भारतीय राष्ट्रध्वजाबद्दलच्या साहित्यिक आणि काव्योल्लेखांची माहिती हवी आहे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
31 Mar 2017 - 1:13 pm
गाभा: 

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा)बद्दलच्या गौरवपर साहित्यिक आणि काव्य उल्लेखांची माहिती हवी आहे.

*** *** ***
भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. संदर्भ मराठी विकिपीडियावरील लेख.
*** *** ***
प्रांजळपणे सांगावयाचे झाल्यास उपरोल्लेखीत परिच्छेद ओळींच्या संख्येचा मिपा नियम पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिला आहे. या धागा चर्चेतून मुख्यत्वे भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा)बद्दलच्या गौरवपर साहित्यिक आणि काव्य उल्लेखांची माहिती हवी आहे. साहित्यिक आणि काव्य, चित्रपटातील नाटकातील गौरवपर उल्लेखांची माहिती व्यतरीक्त आवातंरे टाळण्यासाठी आभार.

*अनुषंगिका व्यतरीक्त आवांतर टाळण्यासाठी आभार
* उल्लेखीत काव्य आणि साहित्यावर संबंधीत साहित्यिकाचा प्रताधिकार असेल हे समजण्यासारखे आहे. पण धागा संबंधीत विकिलेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आहे तेव्हा आपले या धागालेखास दिलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील. प्रतिसादांसाठी आभार

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Apr 2017 - 11:14 am | पैसा

एक जुने गाणे आठवले, हे हिंद राष्ट्र झेंडया प्रणामा घे या
अजून खूप आहेत

माहितगार's picture

2 Apr 2017 - 10:12 pm | माहितगार

हे गाणे आंजावर मिळाले नाही, ह्या गाण्या विषयी अजून थोडी माहिती जसे कि ध्रुववपद (असंच म्हणतात ना?) कवि वगैरे काही माहिती मिळू शकल्यास कळवावे.

पैसा's picture

2 Apr 2017 - 10:22 pm | पैसा

मी लहान असताना ऐकले आहे. रेकॉर्ड आहे का कल्पना नाही. शाळेत शिकवलेले आठवते.

तुम्हांला गाणी/ कविता हव्यात का? त्यात तिरंग्याचा उल्लेख हवा का?
उदा: वेदमंत्राहून आम्हां.. हे चालेल का?

माहितगार's picture

2 Apr 2017 - 10:17 pm | माहितगार

केवळ राष्ट्रगान नको, त्यात तिरंग्याचे (राष्ट्रध्वजाचे( उल्लेख हवेत) आंजावर वेदमंत्राहून आम्हां. चा जेवढा भाग वाचला त्यात तिरंग्याचा उल्लेख आढळला नाही (चुभूदेघे) गाणी/ कविता मध्ये तिरंग्याचा उल्लेख हवा आहे, इतर प्रकारच्या साहित्यातील उल्लेखही चालतील.

ध्वज विजयाचा उंच धरा रे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे

माहितगार's picture

2 Apr 2017 - 10:41 pm | माहितगार

आंजावर हे गाणे दिसते आहे- वृत्तपत्रीय अग्रलेख स्तंभलेखातही ओळींचा उअप्योग दिसतो- पण कवी कोण आहेत हे लक्षात येत नाही.

पैसा's picture

3 Apr 2017 - 9:03 am | पैसा

योगेश्वर अभ्यंकर

पैसा's picture

2 Apr 2017 - 10:24 pm | पैसा

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण

- बा.भ. बोरकर

माहितगार's picture

2 Apr 2017 - 10:43 pm | माहितगार

बाभ बोरकरांचे, हे राष्ट्रगान मस्त आहे. 'मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण' या ओळीचा अर्थ मात्र निटसा उमगला नाही.

बळीराजा आणि वामनाच्या कथेचा संदर्भ आहे हे नक्की. वामनाने बळीच्या मस्तकी पाय दिला तसे उद्धट राज्यकर्त्यांना (पक्षी इंग्रजाना) मनवू (ऐकायला भाग पाडले). इथे मनवू आहे का नमवू आहे हे बघावे लागेल. मी इथे हे आंतर्जालावरून कॉपी पेस्ट केले आहे.

पैसा's picture

2 Apr 2017 - 10:27 pm | पैसा
माहितगार's picture

2 Apr 2017 - 10:52 pm | माहितगार

जोरदार आहे, आपल्या प्रतिसादांसाठी आभारी आहे.

"विजयी विश्व तिरंगा प्यारा" याचे एक मराठी रूपांतर असेच मी शाळेत असताना ऐकले आहे.

विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा राहो भिरभिरणारा

सदा शक्ति सर्वा देणारा
प्रेमसुधा नित वर्षविणारा
मातृभूमीचे तनमन सारा

अशा काहीतरी ओळी त्यात होत्या.

माहितगार's picture

3 Apr 2017 - 5:02 pm | माहितगार

आंजावर खालील गीत दिसते आहे पण कवीचे नाव दिसले नाही. कुणास कवींची माहिती असल्यास कर्‍ सांगावे

विश्‍वशांतीचे अन् समतेचे
ब्रीद आपुले राखूया,
चला, चला रे आज तिरंगा
या खांद्यावर मिरवूया...