अंबरनाथ ते चौक सायकल सवारी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
4 Mar 2017 - 4:29 am

१३/०२ ला ८०+ कीमी ची राईड केल्यावर सेंच्युरी राईड एकट्याने करण्याचा संकल्प केला होता .
सुट्यांची उपलब्धता पाहता आजचा दिवस नक्की केला .. पण ,हा सर्व आठवडा वाढदिवस व त्यात लग्नाचा ही वाढदिवस कालच झाला .
घरी २२ तारखेच पिल्लू सोडताच , मला एक दिवस डोंबिवलीत जायचय तूझी सूटी असेल तेव्हाच हे शक्य होइल त्यामुळे २२ ला जर सायकलिंग ला जायच असेल तर ९:३० पर्यंत परत ये . तू आलास कि मी निघेन असा वटहुकुम निघाला. ( वट हुकुम ची व्युत्पत्ती अशी असावी : वटवृक्षाला फेरे घालून , ज्याच्यावर हुकुमत गाजवता येते अशा प्राण्याला जो हुकुम सोडतात तो ) असो .
एक तर वाढदिवस आठवडा म्हणजे सौ जन्य सप्ताह .. त्यामूळे मी ९:३० ला घरी परत यायला कबूल झालो , यामूळे माझी दुसरी प्रिया खट्टू झाली पण इलाज नव्हता .
पण काल रात्री कसे कूणास ठाउक वट हुकुम अचानक मागे घेतला गेला व चक्क झेपेल तेव्हढे सायकलिंग करायची परवानगी मिळाली , मला तर असा भास झाला कि हे शब्द कानी पडताच मला दुसऱ्या प्रियेने डोळा घालताय .
पहाटे साडे पाच ला निघूया असे तीला सांगीतले, दोघंच जाउ तीसरा नको, असं ती म्हणाली बहूधा .. रात्रीच तीचा मेकप वगैरे करुन खुंटीवरुन काढून ठेवली .
जाग तीन लाच आली , मग उगाच थोडावेळ पडलो .
साडेचार ला उठून साडेपाच ला तीला घेउन पळालो .. वॉचमन ने ही पाहीले नाही सोसायटीच्या .
बदलापूर ला पोहोचताच जो चहावाला जागा असेल त्याच्याकडे एक चहा प्यायचा असे ठरवले . भेटला एक जण. मग मस्त पैकी गाणी गुणगुणत दोघं निघालो . नेरळ माथेरान रस्ता आल्यावर एकदा मनात आले जावे दस्तुरी पर्यंत,पण ही बया म्हणाली मला काय उपयोग पूढे जायला आमच्या जमातीला बंदी आहे , तू मला टाकून जाशील पूढे एकटाच .. त्यापेक्षा मिळाल्या संधीचा फायदा घेउ दुरवर जाउ, मग
तडक भिवपुरी ला आलो ..
आपण गार्बेट पॉइंट मार्गे माथेरान ला जाताना जी वाट पकडतो त्याच्या बरोब्बर समोर एक शहाळ वाला नुकतंच दुकान लावत होता , तेथे थांबलो , एक मस्त मलईदार शहाळ घेतल व निघालो तो थेट चार चौक पर्यंत .
तेथे विचारलं चौक चा रस्ता कोणता , आणि वळलो . माझ्याच अतीशहाणपणामूळे गिअर ची थोडी गडबड होउन चेन निसटली, ती नेमकी एका मस्त बहरलेल्या शिरीष वृक्षा खाली .
हात काळे करुन चेन लावली एव्हढ्यात लक्ष गेलं ते तीथल्या एका बोर्डाकडे " खलबत्ता मसाला चिकन" असा बोर्ड होता व ज्या झाडावर होता त्याला मस्त बहर आला होता .
एव्हढ्यात एक ताजे फूल समोरच पडले .
त्याला छान मंद सुगंध होता , प्रथमच हा सुगंध अनुभवला .
खाली शिरीषाची खूण असलेली अनेक मलूल फूलांची पखरण होती .
एक दोन फोटो काढून निघालो चौक च्या दिशेने , या रस्त्याला लागताच जरा कोकणात आल्या सारखं वाटल . बया ही खूष होउन पळू लागली.
एन डी स्टुडिओ , बाबा डेअरी मागे टाकुन मुंबई पूणा हायवे समोर दिसु लागला. आता पोटात कावळे ओरडू लागले होते .
समोरच पुर्वा हॉटेल दिसले. खिषातुन मोबाइल काढला , स्ट्राव्हा वर ४९.५ किमी अशी अक्षरे दिसत होती. वा झाले पन्नास आता पोटपूजा करु व मग चौक गावात एक फेरफटका मारु असा बेत करुन हॉटेल बाहेरच्या वॉचमनला सायकल वर लक्ष ठेवायला सांगुन आत गेलो हात स्वच्छ धूवून मस्त पैकी डबल ऑमलेट ची ऑर्डर दिली .. सांगुन ही त्याने कमी तिखटच बनवले , म्हणून थोडी मिर्ची बारिक चिरलेली त्यावर पसरुन ,मस्त समाचार घेतला .
चौक गावात चक्कर टाकून परत आलो , बये ला विचारल तुला काही हवय का , तर काही नको , चल फिरुया परत अशी आद्य्ना झाली .
स्ट्राव्हा काढून बघीतले तर आकडा तेव्हढाच .
असो, परत मोबाईल खिशात घालुन सुरु झालो. आता स्ट्राव्हा चालो न चालो आपण घरी गेलो की सेंच्युरि पुर्ण होणारच .
बाबा डेअरी पाशी आलो तेव्हा खरे तर पोट भरलेले होते , पण आलोच आहोत तर एक लस्सी खाउ या असा विचार आला . हो इथली लस्सी खावी लागते इतकी घट्ट असते .
लगेच निघालो .
मस्त उतार मिळाला त्याचा फायदा घेत परत चार चौक येथे आलो .
शिरीषाकडे पुन्हा एकदा पाहून घेतले.
आता उन जाणवु लागले होते ..
या पूढील रस्त्यावर एखादेच मोठे झाड आढळते .. दिसल मोठ झाड कि थांब थोड पाणी पी अस करत बदलापूर ला आलो . उसाच गुऱ्हाळ दिसलं , थांबलो , १ बिनाबरफ पिउन सहज मोबाईल काढला तर स्ट्राव्हा परत सुरु झालेले दिसले . असो तु कर काउंट मी मारतो पॅडल .. अस म्हणत निघालो . त्या आधी घरी एक फोन करुन अर्ध्या तासात येतो असे सांगितले .
घरी आलो , हीला परत खुंटीवर लटकवले ,लवकरच जाउ परत फिरायला अशी समजूत घातली . थोडे कुल डाउन व्यायाम करुन , मस्त माठाची भाजी शेवग्याच्या शेंगाची आमटी असा मस्त आवडता बेत होता, त्याचा आस्वाद घेतला व ताणून दिली .
आता पूढच्या वटहुकूमाची वाट बघतोय .<em></em>

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 Mar 2017 - 4:31 am | भ ट क्या खे ड वा ला

व्हॉट्स ॲप वर लिहिलेली पोस्ट मिपा वर टाकल्ये

एस's picture

4 Mar 2017 - 8:37 am | एस

चांगलंय. कीप इट अप!

कंजूस's picture

4 Mar 2017 - 9:59 am | कंजूस

मजा आहे.

पैसा's picture

4 Mar 2017 - 11:46 am | पैसा

भारी लिहिलंय!

अरे वा! आमच्या भागात येऊन गेलात की!
बाबा डेअरीच्या सात्विक हाॅटेलचा मिक्स व्हेज पराठा छान असतो ! बरोबर मँगो लस्सी!!

सविता००१'s picture

4 Mar 2017 - 11:56 am | सविता००१

छान आहे. आवडली सफर

वरुण मोहिते's picture

4 Mar 2017 - 4:24 pm | वरुण मोहिते

फार्म हौस आहे . पुढच्या वेळेला लस्सी लागू एकदम ओरिजिनल
बदलापूर कर्जत आतल्या रोड ने फिरायला मजा येते .नेक्स्ट टाइम मुरबाड रोड किंवा बारवी धरण व्हाया मुरबाड असा रस्ता घ्या .

झक्कास वर्णन.. पुढच्या वेळी फोटो हवेत..!!

पिंगू's picture

5 Mar 2017 - 3:14 pm | पिंगू

लय भारी..

यशोधरा's picture

5 Mar 2017 - 3:33 pm | यशोधरा

लेख आवडला.

मस्त सफर..लिहिलय पण झकास..

कंजूस's picture

7 Mar 2017 - 3:51 pm | कंजूस

१)फोटो द्या .
२) दुसय्रा भागात गेल्यास टोल देता का?

देशपांडेमामा's picture

8 Mar 2017 - 9:01 am | देशपांडेमामा

सेंच्युरी राईड बद्दल हार्दिक आभिनंदन !!!

पायडल मारत रहा ...लेख लिहीत रहा :-)

देश

खुपच छान वाटल,तुमच्या बरोबर आम्ही दोघेही येतो आहोत भटकणारे भटकायला असेच वाटत होते.

नमिता श्रीकांत दामले's picture

15 Mar 2017 - 10:54 am | नमिता श्रीकांत दामले

इथेही फोटो टाकायला हवे होते.
आम्ही ठाणे ते आसनगाव सेंचुरी राइड एका रविवारी सकाळी केली होती. खूप खाबूगिरी करुन ११ वाजेपर्यंत ठाण्यात परत आलो होतो. तुमचे वर्णन चौकला जावेसे वाटतेय.