मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 Nov 2017 - 6:54 pm
गाभा: 

मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलांच्या पालकांचा हा धागा
http://www.misalpav.com/node/41541 वाचला.चांगला उपक्रम होतोय.शुभेच्छा!

याच विषयावर ग्रुपमधे चर्चा सुरु होती.त्या दरम्यान एक मुद्दा असा पुढे आला की विषयाचं आकलन चांगलं होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं वगैरे ठिक आहे.पण हे चांगलं आकलन झालेले मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?

मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत?

मराठी शाळेतल्या शिक्षणाला दर्जा असेलंच तर साधारण इ.स.२००० किंवा त्यापूर्वी होता आता नाही.असा याचा अर्थ घ्यावा का? किंवा असेल अजून तो दर्जा तर मग ही मुलं या वर दिलेल्या किंवा तशाच टॉपच्या संस्थांमधे जिथे प्रवेश सहजासहजी नाही,खुप बौध्दिक मेहनत घ्यावी लागते अशा ठिकाणी का दिसून येत नाहीयेत?

लेखनाचीही हीच अवस्था आहे.चेतन भगत किंवा असेच नावाजलेले लेखक हे इंग्रजीतून लिहितात त्यामुळेच त्यांना त्याचं मानधनही रग्गड मिळतं.प्रादेशिक भाषेत लिहिलं तर इंग्रजीतून लिहिल्यावर मिळतं तेवढं काही मिळत नसावं.(असल्यास माहिती द्यावी).ब्लॉग्जबद्दलही तेच.

मराठी पत्रकारांचे पगार हे इंग्रजीतून लिहिणार्‍या पत्रकारांपेक्षा कमी असतात/असावेत.

फक्त पैसाच बघणार का? मातृभाषेबद्दल अनास्था का? असे भावनिक प्रश्न गैरलागू आहेत.वर दिलेल्या संस्थांमधील शिक्षणाचा समाजासाठी सुध्दा बराच उपयोग होऊ शकतो.पण मुळात तिथे शिकलं पाहिजे.मराठी माध्यमातून शिकलेली मुलं पुढे जाऊन या संस्थांमधे शिकली पाहिजेत.पण मागच्या १० वर्षात तसं घडलेलं दिसत नाही.

याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?

प्रतिक्रिया

रानरेडा's picture

28 Nov 2017 - 7:56 pm | रानरेडा

हा वाद मी सुरु केला होता .

शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते -

बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नवे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बागीतल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही .

तरुण मुलांबाबत प्रश्न

१) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता

२) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ?

३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ?

४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे .

कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल

१) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ?
२) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? (
४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही .
५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा).

२-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे .

तरी माझा देता सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय

मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात !
आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे )

तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही !

मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .

बाकी सगळे ठीक आहे, पण यावरून 2000 पूर्वी दर्जा चांगला होता असा निष्कर्ष कसा निघतो?

उपयोजक's picture

28 Nov 2017 - 8:02 pm | उपयोजक

विषय अधिक विस्ताराने मांडल्याबद्दल आभार!

मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)

याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?

मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ?

येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)

याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?

मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ?

येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

वेल्लाभट's picture

28 Nov 2017 - 11:34 pm | वेल्लाभट

मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?

सर, तुमचा अभ्यास प्रचंड कमी पडतोय या बाबतीत इतकंच नम्रपणे म्हणतो. बाकी तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी करता येईल अशा लोकांची. तुमच्या आमच्यात आहेत हो, पण आपण जागतिक दर्जाचे म्हणजे काय हे आधी ... असो ते राहूदे,

या संमेलनातून असे निवडक (निवडक हं) चेहरे नुसते समोरच येणार नाहीत त्यांचं मनोगत पालकांना सांगतील, अनुभव सांगतील. उपस्थित आणि टीव्ही इत्यादी मार्फत बघणारे पालक मग कदाचित थोड्या वेगळ्या मताचे होतील अशी आशा आहे.

रानरेडा's picture

25 Dec 2017 - 11:28 am | रानरेडा

यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................
समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

रानरेडा's picture

25 Dec 2017 - 11:28 am | रानरेडा

यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................
समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

वेल्लाभट
तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी ?
तुमच्याकडे मोठी यादी दिसते , तुम्ही आधी का नाही भेटलात ?
आपले काय दिल है छोटा सा, छोटी सी आशा
मोठी यादी नको हो ४-५ नावे प्रत्येक category t तर द्या सुरुवातीला
अ ) तर मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात खालील कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेली मुले
IIT
IIM
INSEAD
Harvard
Stanford
Cambridge
Oxford
London School of Economics
Sloan

ब) खालील पैकी काम करणारे मराठी माध्यमाचे लोक ( कोठल्याही वयाचे ) Only Management / Strategy consulting NOT software
McKinsky
BCG – Boston
Bain
KPMG
PWC

क) ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची मुले

ड) तरुण ( ३०-३५ ) पर्यंत च्या वयाच्या मराठी मुलांनी काढलेले आणि गाजलेले business / startups ( ४० पलीकडचे माझ्या माहितीचे बरेच आहेत )

तर मला हि नवे तुम्ही झटपट द्याल याची खात्री आहे .

साहना's picture

29 Nov 2017 - 12:26 am | साहना

मी IIT Bombay मध्ये शिकत होते तेंव्हा साधारण २५% मुले हि मातृभाषेतून (मराठी, हिंदी इत्यादी) शिक्षण (५ ते दहावी) घेऊन येत होती. ह्यांत बहुतेक मुले हिंदी भाषिक बेल्ट मधून यायची. ह्या मुलांना इंग्रजी शिकवण्या असायच्या त्यामुळे शिकवण्यासाठी रजिस्टर केलेल्या मुलांचीच माहिती घेऊन हा आकडा आहे. कदाचित अशी सुद्धा अनेक मुले असतील ज्यांनी शिक्षण मातृभाषेतून घेतले असेल पण त्यांना शिकवणीची गरज पडली नसेल. प्रत्यक्षात आकडा मोठा असू शकतो.

पण IQ १३५ पेक्षा जास्त असणाऱ्या मुलांवरून आम्ही काहीही निष्कर्ष काढू शकत नाही. जी मुले गणित सारखे विषय शाळेबाहेर आत्मसात करतात त्यांच्या साठी इंग्रजी हि मामुली बाब आहे. माझ्या मते इंग्रजी शिक्षणाचा फायदा साधारण मुलांना फार जास्त होतो.

असल्या घटनात नेहमी "स्किन इन द गेम" पाहावी. नेते मंडळी, शिक्षणतज्ञ्, साहित्यिक, इतर भाषाप्रेमी ह्यांना तुमच्या मुलांचे काहीही पडून गेलेले नसते. आमच्या मुलांवरून ट्रक चालवून ह्यांचा काही फायदा होत असेल तर ते हि मंडळी खुशालीने करतील. त्यामुळे ह्यांचे सल्ले आणि रुदन नजरअंदाज करावेत.

"मार्केट काय म्हणते" हे आधी पाहावे. मार्केट म्हणजे जिथे लोक स्वखुशीने निर्णय घेतात तेंव्हा बहुतेक वेळा कुठल्या आयडिया चालतात तर कुठल्या आयडिया फ्रॉड आहेत हे अतिशय लवकर स्पष्ट होते. उदाहरणार्थ "शिकवण्या १०वी, १२वी साठी फार महत्वाच्या आहेत" हि गोष्ट मार्केटनेच आम्हाला शिकवली आहे. ह्या मार्केट सिग्नल्स ना नजरअंदाज करणे मूर्खपणा आहे.

मार्केट नुसार इंग्रजी शाळेंत प्रवेश आणि खर्या शिक्षणासाठी शिकवण्या हि गोष्ट फार महत्वाची आहे असे वाटते.

रेवती's picture

29 Nov 2017 - 6:56 am | रेवती

मी काही हुषार अजिबातच नसल्याने वरील कॉलेजांच्या आसपास फिरकण्याची वेळ आली नाही पण ही वेळ आलेले लोक आजूबाजूला रोज बघते. वर उल्लेख केलेली आणि दुसरी वेगळी आणि तश्याच दर्जाची कॉलेजस आहेत तीही या यादीत धरलियेत. आमच्या घरच्या मंडळींमध्येही वरील यादीतील मंडळी आहेत. नियम कोणताच दिसला नाही. अमूक असलात तर तमूक होते किंवा अमक्या देशाचे नागरिक, तमक्या पंथाचे, जातीचे वगैरे काहीच नसते असे दिसतेय. मोठ्या कॉलेजांमध्ये शिकून, मेडले मिळवून फारसे यशस्वी नसलेले, फार्फार यशस्वी असलेले, मध्यम दर्जाचे यशस्वी/ अयशस्वी, मराठी, बीनमराठी, भारतीय, बीनभारतीय, सिंगल, भरपूर मुले असलेले, मध्येच मोठा जॉब सोडून व्यवसाय करणारे मोठ्या तसेच लहान कॉलेज मधील काही यशस्वी तर काही अयशस्वी असे प्रकार आहेत. काहीजण जन्मत:अपंग आहेत. त्यांचे यश वरील कॉलेजांमध्ये आणि पैशांमध्ये कसे मोजणार?
खरंतर यशस्वी आणि अयशस्वी कोणाला म्हणायचे हा प्रश्न पडतो. पैसा हेच मोजमाप असेल तर माझा एक भाचा लैच्च यशस्वी आहे पण बाकी संसारालं, व्यवहारातलं काही कळत नाही. सारखे भारतातून नातेवाईक हामेरिकेला पळतात मदतीला. दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही. दुसर्‍याने बोर्डात येऊनही आवडीच्या व्यवसायास जेवढे मिनिमन शिक्षण आवशय्क आहे तेवढे करून विसेक वर्षे व्यवसाय जोरात केला पण कुठेतरी बिनसले आणि आता सगळे बंद करून नोकरी करतोय.
हितं शेजारचा मनुष्य व त्याची बायको मराठीच आहेत. हुच्च दर्जाच्या कॉलेजात शिकलेत पण रोज भाजी फोडणीला टाकता येत नाही दोघांनाही. सहा महिने आईवडील तर उरलेले सहा महिने सासूसासरे आल्याशिवाय यांचे पान हलत नाही. पैशांचे काय करायचे? दुसर्‍याने महान कॉलेजातून आर्थिक व्यवस्थापनाची महान डिग्री घेऊन महिन्याचे घराचे दवापाण्याचे बजेट कसे करावे हे माहित नाही. आम्हाला विचारत होता. तो अब्जाधीश आहे. उपयोग काय?
सगळ्यांचे शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून झालेय पण अगदी पक्के मराठी लोक्स आहेत. आणखी कितीतरी मराठी मध्यमातील मिपाकरच हुच्च दर्जाच्या कॉलेज व जॉब्जमध्ये आहेत. असं आपल्याबद्दलच कसं बोलायचं म्हणून अवघडून गप्प असतील. ही अवघड वेळ माझ्यावर मी कधीच आणली नाही.

babu b's picture

29 Nov 2017 - 7:53 am | babu b

तात्पर्य - अकबर अशिक्षित होता.

डिग्र्या , सर्टिफिकेट हे बहुदा नोकरीसाठीच हातभार लावतात. खासगी व्यवसायाला स्वत:चे स्किल उपयोगी पडते.

रानरेडा's picture

29 Nov 2017 - 10:21 am | रानरेडा

अब्जाधीश म्हणजे ते बिलिओनर म्हणतात ते ?

उपयोजक's picture

29 Nov 2017 - 7:18 am | उपयोजक

दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही.

तुमच्या भावाचा हा प्रवास वाचायला नक्की आवडेल अंजन ठरेल ते! शक्य झाल्यास त्यावर धागाच काढा.

अहो, नाही हो, असं कसं लिहायचं. शिवाय तो जर मिपावर असला तर माझा कान धरेल.
थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे शालेय शिक्षणाला अवास्तव महत्व दिले जाते.
शालेय शिक्षण, तेही मातृभाषेतून आवश्यक आहेच पण मनुष्यप्राणी या प्रांतातून त्या प्रांतात, परदेशात संचार करत असतो व मुले त्यानुसार शाळा बदलत असतात.
माझ्या या आतेभावाने व त्याच्या बहिणींनी यत्ता पाचवीपर्यंत अत्यंत कमी मार्क पाडण्याचा सपाटा लावला होता. ते मराठी माध्यमातच शिकत होते.
शेवटी त्या तिघांनाही इंग्रजी माध्यमात घातले (ती शाळा घराजवळ होती म्हणून! बाकी काही कारण नाही). त्यानंतर तिघाही भावंडांनी मागे वळून पाहिले नाही. सतत पहिला नंबर, मग दहावी व बारावी गुणवत्ता यादीत, उच्च दर्जाची कॉलेजे, मोठ्या कंपन्या असे तिघांनीही केले व आता चाळीशीत निवृत्त झालेत. त्यापैकी भावाने अनेक वर्षे नोकरी केली, बदलली, पुन्हा बदलली असे करूनही मनासारखे काम मिळेना तर कधी नोकरी टिकेना! इतक्या हुषार मुलाचे असे काय झाले वगैरे वाटणे साहजिक होते. शेवटी कंटाळून त्याने हामेरिकेतला गाशा गुंडाळला. बायको मुले घेऊन मायदेश गाठला. आईवडिलांपुढे मनातले काय ते बोलला. सुदैवाने त्यांनी आनंदाने परवानगी दिली. याने ट्रॅक्टर संदर्भात व्यवसाय सुरु केला आणि आता ऐकीव माहितीप्रमाणे (माहेरी जाणे व नातेवाईकांची विचारपूस होत नाही आताशा) पुढे व्यवसायविस्तार करून अनेक उपव्यवसाय सुरु केलेत. बस्तान बसवताना त्याला तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला नाही इतका विचार त्याने केला होता (असे म्हणावे लागेल. नक्की काय ते माहित नाही). हे सगळे असूनही त्याचे वैशिष्ट्य असे की घरातील सगळी कामे करणे, रांधणे, वाढणे, पाहुण्यांची ऊठबस ही कामे त्याला व्यवस्थित जमतात. सध्या सगळ्या कामांना वेगळे मनुष्य आहे. घरी पूजेच्या दिवशी सोवळ्यातले स्वयंपाकी ऐनवेळी आले नाहीत, तीन ऐवजी दोन आले तर हा लगेच सोवळे नेसून शंभर माणसांच्या स्वयंपाकाला बरोबरीने उभा राहतो. त्याच्या बहिणीही तश्याच आहेत.
आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही.
दुसर्‍या आतेभावाचे सगळे शिक्षण असेच चांगले झालेय पण हुषार मुलगा म्हणून शिक्का बसल्याने त्याने आजपर्यंत एकदाही घरातल्या एकाही कामाला हात लावलेला नाही. सत्रा नोकर कामाला आणि तो व्याप सांभाळताना बायको म्हातारी व्हायची वेळ आलिये. उपयोग काय या मनुष्यांचा? इथे मराठी माध्यम की तमीळ माध्यम याचा काय संबंध? पण आपले मराठीवर प्रेम आहे, ती आपली भाषा आहे यावर १०० टक्के सहमत आहे.

ते तुमच्या शेजारी कोण अब्जाधीश राहतात ? ते अब्जाधीश म्हणजे ते बिलिओनर म्हणतात ते आहेत का हो ?

स्मिता.'s picture

1 Dec 2017 - 2:41 pm | स्मिता.

माझ्या माहितीतही असे अनेक लोक आहेत हे लहान शहरातल्या मराठी माध्यमातल्या शाळांत शिकून परदेशात (वर उल्लेखलेली बरीचशी कॉलेजेस परदेशी आहेत म्हणून परदेशाचा उल्लेख) उच्चपदस्थ आहेत. जरा सुधारीत खेडं म्हणावं अश्या लहान शहरात शालेय शिक्षण करून पुढे Oxford मधून Phd करणाराही एक आहे.

माझ्यामते शिक्षण कसं मिळतंय ते महत्त्वाचं, शाळेतून आणि घरूनही! भाषामाध्यम इंग्रजी असलं म्हणजे शिक्षण आपोआपच उत्तम होतंय असं नाहीये. खरं तर प्रत्येकाच्या यशापशाला अनेक गोष्टी जबाबदार असतात पण शिक्षणाचं माध्यम ही सगळ्यात गौण गोष्ट असावी.

आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही.

यातल्या शब्दाशब्दाशी सहमत!! हल्ली चांगले शिक्षण घेतले की स्वयंपाक किंवा इतर साधे घरकाम न जमणे हे समीकरण झाल्यासारखे वाटते.

दुर्गविहारी's picture

29 Nov 2017 - 1:21 pm | दुर्गविहारी

मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली. भरपुर पगार मिळतोय म्हणल्यानंतर भुछ्त्र्यासारखी डि.एड.ची कॉलेज निघाली. एकदा पैसा मिळाण्याचे उत्तम साधन म्हणून शिक्षकी पेशाकडे पहाण्यास सुरवात झाली, शिवाय शिक्षकाला तसेही फार काम नसते म्हणून कोणतेही शासनाचे काम त्याच्या गळ्यात घालण्यास सुरवात झाली. याचा परिणाम म्हणून सरकारी मराठी शाळांचा दर्जा वेगाने घसरला. अर्थात आजही मराठी शाळात चांगले शिक्षक आहेत आणि अगदी अ‍ॅडमिशनसाठी रांग लावल्या जाणार्‍या नगरपालिकेच्या शाळा आहेत. पण हे अपवाद.
यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत.
यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे.
शिक्षणाचा विचार केला तर गणितासारखा विषय मराठीमधूनच शिकवावा, मात्र शास्त्र हे ईंग्रजीमधून योग्य वाटते. शास्त्रामधे मराठीकरणाच्या नादात अनेक क्लिष्ट शब्द शिरलेले आहेत, जे लक्षात ठेवणे फार जड जाते, त्यापेक्षा काही ईंग्रजी शब्द एकून एकून सोपे वाटतात. इतिहास, भुगोल वगैरे किमान समजावून तरी मराठीतून द्यावेत. अर्थात हा वेगळा विषय होइल.
राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.

सरल मान's picture

29 Nov 2017 - 2:53 pm | सरल मान

state board मध्ये जाणार्या मुलीचा बाप.......

babu b's picture

29 Nov 2017 - 3:03 pm | babu b

स्टेट बोर्डमध्येही इंग्रजी मेडियम असतेच.

मी एक वर्ष क्लास घेतले होते.. त्याना मी चार वर्ण शिकवले होते...

१. इतर हाय फाय बोर्ड

२. कॉन्वेंट / इंग्रजी माध्यम

३. सेमी

४. मराठी माध्यम.

प्रत्येक वरचा वर्ण हा खालच्याना दाबायला बघत असतो.

माहितगार's picture

29 Nov 2017 - 5:01 pm | माहितगार

त्याना मी चार वर्ण शिकवले होते...

भारतात नवी स्तरीकरणे आकारास येत आहेत हे खरे असले तरी त्याचे स्वरूप जन्माधारीत वर्ण कडून संपत्तीआधारीत '(सोशल) क्लास' असे बदलत आहे का ? नव्यास्तरीकरणाचा शैक्षणिक भाषामाध्यम हा यात अद्यापतरी तात्कालीक आणि दुय्यम घटक आहे.

एकदा तुम्ही तंत्रज्ञ / तज्ञ म्हणून तुमच्या नौकरीत स्विकारले गेला की शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले हा अजूनही दुय्यम घटक आहे आणि पुढेही हा घटक दुय्यम राहील फक्त न्युनगंड, एक्सपोजर अभाव या समस्या भेडसावत राहतात त्यातून मोठ्या मानवी समुहाची भाषा संकल्प होतो आहे.

आज भाषा विषयक तंत्रज्ञान एवढ्यावेगाने प्रगत होत आहे अजून दहा-पंधरा वर्षांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विशीष्ट भाषेचे येणे न येणे दुय्यम होईल. इंग्रजीच्या तुष्टीकरणात रॅशनल काहीच नाहीए पण समाज आणि त्यांचे सामाजिक-राजकीय नेतृत्व आत्मविश्वास गमावून बसल्यावर काय होते याचे चित्र दिसत आहे.

माहितगार's picture

29 Nov 2017 - 5:03 pm | माहितगार

* त्यातून मोठ्या मानवी समुहाची भाषा बदलण्याचे संकल्प होतो आहेत.

माहितगार's picture

29 Nov 2017 - 4:46 pm | माहितगार

मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली.

सहमत. अजून काही मुद्दे;

१) जो पर्यंत विभागवार आणि राज्यवार बोर्ड परिक्षांच्या मेरीट लिस्ट काढल्या जात तो पर्यंत मराठी शाळातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची आणि शाळांची स्पर्धात्मकता आणि गुणात्मकता स्पष्टपणे दिसून येत होती. ते आता होत नाही त्यामुळे तुलना काय दिखाऊ ते चकाकते आहे, त्याच्याशी होते आहे.

२) आधीच्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा ओढा राज्य-सरकारी नौकर्‍या त्यासाठी च्या स्पर्धा परिक्षाकडे होता, लोकसंख्या वाढ आणि सरकारी संधी खासगीकरणामुळे कमी होणे जागतीकीकरण यामुळे करीअर गोल शिफ्ट झाले.

यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत.
यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे.

सहमत.

राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.

वस्तुतः आधीच्या पिध्यातून आमेरीकावासी आणि आयटीवासी झालेली बरीच मंडळी मराठी माध्यमातीलच आहेत . मराठी संकेतस्थळांचा मोठा वाचक/ग्राहकवर्गही हिच मंडळी आहेत. आमेरीकेत गेल्यावर यांना आयआयटी आय आय एम झालेली मंडळी भेटतात. जो सिंड्रोम भारतात असताना नसतो तो तिथे जाऊन काही प्रमाणात तयार होऊन असे धागे तयार होतात.

वस्तुतः विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्ता उपलब्ध ज्ञान आणि संधी अर्थशास्त्र परभाषा अवलंबी असण्याचे कारण नाही, हे भाषा अवलंबीत्व कृत्रिम मोनोपॉलीच्या आधारावर तयारकरत केले जात याची जाणीव होत नाही. तो पर्यंत हे दुष्टचक्र चालू रहाणे क्रमप्राप्त असावे.

त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.
>> +१००
पूर्ण सहमत

श्रीगुरुजी's picture

29 Nov 2017 - 3:56 pm | श्रीगुरुजी

"मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" हे या धाग्याचे शीर्षकच मुळात चुकले आहे. त्याऐवजी "सर्व माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" किंवा "शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" असे शीर्षक हवे होते. कारण निव्वळ मराठी माध्यमाच्याच शाळा दर्जाहीन नसून सर्व माध्यमातील बहुतेक सर्व शाळांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. मराठी शाळांच्या जुनाट इमारती, फारसे पॉलिश्ड नसलेले किंवा शहरी/स्पष्ट उच्चार नसलेले काही शिक्षक, तिथे शिकण्यास येणारे कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी यामुळे चकचकीत वर्ग, हायफाय शिक्षक, उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थी असलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळा मराठी शाळांच्या तुलनेत खूप उजव्या वाटतात. परंत दोन्ही शाळांमध्ये फक्त दिखाव्याचाच फरक आहे. तिथल्या शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा यात फारसा फरक नाही.

एकूण चार प्रकारची माध्यमे आहेत.

१) १० पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण
२) ७ वी पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण व ८ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून (यातला अजून एक प्रकार म्हणजे ४ थी पर्यंत संपूर्ण मराठी व ५ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून)
३) मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा
४) चर्चशी संबंधित असलेल्या संतांची नावे दिलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या कॉन्व्हेन्ट शाळा

या सर्व प्रकारच्या शाळेत ज्ञान दिले जात नसून या शाळेत दिले जाते ते ज्ञान समजून गोड मानून घ्यावे लागते. बर्‍याचशा मराठी शाळा या सरकारी अनुदानित आहेत तर बहुतेक इंग्लिश माध्यमाच्या शाळा विनाअनुदानित आहेत. कॉन्व्हेन्ट किंवा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना संपूर्ण मराठी किंवा अंशतः मराठी माध्यम असलेल्या शाळातील शिक्षकांच्या तुलनेत जास्त किंवा खूप जास्त वेतन मिळते हा एक मोठा गैरसमज आहे. इंग्लिश माध्यम / कॉन्व्हेन्ट मध्ये शिकविणारे अनेक जण कंत्राटी शिक्षक असून त्यांच्याकडे बी एड किंवा तत्सम पात्रता पदवी नसते. त्या तुलनेत मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित असल्याने तिथले शिक्षक पूर्णपणे सरकारी नियमानुसार नेमले जातात (म्हणजेच ते बी एड, डी एड इ. पदवीधारक असतात). त्यांचे वेतन सरकारी नियमानुसार असते व नोकरीची शाश्वती असते. याउलट इंग्लिश माध्यमातील शाळांमधून शिकविणार्‍या शिक्षकांना नोकरीची शाश्वती नसते व त्यांचे वेतन संस्थाचालकांच्या मर्जीवर अवलंबून असते. या शाळांची फी प्रचंड भरमसाठ असली तरी त्यातील बहुतेक रक्कम संस्थाचालकांकडे जाते व शिक्षकांना त्यातील अत्यल्प वाटा मिळतो.

मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत?

हा प्रश्नच संदर्भहीन आहे. त्याचे कारण असे की मराठी माध्यमांच्या शाळा व इंग्लिश माध्यमांच्या शाळा हा निर्णय बहुतांशी पालकांच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून आहे (याला अर्थातच थोडे अपवाद आहेत). IIT/IIM, हार्वर्ड, INSEAD अशा ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. त्यासाठी प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची फी खूप प्रचंड असते (IIT साठी शक्यतो उशीरात उशीरा ८ वी पासून तयारी करावी लागते व IIT च्या ११ वी/१२ वी च्या प्रशिक्षण वर्गाची फी किमान २ लाख आहे). नुसते प्रशिक्षण घेऊन भागत नाही तर त्याबरोबर महागडी पुस्तके, टेस्ट सीरीज असा मोठा खर्च असतो. मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नसते व त्यामुळे त्यांना हे महागडे प्रशिक्षण परवडत नाही. त्यामुळे तिथून IIT/IIM किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रवेश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अर्थातच कमी असते. या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच.

मराठी व इंग्लिश पत्रकारांची किंवा लेखकांची तुलना अस्थायी आहे कारण मराठी ही केवळ एका राज्याची भाषा आहे तर इंग्लिशभाषी देशात व परदेशात सर्वत्र पसरलेले आहेत. अशी तुलना करणे म्हणजे दंगल व सैराट या सिनेमांच्या गल्ल्याची तुलना केल्यासारखे आहे.

याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?

दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).

श्रीगुरुजी's picture

29 Nov 2017 - 4:05 pm | श्रीगुरुजी

दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).

वरील वाक्य थोडे चुकले आहे. ते पुढीलप्रमाणे हवे.

दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या व मुलांच्या आवडीनुसार व प्राथमिकतेनुसार आपल्या मुलांसाठी माध्यम निवडावे. इंग्लिश माध्यम हवे असल्यास कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य.

या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच.
चांगली गोष्ट आहे . तरी गेल्या १५ वर्षातील काही नवे देवू शकाल काय ?

मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा याच चांगल्या का ? त्या ICSE / CBSE नसतील तरी चांगल्याच का ? आणि मग मुंबईतील काही शाळा जशा कि जमनाबाई नरसी , मानेकजि कूपर , पोदार या मराठी लोक चालवत नाहत म्हणून टाकाऊ आहेत काय ? मराठी लोकांनी चालवलेल्या कोणत्या ICSE / CBSE शाळा आहेत ? IB बोर्डाच्या किती ?

कॉन्व्हेंट मध्ये गेल्याने काय तोटा होतो ? मी ३० वर्षे पाववाल्यांच्या शेजारी ( कॅथलिक ) वाढलो . ते आणि बिल्डिंग मधले बरेच कॉन्व्हेंट मध्ये होते . हिंदू मित्र हिंदूच राहिले आणि क्रिस्टिअनस क्रिस्टिअनस , उलटे माळ्यावर आजिबात इतर मराठी लोक नसल्याने बालपण मजेत गेले . सध्या कॉन्व्हेंट चा एकच तोटा आहे कि फार कमी ICSE / CBSE आहेत , आणि मुंबईच्या बऱ्याच भागात कॉन्व्हेंट शाळांचे ग्लॅमर गेले आहे .
तरी पण तुमचे कॉन्व्हेंट ला झोडपणे अनाठायी वाटते !

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

माझा नूमवि शाळेतील वर्गमित्र १२ वी नंतर आयआयआयटीत गेला होता. ७ वी पर्यंत मराठी माध्यमात व ८ वी ते १० वी फक्त शास्त्र व गणित वगळता इतर विषय मराठीतून शिकलेले एक मिपाकर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये होते. माझ्या ओळखीची एक मुलगी १० पर्यंत हुजूरपागेच्या मराठी माध्यमात शिकली. पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले.

ही अगदी सहज आठविलेली उदाहरणे. मी ज्या आयआयटी प्रशिक्षण संस्थेत शिकवितो तिथे ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इंग्लीश माध्यमातील असले तरी मराठी माध्यमातील सुद्धा काही विद्यार्थी आहेत व त्यातील काही जण आयआयटी प्रवेश परीक्षेत रॅंक मिळवितात.

मी आधीच लिहिल्याप्रमाणे आयआयटी, आयआयएम इ. संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचा व शिक्षणाच्या माध्यमाचा संबंध नाही. या संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अपवाद वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अशा प्रशिक्षण वर्गाची फी खूप प्रचंड असते. कमी आर्थिक उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण परवडत नाही व त्यामुळे ते त्या दिशेला फिरकत नाहीत. एखाद्या उच्च उत्पन्न गटातील मुलाने १० पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप जास्त आहे. याउलट त्याच मुलाने १० पर्यंत इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले नाही तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप कमी आहे.

मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा व चर्चशी संबंधित किंवा कॉन्व्हेंटने चालविलेल्या अशा शाळा यात बराच फरक आहे. कॉन्व्हेंट शाळेतून बर्‍याच प्रमाणात RNI तयार केले जातात असे माझे निरीक्षण आहे. इथल्या संस्कृतीशी, चालीरितींशी ते बर्‍याच प्रमाणात फटकून वागतात. अशा संस्थांमध्ये दिवाळीची सुटी जेमतेम १ आठवडा व ख्रिसमसची सुटी ३-४ आठवडे असते. याउलट मराठी शिक्षणसंस्थांनी शाळा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या असल्या तरी त्या बर्‍याच प्रमाणात मराठी शाळेप्रमाणेच चालविल्या जातात. अशा बर्‍याचशा शाळा अनुदानित असल्याने तिथे पात्र शिक्षकांनाच घेतले जाते. कंत्राटी, अपात्र शिक्षक कमी असतात.

रानरेडा's picture

30 Nov 2017 - 10:15 pm | रानरेडा

पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले.

काहीतरी गडबड नाही का?
मला वाटे कि ती मुलगी फेक्तेय
हे कुठल्या वर्षी झाले ?

मुंबईत चांगल्या कॉलेज चे ranking असे आहे

Independat
SP Jain
IIT Shailesh J Mehta School of Management
National Institute of Industrial Engineering, Mumbai

Under Mumbai Univercity

JBIMS
NMIMS
Sydenham
Welingkar
सोमैया

तर तिने एवढी कॉलेज सोडून Welingkar ला प्रवेश का घेतला ?

माझ्या वेळेला (1991) IIT 2 मार्कांनी गेली सांगणारे बरेच जण असायचे . नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते . हे एकदा एक असेच सांगणार्याला सांगितले तेव्हा तो पिसाळला होता !

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 10:39 pm | श्रीगुरुजी

तिच्या पालकांनी ३ कॉलेजेस पाहून त्यांना सोयिस्कर म्हणून वेलिंगकर निवडले होते.

नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते .

चुकीची माहिती आहे.

गॅरी ट्रुमन's picture

30 Nov 2017 - 11:08 pm | गॅरी ट्रुमन

कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल असतील तरी वेलिंगकरमध्ये जायची प्रेरणा समजण्याच्या पलीकडची आहे. मुंबईत एकही आय.आय.एम नाही तरी कॅटचा स्कोअर घेणारी एस.पी.जैन (आणि इंजिनिअर असल्यास आय.आय.टी आणि निटी) ही कॉलेज टारगेट करता येऊ शकली असती. आणि तिथे पण जायचे नसेल तर मुळात कॅट कशाला दिली हा प्रश्न पण पडलाच. नाहीतर नरसी मोनजीसाठीची एन.मॅट किंवा बजाज/ सिडेनहॅम यांच्यासाठीची सी.ई.टी यातून वेलिंगकरपेक्षा जास्त चांगली कॉलेज मिळू शकलीच असती.

कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल आणि त्यातून मुलगी असेल तर अहमदाबाद/कलकत्ता नाही तरी निदान कोईकोडचे आय.आय.एम मध्ये नक्कीच प्रवेश मिळू शकतो. ते सोडून वेलिंगकरमध्ये जावे लागल्याची घटना बघून वाईट वाटले. आणि चांगल्या संस्था कुठल्या ही माहिती नसल्यामुळे जर हा निर्णय घेतला गेला असेल तर अजूनच वाईट वाटण्यासारखा प्रकार आहे हा.

आयला . असे त्यांनी काय पहिले होते ? ती ओंग वागिरे होती का ?

१९९१ साली IIT चे मार्क कळत होते ? तुम्ही त्यावेळी दिली होती का? कारण त्या वर्षी पहिल्यांदा Screening टेस्ट आली होती , तसेच ८९ , ९० , ९१ , ९३ ला कोणी ना कोणी तरी ओळखीचे IIT गेले होते .

रानरेडा's picture

30 Nov 2017 - 11:28 pm | रानरेडा

ओंग नाही अपंग

मी आज पहिल्यांदा मिळत असून टॉप चे कॉलेज सोडले अशी केस बघितली ...

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 11:58 pm | श्रीगुरुजी

माझ्या ओळखीतील अजून एक केस आहे. ही मुलगी १२ वीत असताना तिची आई एका गंभीर आजाराने आजारी पडली. मुलीला IIT प्रवेश परीक्शेत ranking मिळूनसुद्धा तिने आईपासून दूर जाऊ नये यासाठी IIT त गेली नाही.

हे असू शकते कारण iit राहावे लागते इकडे बाकीची सर्व कॉलेज मुंबईतच आहेत .
म्हणजे जायला यायला त्रास होतो म्हणून तिने हे केले का ? असे असेल तर तिची Management करायची लायकी नव्हती असे वाटते . नात्र हि कोठे जॉब करतेय ? म्हणजे तिकडून एकाद्या कामाला दुसर्या ठिकाणी जावे लागले तरी नाही म्हणते का ? कि असा काही व्यवसाय आहे कि तिच्याकडेच फक्त क्लायंट ला दुरून यावे लागते ?? अजबच आहे सगळे ...

अहो असतात अशा केसेस. माझ्या आत्यानी तिच्या मुलीला कोणत्यातरी चांगल्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळत असताना लांब पाठवायला नको या एका कारणास्तव बिएस्सी करायला लावले व एमेस्सीचे एक वर्ष झाल्यावर "बास आता" म्हणाली. ती बहिण आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी असल्याने त्यावेळची मार्कांची परिस्थिती व मुंबईतील कॉलेजस माहित नसल्याने काही सांगता येणार नाही पण उडत उडत ऐकले की तिला वैद्यकीय प्रवेश मिळत होता पण 'लग्न' या एका कारणास्तव बाकी सगळे बंद केले. एवढे करून लग्न नंतर चार वर्शांनी झाले. बीएस्सी व पुढील वर्षी ती त्यावेळचे हुच्च मार्क्स मिळवून होती हे मात्र माहितिये.

शिक्षण कुठल्याही माध्यमात घेतले तरी आयुष्यात यश अंगभूत हुशारी मुळेच येते ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण हुशारीला पैलू पाडायचे काम शाळेत होऊ शकत असल्याने शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा माध्यमाइतकाच महव्हाचा आहे.

माझ्य वैयक्तीक अनुभवावरून सांगतो, आमच्या शाळेचा दर्जा - जो मी शिकत असतानाही फारसा उच्च नव्हता - तो आता प्रचंड घसरला आहे. ह्याची सुरुवात मी शाळेत असतानाच झाली होती. स्पष्ट सांगायचं तर शाळेने सरकारी ग्रँट घेतल्यावर शाळेत रिझर्वेशन कोट्यातनं शिक्षक यायला सुरुवात झाली आणि तिथून दर्जा घसरू लागला. दोन शिक्षकांच्या शिकवायच्या पद्धतीमुळे आणि अगाध ज्ञानामुळे मुलांनीच सह्यांची मोहीम राबवून त्यांना शाळेतून काढायला लावले होते. पण पुढले पाढे पंचावन्न झाल्यावर आम्हीही नाद सोडला.

हळू हळू लोकांनी मुलांना इथे पाठवायचे बंद केले. सद्ध्या जाता येताना ह्या शाळेतली मुलं बघितली तर ह्यांच्या सोबत आपल्या पाल्याला शिकू द्यायला काय १० मिनिटं सोबत बसवायलाही कुणी तयार होणार नाही. थोड्याफार फरकाने हीच अवस्था मागच्या १२-१५ वर्षात इतर मराठी शाळांची झालेली आहे.

मी माझ्या मुलीसाठी शाळा बघत असताना, मराठी माध्यम - स्टेट बोर्ड - अन्यथा इतर असा पर्याय ठेवला होता. कॉन्व्हेंटमधे चुकुनही पाठवायचे नव्हते. आजूबाजूच्या बर्‍याच शाळांचा अभ्यास केल्यावर आणि बराच शोध घेतल्यावर शेवटी आय.सि.एस.सि. बोर्डात प्रवेश घेतला. शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. त्यांचा अभ्यासक्रम आणि मराठी शाळेतला अभ्यासक्रम ह्यात प्रचंड फरक आहे. आणि माझ्या मते हा अभ्यासक्रम भविष्यासाठी अधीक उत्तम आहे.

शाळेची फी नक्कीच जास्त आहे, पण शैक्षणीक सोयी सुविधा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा दर्जा हा आमच्या शाळेपेक्षा कैक म्हणजे कैक प्रमाणात चांगला आहे.

babu b's picture

29 Nov 2017 - 6:23 pm | babu b

रिजर्वेशनचा कोटा पुर्वीपासूनच आहे.

आम्हाला सर्व जातीधर्मांचे शिक्षक चांगलेच भेटले.

दुर्गविहारी's picture

29 Nov 2017 - 7:26 pm | दुर्गविहारी

बर्‍याचश्या मुध्दयाशी सहमत ! मी ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो तिथली सध्याची परिस्थिती पहाता मला मुलगा असता तर निश्चितच घातले नसते. मात्र हे दर्जा घसरत जाणे एका रात्रीत घडलेले नाही. आजुबाजुची मुले याच शाळेत जात होती. त्यामुळे चाललेल्या घडामोडी समजत होत्या. याबाबत रिझर्व्हेशन कोट्यालाच किती दोष द्यायचा हे नक्की समजत नाही. बर्याचश्या शिक्षकांचे चुकीचे उच्चार, जो विषय शिकवायचा त्याचे पुरेसे नसलेले ज्ञान आणि शिकवण्याआधी तयारी न करताच तासाला येणे हे दोष जाणवतात. अश्या परिस्थितीत आपल्या मुलाला/ मुलीला कोणत्या कारणाने या शाळेत घालणार ? शिवाय मराठी शाळांची कमी असणारी फि आणि ईंग्रजी माध्यमांच्या शाळांची जास्त असणारी फि यामुळे कदाचित आर्थिकदॄष्ट्या विभागणी होउन एका विशिष्ट वर्गाची मुलेच पालकांना परवडणार्‍या शाळेत जात असल्याने कदाचित मराठी शाळांचा पर्याय निवडताना अडचणी येत असाव्यात किंवा आजुबाजुच्या लोकांचे एक नकळत दडपण येत असावे. यामुळे काही उत्तम दर्जा असणार्‍या मराठी शाळांना याचा फटका बसला असणे शक्य आहे.
माझ्यापुरते सांगायचे तर मी माझ्या मुलीसाठी सि.बी.एस.सी. पॅटर्न नक्की केला. मात्र शाळेची निवड करताना आवर्जुन आजुबाजुच्या लोकांकडून शाळेची पुरेशी माहिती घेतली आणि मुख्य म्हणजे शाळा पहायला जाताना आवर्जून मुलीला सोबत घेउन गेलो, कारण शेवटी तीलाच आयुष्यातील महत्वाची दहा वर्षे तिथे काढायची आहेत. ज्या शाळेत ती आत्ता आहे, तिथे गेल्यानंतर स्वतःहून तीला ती शाळा आवडली. आम्हीही अगदी टॉयलेटपासून सर्व सुविधा नजरेखालून घातल्या. नुसते शिक्षण नाही तर ईतर गोष्टींवर किती भर दिला जातो आहे ह्याच्यावर लक्ष दिले. तेव्हा मुलांसाठी शाळा मराठी किंवा ईंग्रजी कोणतीही निवडा महत्वाचे आहे आपले मुल तिथे रुळले जाईल का, हे.
अर्थात शिक्षणाचे माध्यम ईंग्लिश निवडले म्हणजे अगदी घरादारात सतत ईंग्लिश बोलले पाहीजे असे नाही, हे माझे मत. आवर्जून नवीन समजलेल्या गोष्टीला ईंग्लिश शब्द व त्याला पर्यायी मराठी शब्द आम्ही सांगतो. शाळेमधे ईंग्लिश गोष्टीची पुस्तके मिळतात. पण पुस्तकप्रदर्शनातून तिच्यासाठी खास मराठी गोष्टीची पुस्तके, सि.डी. या आणतो. मातॄभाषेतही तुम्हाला सफाईने लिहीता वाचता यायलाच हवे. अगदी पु.ल. किंवा व.पु. किंवा मिरासदार, माडगुळकर यांची पुस्तके हि मुले वाचतील कि नाही हे आज सांगंणे कठीण आहे, पण किमान यांची ओळख करुन देणे तरी तुमच्या हातात आहे.

मित्रहो's picture

29 Nov 2017 - 8:01 pm | मित्रहो

शाळा कुठली आहे याने खरच किती फरक पडतो हा संशोधनाचा विषय आहे.

कितीही नाकारले तरी पैसा हे यश मोजण्याचे एक महत्वाचे परिमाण आहे. वर नमूद केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला असता पैसा मिळविणे सोपे जाते हेही खरेच आहे. तेंव्हा ते मार्केट आहेच. पुढे राहीलच असे ठामपणे सांगता येत नाही. प्रश्न येतो की मुलांना तिथे प्रवेश मिळविण्यात शाळेचा वाटा किती. क्लासेसचा वाटा किती. बरेच असे असतात उगाच क्लास नाही लावला तर प्रवेश मिळनार नाही म्हणून क्लास लावतात तर काही मित्र जातात म्हणून तिथे जातात. मला वाटते जे खरच जिनियस असतात, कुठल्या तरी क्षेत्रात कारागीर असतात, मेहनत करायची तयारी असते ते मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले काय किंवा इंग्रजी, आयआयटीत गेले काय किंवा साधारण कॉलेजात ते यशस्वी होतातच. त्यांना हवे ते गुरु सुद्धा भेटतात. शेवटी रत्न आहे तर त्याला रत्नपाऱखी सुद्धा भेटतात. जे ढ आहेत ते तसेच राहतात. समस्या असते ती मधल्यांची. त्यांना इंग्रजी, मोठ्या कॉलेजचे सर्टिफिकेट या अशा कुबड्यांची गरज पडते. आज इंग्रजी ही जगाच्या व्यवहाराची भाषा आहे. तिला नाकारुन जमतच नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विशेषताः विज्ञान तरी नक्कीच इंग्रजीतून शिकले पाहीजे.

Harvard, Insead यांना GMAT लागते त्यात Sentence Correction नावाचा प्रकार असतो. तो इंग्रजी माध्यमवाल्यांना सोपा जातो असे म्हणतात. खरे म्हणजे या प्रकाराचा व्यक्तीच्या बुद्धीशी फारसा संबंध नाही. IIM मधे प्रवेशासाठी सुद्धा इंग्रजीचे आकलन गरजेचे असते त्याचमुळे इकडे मराठी माध्यमातील मुले सापडत नसावीत. मराठी शाळा जर खरच चांगल्या शिकवित असतील तर IIT मधे मराठी शाळेतील विद्यार्थी सापडायला हवेत.

Consultancy कंपनीत जाणे म्हणजे फार महान आहे हे फारसे पटले नाही. त्या कंपन्यांतील लोकांना प्रत्यक्ष व्यवस्थापनाचा कितपत अनुभव असतो माहीती नाही पण त्यांच्या स्लाइडस आणि इंग्रजी छान असते. स्लाइड कशा बनावायच्या हे त्यांच्यापासून शिकले पाहीजे. खरे खोटे माहीत नाही मागे वाचले होते बजाजने पल्सर लॉंच करायच्या आधी अशाच साऱ्या कंपन्यांना विचारले होते आणि साऱ्यांनी नाही म्हणून सांगितले होते. बजाजने त्यांचे म्हणणे ऐकले असते तर.... कॉर्पोरेट क्षेत्रात VP म्हणून बरेच मराठी माणसे सापडतात पण मोठी म्हणून काही नावे घ्यायची झाली तर नितीन परांजपे, विक्रम पंडीत, अभी तळवलकर अजूनही असतील घेता येतील. माझ्या माहीतीप्रमाणे ते मराठी शाळांचे नाही. तसेच KPIT, Persistent या मराठी माणसांच्या यशस्वी कंपन्या आहेत .

यश हे फक्त शाळेवरच अवलंबून नसते हे जरी खरे असले तरी इंग्रजीचे ज्ञान आणि सराइतपणे इंग्रजी बोलायची सवय आजच्या जगात तरी मदत करते. पुढे तसेच राहील काही सांगता येत नाही. इंग्रजी माध्यमात गेला म्हणून खूप नुकसान झाले असे मात्र ऐकले नाही. इंग्रजी माध्यमात शिकला म्हणून मराठीपण हरवायला नको हे मात्र खरे.

खरं तर हा प्रश्नच संदर्भहिन आहे. आता मुलं इंग्रजी माध्यमातच शिकणार.
प्रश्न एवढाच आहे की
स्टेट बोर्ड
सि.बी.एस. सी
आय.सी.एस.सी,
आय.जी.सी.एस.सी की
आय.बी. ?

उपयोजक's picture

29 Nov 2017 - 8:31 pm | उपयोजक

IIT/IIM हार्वर्ड , INSEAD, Oxford इथे शिकता येण्यासाठी नेमकं काय काय लागतं? अाणि हे जे काही लागतं ते मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांमधे(निदान मागच्या १० वर्षातल्या तरी) नसतं का? असेल तर आऊटपूट का दिसत नाही? मराठी माध्यमांतल शिक्षण हे पुढे जाऊन जागतिक स्तरावर टिकता येईल एवढं दर्जेदार नसतं का? किंवा राहिलेलं नाही का?

मागच्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेली मुलं पुढे मात्र दर्जेदार संस्थेत शिकतात.हे कसं?

माहितगार's picture

30 Nov 2017 - 11:03 pm | माहितगार

विधानांमध्ये बर्‍याच गोष्टी सरसकट गृहीत धरल्या जात नाही आहेत ना ?

श्रीगुरुजी's picture

1 Dec 2017 - 1:10 pm | श्रीगुरुजी

खालील संकेतस्थळावरील माहिती वाचा.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/After-Hindi-and-Marathi-...

मुंबई आयआयटीमध्ये स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांंसाठी मराठी, हिंदी व बंगालीतून तास आयोजित करून शिकण्यासाठी मदत केली जाते. या संस्थेत स्थानिक माध्यमातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी आहे व त्यांना विशेषतः पहिल्या वर्षी इंग्लिशमधून विषय शिकण्यास अवघड जाते. त्यामुळे तेथील प्राध्यापकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. या वृत्तांतातील काही निष्कर्ष उल्लेखनीय आहेत.

- A campus survey has shown that among IIT-B's 2013 batch's first-year students, 40% are from metropolitan cities, 35% from other cities, 21% from towns and the remaining 4% from villages. The institute's student media body, which conducted the study, found that academic performance was correlated to students' place of origin.

विद्यार्थी कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिकला यापेक्षा तो कोणत्या गावातून आला यावर विद्यार्थ्याची कामगिरी अवलंबून आहे असे लिहिले आहे.

The survey also found that every third respondent felt their academic performance nosedived because of the medium of instruction being English (for exceptions, refer to main story). The average CPI of such students is 5.47.

एकंदरीत येथील एक तृतीयांश विद्यार्थी इंग्लिशमधून शिकण्यास कचरत असावेत असं दिसतंय. ते कदाचित स्थानिक भाषेतून शिकले असावेत.
___________________________________________________________________________

खालील संकेतस्थळावर रोचक आकडेवारी आहे.

http://blog.askiitians.com/jee-advanced-2014-result-analysis-favor-regio...

जेईई-अ‍ॅडव्हान्स्डची पूर्वपरीक्षा, जेईई मेन्स, स्थानिक भाषेतून सुद्धा देता येते. या परीक्षा इंग्लिश माध्यमातून देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १२.५% टक्के आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ३.०३% टक्के आहे. यावरून एकदम असा निष्कर्ष काढता येईल की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे ते मागे पडत आहेत.

परंतु इतर आकडेवारी व निष्कर्ष वेगळेच चित्र दाखविते. गुजराती माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ११.०५% टक्के व हिंदी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ९.२१% टक्के आहे. म्हणजे इंग्लिशमधून किंवा गुजराती/हिंदी भाषेतून ही परीक्षा देऊन यश मिळविणार्‍यांच्या टक्केवारीत फारच थोडा फरक आहे. याचे कारणही वृत्तांतात दिले आहे.

- A senior CBSE official shared that most students who took JEE Main in Marathi and Urdu were from government schools and poor families. Their poor performance and weak success rate can be attributed to lack of coaching and guidance too. Most of the JEE coaching is either available in English or in Hindi (in some regions), is expensive and is concentrated in urban areas.

- An IIT faculty member opines that even the JEE Main aspirants taking exams in regional languages can have a better success rate if they have adequate study material and training in the languages they choose. This trend can be seen in the case of Gujarat where even students from well-off families study in Gujarati medium. Hence, the success rate of students who took JEE Main in Gujarati is quite high.

मी याआधीच एका प्रतिसादात लिहिले आहे की अशा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे व अशा प्रशिक्षण वर्गांचे शुल्क खूप जास्त असल्याने कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सर्वसाधारणपणे मराठी माध्यमातील बहुसंख्य शाळांमधून कमी उत्पन्न गटाचीच मुले असतात व त्यांना हे प्रशिक्षण परवडू शकत नसल्याने त्यांची टक्केवारी कमी दिसते. जर त्यांनासुद्धा हे विशेष प्रशिक्षण मिळाले तर ते सुद्धा या संस्थेत प्रवेश मिळवून शकतील. वरील परिच्छेद मी आधी लिहिलेलेच सिद्ध करतात.

____________________________________________________________

मराठी माध्यमातून शिकून प्रथम आयआयटी (मद्रास) व नंतर स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश मिळविलेल्या सुजीत घोलपची स्फूर्तीदायक कहाणी त्याच्याच शब्दात -

http://blog.sujeet.me/2014/06/let-no-one-tell-you.html

तामिळ माध्यमातून शिकून आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळविणार्‍या व नंतर गुगलमध्ये जॉब मिळविणार्‍या अजून एका तामिळ विद्यार्थ्याची कहाणी -

http://ajourneythatneverends.blogspot.in/2011/08/how-did-i-survive-that....

३-४ वर्षांपूरी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून शिकणारी मृदुल थत्ते हिला ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाचे रौप्य पदक मिळाले होते. तेव्हा ती १२ वीत शिकत होती. या स्पर्धेतील यशामुळे तिला एमआयटी पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश दिला व सध्या ती तिथेच पदवीचे शिक्षण घेत आहे. ज्ञानप्रबोधिनी ही अधिकृतरित्या इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत प्रवेश ५ वी मध्ये मिळतो (१ ली ते ४ थी वर्ग ही संस्था चालवित नाही). ४ थी तील मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन फत ८० विद्यार्थ्यांना ५ वीत प्रवेश दिला जातो. ५ वीत प्रवेश घेतलेली मुले ४ थी पर्यंत मराठी किंवा अन्य माध्यमातून शिकलेली असतात. ५ वी नंतर जरी इंग्लिश माध्यम असले तरी शाळेचे वातावरण व सर्व उपक्रम संपूर्ण मराठी आहेत. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सर्वजण मराठीतच बोलतात. इंग्लिश फक्त विषय शिकण्यापुरते आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Dec 2017 - 3:14 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या, मराठी माध्यमातून शिकलेल्या व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या सागर देसाईची कहाणी - http://www.dnaindia.com/academy/report-worldly-wise-converge-at-iim-a-12...

गुजराती माध्यमातून शिकलेल्या व व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या एका विद्यार्थ्याची कहाणी -
https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Over-15-students-from...

कुमार१'s picture

1 Dec 2017 - 5:34 pm | कुमार१

वरील दोन्ही प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत!
छान माहिती

निव्वळ एेदी पणा.
HR ला आहात तर घ्या की PhD या विषयात, करा जरा मेहनत, अभ्यास, आकडेमोड इ. इ.
IIT, IIM सरकारी नियंत्रणात असल्याने RTI खाली नक्की माहीती मिळेल पण उगा उचकवण्याचा आनंद घालवा कशाला?
प्राथमिक माहीती व शिक्षण दुरापास्त असताना हे माध्मम वितंड कुठे उठाठेव करतील मराठी जन?
सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही. या राज्यात राज्यभाषेची अवहेलना व तिचे पाईक शिक्षक सरकारी अधिका-यांच्या मनमानी, लहरी, धोरणशुन्य कारभारात पिचून गेल्याने कसचा दर्जा, सगळा जर्दा!!

धागालेखकाला PhD साठी शुभेच्छा!!
बाकी , विषयात वाद-विचार मूल्य शून्य.

शिका व मोठे व्हा, स्वत:चा अभ्यास स्वत: करुन!

babu b's picture

3 Dec 2017 - 10:19 am | babu b

सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही.

हे पटले नाही.

नमकिन's picture

2 Dec 2017 - 7:45 pm | नमकिन

मी 【राज्यातील तेराशे शाळा बंद - one thousand three hunderd school will shut down - Maharashtra Times】 | https://www.google.co.in/search?hl=mr-IN&ie=UTF-8&source=android-browser... ची मजा घेत आहे

आता शिकायचं कुटं? आन् कसं वो?
लोकसंख्या वाढतेय पण पटसंख्या घटतेय.

babu b's picture

2 Dec 2017 - 8:47 pm | babu b

पटसंख्या स्थलांतरीत होते.

बाकी , सत्तांतर होउनही संस्कृती , भाषा वाचेना , हे गौडबंगाल काय म्हणे ?

उपयोजक's picture

2 Dec 2017 - 11:46 pm | उपयोजक

3 brothers

babu b's picture

4 Dec 2017 - 11:37 pm | babu b

Taj terror attack has become a massive psychology case study in Harvard. Not ONE Taj employee abandoned the hotel and ran right through the attack. They helped guests escape and many died . It confounds psychologists . Finally they pin pointed 3 recruitment strategies 1) Taj did not recruit from big cities , they recruited from smaller cities where traditional culture still holds strong 2) They did not recruit toppers, they spoke to school masters to find out who were most respectful of their parents, elders , teachers and and others .3) They taught their employees to be ambassadors of their guests to the organisation not ambassadors of the company to their guests . The results are stupefying . The Indian army too does not recruit toppers, they recruit people through intensive psychological testing, perhaps that is why they have one of the most effective govt organisations in the country , unlike bureaucrats recruited for being topers but suspect psychologies . This has implications on parenting too

https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=vQGz1YRqBPw

पद्मश्री चित्रे's picture

5 Dec 2017 - 11:02 am | पद्मश्री चित्रे

माझा मोठा मुलगा गेल्या वर्षी 12 वी त होता . तो मराठी (Semi english) माध्यमात होता . 12 वी CET त तो top 100 मधे होता , bits pilani ला प्रवेश मिळत होता . पण IIT च हवं होतं त्याला त्यामुळे I IT इंदौर ला प्रवेश घेतला . तो हुशार आणि अभ्यासू होताच पण त्याच्या मते अशा competitive परीक्षंत माध्यम महत्वाचे नसते . Basic concept समजून घेतली तर कठीण नाही . त्ाने अकरावीत क्लास लावला .सुरवातीचे सहा महिने icse cbse ची मुले क्लास मधे पुढे होती कारण काही portion आधीच झाला होता त्यांचा. पण नंतर अर्थातच मेहनत घेउन याने स्पेशल बॅच , स्पेशल टीचर मिळवले. यात त्यची हुशारी मेहनत धरली तरीही त्याचा अनुभव अगदीच ताजा आहे हे पण खरं . माझ्या मते एकूणच दर्जा खालावला आहे . मराठी माध्यमातून शिकणं कधीही चांगलेच. उगाचच भपका पाहून दुसरीकडे धावण्यापेक्षा हे बरं .

पिलीयन रायडर's picture

25 Dec 2017 - 3:08 pm | पिलीयन रायडर

माध्यमापेक्षा शिक्षक महत्वाचे आहेत हे माझं मत पक्के आहे. आजूबाजूला पाहिलं तर इंग्रजी माध्यमाच्या गेल्या काहीच वर्षात सुरू झालेल्या शाळांमध्ये शिक्षक अगदीच सुमार आहेत. अत्यंत कमी पगारावर काम करणारे हे लोक दर्जेदार असतील तरी कसे? जुन्या मराठी शाळेत अजून काही शिक्षक शिल्लक आहेत (पण अशा शाळाच आता शिल्लक नाहीत. आहेत त्यांनीं माध्यम इंग्रजी करून घेतले आहे.) मी सध्या शाळाच शोधतेय आणि प्राधान्य मराठीलाच आहे.

बाकी आयुष्यात यशस्वी होणे ही घटना अगणित घटकांवर अवलंबून आहे. एकट्या माध्यमाचा काय संबंध?

आमच्या शाळेतला मुलगा आयआयटी आणि आयआयएम ला होता. भारतात पहिला आला होता cat मध्ये. एक काका पंढरपूरचे आहेत. मराठीच माध्यम. तेही ह्या दोन्ही संस्थमध्ये गोल्ड मेडलिस्ट आणि आज फार मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहेत. माझे बाबा खेडे गावात झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेत, परिस्थितीमुळे डिप्लोमाच फक्त करू शकले. आज मोठ्या पदावर आहेत.

हे तिघे मराठीतून शिकले म्हणून पुढे गेले नाहीत तर ते अत्यंत हुशार किंवा मेहनती होते. माध्यम महत्वाचं असत तर त्याच शाळेतले आम्ही सुद्धा आयआयटी मध्ये गेलो असतो. एवढ्या मोठ्या ठिकाणी जायला केवळ माध्यम (इंग्रजी वा मराठी) कसे महत्वाचे असेल? इतर अनेक पूरक गोष्टी हव्यात. त्यामुळे रानरेडा ह्यांचे प्रश्न पटले नाहीत.

बाकी सगळ्याच शाळांचा दर्जा घसरतो आहे. मराठीचाच नाही.