गुरगाव संबंधी माहिती हवी आहे.

उत्तरा's picture
उत्तरा in काथ्याकूट
16 Feb 2017 - 12:52 pm
गाभा: 

माझ्या भावाला मनेसार, गुरगाव येथे नवीन नोकरी मिळाली आहे. सगळं चांगलं असुन ही त्याची फॅमिली (बायको आणि ७ वर्षाची मुलगी) तेथे शिफ्ट होण्यास तयार नाही. कारणं फक्त दोन.
१ - प्रदुषीत वातावरण आणि २ - सुरक्षीतता.
तर कोणाला तिथली काही माहिती आहे का? जेणेकरुन योग्य माहीती मिळेल व निर्णय घेणे सोपे जाईल.कारण सगळ्यात मोठा प्रश्न सुरक्षीततेचा आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2017 - 1:46 pm | चौथा कोनाडा

मिपाकर किंवा त्यांच्या जवळेचे कुणी गुरुग्राम मध्ये नाही असं दिसतंय.

आज काल सर्वच शहरे विषेशतः नविन उपनगरे ही अशीच झालियत, प्रदुषित व असुरक्षित.
याला घाबरुन शिफ्ट व्हायला तयार नसतिल तर ही संधी वाया जाईल.
संधी उपभोगायची असेल तर या विषाची परिक्षा घेवुन पहिलीच पाहिजे.

खालील क्वोराच्या साईट वर काही अनुभव दिलेले आहेत, निगेटिव्ह आहेत तसेच पॉझिटिव्ह देखिल आहेत.
बघा, कोणते सुट होतात.

https://www.quora.com/How-is-life-in-Gurgaonmanesar gurgaon

उत्तरा's picture

16 Feb 2017 - 3:12 pm | उत्तरा

:) धन्यवाद.
क्वोरा या साईट वरची माहिती वाचतेय.

विअर्ड विक्स's picture

18 Feb 2017 - 12:32 pm | विअर्ड विक्स

मी स्वतः गुरगाव मध्ये DLF सिटी phase -२ मध्ये राहतोय. मानेसार नि गुरगाव २५ किमी अंतर आहे. मानेसार नि गुरगाव च्या भाड्यांत ( घरांच्या ) बराच फरक आहे. मानेसार स्वस्त आहे नि प्रदूषण म्हणाल तर गुरगाव दिल्लीपेक्षा कमी. सुरक्षितता हा तुम्ही कुठच्या भागात राहता यावर अवलंबून आहे!!!! मानेसार ला जॉब म्हणजे मारुती व औद्योगिक विभागातील नोकरी. गुरगाव हे उच्भ्रू लोकांसाठी चा भाग समजला जातो त्यामुळे दिल्ली पेक्षा इथे महागाई आहे. मानेसार गुरुगावमध्ये पकडले जात नाही !!!

सिरुसेरि's picture

18 Feb 2017 - 2:27 pm | सिरुसेरि

गुरगाव महाराष्ट्र मंडळ यांची साईट www.maharashtramandalgurgaon.com गुगलवर सापडली . कदाचित या मंडळातील सभासदांकडुन मनेसार, गुरगाव बद्दल अधिक माहिती मिळु शकेल .

इथे वाटलं होतं त्यापेक्षा जास्त आणि मोलाची माहिती प्रतिसाद आणि व्यनि मधुन मिळाली. अणि निर्णय घेणे सोपे झाले. सर्वांचे मनापासुन आभार. सगळ्यांचे अनुभव ऐकुन आणि वाचुन तिकडे शिफ्ट होणे ठरलंय.
पुन्हा एकदा धन्यवाद..

ते मानेसर आहे. पानीपत-सोनीपत-दिल्ली-गुरगाव-मानेसर या उत्तर ते दक्षिण अक्षाच्या सर्वात उत्तरेला आहे.
१. मानेसर मधे सुरक्षिततेसाठी सोसायटीमधे राहा..
२. स्वतःचा ट्रान्सपोर्त (म्हणजे कार) हवाच हवा. तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही.
३. मानेसरला पोल्यूशन नाही. असले तरी असह्य नाही.
४. मानेसर दिल्लीपेक्षा , गुरगावपेक्षा स्वस्त असेल.
५. दिल्ली जयपूर हायवे ने कम्यूट करायचे असेल तर गुरगाव मधे राहिलेले चालेल.
६. आपण महाराष्ट्रात स्वतःच्या घरात राहत असाल, इ इ तर तिकडे उत्पन्न बरेच टक्के जास्त हवे. भाडे, प्रवास, इ इ धरून खर्च वाढेल.
७. हरयाणात खडी बोली बोलतात. म्हणून स्थानिकांचे बोलणे अपमान म्हणून वाटून घेऊ नये. ते तशेच बोलतात.
८. मानेसर ते इंडीया गेट्/संसद इतके अंतर काटायला सुमारे २-३ तास लागू शकतात.

उत्तरा's picture

21 Feb 2017 - 10:38 pm | उत्तरा

हे नविन मुद्दे देखील आता विचारात घेतले आहेत.

धन्यवाद..