जेनरीक औषधे च घ्या

Primary tabs

बाजीगर's picture
बाजीगर in काथ्याकूट
17 May 2017 - 1:20 pm
गाभा: 

Generic औषधे च घ्या

मातोश्री (84) पडल्या, hip-bone मोडले (पडण्याची भिती होतीच,म्हणून 24 तास नर्सींग व्यवस्था केली होती,नर्स आंघोळीसाठी नेत असतांना हे झाले.( एक मत असेही ऐकले की हाडं क्षीण झाल्यानं फ्रॅक्चर झाली त्यामुळे ती पडली,असो.))

नंतरच्या सर्व forced moves होत्या.
हाॅस्पीटल / प्लेट्स,स्क्रू / सलाइन्स.

डिस्चार्ज नंतर आई पायावर उभी राहीली नाही, दुखतं म्हणत राहीली,प्रकृती तोळामासा. वृद्धाश्रमातली मदतनीसांनी तिच्या मनाला उभारी मिळावी म्हणून चाकखुर्चीतून बाल्कनी / टेरेस वर मोकळ्या हवेत फिरवलं.
(मुन्नाभाई थेरेपी ??)

2 महिन्यांनी infection झाले, असह्य दुर्गंध पसरला.
कारण नंतर कळलं,हाडं ठीसूळ ( osteoporosis) झाल्यानं तो स्क्रू जागेवर राहिला नाही व आतून सारखा टोचंत राहून infection निर्माण करता झाला, वेगाने pus होऊन एक दिवस त्वचेवर भोक पडून तो स्क्रू दिसू लागला.
आम्हाला धक्का बसला.

हाॅस्पीटलदाखल केले,डाॅ.नी मदतनीस/ नर्सींग च्या handling ला दोष देत तो स्क्रू नुसत्या हाताने काढला.
पुन्हा शस्रक्रिया करून ती प्लेट्स,स्क्रू काढल्या !
मोठ्या प्रमाणात pus निघाला.
pus samples चे कल्चर करुन अँटीबायोटिक्स Meropenem ची ट्रिटमेंट सुरु केली.

Rs.2200 x 3 प्रतिदिवस x 45 दिवस

4-5 दिवस असे दिल्यानंतर मी व भावाने Generic औषधाचा शोध सुरु करुन दोन दिवसात ते मिळवले.

प्रश्ण असा पडला कि जे आम्ही काहीही माहीती नसतांना शोधले ते वर्षानुवर्षे वैद्यकीय क्षेत्रात पडीक असलेली मंडळी म्हणजे डाॅ./ फार्मसी का सांगत नाहीत?

सत्य हे आहे कि,

गंदा है पर,
धंदा है ये !

माझ्या नेहमीच्या फार्मसीवाल्या ला विचारले तर तो म्हणाला,

"डाॅक्टर जे लिहून देतात ते आम्ही देतो"

( WA मुळे एवढे तरी प्रबोधन झाले आहे कि priscribed आणि generic औषध काय आहे, उदा. पेशंटला दूध घ्या सांगायचे असेल तर, priscribed म्हणजे रामू के तबेले का दूध,मग रामू त्याच्या मर्जी प्रमाणे दहापट भाव लावणार,तर generic म्हणजे इतर कुठल्याही डेअरीचे दूध ,म्हणजे औषधाचा मुळरुप तेच असणे)

" तुम्ही generic उपलब्ध आहे हे का सांगत नाही?"
मी रेटून विचारले.

त्यावर फार्मसीवाला "चाललं नाही तर ते 400 रु वाया जातील ना,परवडत नाही "
मी करकरीत पाचशे offer केले असतांना त्याला काय परवडत नाही हे कळेना,

माझा संताप चढून मी अपशब्द उच्चारण्याआधी तिथून बाहेर पडलो.

नंतर शांतपणे विचार केल्यावर कळले की ही व्यापा-यांची भाषा, दोन रुपये मिळतात म्हटले की ओळखायचे,
Rs.2/ per piece x 1000
म्हणजे दोनहजार तसे,

Rs.400 x 1000 = 4 लाख
गुंतवले तर चाललं नाही तर परवडतं नाही.

तेच 4 लाख Rs.2200 च्या औषधात गुंतवले तर सर्वांचे कमीशन देऊनही 3 लाख फायदा होतो कारण ग्राहकाला दाखवायला MRP 2200/--- छापतात,पण ज्यापद्धतीने ते discount देत होते (मला रु.1800/-- ने मिळाले/ दुसरा 1200/-- म्हणत होता)त्यावरुन cost price 220/-- असणार असा कयास आहे.
Generic meropenem वर सुध्दा MRP 1400/-- लिहीली होती व दिले 400/-- ने.
काय चाललयं?)

हल्ली हे फार ऐकतोय,
हो हो आमचीही आई/ आत्या/मावशी,काकू पडल्या होत्या.(शक्यतो महिलांची हाडं ठिसूळ होतात (hormons चे संरक्षण हरपल्यावर osteoporosis अपरीहार्य पणे येत असणार)मेरोपेनम दिलं होतं दिडमहिना वगैरे.

आता मातोश्री भीष्मासारख्या शरपंजरी पडल्या आहेत,दरदिवशी 3 वेळा Meropenem 1000mg सुरू आहे.
आम्ही अर्जूनासारखे असहायपणे पहातो आहोत,
आम्हाला सल्ला देणारा तो कृष्णसखा कुठेच न दिसल्याने आम्हीच सल्ला देत आहोत,

जर हाच आहे exit चा रस्ता,
कमी करु जीवलगांच्याआर्थीक खस्ता

generic औषधे वापरू या.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 1:28 pm | टवाळ कार्टा

Generic medicine चा काही तोटा असतो का? मिपावरच्या डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत?
भारतात दिवसेंदिवस औषधांच्या किंमतींचा आणि आरोग्यविम्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे असे वाटते आहे

अनुप ढेरे's picture

17 May 2017 - 2:44 pm | अनुप ढेरे

Generic medicine चा काही तोटा असतो का?

गुण नीट येत नाही म्हणतात काही डाक्टर.

डॉक्टरांचे केमिस्ट आणि कंपनी दोघांकडे कमिशन ठरलेले असते. हे चिरंतन सत्य आहे. केवळ पाच ते दहा टक्के डॉक्टर्स कट प्राक्टिस करत नाहीत.

प्राची अश्विनी's picture

17 May 2017 - 3:40 pm | प्राची अश्विनी

कमी किंमत हा जेनेरीकचा मोठ्ठा फायदा आहे. मुख्यत: बाजीगर यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा अशी महाग औषधे लागतात तेव्हा.
तोटे म्हणजे
1combination असलेली औषधे चिठ्ठीवर लिहिणं कठीण पडतं.
2 जेनेरिक औषधांच्या quality control बद्दल थोडी साशंकता आहे. (काही विशिष्ट कंपन्यांच्या औषधांचा रुग्णांना चांगला आणि लवकर फायदा होतो असा माझाही व्यक्तिगत अनुभव आहे. (त्यांचे MR माझ्या कडे येन नाहीत . वा कसलेही गिफ्ट देत नाहीत . तरीही.)
3 प्रत्येक औषधांच्या दुकानात फार्मसिस्ट असतातच असे नाही, त्यामुळे चुकीचे औषध दिले जाऊ शकते.
( कदाचित एखादं चांगलं app वगैरे यावर उपाय होऊ शकेल.)

इतर डौक्टरांच्या प्रतिक्रियांंच्या अपेक्षेत.

अजया's picture

18 May 2017 - 6:29 pm | अजया

माझे मत डाॅ खरेंच्या धाग्यावर लिहिले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

17 May 2017 - 2:25 pm | प्रकाश घाटपांडे

तुटक वाटतो धागा. नीट सुसंगती लागत नाही

तुमच्या लेखातून काय सांगायचं आहे ते कळलं परंतू इकडे बय्राच गोष्टी लिखित स्वरुपात देता येणार नाही. मजकुरातील थोडासाच भाग,वाक्य घेऊन त्यावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. थोडे विषयाला धरूनच हे पाहा-
१) डॅाक्टर रुग्णाची जबाबदारी घेतो त्याला आपण एक दोन हजारातच बरे कर असं सांगू शकत नाही.तसेच अमुकच औषध दे हेही सांगू शकत नाही. डॅाक्टर बदलणे हाच उपाय असतो.
२) रुग्णाला बरेच नातेवाइक मुले मुली भाऊ बहिणी वगैरे असले तरी ज्याच्याकडे आहे त्यावर जबाबदारी पडते.
काहीवेळा त्यालाच गोत्यात यावे लागते.

सिद्धार्थ ४'s picture

17 May 2017 - 4:25 pm | सिद्धार्थ ४

अमेरिकेत डॉक्टर जनरिक औषधेच लिहून देतात. मग तुम्हाला ज्या फार्मसी मधून घ्यायची असतील त्यातून घ्या.

माझ्यामते ज्या प्रगत देशांत औषधविषयक कायदे कडक असल्याने जेनेरिक औषधांचा दर्जाही खात्रीशीर असतो तिथे जेनेरिक औषधं लिहून चालत असावं.

भारतात असं नियमन कदाचित नसावं. तज्ञ डॉक्टरच खात्रीलायक विधान करु शकतील.

आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी लॅक्मे किंवा ला ओरिअल चे क्रीम सॊडून अगरवाल फार्मा गुडगाव चे क्रीम किती बायका वापरतील.
किंवा
आपल्या बाळाला जॉन्सन सोडून "इत्तफाक" फार्म, कतरी सराय, गया, बिहार या कंपनीचा बेबी सोप किती जण वापरतील. याचे समर्पक उत्तर द्या
मग या प्रश्नावर डिटेलवार मध्ये लिहितो.

क्रीम/साबण आणि जेनेरीक औषधे यात फरक आहे डॉक्टर. हि तुलना होऊ शकत नाही.
जेनेरीक औषधे कशी/का तयार होतात, त्यांच्या चाचण्या अश्या होतात, मूळ औषधांची किंमत त्याचे पेटंट संपल्यावर ७०-८०% नी कशी घसरते या व अशा अनेक आतल्या गोष्टी किमान आपल्याला तरी माहिती असाव्यात अशी अपेक्षा होती.
असो

अगरवाल फार्मा गुडगाव चे क्रीम किती बायका वापरतील.

अगरवाल फार्मावाले माधुरी दिक्षित, सनी, अनुष्का शेट्टी वगैरे सुंदरी त्यांचे क्रीम वापरल्याने इतक्या सुंदर झाल्यात हे जेंव्हा तमाम बायकांना पटवून देण्यात यशस्वी होतील, तेंव्हा पब्लिकिणी तेच वापरतील. अर्थात ही जाहिरातबाजी करण्यात त्या क्रीमच्या किंमती कितितरी पटीने वाढतीलच.
.....
ये है अगरवाल फार्मा के कामिनी ब्यूटी क्रीम का कमाल. आज ही खरीदीये.

सुबोध खरे's picture

17 May 2017 - 6:56 pm | सुबोध खरे

फार लवकर निवड करून मोकळे झालात इतकेच मी "सध्या" म्हणेन.
मग या प्रश्नावर डिटेलवार मध्ये लिहितो.
हि ओळ कदाचित आपण वाचली नसेल. (संशयाचा फायदा)

रामपुरी's picture

17 May 2017 - 8:04 pm | रामपुरी

वाचली पण वरच्या दोन वाक्यांवरून कदाचित असं ध्वनित होतंय कि जेनेरी़क औषधे हि दुय्यम दर्जाची असतात. तसं नसेल तर आमचा वाचनदोष. माफी असावी.

सुबोध खरे's picture

17 May 2017 - 6:58 pm | सुबोध खरे

निवाडा

सुबोध खरे's picture

17 May 2017 - 8:30 pm | सुबोध खरे

प्रतिसाद लिहायला घेतला पण तो मूळ धाग्यापेक्षा फारच जास्त मोठा होतो आहे आणि अजून बरेच टंकायचे आहे म्हणून एक वेगळा धागाच लवकरच काढत आहे.

राघवेंद्र's picture

17 May 2017 - 10:44 pm | राघवेंद्र

धन्यवाद आभारी आहे

आनन्दा's picture

17 May 2017 - 11:38 pm | आनन्दा

http://www.maayboli.com/node/47681
विषयाशी संबंधित वाटला म्हणून टाकतोय. बघा वाचून.

आता खरे साहेब काय ते खरे खोटे सांगणारच आहेत पण माझे म्हणून एक मत मी नोंदवत आहे.

जेनेरिक औषधे बाजारात असणे हे खरेच खूप चांगले आहे. पण त्याच्या बाबतीत ची माहिती नसणे हे खूपच त्रास दायक आहे. त्यामुळे धाग्यातली स्तिथी उद्भवते. अमेरिकेत जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जातात पण येथे पण डॉक्टर लोक ब्रँडेड औषधे प्रेस्क्रिब करतातच. आपल्याला स्वतःला जण नसेल तर खिशातून पैसे जातातच.

मुळातच व्यपाऱ्याला तुम्ही मला जास्त किमतीची औषधे का दिलीत असे विचारात येत नाही. आणि डॉक्टर ला हेच औषध का दिले ते पण विचारात येत नाही. आपले आपणच डॉक्टर ला सांगणे चांगले असते कि जेनेरिक औषधे द्या. उगाच ब्रँडेड नको. काही वैद्यकीय मित्र आहेत. त्यांच्या सोबत चहापान असले कि ऐकायला मिळते कि अमुक एका रुग्ण कसा ब्रँडेड औषध सांगितले नाही म्हणून भांडला ते. मग डॉक्टर पण म्हणतो कि माझ्या बापाचे काय जाते.

येथे तर अजून एका वेगळाच आयाम येतो. कि पैसे रुग्ण देताच नाही. पैसे इन्शुरन्स कंपनी देते. मग रुग्ण पण म्हणतो कि खिशाला चाट बसणार नाही आहे तर मग उगाचच जेनेरिक का घ्यायचे. येथे पण महाग ते चांगले अशी विचारधारा आहेच.

समाज जागृती हाच खरा उपाय आहे.

थोडेसे विषयांतर होते आहे पण असाच विषय हा ट्रीटमेंट कोणती घ्यायची हा पण असतो. कर्क रोग बाबत तर खूपच मोठा निर्णय असतो. डॉक्टर लोक छाती ठोक पणे सांगतात कि किमो घ्या रेडिएशन घ्या. आयुरवैदिक लोक सांगणार कि त्यात काही तथ्य नाही. जीवनशैली बदला. नवीन आलेल्या इम्म्युनो थेरपी बद्दल विचारले तर कोणी बोलणारच नाही. मग रुग्णाने खर्चिक किमो घ्यायची. त्रास सहन करायचा. होता येईतो बरे व्हायायचे. आता ह्याच्यात पण मला डॉक्टर लोकांचे खूप चुकीचे वाटत नाही. इम्म्युनो थेरपी कमी कष्टप्रद पण नवीन आहे. आणि समाज जर का ही थेरपी घेऊन रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर मग जबाबदार कोण? म्हणून मग known donkey is better than unknown horse ह्या न्यायाने किमो सांगतात.

असो मी येथेच थांबतो. डॉक्टर साहेब काय ते खरे खोटे सांगतीलच

विदेशी वाचाळ

समाज जागृती हाच खरा उपाय आहे! कशी करू या???

साधा मुलगा's picture

18 May 2017 - 8:39 am | साधा मुलगा

या विषयावर आधी एकदा चर्चा झाली आहे , खरे साहेबांचा धागा आला की त्यात माझे 2 पैसे टाकीन,
सध्या बाजीगर साहेबांना एवढंच सांगायचं आहे की जो स्वस्तातील ब्रँड खरेदी करत आहात त्याची स्ट्रेनथ आणि मॉलिकुल नीट बघून घ्या, एखाद्या फार्मासिस्ट अथवा डॉक्टर कडून तपासून घ्या, औषधांच्या दुकानात प्रशिक्षित फार्मासिस्ट नाहीत हा सर्वात मोठा अडसर आहे .

नमकिन's picture

18 May 2017 - 8:56 am | नमकिन
नमकिन's picture

18 May 2017 - 8:58 am | नमकिन
नमकिन's picture

18 May 2017 - 9:05 am | नमकिन

वापरणारे व सुचवणारे.
यात सुचवणारे भाव खातायत.
आजच्या जगात जिथे उपलब्ध माहितीत सर्व जन या निष्कर्षावर पोचलेत की सर्वत्र भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी बोकाळलेत मग FDA ने मान्यता प्रदान करते वेळेस भ्रष्टाचार झालेला नाहीं हे छातीठोक कोण सांगू शकतो?
औषध सुचवणारे स्वतः नजरेखाली घालतात का उत्पादन सामग्री व प्रक्रिया? MR च्या स्कीम ऐकुन ठरवतात. आजवर एका तरी डॅाकने स्वतः सुचवलेली औषधे कशी व कुठे व कसल्या तपासण्या प्रमाणित करुन बनवतात हे पाहिले आहे?
यांना फक्त कमिशन व परदेश /देश दौरे दिसतात मग मरो तिथे रुग्ण व त्याचे आप्त.
मी बर्याच औषध कंपनी व Bulk drug कारखाने व अधिकारी ना (भारतातिल- परदेशी सहित) भेटलोय कामानिमित्त व FDA ला काय सादर करतात हे सर्व मुखी समान आढळलेय- पैसा.

तेव्हा उगा जाहिराती व भूलथापा यावर आपले मत प्रकट करणारे वापरकर्ते व लोभी सुचवणारे यांपासून सावधान.
जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषध मूलद्रव्य एकच असते परिणाम देखील एकच येईल. पूर्ण विराम.
भारत सरकार द्वारा कित्येक परदेशी कंपन्याच्या या लूटमारीला आळा घालण्याच्या प्रयत्नाला आपण सर्व सामान्य जनतेने पाठिंबा नाहीं दिला तर या क्रुर कंपनियां मानवता संपवायला मागे पुढे पाहणार नाहींत. आठवा आताचे स्टेंट प्रकरण.

साधा मुलगा's picture

18 May 2017 - 9:35 am | साधा मुलगा

जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषध मूलद्रव्य एकच असते परिणाम देखील एकच येईल.

Ideally असे घडले तर उत्तम आहे, पण नुसते मूलद्रव्य नाही तर त्याला dosage form मध्ये कन्व्हर्ट करायला लागणारे excipients हे सुद्धा चांगल्या quality चे पाहिजेत.
प्रत्येक कंपनी असे करेलच असे नाही.
जेनेरिक या मुद्द्यावर सरकारने सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
उगाच आधी निर्णय मग अंमलबजावणी साठी धावाधाव असे व्हायला नको.

सुबोध खरे's picture

18 May 2017 - 10:20 am | सुबोध खरे

आजवर एका तरी डॅाकने स्वतः सुचवलेली औषधे कशी व कुठे व कसल्या तपासण्या प्रमाणित करुन बनवतात हे पाहिले आहे?
मान्य- आपण सगळे डॉक्टर चोर आणि भ्रष्टाचाराचं आहेत असे गृहीत धरू.
काहो साहेब, तुम्ही टाटा चे मीठ खाता ते कुठे आणि कसे तयार करतात ते तुम्ही पाहिलंय का? किंवा कोलगेटची टूथपेस्ट वापरता ती कुठे आणि कशी तयार होते हे पाहिलंय का?
जर FDA ला पैसे देऊन औषध प्रमाणित करून घेता येते ( हि वस्तुस्थिति मान्य आहय) तर मग अगरवाल फार्मा ला ते करता येईलच. मग सिप्ला,कॅडीला सारख्या कंपनीला निदान स्वतः च्या अपकिर्तीची काळजी असते ती तर यांनाही नाही. आणि तुम्ही म्हणता तशी जेनेरिक औषधे घेता त्यात अगरवाल फार्मचे मूळ औषध (ड्रग) आहेच याची खात्री तुम्ही कशी करून देणार? कारण वर्ष दोन वर्षात कंपनी बंद पडली तर गोयल फार्मा म्हणून नवी कम्पनी चालू करता येईलच कि. मग दहा रुपयांच्या गोळीत पाच रुपयांचे औषध असले काय आणि नसले काय?
दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे हे अगदी स्पष्ट आहे.

डॉक्टर्स अथवा केमिस्टस...
हे दोघेही दोषी आहेत असे न समजता या विषयावर चर्चा होऊ शकते...
डॉक्टर्स, केमिस्टस आणि सर्व सामान्य रुग्ण (ग्राहक) यांनी आप आपले अनुभव, मते मांडावीत.

निखिल बेके's picture

18 May 2017 - 7:55 pm | निखिल बेके

Aapan potapanyasathi Kay karata saheb? Ka poorna vel Dharmarth kam? Aapalya kaamat roj eka tari garib manasachi madat karatach asal, nahi?
Nahi Na?
Barechase doctor karatat, mhanoon vicharale!

निखिल बेके's picture

18 May 2017 - 7:56 pm | निखिल बेके

Varil pratisaad Mr Namakin hyanna ahe.

गामा पैलवान's picture

18 May 2017 - 11:01 pm | गामा पैलवान

नमकिन,

जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषध मूलद्रव्य एकच असते परिणाम देखील एकच येईल. पूर्ण विराम.

हे जरी खरं असलं तरी प्रश्न अनामांकित (=जेनेरिक) औषधांच्या गुणवत्तेचा आहे. त्याची खातरी पटेस्तोवर नामांकित औषधे देण्यावाचून पर्याय नाही.

आ.न.,
-गा.पै.

Nitin Palkar's picture

20 May 2017 - 8:52 pm | Nitin Palkar

नामांकित औषधे निर्माण करणाऱ्या मंडळया नामांकित होण्यासाठी काय काय करतात हे सामान्य माणसाला कळत नसल्याने आपण नामांकित औषधी मंडळींच्या मागे धावतो.

Nitin Palkar's picture

20 May 2017 - 10:13 pm | Nitin Palkar

"खातरी पटेस्तोवर"
कशी आणि कोण पटवणार? कट प्राक्टीस वाले डॉक्टर्स की XX खाऊ केमिस्टस?

गामा पैलवान's picture

21 May 2017 - 2:02 pm | गामा पैलवान

नितीन पालकर,

खातरी पटवण्यासाठी शासनाचं अन्नौषधी खातं आहे.

आ.न.,
-गा.पै.

अरुण मनोहर's picture

19 May 2017 - 11:26 am | अरुण मनोहर

जिनरीक औषधे हा गहाण विषय आहे. त्यावर डॉक्टरांच्या धाग्यावर विस्तृत चर्चा होईलच.
आपले अनुभव वाचून मन कष्टी झाले. का उतारवयात देव असे दु:ख देतो?

अरुण मनोहर's picture

19 May 2017 - 11:26 am | अरुण मनोहर

गहन म्हणायचे होते.

अरुण मनोहर तुमची सहृदता मनास भिडली,धन्यवाद.
दोन्ही बाजूची मते पटली.
सुबोधखरे यांचा धागा वाचला,गरगरले, पैशासाठु कुणी rejected माल विकला असेल तर (काय अज्ञानातसुख होते फक्त किंमती वर लक्ष होते)
ज्ञानाचा हा एक तोटा. असो.हे ही दिवस सरतील.

औषध उत्पादक मंडळींचे वैध आणि अवैध उद्योग या विषयावर 'रोष व्हर्सेस अडम्स' नावाचे राजहंस प्रकाशनचे अतिशय चांगले पुस्तक आहे. सुमारे पंचवीस तीस वर्षांपुवीचे हे पुस्तक औषध उत्पादक मंडळींच्या गैरप्रकारांवर खूप उद्बोधक भाष्य करते.
डॉक्टरांची माफिया gang नावाचेही एक चांगले पुस्तक वाचनीय आहे.
ही दोन्ही पुस्तके माझ्या संग्रही होती. पुन्हा शोधून पहावी लागतील. सापडल्यास PDF नक्की अपलोड करेन.

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 2:24 pm | सुबोध खरे

औषध उत्पादक कंपन्यांच्या कहाण्या सुरस आणि चमत्कारिक आहेतच. औषधाची मुदत संपणे( expiry) हा यातील एक मोठा झोल आहे. जी औषधे 5 वर्षे पर्यंत परिणामकारक असतात अशांना 1 वर्षाची मुदत समाप्ती( expiry date) दिलेली असते. म्हणजे आपले दुकान चालूच राहावे.
http://www.health.harvard.edu/staying-healthy/drug-expiration-dates-do-t...

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 2:25 pm | सुबोध खरे

अशा अनेक कहाण्या आहेत. ही त्यातील एक आहे पण हा धाग्याचा विषय नाही.

जी औषधे 5 वर्षे पर्यंत परिणामकारक असतात अशांना 1 वर्षाची मुदत समाप्ती( expiry date) दिलेली असते. म्हणजे आपले दुकान चालूच राहावे.

पण अशी मुद्दाम लवकर एक्स्पायर केलेली पण न खपलेली औषधं कंपनीला परत घ्यावी लागत असतीलच ना? मग फायदा काय?

सुबोध खरे's picture

22 May 2017 - 8:24 pm | सुबोध खरे

तुम्ही एक गोळी जरी खाल्ली तरी अख्खी पट्टी फुकट जाते ना.

बाजीगर's picture

4 Jul 2017 - 5:09 pm | बाजीगर

23 जुन 2017, 4:50 pm
मातोश्री ने शेवटचा श्वास घेतला.
एक अध्याय संंपला.

गामा पैलवान's picture

4 Jul 2017 - 5:46 pm | गामा पैलवान

तुमच्या मातोश्रींना शांती लाभो आणि तुम्हांस दु:ख सहन करायचं बळ मिळो. :-(
-गा.पै.

दशानन's picture

4 Jul 2017 - 6:03 pm | दशानन

आईला शांती लाभो आणि तुम्हांस हे दु:ख सहन करायचं बळ मिळो.

फार वाईट वाटलं. मर्त्य जीवाला मृत्यू अटळ आहे, पण बिछान्याला खिळून हाल होताना पाहवत नाही. तुम्ही लोकांनी त्यांच्या आजारपणात केलेली शुश्रुषा वाखाणण्याजोगी आहे. तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना.

धन्यवाद गामा पैलवानसर आणि दशाननसर.
आपली सहृृदयता मनाला भिडली.