु, जुने दर्जेदार साहित्य शोधणे तिन्ही कडे कठीण आहे. मिपावर तर मला अजून "शोध" सुविधा सापडलेलीच नाही.
६. एकंदरीत काय की जसे म्हणतात की "२ मराठी माणसे एकत्र आली कि ३ मराठी मंडळे तयार होतात - १ माझे, १ त्याचे आणि १ दोघांचे" असा प्रकार वाटला.

नवीन, जुन्या जाणकार, तसेच दोन्ही कडे सक्रिय असणाऱ्या सदस्यांचे काय मत आहे?

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2017 - 11:11 pm | चौथा कोनाडा

<< ४. मिपावर मात्र कधीकधी प्रतिक्रिया अगदी भरकटत जातात आणि वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे खच्चीकरण कारण्यापर्येंत पोहोचतात. बाकी दोन्ही ठिकाणी मला हे प्रमाण कमी वाटले. >>

कित्येक वेळा हे भरकटणं सर्प्राइझींग अन सुखदायक असल्याचं मला जाणवलंय ! एका विषयातून दुसरा अन त्यांचे अनेक पदर उलगङत जातात, मजा येते असं हरवुन जायला. मिपाचं हेच बलस्थान वाटतं.
वैयक्तिक खच्चीकरण वै कदचित होत असावे ते त्या त्या जाणकारांनाच माहित, पण एकमेकांच्या टोप्या उडवल्या जातात ते वाचायला मजा येते !
एकंदरीत मिपा माय फेव्हरेट !

कंजूस's picture

2 Dec 2017 - 7:45 am | कंजूस

तिन्ही ठिकाणांवर आहे.
१) ज्योतिषावर चर्चा माबोवर चांगली चालते.
२) पर्यटनाचे अनुभव माबो.
३) पासपोर्ट चर्चा.
आंतरराष्ट्रीय प्रश्न ऐसीवर
मिपाबद्दल इथे बरेच लिहिले आहेच.

*>>मिपावर तर मला अजून "शोध" सुविधा सापडलेलीच नाही.>>
- मिपाचे android appपाहा त्यावरून झकास चालते शोध.

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2017 - 3:56 pm | टवाळ कार्टा

२ मराठी माणसे एकत्र आली कि ३ मराठी मंडळे तयार होतात - १ माझे, १ त्याचे आणि १ दोघांचे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2017 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मिपा आणि मायबोली मध्ये काय फरक आणि साम्य आहे?

मिपा हे एक मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी अतिशय उत्तम चालवलेलं आणि लेखन वाचनासाठी प्रसिद्ध असलेलं जगभरातील एक नामांकित मराठी संकेतस्थळ आहे. बाकी संकेतस्थळ चालू आहेत की नाही माहिती नाही आणि ती तपासून पाहण्यात इंट्रेष्टही नाही.

-दिलीप बिरुटे
(कट्टर मिपाकर)

नाखु's picture

6 Dec 2017 - 4:55 pm | नाखु

अट्टल मिपाकर

वाचकांची पत्रेवाला नाखु

सस्नेह's picture

2 Dec 2017 - 12:22 pm | सस्नेह

रोचक चर्चा !!

मित्रहो's picture

2 Dec 2017 - 1:00 pm | मित्रहो

माझ्या मते दोन्ही ठिकाणी फरक असा काही नाही. प्रत्येक जण कुठेतरी रमतो. मी सुरवातीला आंजावर जिथे जागा मिळेल तिथे लिहित होतो . ऐसीविषयी उशीरा कळले तोपर्यंत तिथे जाउन लिहायचा उत्साह संपून गेला होता. सुरवातीच्या लेख कविता यांना मिपावर ज्या प्रतिक्रिया मिळाल्या तशा माबोवर मिळाल्या नाहीत मग हळूहळू माबोवर लिहायचा उत्साह मावळला. तरीही मी जर कविता लिहिली तर माबोवर टाकत होतो. आता तर लिखाणच सणासुदीला होते ते परत चार ठिकाणी टंका कंटाळा येतो.
मिपाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे मिपाची जुनीजाणती मंडळी डॉक्टर बिरुटे सर, पैसा, एस, स्पंदना (आता अॅक्टीव्ह नाही) मुविकाका(हल्ली दिसत नाही), बॅटमॅन(दिसत नाही) अभ्या, वेल्लाभट, पद्मावती अशी बरीच नावे घेता येतील ही मंडळी नवीन कोणी लिहले असेल तर त्याला आवर्जून प्रोत्साहन देतात, त्याला आवश्यक त्या सुधारणा सुचवतात. त्या व्यक्तीचा उत्साह वाढवतात आणि तो लिहित राहतो. जर का त्याने धाग्यांचा रतीब टाकायला सुरवात केली तर मात्र त्या व्यक्तीला मिपाचे वाक्यप्रचार ऐकवून गप्प करतात.
राजकारण, समाजकारण त्यावरुन होनारे वाद , उगाच काडी करने असले प्रकार सर्वत्र असतात. शुद्धलेखनाचा किंवा खूप विचारपरिवर्तक वगेरे लिहण्याचा आग्रह मिपा माबो दोन्हीवर नाही. असे संकेतस्थळ होती पूर्वी हे ऐकूनच धक्का बसला. त्यामुळेच मिपा माबो किंवा आणखीन काही असा विचार न करता लिहावे आपली जागा सापडतेच.

फारएन्ड's picture

2 Dec 2017 - 9:01 pm | फारएन्ड

तिन्ही साइट्स ची प्रकृती वेगळी आहे. काही आयडी कॉमन आहेत पण चर्चेच्या स्टाइल मधल्या फरकामुळे तिन्हीकडे वेगळी मजा आहे. पण हे थोडे पूर्वी घरच्या पेपरचे असायचे तसे आहे. एकदा एकाची सवय लागली त्याला पर्याय म्हणून रोज दुसरा चालेल असे नाही.

मी जे लेख लिहीतो ते बरेचसे तिन्हीकडे पोस्ट करतो. कारण साधे आहे - आपला लेख जास्तीत जास्त लोकांनी वाचावा, म्हणून. बराच वाचकवर्ग तिन्हीचा वेगळा आहे असे लोकांच्या वेळोवेळी वाचलेल्या पोस्ट्सवरून जाणवते, तसेच लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवरूनही. यातील कोणत्याही (ते ही फिक्स असे नाही) एका साइट वर लेख लिहून तेथे साधारण दिवसभर प्रतिक्रिया पाहून मग इतर ठिकाणी तो कॉपी करतो, काही दुरूस्ती वगैरे असली तर ती करून.

सुरूवातीला बरीच वर्षे फक्त मायबोली माहीत होती त्यामुळे साहजिकच तेथे अजूनही जास्त वेळ असतो. तेथील गेटटुगेदर्स ("गटग") मुळे अनेक लोकांशी आता वैयक्तिक ओळखी आहेत. मायबोलीवर जास्त वेळ रमण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील "धावते" थ्रेड्स, किंवा बाफ (बातमीफलक्)/बीबी - जेथे साधारण २०-३० लेटेस्ट पोस्ट राहतात व आधीच्या वाहून जातात. तेथे अनेक थ्रेड्स वर नेहमीच्या लोकांशी गप्पा मारत बसता येते, काम करता करता एकीकडे. त्या गप्पा वेगवेगळ्या बाफ वरच्या इतक्या वेगळ्या असतात की दुसर्‍या साइट वर आहोत असे वाटेल.

आजकाल राजकीय चर्चा मिपावर जास्त सखोल व विषयाला धरून असतात असे जाणवले. अनेक लेख फक्त मिपावरच दिसतात, इतरत्र नाही. त्यामुळे मिपावर सुद्धा रोज किमान एक चक्कर असतेच. मिपावरच्या प्रतिक्रिया एकदम परखड असतात असे जाणवते. इथेही अनेक ओळखी आहेत. बे एरिया मधल्या एका मिपा कट्ट्याला गेलो होतो. त्यानंतर मात्र अजून जमलेले नाही. मिपा आजकाल लोड व्हायला वेळ लागतो असेही गेले काही दिवस वाटले आहे. मात्र गेल्या काही महिन्यातील मिपामधले बदल जबरी आहेत. मिपा वरची विडंबने धमाल असतात. कधी कधी तर मूळ लेख/कविता आल्यानंतर अगदी लगेच विडंबन येते. ती कॅटेगरीच एकदम धमाल आहे. इतरत्र ते फारसे दिसत नाही. एखाद्या कवितेची, लेखाची रेवडी मिपावर जोरदार उडवली जाते. खवचट पोस्टी वगैरे इथे धमाल असतात.

ऐसीअक्षरे तुलनेने नवीन आहे. तेथील खरडफळ्यावरची धावती चर्चा मला सर्वात आवडते. तसेच "अलीकडे काय पाहिलंत..." व तत्सम सदरे. तेथेही रोज चक्कर असतेच. फक्त ही सदरे सोडली तर खूप नवीन मटेरियल रोज असते असे नाही. त्यामुळे सहसा ही सदरे व खफ यावरच जातो. लिबरल विचार तेथे अत्यंत स्पष्टपणे व खुलेपणाने मांडले जातात, इतर साइट्स च्या तुलनेत. एखाद्या बाळबोध लेखाची सरकॅस्टिक रेवडी तेथेही जबरी उडवतात.

ऐसी व मिपा दोन्हीकडे आपले लेखन किती लोकांनी वाचले हे ही कळते. माबोवर ते कळत नाही. माबोवर बाळबोध लेखांवर जुने जाणते येउन रेवडी उडवत आहेत असे पूर्वी व्हायचे. आजकाल जवळजवळ बंद झाले आहे. कोणत्याही लेखाची/कवितेची तारीफ करणारे काही आयडी सोडले तर बाकीचे पूर्ण दुर्लक्ष करतात असे सध्या दिसते.

राजकीय बाबतीत ऐसी डावीकडे तर मिपा उजवीकडे झुकलेले आहे असे माझे मत आहे, एकूण पोस्टींमधून दिसणार्‍या सरासरी मतांनुसार. माबोवर दोन्ही भरपूर आहे.

सिंथेटिक जिनियस's picture

3 Dec 2017 - 7:40 pm | सिंथेटिक जिनियस

आपल्याला मिपा आवडते.एखादा लेख माबो व मिपा दोन्हीकडे टाकतो.पण माबोला आता लोक नकोसे झालेत,सिंथेटिक जिनियस हा माझा आयडी काहीच कारण नसताना उडवला.
आता विषय निघालाच आहे तर सांगतो,मिपावर माझे बरेच आयडी होते.पैकी नानासाहेब नेफळे हा आयडी प्रसिद्ध ,कारण हलकट मिपाकरांनी नाना माई अशी जोडी लावली होती.
ऐसी म्हणजे चार टाळक्यांचे गप्पा ठोकण्याचे ठिकाण आहे.वैचारीक मैथुन करत दोन चार जणच तिथे कुथत बसलेले असतात.ते बंद पडायला आले आहे ऐसि.
असो मिपाला शुभेच्छा!

हांन्न तेजयायला.
हे खरा जिगर.

अभिजीत अवलिया's picture

4 Dec 2017 - 9:35 am | अभिजीत अवलिया

रोखठोक प्रतिसाद आवडला.

babu b's picture

4 Dec 2017 - 8:43 pm | babu b

नाना म्हणजे हे ?

माई म्हणजे कोण ?

माबोवरचं अन्नं वै प्राणा: अतिप्रचंड आवडतं. ते वाचण्याच्या निमित्ताने तिथे सदस्यत्व घेणे झाले. तिथे इतकी गर्दी आहे की कित्येक वेळा तुम्हाला खिजगणीतही धरणार नाहीत तिथली लोकं असं वाटत राहतं.
ऐसीवर लोक अतिशयच कमी आहेत. कित्येक चांगल्या पुस्तकांची, सिनेमांची माहिती तिथे मिळते. एरव्हीही कित्येक दीर्घ अन प्रचंड माहितीने भरलेले लेख तिथे असतात. नविन लेखकांना प्रतिसादांची गॅरंटी मात्र नाही. कपाळावर चष्मा सरकवून रोखून पाहत आहेत लोक असा फिल येतो तिथे. पण तरीदेखिल तिथे लिहिणे आणि तिथले वाचणे चांगला अनुभव असतो. कित्येकदा अगदीच वेगळा पॅराडाईम नजरेस पडतो. एरव्ही विचार केला नसता अश्या गोष्टींवर झोत मारला जातो.
मिपावर पुर्वी असत तश्या वाड्याप्रमाणे किंवा चाळीसारखे वातावरण आहे. अतिशय प्रतिभावान लोक सुद्धा लहानग्यांत मस्त मिळून मिसळून मजा करत असतात. इथे माणूस रमून जातो. जसे पट्टीचे अभ्यासक इथे आहेत तसेच नुसते टिवल्याबावल्या करणारेही आहेत त्यामुळे यावसं वाटतं परत परत.

अनन्त्_यात्री's picture

4 Dec 2017 - 2:36 pm | अनन्त्_यात्री

चपखल शब्दात तिघांची तुलना केलीत पुंबा!

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2017 - 4:44 pm | चौथा कोनाडा

<<<< मिपावर पुर्वी असत तश्या वाड्याप्रमाणे किंवा चाळीसारखे वातावरण आहे. अतिशय प्रतिभावान लोक सुद्धा लहानग्यांत मस्त मिळून मिसळून मजा करत असतात. इथे माणूस रमून जातो. जसे पट्टीचे अभ्यासक इथे आहेत तसेच नुसते टिवल्याबावल्या करणारेही आहेत त्यामुळे यावसं वाटतं परत परत >>>>

+१०००

प्रचेतस's picture

4 Dec 2017 - 2:23 pm | प्रचेतस

एकमेव मिपाच.

एस's picture

7 Dec 2017 - 12:05 am | एस

ही अशी चर्चा इतर संस्थळांवर होते का? आणि होत असल्यास मिपाचं त्यात खुलेआम कौतुक होतं का? आणि होत असल्यास ते खपवून घेतलं जातं का?

कुत्सितपणे विचारत नाहीये, तर इतरत्र अजिबात जातच नसल्याने माहिती नाही, पण उत्सुकता आहे.

ही अशी चर्चा इतर संस्थळांवर होते का? >> हो. माबोवर वाहत्या धाग्यांवर याबद्दल चर्चा वाचल्या आहेत.

आणि होत असल्यास मिपाचं त्यात खुलेआम कौतुक होतं का? >> नोप्स. मिपाचं कौतुक करणारे मिपावरच असतात ना! ते तिकडे कशाला येतील ;)

आणि होत असल्यास ते खपवून घेतलं जातं का? >> मिपाला नावं ठेवली तर ते इथे खपवून घेतात का? बाकी दोन्हीकडे त्यांनाच शिव्या घातल्या तर चालत :D

फारएन्ड's picture

8 Dec 2017 - 4:36 am | फारएन्ड

मिपा व ऐसी - दोन्हीचे उल्लेख तेथे होतात. इथल्या चांगल्या चर्चा व लेखांच्या लिन्क्स लोक तेथे एकमेकांना देतात (मी अनेकदा दिलेल्या आहेत). "ख्पवून घेतले जातात" वगैरे म्हणण्याइतके ते मुळात कोणाला खटकतच नसावेत :)

मायबोलीवर मी याच नावाने सदस्य आहे तिथे एक लेख हि टाकला होता. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता पण तेथे मुळातच इतके लोक आणि इतकी गर्दी असते कि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला लेख शोधण्यासाठीच फार वेळ गेला. दुर्दैवाने मला भरपूर वेळ नाही त्यामुळे मी मायबोलीवर केवळ सदस्य म्हणून आहे. कधीतरी जेंव्हा मिपा बंद असते व्हॉट्सअप इ वरून वेळ मिळतो तेंव्हा तेथे चक्कर टाकतो. अशी वेळ सहा महिन्यात फार तर एकदा येते.
बाकी माझे सर्वच्या सर्व लेख केवळ मिपावर आहेत.
त्याला कुणी निंदा कुणी वंदा
आपुन को कि फर्क पैंदा?

गामा पैलवान's picture

8 Dec 2017 - 10:41 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

आता विषय निघालाच आहे तर सांगायला हरकत नसावी की मायबोलीवर हिंदूच्या वा तटस्थ बाजूने लिहिणे मना आहे. तुम्ही हिंदुत्ववादी नाही. तुम्ही तटस्थ भूमिकेतून दिलेल्या प्रतिसाद केवळ विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात असल्याने तुमचा कसा अपमान झाला होता ते माझ्या चांगलंच लक्षात आहे.

आ.न.,
-गा.पै.

फारएन्ड's picture

9 Dec 2017 - 5:23 pm | फारएन्ड

दोन्ही बाजूने लिहीणारे व दोन्हीतही इण्टरेस्ट नसलेले भरपूर लेखन तेथे होते. सगळे पब्लिक आहे. कोणीही चेक करू शकते.

बाकी अपमानास्पद पोस्टी कोणत्याही लेखनावर येउ शकतात. त्याचा विषयाशी संबंध नाही.

गापै - तुम्हाला विरोध म्हणून हे लिहीत नाही. तुमचा का तसा समज झाला, तुम्ही तेथे का नाही याबाबत कल्पना नाही. आपण तेथेही भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. पुन्हा आलात तर बोलूच :)

सुबोध खरे's picture

11 Dec 2017 - 10:50 pm | सुबोध खरे

कुठलं हो?
मी साधारणपणे कोणत्याही अशा गोष्टी मेंदूपर्यंत नेत नाही. पण आता तुम्ही कुतूहल चाळवलंत तर सांगून टाका.