ताज्या घडामोडी : भाग ४

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
25 Feb 2017 - 12:58 pm
गाभा: 

आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही.

------------------------------------------------

अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....

1

इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

प्रतिक्रिया

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Apr 2017 - 10:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

कायदा मोडणाऱ्या ह्या झुंडीकडे लक्ष देणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच किंबहुना गहुभर जास्तच लक्ष कायदा मोडणाऱ्या समोरच्या झुंडीकडेही देणे गरजेचे आहे.

पुंबा's picture

10 Apr 2017 - 10:41 pm | पुंबा

बरं..

सौरा,

मला तरी साध्वी प्राचींच्या वक्तव्यात काही आक्षेपार्ह सापडलं नाही. तिहेरी तलाक हा मुसलमान स्त्रीला हिंदू धर्मात परतायचा राजमार्ग बनला पाहिजे. यात चुकीचं ते काय? हिंदू धर्माची निंदानालस्ती करून पोपचे चमचे धर्मांतर करवितात तेंव्हा त्यांना कोणी बोल लावीत नाही. जणू हिंदूंचं धर्मांतर हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. मग उलटी गंगा वाहू लागली तर ओरड कशास्तव?

गोरक्षकांने केलेली हिंसा चुकीचीच आहे. ती गैरसमजातून झालेली आहे. मुसलमान समाजही गायीविषयी अशाच चुकीच्या धारणा बाळगून आहे. त्या ठीक केल्यास दोन्ही बाजूंनी सुसंवाद प्रस्थापित व्हायला मदत होईल.

आ.न.,
-गा.पै.

गापै, कुठल्याही बाईला तू अमक्या अमक्याला 'आय लव्ह यू' म्हण तो तुझ्याशी लग्न करेल असं सांगणं मला तरी असभ्यपणाचं वाटतं. बळजबरीने ब्रम्हचर्य लादल्यामुळे ह्या साधू- साध्व्यांना असलं सुचतं असं मला वाटतं.

गामा पैलवान's picture

10 Apr 2017 - 11:43 pm | गामा पैलवान

सौरा,

कुठल्याही बाईला असं काही सांगणं तुम्हाला असभ्यपणाचं वाटतं. त्याप्रमाणेच मला तुम्ही हिंदू साधूसाध्वीवर बळजबरीने ब्रह्मचर्य लादल्याचा केलेला आरोप असभ्य वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

हो. ते चुकलंच खरं. क्षमस्व.

babubobade's picture

4 Aug 2017 - 12:04 am | babubobade

डोकलाम वादावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय असू शकत नाही म्हणूनच आम्ही चर्चेच्या मार्गानेच 'डोकलाम'वर तोडगा काढण्यासाठी आग्रही आहोत. द्विपक्षीय चर्चेतून हा प्रश्न सुटेल. संयम आणि धैर्याने आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत, असे सुषमा म्हणाल्या.

. ( हा गांधी बुद्धांचा देश आहे , हे मोदींचे वाक्य ॲडायचे बाईंकडून राहून गेले. )

नेहरुंच्या हिंदी चिनी भै भै वर टीका करणारे , नेहरु चिनबरोबर कसे हरले याच्यावर ३० - ३० वर्षे विनोद करणारे वाचाळवीर भा ज पे आता बोलतात .. युद्ध नको, चर्चा करू ..

...

एक शंका ....

चायनाबरोबर युद्ध झाले तर हंबानीच्या नव्या स्कीमला चायना मोबाइल कुठून मिळणार ?

नेहरुंच्या हिंदी चिनी भै भै वर टीका करणारे , नेहरु चिनबरोबर कसे हरले याच्यावर ३० - ३० वर्षे विनोद करणारे वाचाळवीर भा ज पे आता बोलतात .. युद्ध नको, चर्चा करू ..

आता काय भाजपे हिंदी चिनी भैन भैन म्हणताहेत का? भांडण आहेच म्हणताहेत ना?
नेहरू कसे हरले ही आजदेखील विनोदाचीच बाब आहे, आज युद्ध टाळणं वेगळं आणि मूर्खासारखं युद्ध उकरून काढणं, हरणं वेगळं.

चायनाबरोबर युद्ध झाले तर हंबानीच्या नव्या स्कीमला चायना मोबाइल कुठून मिळणार ?

युद्ध क्षणकालिक असतं, व्यापार सातत्याचा असतो. चायनाच्या स्वस्त आयाती थांबण्याचं डिसअ‍ॅडवांटेज प्रत्येकालाच (आणि काही काळ) असेल ना?