स्त्री लैगिंकतेचा 'ब्र'

रागिणी९१२'s picture
रागिणी९१२ in काथ्याकूट
22 Feb 2017 - 12:13 pm
गाभा: 

मिपावर अनेकवेळा स्त्रीच्या लैगिकतेविषयी चर्चा झालीय. यात अनेक पुरुष सदस्यांची मते पाहण्यात आली. बरेचदा ती मत अचाट, अतर्क्य वाटली. "स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत इथे.
फार कमी वेळा स्त्री सदस्यांनी मते मांडली. कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.
आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे. तस होणं अवघडच आहे तरीपण.
झालं असं कि नुकताच माझ्या वाचनात कविता महाजन यांचा ब्लॉग आला. त्यापूर्वी मी त्यांची ठकी आणि ब्र हि पुस्तके वाचली होती. 'भिन्न' बद्दल ऐकून आहे, वाचायचे राहिले आहे. मला त्यांचा रोखठोकपणा फार आवडतो. अत्यंत मार्मिकपणे स्त्री लैगिंकतेवर त्या लिहितात. ऐसी अक्षरेच्या विशेषांकात सुद्धा त्यांची अत्यंत सुंदर मुलाखत आहे.
या चर्चेसाठी मला काही त्यांच्या कथेतील उतारे समर्पक वाटले, ते देत आहे.
'ब्र'मध्ये एक प्रसंग आहे.... एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे नवऱ्याची तक्रार करताना 'आपण नाही म्हटलं तर ऐकून घ्यावं लागतं, पण आपली इच्छा असताना त्याचं उठलं नाही तर आपण काही बोलायची चोरी असते... आता तुला सांगतेय तर तुझ्या चेहऱ्यावर कसे भाव आलेत बघ.' असं काहीतरी मैत्रिणीला सांगते.
त्यांच्या ब्लॉगवर एक 'डिमांड' नावाची लघु कथा/किस्सा आहे. उपहासात्मक शैलीत त्यांनी सत्य मांडलं आहे ..... मैनावतीने जाहिराती चाळून बऱ्या वाटलेल्या कॉलबॉय केंद्राचा फोननंबर फिरवला. एका घोगरट आवाजाच्या प्रौढ बाप्याने फोन घेतला.
मैनावतीने एका रात्रीसाठी एक बाप्या हवाय अशी डिमांड सांगितली आणि दर व दर कसे लावले जातात त्याची पद्धत असे दोन्ही विचारले.
घोगरट म्हणाले,”घरी नेणार तर दर वेगळे, हॉटेलमध्ये नेणार तर वेगळे, नुसते कॅबमधून भटकणार तर वेगळे. पुन्हा तुम्हाला कसा पुरुष हवा आहे आणि किती तासांसाठी आणि काही विशेष अपेक्षा आहेत का, यावर बाकी दरनिश्चिती होईल. तर तुमची गरज आणि अपेक्षा काय आहे ते सांगा.”
मैनावती म्हणाली,”तशी काही फार खास अपेक्षा नाहीये. चाळीशीच्या आसपासच्या वयाचा, थोडं टक्कल पडलेला, पोट सुटून अंग जरा विसविशीत झालेला, काहीसा गबाळा, फोर प्ले या शब्दातला फ देखील माहीत नसलेला, फार काही नीट करणं जमत नसल्याने कसंबसं काम उरकून तिसऱ्या मिनिटाला घोरायला लागणारा पुरुष पाहिजे आहे.”
घोगरट आश्चर्यचकित होऊन म्हणाले,”कमाल आहे. आमच्याकडे अशी डिमांड पहिल्यांदाच कुणी बाई… सॉरी तरुणी करतेय. सहसा सगळ्यांना तरुण, देखणे, दणकट, तज्ञ पुरुष हवे असतात. मी तुमच्या डिमांडनुसार व्यवस्था करतो. पण कुतूहल म्हणून विचारतोय, गैरसमज करून घेऊ नका… पण इतके पैसे मोजून तुम्हाला ‘असा’ पुरुष का हवा आहे? म्हणजे त्यामागे काही विशेष कारण आहे का?”
मैनावती म्हणाली,”गैरसमज कसला डोंबल्याचा? आणि कारण अगदी साधं आहे. गेले दोन महिने ऑफिसच्या कामानिमित्त सतत प्रवासात आहे. फार कंटाळा आलाय.”
“अहो, पण मग कुणीतरी इंटरेस्टिंग, तरणातगडा, मनोरंजक पाठवू का?”
“एरवी तसाच मागवला असता हो… पण आज किनई मला नुसता कंटाळा नाही आलेला… मला आज फार ‘होमसिक’ वाटतंय!”

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

22 Feb 2017 - 12:30 pm | विनिता००२

नक्की काय अपेक्षित आहे??

रागिणी९१२'s picture

22 Feb 2017 - 12:37 pm | रागिणी९१२

मिपावर अनेकवेळा स्त्रीच्या लैगिकतेविषयी चर्चा झालीय. यात अनेक पुरुष सदस्यांची मते पाहण्यात आली. बरेचदा ती मत अचाट, अतर्क्य वाटली. "स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत इथे. पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे

उपयोजक's picture

22 Feb 2017 - 8:50 pm | उपयोजक

खळबळजनक असा काही!

इरसाल कार्टं's picture

22 Feb 2017 - 12:43 pm | इरसाल कार्टं

"स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही."

मला तरी असे वाटत नाही, ब्र हे पुस्तक जेव्हा वाचले तेव्हा डोक्यात झिणझिण्या आल्या होत्या. लेखिकेचा रोखठोकपणा उठून दिसला.

तुम्ही एक संवेदनशील तार छेडलीत, अभिनंदन.
अपेक्षित चर्चा रांगणारे.

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2017 - 3:13 pm | संजय क्षीरसागर

कविता महाजनांचा सर्व अभ्यास विकृत आणि एकांगी लैंगिकतेवरचा आहे हे त्यांच्या लेखनावरुनच कळतं. परस्परांशी अनुबंध जमलेल्या जोडप्यांच्या प्रणयजीवनाची त्यांना कल्पनाच नाही. सेंसेशनल लिहीणार्‍या व्यक्तीच्या डोक्यात प्रणय चालू असतो आणि ती व्यक्ती तो लेखनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. या उलट प्रणय मेंदूत नसून सक्षम देह, पारस्पारिक आकर्षण आणि एकमेकांप्रती जिव्हाळा यात आहे, असा तृप्त प्रणयींचा अनुभव असतो. तस्मात, स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते हा अतृप्त पतीचा स्वतःच्या पत्नीपुरता अनुभव असतो. तद्वत, `एरवी तसाच मागवला असता हो पण आज किनई मला नुसता कंटाळा नाही आलेला… मला आज फार ‘होमसिक’ वाटतंय!' हा अतृप्त पत्नीचा वैयक्तिक अनुभव असतो. आपली पत्नी अनरिस्पॉन्सिव आहे अशी तक्रार तृप्त पती कधीही करत नाही आणि `आपली इच्छा असताना त्याचं ...' इतकी गलिच्छ तक्रार, आपल्या पतीशी कोणताही अनुबंध नसलेली पत्नीच करु शकते.

शेवटाकडे एक रोमान्स लिहायचा होता. तिथे अडखळल्यावर ध्यानात आलं की नकारात्मक लैंगिक अनुभव मी थेट लिहिले आहेत. संतापच इतका तीव्र होतो की तिथे विचार करण्याची गरज भासत नाही; पण याउलट सकारात्मक लैंगिक अनुभव लिहिताना मात्र अजूनदेखील संकोच वाटतो आहेच, हे तेव्हा ध्यानात आलं होतं.

थोडक्यात, सगळं सेंसेशनल लेखन हा विकृत लैंगिक अनुभवातून आलेला भाग आहे आणि विधायक लैंगिक अनुभव लिहीतांना संकोच वाटतोयं !

रागिणी९१२'s picture

22 Feb 2017 - 4:16 pm | रागिणी९१२

मला वाटत हि चर्चा 'कविता महाजन' यांच्याविषयी नसून स्त्रीच्या लैंगिकतेविषयी आहे.
त्यांच्या ज्या कथा नमुना म्हणून दिल्या आहेत. त्यात एवढं आक्षेप घेण्यासारखं मला काहीच दिसत नाही. ते फारच थेट लिहिलंय एवढंच. सांकेतिक भाषेत आपल्या समस्या मांडली असती तर योग्य होत का? आताच मराठी कथालेखक यांचा एक धागा येऊन गेला त्यात त्यांनी म्हटलं आहे कि मित्र मित्राला काहीहि खाजगी सांगू शकतात. मग स्त्रिया का नाही. पुरुषाला जेवढी शारीरिक सुखाची गरज असते तेवढी स्त्रीला नसते का? ज्याला नकार पचत नाही त्याच नवऱ्याला आपल्या बायकोच्या इच्छांचा आदर करता येत नाही, अशी स्त्री वैतागून असं म्हणू शकते.
कितीतरी प्रतिसादात डॉ. खरे म्हणतात कि स्त्री अनाकर्षक आणि थंड असते तेव्हा पुरुष ऍक्टिव्ह होत नाही. मग हे काय असत? पारस्पारिक आकर्षण आणि एकमेकांप्रती जिव्हाळा यावेळी कुठे असतो?
'डिमांड' हि एक उपहासात्मक विनोदी कथा आहे ज्यातून असं स्पष्ट होत कि चाळिशीतले पुरुष जसे आपल्या बायकांबद्दल विचार करतात तेच विचार बायकांच्याही मनात येऊ शकतात. हा एक पुरुषांना दिलेला टोला आहे. यावर 'आकर्षण, प्रेम, जवळीक' या धाग्यावर बरीच चर्चा झालीय.
आणि कविता महाजन यांनी दुसऱ्या उद्देशाने हि कथा लिहिली असेलही पण मी त्याचा अर्थ असाच काढलाय कि बायका थंड, निरुत्साही असतात, असा जो आरोप पुरुष करतात. त्याला पुरुषही तेवढेच जवाबदार असतात. मला वाटत तरीही अनेक लग्न टिकतात कारण प्रेम हेच मुख्य कारण असत. पण प्रेमात असणाऱ्या स्त्रीच्या मनात खाजगीतही लैंगिक संबंधातल्या 'अपुर्णत्वाची/अतृप्तीची' जाणीव होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. ती (आणि पती सुद्धा) आपल्या अतुप्तीवर त्याच्यावरील प्रेमाने कशी मात करते, संयम ठेवते महत्वाचं ठरत.

एनी वे, सध्या तरी या विषयावर चर्चा करण्यात रस उरला नाही.

प्राची अश्विनी's picture

22 Feb 2017 - 3:42 pm | प्राची अश्विनी

मागे विक्षिप्त अदिती ने घेतलेल्या प्रश्नावलीचे काय झाले?

पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे

कशाला? बरंय!!
धागा काढला नाही की नुसत्या उल्लेख झालेल्या मुलाखतीवरुन वैयक्तिक घसरणारे लोक आहेत.
रच्याकने धाग्याचा उद्देश फारसा आवडला नाही तरी कविता महाजनांची थेट मुलाखत वाचायला फार आवडली. त्यांच्या कादंबरीतल्या उतार्यांवरुन खुद्द त्यांच्याबद्दल मत मांडणे म्हणजे शिरेलीत व्हिलनचे काम करणारा खर्या आयुष्यात तसाच असणार समजणारे आमचे गाववाले अडानी असतात तसेच काहीसे वाटून हशीवलं बगा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2017 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांच्या कादंबरीतल्या उतार्यांवरुन खुद्द त्यांच्याबद्दल मत मांडणे म्हणजे शिरेलीत व्हिलनचे काम करणारा खर्या आयुष्यात तसाच असणार समजणारे आमचे गाववाले अडानी असतात तसेच काहीसे वाटून हशीवलं बगा!

+१०००

हे भान ठेवणे सगळ्यांना जमते असे थोडेच आहे ?! :(

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 6:43 pm | संदीप डांगे

त्या जे के रोलिंग ला हॅरी पॉटरचे एवढे भाग कोणत्या अनुभवावर आधारुन लिहिलेत हे मला इच्चारायच्चंच हाय.. हॉस्टेल टू नामे चित्रपटात ब्लडबाथ चा सिन टाकणार्‍या लेखकाने कोणता अनुभव घेतला असेल तेही...

पूर्वाविवेक's picture

23 Feb 2017 - 11:56 am | पूर्वाविवेक

अजयाशी सहमत. उगाच कशाला आपटायचे दगडावर डोके?

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 4:15 pm | संदीप डांगे

काही प्रतिसादांनी धाग्याचा उद्देश चिरडून टाकला आहे... :(

अजया ताईच्या प्रतिसादाशी शब्द न् शब्द सहमत! पुरुषांचे गैरसमज दूर करायला जाणे म्हणजे आपणच (स्त्रीने) चक्रव्यूहात फसण्यासारखे आहे...

मनिमौ's picture

22 Feb 2017 - 4:25 pm | मनिमौ

अजया आणी डांगे अण्णा ना अनुमोदन

इरसाल कार्टं's picture

22 Feb 2017 - 5:07 pm | इरसाल कार्टं

विषय भरकटतोय

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 8:52 pm | पिलीयन रायडर

मला चर्चाविषयच नीट मांडलाय असं वाटत नाही. तुम्ही काही उदाहरणं दिली आहेत. ती परस्पर संबंधित नसली तरी अगदी थेट आहेत. स्त्रीयांनाही कामभावना असतातच वगैरे सगळं मान्य आहेच.

पण नक्की चर्चा कशावर करायची? पुरुषांचे गैरसमज दूर करायचे म्हणजे काय? कोणते गैरसमज नक्की? खुप ब्लँकेट स्टेटमेंट आहे हे. इथे खरे काकांनी जे लिहीलंय त्यावर चर्चा अपेक्षित असेल तर ती त्या त्या धाग्यावर करता येईल. किंवा किमान त्यांची कोणती वाक्य तुम्हाला मान्य नाहीत ती संदर्भा सकट इथे क्वोट करा. नुसतंच "कितीतरी प्रतिसादात डॉ. खरे म्हणतात कि स्त्री अनाकर्षक आणि थंड असते तेव्हा पुरुष ऍक्टिव्ह होत नाही." हे बोलुन फायदा नाही. ते कोणत्या संदर्भात तसं बोललेत? ते समस्त स्त्री प्रजाती विषयी बोललेत का? सगळ्याच बायकाच थंडच असतातच असं काही त्यांचं म्हणणं आहे का?

मी असं म्हणत नाही की डॉ.खरे लिहीतात ते सगळं बरोबरच असतं. त्यांच्या लिखाणाचा दोषही असू शकतोच. पण मी त्यांचं एखादं वाक्य असं उचलुन त्यावरुन "मिपावर तारे तोडले जातात. तर चला गैरसमज दूर करुया" अशी चर्चा नाही करु शकत. तुम्ही नेमकं कोणत्या गैरसमजांबद्दल बोलताय हे सांगा, त्याची निश्चित उदाहरणे द्या, आपण नक्कीच त्यावर चर्चा करु शकतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Feb 2017 - 10:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत!

स्रुजा's picture

22 Feb 2017 - 11:55 pm | स्रुजा

+ १ . शिवाय बायकांबद्दल या किंवा इतर बाबतीत जसे पुरुषांचे गैरसमज असतात तसे आपण नेहमी झाशीच्या राणी अवतारात रहायला हवं, पुरुष व्यक्तिगत होतात , कशाला दुर करा त्यांचे गैरसमज असं स्वत:चे गैरसमज बाळगणार्‍या तथाकथित फेमिनिस्ट्स पण असतातच.
तुम्ही कुणा एका गैरसमजाला उद्देशुन जर चर्चा सुरु करणार असाल तर फोकस खुप कमी राहतो.

आणि हो,

कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.

अशी काँडसेंडिंग आवाहनं मला व्यक्तिशः पटत नाहीत.

इरसाल कार्टं's picture

23 Feb 2017 - 2:40 pm | इरसाल कार्टं

"कितीतरी प्रतिसादात डॉ. खरे म्हणतात कि स्त्री अनाकर्षक आणि थंड असते तेव्हा पुरुष ऍक्टिव्ह होत नाही."

हे मी अजून वाचले नाही. वाचायला लागेल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

22 Feb 2017 - 10:06 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आमचे निरिक्षण असे आहे की पन्नाशीला आलेले म्हातारे बर्याचदा स्त्रीच्या लैंगिकतेवर तारे तोडत असतात.वास्तविक आमच्यासारखे तीशिला आलेले व सगळीकडे लफडी करुन आलेले तरुण जास्त चांगला इन्साइट देऊ शकतात.माझ्या लिमिटेड लैंगिक अनुभवावरुन मी हे सांगू शकतो की स्त्रीही मुळातच पुरुषासारखी गेट अवे विथ डिझायर्ड ' नसते.तिची कामेच्छा शाररिक नसून मानसिक असते.याला इंन्स्ट्रुमेंटल सेक्स डिझायर म्हणता येईल.स्त्रीची कामेच्छा पुरुषाइअतकीच असते हे अमेरिकन निओ फेमिनिस्टांनी पसरवलेले गैरसमज आहेत.

सुबोध खरे's picture

23 Feb 2017 - 9:38 am | सुबोध खरे

वास्तविक आमच्यासारखे तीशिला आलेले व सगळीकडे लफडी करुन आलेले तरुण जास्त चांगला इन्साइट देऊ शकतात.
मग वाट कुणाची पाहताय. लिव्हा पटापट. समजून जाऊ द्या सगळ्याना बायका म्हणजे काय रसायन आहे ते.

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 10:11 pm | संदीप डांगे

१. आमचे निरिक्षण असे आहे की पन्नाशीला आलेले म्हातारे बर्याचदा स्त्रीच्या लैंगिकतेवर तारे तोडत असतात.
२. वास्तविक आमच्यासारखे तीशिला आलेले व सगळीकडे लफडी करुन आलेले तरुण जास्त चांगला इन्साइट देऊ शकतात.

मस्त ना! पन्नाशीच्या म्हातार्‍यांना तीशीच्या मुलांपेक्षा कमी अनुभव असतो म्हणे!!!

संवेदनशील विषय आहे. पण यावर आता पुरुष सदस्यांचे विचार वाचण्याची अजिबात इच्छा नाही. आणि अशा खुल्या व्यासपीठावर प्रामाणिकपणे कुठली मिपाभगिनी यावर मत देऊ शकेल असे वाटत नाही. खरे तर देऊ ही नये. अजयाताई म्हणतात तसे उगीच कसले गैरसमज वगैरे दूर करत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथे कुठल्या वाक्याचा कसला अर्थ काढून कुणाला कसे टार्गेट केले जाईल आणि कुठल्या पातळीवरचे स्कोर सेटलींग होईल याची खात्री नाही.

ते सगळं ठीक आहे, पण या विषयात खुद्द तुमचं मत काय आहे ते पहिले मांडा की ताई !

रागिणी९१२'s picture

23 Feb 2017 - 12:57 pm | रागिणी९१२

पिलियन रायडर-
चर्चाविषयच नीट मांडलाय अस वाटत नाही असे तुम्हाला वाटते. बरोबर आहे. माझा काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. बरेच वर्ष मिपावर मी वाचनमात्र होते. याचे कारण घरी वेळ मिळत नाही आणि त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये मिपा उघडत नसे आणि मला सेलफोनवरून मराठी लिहिता येत नाही. सहा महिन्यापूर्वी मी नोकरी बदलली. तिथे मिपा चालते. बऱ्याच वर्षांपासूनचे पुष्कळ प्रश्न मनात आहेत. वेळ मिळेल तसे लिहिण्याचा प्रयत्न करेन.
मी कुणाही एकाला डोळ्यासमोर धरून हा धागा काढलेला नाही. त्यामुळे संदर्भ वै. देण्याचा प्रश्नच येत नाही. एवढ्या वर्षात स्त्री बद्दल जे इथे वाचले त्यातून आलेले हे एक कन्क्लुजन आहे. खरेतर सगळ्यांना सगळ आठवत असत पण....

इरसाल कार्टं-
विषय भरकटतोय, हो भरकटलाच आहे.

सृजा-
विषय सोप्पा आहे. झाशीची राणी, फेमिनिस्ट वै बोलून अवघड करू नका हो.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर-
तुमच्याशी सहमत नाही पण एका वाक्यात तत्थ्य वाटत आहे. पन्नाशीतिल लोक फारच विपर्यास करतात.

स्नेहांकिता-
काही प्रतिसादात मी माझी मते मांडली होती. योग्य चर्चा सुरु झाली असती तर सविस्तर मांडता आली असती.

एस-
तुमच्याशी पूर्णपणे सहमत.
मला जे सुचवायच होत ते खरेतर बऱ्याच जणांना कळल आहे. माझा उद्देश माझ्यासाठी तरी पूर्ण झाला आहे. मिपावर अनेक संवेदनशील, समजूतदार पुरुषही तितकेच आहेत याबाबतीत माझे दुमत नाही.
स्त्रिया संकोचाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गप्प राहतात. त्यामुळे पुरुषांना आपली खोडसाळ मते खरी वाटू लागतात. कविता महाजन यांचा लेख वाचल्यावर मला अस वाटलं हे लिहावं, मी लिहिलं. ह्या धाग्यामागचा उद्देश उदात्त वै नव्हताच, मनातलं लिहाव इतकच. मला जे खुपत ते इतर स्त्रियांना खुपत नसाव. माझ अपयश हे कि मला जे अभिप्रेत होत ते मला नीट मांडता आल नाही..असच म्हणाव लागेल.
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल.

मराठी कथालेखक's picture

23 Feb 2017 - 7:47 pm | मराठी कथालेखक

स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत इथे.

आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे.

पुरुषांचा गैरसमज आहे .. हा पण एक गैरसमज असू शकतो असं मला वाटतं.
मुळात किती पुरुषांचा काय समज आहे हेच नक्की कुणाला माहिती नाही...एखादा पुरुष उठून म्हणतो की "(माझ्या) बायकोला कामभावना नाहीत, ती थंड असते ई ई" याचा अर्थ सगळ्या पुरुषांनी ते 'जनरलाईज' केले असं नाही. एखादा पुरुष तसं म्हणत असेल कारण त्याचा तसा अनुभव असेल, त्याची व्यथा तो मांडतोय.
ज्या पुरुषाची अशी काही व्यथा नसेल , ज्याची बायको प्रणयात रस घेत असेल तो काही सांगत फिरणार नाही की "माझी बायकोच्या कामभावना तीव्र आहेत, प्रणयाच्या वेळी ती खूप उष्ण (हॉट ?) असते". अर्थात त्यामुळे अननुभवी पुरुषांपर्यंत फक्त एकाच प्रकारचे विचार पोहोचतील हे खरे, आणि अननुभवी पुरुष कदाचित काही गैरसमज करुन घेतील ही शक्यता आहे. पण अननुभवी पुरुष किती असतील ? वयात आल्यावर आणि 'अनुभव घेईपर्यंतच्या' काळातील काही वर्षे ..अगदी आपण १५-२२ अशी सात वर्षे जरी गृहीत धरलीत तरी या सात वर्षांच्या गटातील पुरुषांची संख्या ती किती असणार (लोकसंख्येच्या प्रमाणात, किंवा एकूण पुरुषांच्या प्रमाणात). बरं अनुभव येईपर्यंत काही मनात काही गैरसमज असलेच तरी एकदा अनुभव आल्यावर ते दूर होणार असतील तर त्या गैरसमजाचं महत्व ते काय ? काही अपवादात्मक उदाहरणांत या गैरसमजामुळे वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होवू शकतो. म्हणजे प्रणयात रस घेणारी पत्नी पतीला 'वाईट चालीची' वगैरे वाटण्याची शक्यत आहे. पण तरी "पुरुषांचा गैरसमज" या मुद्द्यापेक्षा स्त्रीच्या लैंगिक इच्छा, त्या व्यक्त न करता आल्यास, पुर्ण न झाल्यास होणारी घुसमट ई मुद्दे अधिक महत्वाचे असावेत.

एक सहज सुचलं : "कहे झूम झूम रात ये सुहानी पिया हौले से छेड़ो दुबारा, वही कल की रसीली कहानी" नायिकेची अशी सूचक पण थेट मागणी असलेलं गाणं १९५९ साली लोकप्रिय झालं होतं की त्यावर 'काय ही छचोर नायिका दाखविली आहे' म्हणून टीका झाली होती ?