खूप बिअर शिल्लक आहे

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
6 Oct 2017 - 6:06 pm
गाभा: 

घरी २ क्रेट बिअर शिल्लक आहे. पिणारे तोंड १ च आहे.
कृपया नशादायक विल्हेवाट / पर्याय सुचवा.

१. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. चढते.
२. कॅलरी कॉन्शस असल्याने एकावेळी जास्त पित नाही.

हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण ब्रेथ अनालायझर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त सापडल्याने access denied.

धन्यवाद.

ताक (बिअर नव्हे) : पार्टी करा, आम्हाला बोलवा, आम्ही संपवू असे पर्याय सुचवू नयेत. सपे पुणेरी घाऊक अपमान केल्या जाईल.

प्रतिक्रिया

केसाला लावा. घने मुलायम काले बाल, खिले खिले मतवाले बाल.

(एका मित्राची गर्लफ्रेंड खरोखर हा प्रकार करत असे. तिचे केस खरंच घमुकाबाखिखिमबा होते.)

बाकी दुसरा पर्याय हवा असल्यासः

https://en.wikipedia.org/wiki/Beer_cocktail

पार्क अवेन्युचा बीअर शाम्पू पण मिळतो. बीअरच्या बाटलीच्या आकारात. त्याने केसं (केसाचे अनेकवच्चन) गळतात लैच.

महाभृंगराज केसांसाठी उत्तम, पण अगदीच दौलतजादा करायची असेल तर केस धुवायचा ऑप्शन चांगला आहे.

पगला गजोधर's picture

6 Oct 2017 - 6:54 pm | पगला गजोधर

नै फ्लॅट बियर त्वचेला चांगली असते म्हणतात...
बाथटब मधे ड्रेनप्लग लावून, बियरने टब भरा...
मस्तपैकी त्यात नग्न होऊन एकटे डुंबत रहा .... किंवा
कोणी जोडीदार / जोडीदारीण (तुमच्या ओरिएन्टेशन नुसार), बरोबर घेऊन डुंबा....
निदान दगड घेऊन पाठ चोळायला बोलावा / पाठ चोळून द्या (तुमच्या "आवडी" नुसार... इथे "आवड" ही तुम्ही चोळणार किंवा चोळून घेणार या बाबत लिहिलीय , पाठ किंवा दुसरे अवयव .... या बाबत नाही, गैरसमज नको )

बिअर शिल्लक राहिलीय? अशक्य! काहीच्या काही फेकू नका. =))

कपिलमुनी's picture

6 Oct 2017 - 8:05 pm | कपिलमुनी

सपे पुणेरी म्हणायचं आणि बीयर शिल्लक राहिली ?? अशक्य !!

नक्कीच सपे पुणेरी. मुंबईकरांना असले प्रश्न पडतच नाहीत.
दोन क्रेट बिअर कशाला अंघोळ करायला आणली होती का? जर अपेक्षित मित्रांनी पांडू केला असेल आणि बायको येण्यापूर्वी सम्प्व्यायाची असेल तर शेजाऱ्यांना बोलवा. सपे असल्याने शेजाऱ्यांना तुम्ही बोलावणार नाही आणि तुम्ही बोलावले तरी ते येणार नाहीत. तेव्हा मोरीत ओतून टाकणे हा चांगला पर्याय आहे. बायको कडून मार खायचा नसेल तर मोरी फिनेल्ने धुवायला विसरू नका.
दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना काल इथे किती बिअर ओतली होती याची नशा घ्यायला विसरू नका!

सोमनाथ खांदवे's picture

6 Oct 2017 - 10:02 pm | सोमनाथ खांदवे

सगळे च वादा चे मुद्दे
सपे पुणेरी 2 क्रेट बियर घेवू शकतात का ? अन दुसऱ्या ना कधी सल्ले विचारतात का ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Oct 2017 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

साहेब आम्ही लिहीलेले "बियरच्या १००१ आरोग्यदायी पाककृती" हे पुस्तक विकत घ्या. किम्मत फक्त रु ३००/-
पैजारबुवा,

तिमा's picture

7 Oct 2017 - 10:23 am | तिमा

जवळच्या प्राणिसंग्रहालयात जा. तिथे एखादे बेअर असल्यास त्याला दोन्ही क्रेट भरुन पाजा. त्यानंतर ते बेअर डान्स करेल, किंवा तुम्हाला बेअर करेल, गुदगुल्या करायला.

नशादायक विल्हेवाट म्हणजे काय?

मला मद्यपी मिपाकरांकडून मोठी अपेक्षा होती !!

नशादायक विल्हेवाट याची दोन उदाहरणे देतो.

पाण्याचे आईस क्यूब्ज करतो तसे बिअरचे क्यूब्ज करा आणि पाण्यात किंवा फळांच्या रसात टाकून प्या.

कुल्फी मेकरच्या साच्यामध्ये बिअर ओतून कुल्फीची काडी खोचून फ्रिजर मध्ये ठेवा आणि बियरुल्फी खा.

येन्जॉय.

मला मद्यपी मिपाकरांकडून अश्या बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती.

हा हंत हंत, मिपाकरांची कल्पना कुठे गेली?
केव्हढा हा अपेक्षाभंग !!

पगला गजोधर's picture

8 Oct 2017 - 1:35 pm | पगला गजोधर

नशादायक विल्हेवाट याची दोन उदाहरणे देतो.
.
.

तुम्हास ठाऊक आहे काय ? मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव की जो शरीरारात द्रव्य शोषून घेऊ शकतो....कोणता ??
तर तुमची त्वचा....

म्हणून तुम्हाला फ्लॅट बियर मधे डुंबून रहा असा, "नशादायक" म्हणण्यास पात्र, असा सल्ला दिलेला होता.....

एस's picture

10 Oct 2017 - 9:51 am | एस

पण शेवटी तुम्ही काय केलंत त्या बिअरचं हे सांगितलंच नाही. प्रतिसादाचंही विडंबन करता आलं पाहिजे.

च्ययला कैपण. हे असले टाकाऊतून टीकाऊ करणार्‍या गृहशोभिका वाचकांचा लै राग येतो.
आज बिअरची कुल्फी करायला सांगताय, उद्या चकण्यापासून पंचपक्वान्नाचे जेवण बनवायला सांगताल.

पगला गजोधर's picture

10 Oct 2017 - 12:38 pm | पगला गजोधर

हम्म... कोणीतरी गृहशोभिका नियमित व तपशीलवार वाचत आहे म्हणायचं ....

नाखु's picture

7 Oct 2017 - 6:08 pm | नाखु

सरकार दरबारी जमा करा

सरकारी दप्तरी​ नोंद फक्त एकच बाटलीची राहिल याची खात्री बाळगा.

धाग्यावर ही बिअर पासुन निर्लेप नाखुश

आमचे ईथे कशाचे काय करावे याचे वर्ग घेतले जातात
अभामिपा फावेडोस समिती

प्रमोद देर्देकर's picture

8 Oct 2017 - 1:16 pm | प्रमोद देर्देकर

सम्द्यास्नी काय बी कललं नाय
आवो ते दूध शिल्लक हायचं विडंबन हाय.

अभामिपा फावेडोस समिती
फावल्या वेळेत डोकेबाज सल्ला समिती आपलं स्वागत आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2017 - 9:26 am | ज्ञानोबाचे पैजार

श्या... पोपट झाला...
आम्ही उगाचच आमचे पुस्तक खपवायच्या मागे लागलो.
सर्व विडंबकांना नम्र विनंती जेव्हा विडंबन करत असाल तेव्हा पेरणेची लिंक जरुर टाका.
नाहीतर माझ्या सारख्या सरळमार्गी लोकांचा असा घोळ होतो.
पैजारबुवा,

दर्ददेकर सर,

आधीच ती बिअरची नशा आणि त्यात आणखी ती संपवायचं टेन्षण त्यामुळे तो प्रेर्ना दुवा टाकायचा राहिला बघा. सवारी.

दर्ददेकर साठी तुम्हाला एक बीयर मस्तानी देण्यात येईल.

चामुंडराय's picture

14 Oct 2017 - 6:36 pm | चामुंडराय

वा व्वा, बिअर मस्तानी, बिअरोव्हेटिव्ह आयडिया.

बिअर मस्तानीचा आस्वाद घेऊन बाजीराव होऊ इच्छिणारा चामुंडराय.....

चामुंडराय's picture

14 Oct 2017 - 6:36 pm | चामुंडराय

वा व्वा, बिअर मस्तानी, बिअरोव्हेटिव्ह आयडिया.

बिअर मस्तानीचा आस्वाद घेऊन बाजीराव होऊ इच्छिणारा चामुंडराय.....