औरंगाबाद - पुणे २४० किमी - सायकलप्रवास.

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in भटकंती
13 Feb 2017 - 7:58 am

सायकलींग मी का करतो ? सायकलींग नी मला काय मिळालं ? हे प्रश्न मला कधीच पडले नाहीत. सायकल चालवणे हा माझा दिवसभरातील खूपच आनंदाचा भाग आहे. औरंगाबाद कट्ट्याच्या शेवटी शेवटी अचानकच "मी सायकलने पुण्याला येतो" असे बोलून गेलो आणि प्रशांत, मोदक, आनंदराव मंडळींनी ते उत्साहाने उचलून धरले. बस्स.. काहीही विचार न करता औरंगाबाद पुणे सायकलने पार करायचे ठरले. या आधी एक दीड वर्ष सायकलिंगच्या वेडेपणाची लागण झाली होती. नियमीत सायकलींग नंतर १००-१५० किमी मारणं अवघड वाटेनासं झालं होतं पण २३०-२४० किमी सायकलींग जरा जास्तच होणार होतं.

१०० किमी करायचं ठरवलं आणि ४ तास काही मिनीटात झालं होतं (औरंगाबाद-जालना आणि परत) ४० किमी तर आठवड्या ३-४ वेळेस व्हायचंच. हळूहळू ताकद गोळा होत होती पण त्याहीपेक्षा महत्वाचा होता अनुभव की लांबच्या राईड्स मुळे येत होता.

पण आता ठरवलं कि आता पुण्याला जायचंच.. तसे २०० + किमी करायचे तर नगरला जाऊन परत येणं हा एक पर्याय होता पण त्यात मजा नसती आली , मग पुण्याचा बेतच फायनल केला. आता तयारी सुरू केली मनाची ,कारण त्यावरच हे सगळं होणार होतं ....

आता जास्त फाफट पसारा न मांडता माझ्या सायकलवारी वर्णनावर येतो :))

१० डिसेंबरला जवळ जवळ सगळी तयारी झाली होती, स्वत:चीच गाडी सपोर्ट व्हेईकल म्हणून होती, स्पेयर ट्युब्स होत्या पण रोड बाईकचं पंक्चर कधी काढलं नव्हतं की ट्युब बदलली नव्हती; मग अभिजीत दादाच्याकडे जाऊन ट्युब बदलण्याता शाॅर्ट कोर्स केला आणि ट्युब बदलतांनाच ट्युब पंक्चर करून ठेवली.
आता मात्र धाबं दणाणलं, नवी ट्यूब आणणे पंक्चर काढणे ही सगळी जबाबदारी दिपकवर ( हाच गाडी घेऊन आला सोबत पुण्यापर्यंत ) टाकून OPD साठी निघालो. तो पर्यंत अभिजीत दादानी मिहीरशी बोलून त्याची सायकल (स्पेअर १ म्हणून) मागवून ठेवली , अंतरिक्षकडून कारला सायकल अडकवायचा स्टॅंड पण दादानीच घेऊन ठेवला होता माझ्यासाठी _/\_ (हे सर्व औरंगाबादकर सायकल मित्र..! )
नेहमी ५ पर्यंत संपणारी OPD त्याच दिवशी ६:३० पर्यंत लांबली. मग घरी येऊन सगळी तयारी सुरू केली. ८-१० पाण्याच्या बाटलइलेक्टृऑक्ट्रॉल बेक्कार लागतं म्हणून TANG घेतलं, केळी,चिक्की (हा सर्वात उत्तम एर्नजी बार!!) असं माझं इंधन घेतलं, दोन मोबाईल फोन, एक पावर बॅंक, चार्जर, एक्स्ट्रा चष्मा, एक्स्ट्रा हँड ग्लोव्हज् आणि जास्तीची सायकलींग शाॅर्ट घेतली. .हे सगळं ह्यासाठी कारण कुठल्याही गोष्टीसाठी मला थांबायचं किंवा परत यायचं नव्हतं !!

रात्री झोपण्याआधी सगळं सामान गाडीत भरलं. रात्री झोप लागणं मुश्किल होतं आणि अस्वस्थ का होईना झोपलो. सकाळी ४:३०-४:४५ ला निघायंच होतं त्यामुळे ३:३० लाच उठून उरलेली तयारी केली, ४:१५ ला बायकोनी २ आम्लेट्स करून दिली (आणि ह्या सगळ्या खटाटोपीसाठी तीनं फुल्ल सपोर्ट केलाच होता)

निघेपर्यंत ४:५० झाले, निघालो एकदाचा. सायकल वारी सुरू झाली..!!

.

हिवाळा असल्यानी चांगलाच अंधार होता, पण गाडीच्या लाईट्स मध्ये व्यवस्थीत दिसत होत आणि मोजून ५ व्या मिनीटाला शहराबाहेर पडलो. साधारण विसेक किमी नंतर पेट्रोलसाठी गाडी थांबली तेव्हाच टाॅयलेटला जाऊन आलो. परत सायकलींग सुरू.

हळूहळू थंडी जाणवू लागली, पण ह्याचा फायदा घेऊन सुसाट सायकल हाणायला सुरू केली. मध्येच गाडी जवळ बोलावून स्पीड बघीतला तर २८-२९ चा होता (माझ्या मानानी फारच चांगला होता). गंगापूरला १:३० तासानी पोहोचलो आणि प्राडाॅ.बिरूटे सर भेटणार म्हणाले म्हणून थांबलो पण सर काही दिसले नाहीत म्हणून १० मिनीटांनी निघालो.
.

५० किमी ला देवगड आलं तिथे चहाचा ब्रेक घेतला तोपर्यंत व्यवस्थीत उजाडलं होतं. दिपकला सांगीतलं तू पुढे जा १०-१५ किमी मग मी आलो की परत तसचं पुढे जायचं. आता चांगलं राईडींग सुरू होणार होतं. मग दर २५-३० किमी नंतर पाण्याच्या बाटल्या भरून घेणे आणि पुढे निघणे असा कार्यक्रम सुरू झाला. नगर आधी २० किमी वर लिलीयम पार्क ला CCD मधे काॅफीसाठी थांबलो व मोदक दादांना फोन केला आणि नगरजवळ आलोय सांगितलं.

.

तिथुन निघाल्या निघाल्या अतिशय जीवघेणा म्हणजे ८-१० च्या स्पीड नी चढावा लागणारा चढ आहे , मग एका ओव्हरलोडेड ट्रकशी स्पर्धा करत तो चढ पार केला आणि त्यानंतर जो उतार लागला.... व्वा.. जन्नत !! सलग ३-३.५ किमी फक्त उतार वा वा वा !!!

नगर ला नितीन पाठक साहेब भेटणार होते पण एका लग्नासाठी ते पुण्याला गेले होते. त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते पुण्याहून निघाले असं कळलं. नगरचा स्टाॅप रद्द करून पुढे निघालो. नगर शहरात रहदारी मुळे वेग बराच मंदावला होता पण हे अपेक्षितच होतं.
.

शहरा बाहेर पडतांना एक दुधवाला (अॅक्टीव्हावर बरं का) जवळ येऊन बराच वेळ निरखून सायकल बघत होता मग मीच विचारलं पुणे किती अंतर आहे इथून? मग तो आश्चर्यचकीत होऊन म्हणाला "सव्वाशे किमी" पुढे तो सगळा वेळ मराठीमिश्रीत हिंदीत बोलत होता (सायकल चालवणाऱ्याशी मोटारसायकल किंवा स्कुटर वाले हिंदीमध्ये का बोलतात देवच जाणे)
औरंगाबादहून आलोय पुढे पुण्याला जातोय सांगितल्यावर आदरयुक्त भाव अवतरले होते त्याच्या चेहेऱ्यावर !!

१० वाजले तेव्हा नगर च्या बाहेर पडलो होतो(सकाळपासुन १२५ किमी)

ऊन तापायला सुरू झालं होतं, मग बसेस चा नेहमीचा स्टाॅप म्हणजे 'स्माईल स्टोन' एका मोठ्या आणि त्रासदायक चढानंतर आलं तेव्हा थकवा जाणवायला सुरू झाला होता, पण दर ५ किमीला पाण्याचा मोठा घोट घेऊन राईडींग चालू होतं.

एक गोष्ट प्रकर्षानी कळली ती म्हणजे आज पर्यंत जेवढे चढ पुण्याला जातांना लागायचे त्याच्या तिप्पट चढ प्रत्यक्षात आहेत !! वाऽऽऽऽट लागली होती पण ठरवलं होतच की वेग कितीही कमी झाला तरी उतरून सायकल नाही चालवायची बास्स् ह्यावरच सगळे चढ पार केले..

ह्या दरम्यान नितीन पाठकांचे २-३ फोन येऊन गेले पण सायकलवर असल्याने ऐकूच आले नाहीत आणि बोलणं नाही झालं, एका ब्रेक दरम्यान (बहूदा शिरूर गाव किंवा त्या आधी) बोलणं झालं आणि पाठक साहेब रस्त्यातच भेटले, ह्यापुर्वी न बघीतल्यामुळे मी त्यांना ओळखलं नाही पण त्यांनी मात्र मला ह्यामुळे ओळखलं कारण ह्यावेळेस फक्त मीच सायकलवर असणार होतो नगर-पुणे हायवेवर असं त्यांनीच सांगीतलं ;)) त्यांच्याशी १० मिनीटे बोलून पुढे निघालो..

वाघुर्डे गावाबाहेर पाणी भरण्यासाठी थांबलो असतांना एक हाॅटेलवाला जवळ येऊन विचारू लागला "रेस आहे का ? बाकी लोक कुठे आहेत ? रेस नाही तर कशाला सायकल चालवता आहात ? सायकलची किंमत काय ?" इथंपर्यंत ठिक होतं आणि मी पण यथाशक्ती उत्तरं देत होतो , जसा तो म्हणाला एक चक्कर मारतो माझं डोकंच फिरायला लागलं मग मीच म्हणालो की बास् झालं राहू द्या निघायचं आहे मला आणि मी सटकलो , हा किस्सा रात्री जेव्हा सायकल गृपला सांगीतला तेव्ह शेफ केडी (केदार दिक्षित) म्हणाले डाॅक तुम्ही फाऽऽर सौजन्यानी घेतलं नाही तर मी सायकलच्या जवळ जरी कोणी आलं तरी "पाच फूट दूऽऽऽऽऽर "असं ओरडतो म्हणे म्हणजे समोरचा ६-७ फूट दूरच थांबतो !! मला पटलं आता पुढच्या वेळी करुन बघयचं आहे तसं :))

मोदक दादा, खुद्द सरपंच , सागर पाध्ये आणि नकुल पाठक ही मंडळी रांजण गावच्या २५ किमी अलिकडे पोहोचली होती.... मला घ्यायला चक्क ५५ किमी सायकलवर आले होते हे लोकं _/\_ मोदक दादांनी तर नगरपासून सोबत येण्याची इच्छा दर्शवली होती पण माझी रोडबाईक आणि त्यांची हायब्रीड असा वेग जुळला नसता शिवाय माझ्याकडे सपोर्ट व्हेईकल असल्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला होता !

इथून पुढे मात्र मानसिक बळावरच सायकलींग केलं कारण काही चढ नकोसे झाले होते. रांजणगाव जवळ आलं तेवढ्यात पाण्याच्या बाटलीचं झाकण उडून रस्त्यावर पडलं कळेपर्यंत मी १० फुट पुढे आलो होतो , सायकल वरुन बाजूला उतरलो तेवढ्यात वेगानी एक ट्रक बाजूनी गेला आणि त्याच्या हवेनी पडलेलं झाकण उडुन माझ्याजवळ आलं. फोनाफोनी मध्ये कळलं की सगळी मंडळी रांजणगावला पोहोचली म्हणून. सायकल दामटायला लागलो आणि रस्त्यातला एका विचारलं किती अंतर आहे रांजणगाव तर तो म्हणाला हे इथंच आहे १ किमी वर पण ते प्रत्यक्षात ५ किमी वर होतं हे रांजणगावला पोहोचल्यावर कळलं !!!

रांजणगावला मंदिराबाहेर हे चार जणं मस्त पेरू , लस्सी असं खात-पित बसले होते. तासभर गप्पा मारता मारता बराचसा शीण कमी झाला होता. सव्वा दोन ला सगळे जण निघालो. मी आणि सागर पाध्ये एकमेकांना पेसिंग करत मस्त २७ च्या स्पिड नी पुढे निघालो मागून प्रशांत, मोदक आणि नकुल येत होते, साधारण २० किमी नंतर ऊसाचा रस पिण्यासाठी वाघोलीच्या अलीकडे थांबलो तर माझा बालवाडीपासूनचा मित्र अद्वैत फक्त मी सायकल वर येतोय म्हणून भेटायला ३०-३५ किमी वरून आला, ५-१० मिनीट्स गप्पा मारून निघालो पुढे परत ५-७ किमी नंतर खराडीला माई वडेवाले कडे वडा सांबारसाठी ब्रेक घेतला (बेकार सांबार होतं) तिथून निघालो आणि खराडीला २०० किमी क्राॅस झाले होते ( स्ट्रावा नी २८-३० किमी खाल्ले कारण २३०+ ऐवजी २०४ किमी दिसत होते ) तेव्हा थांबायचा निर्णय घेतला , माझी आणि प्रशांतची सायकल कारच्या कॅरियरला अडकवली; बाकी लोक तसेच पुढे निघाले आणि मी सूस रोडला भावाकडे गेलो.

.

१० तासात २३० किमी अंतर पार केलं होतं मी त्या दिवशी. नकुलची पण पहिलीच १०० किमी ची राईड झाली होती, बाकी लोकांची पण १२५+ ची सायकलींग झाली होती, आदल्या दिवशीच देशपांडेमामांची २००किमी BRM झालेली होती.

त्याच दिवशी रात्री बरेचसे मिपाकर जे सायकल गृपचे मेंबर आहेत (अमित मनोहर, केदार दिक्षीत, देशपांडेमामा,अंजनेय, सागर पाध्ये, नकुल पाठक, मोदक आणि त्यांचे एक दोस्त "५० फक्त") असे रंगला पंजाब नावाच्या ठिकाणी भेटलो मस्त २-३तास गप्पा आणि झक्कास जेवण असा लक्षात राहील असा वेळ घालवला.

दुसऱ्या दिवशी ८ ला सकाळी निघाले परतीच्या प्रवासाला खुप साऱ्या आठवणी घेऊन.

.
आता दर वर्षी सायकलवरची पुणेवारी ठरवलेली आहे , डिसेंबर मधे !!

औरंगाबाद-पुणे सफरीसाठी आणि एकंदर सायकलिंगसाठी मिपाचा सायकल सायकल गृप फार म्हणजे फारच स्फुर्ती देणारा ठरला !! ह्यातल्या प्रत्येकाला माझ्यावर जेवढा विश्वास होता तेवढा कदाचित मला पण माझ्यावर नव्हता. हा गृप ही माझ्या सायकलींग मुळे झालेली खरी कमाई आहे. सायकलींगनी मला इतके वेग वेगळ्या प्रोफेशनचे, विचारसरणीचे आणि माझ्यापेक्षा वेगळे असुनही माझ्यासारखे सायकलवेडे मित्र दिले. औरंगाबाद, लातूर, पुणे, बंगलोर, आॅस्ट्रेलीया आणि अमेरिकेपर्यंत हा मित्रपरिवार पसरलेला आहे.

ज्या कोणालाही मी माझ्या औरंगाबाद-पुणे सायकल राईडबद्दल सांगीतलं त्यांच्यापैकी सायकल चालवणाऱ्या एकाही व्यक्तीनी हे म्हटलं नाही की का जायचं इतकं लांब किंवा उगाच कशाला नसत्या उचापती ; मात्र इतरांपैकी जवळ जवळ सगळ्यांना हे प्रश्न पडले होते !

सायकलींग करणाऱ्या किंवा इच्छूक लोकांनी सायकलींगसोबत नियमीत चालणं (मला पळायला फारसं जमत नाही ) किंवा पळणं गरजेचं आहे कारण ह्यात पायाचे वेग वेगळे स्नायूंचे गट वापरले जातात आणि संपूर्ण क्षमता वाढायला चांगलीच मदत होते. Cross training म्हणतात ह्या प्रकाराला ज्याचा मला बराच फायदा झाला. ह्या शिवाय सायकलींग नंतरचं स्ट्रेचींग फार महत्वाचं असतं. ह्यावर बरेचदा चर्चा झाल्या आहेत पण मला माझ्या पुणेवारीसाठी खुप फायदा झालाय ह्या सगळ्याचा !!

तुम्हीही सायकल चालवत रहा, चालत पळत रहा. पुढील आव्हानांसाठी शुभेच्छा. :)

(मोदक दादांचे खास आभार कारण मला लिहीतं केलं आणि लिखाणासाठी मदत देखील केली )

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

13 Feb 2017 - 8:39 am | शैलेन्द्र

जोरदार,

डॉ श्रीहास's picture

13 Feb 2017 - 9:46 am | डॉ श्रीहास

पुढच्या वारीला नक्की भेटा हो....

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2017 - 8:47 am | पिलीयन रायडर

अफलातुन!!

७ दिवसांचं चॅलेंज झालं की २ दिवस पुर्ण टाईमपास करण्यात घालवले. हे असे लेख वाचले की ताळ्यावर यायला होतं!

सायकलींग करणाऱ्या किंवा इच्छूक लोकांनी सायकलींगसोबत नियमीत चालणं (मला पळायला फारसं जमत नाही ) किंवा पळणं गरजेचं आहे कारण ह्यात पायाचे वेग वेगळे स्नायूंचे गट वापरले जातात आणि संपूर्ण क्षमता वाढायला चांगलीच मदत होते. Cross training म्हणतात ह्या प्रकाराला ज्याचा मला बराच फायदा झाला.

मलाही पळायला जमत नाही. काय प्रकार आहे कळत नाही. मी सायकल पुर्वी चालवलेली आहे खुप. आताही ट्रेडमिलवर चालु शकते खुप. पण पळायचं म्हणलं की बेक्कार धाप लागते.

डॉ श्रीहास's picture

13 Feb 2017 - 1:30 pm | डॉ श्रीहास

Walking is less injurious than Running.... म्हणून चालणं बेस्ट आहे, काही जणांच्या मते चालणं हा व्यायाम होऊच शकत नाही पण मी मात्र पळणं होत नाही म्हणून चालतो भरपूर चालू शकतो ( हाफ मॅरेथाॅनचं अंतर म्हणजे २१.१ किमी 3:30 मिनीट्स मध्ये चालू शकतो ).... आणि चालण हा low intensity म्हणजे सायकलींग सारखा व्यायामप्रकार आहे म्हणून जास्त वेळ देखील देता येतो...

फेदरवेट साहेब's picture

13 Feb 2017 - 9:19 am | फेदरवेट साहेब

तुमच्या साहसाला मनःपूर्वक सलाम. २४० किमी बाईक चालवूनही काटा ढिला होतो त्यात सायकल म्हणजे कमालच आहे. बाकी सपोर्ट व्हेईकल वगैरे कंपल्सरी असते काय? उगाच सायकलिंग म्हणजे रिच मेन्स स्पेशल हॉबी आहे असा विचार आमच्या निम्नमध्यमवर्गीय मनात येऊन गेला :(

डॉ श्रीहास's picture

13 Feb 2017 - 9:45 am | डॉ श्रीहास

धन्स फेदरवेट साहेब

सपोर्ट लागतोच....पण सपोर्ट व्हेईकलच पाहीजेच असं अजिबात नाही...राहीला प्रश्न सायकलींच्या किमतीचा तर ४५०० ₹ बिना गियर ची (बघेरघेर) सायकल वापरणारे आमचे जवळचे मित्र मानस चंद्रात्रे १०० किमी मारतात तेही लातूरला .....

sagarpdy's picture

13 Feb 2017 - 9:53 am | sagarpdy

तेही दुपारी

मजबुरी आहे हो दादा. मोकळा वेळ तेंव्हाच असतो. सध्या उन पण कमी होतं म्हणुन.

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 11:45 am | मराठी कथालेखक

मी दिड वर्षांपुर्वी ५००० रु ला हीरोची ६ गिअरची सायकल घेतली.

सामान्य वाचक's picture

13 Feb 2017 - 10:23 am | सामान्य वाचक

एका डिस्टन्स नंतर शारीरिक पेक्षा मानसिक ताकद जास्त महत्वाची ठरते

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:36 am | डॉ श्रीहास

ह्याचा प्रत्यय पदोपदी आलाय...

डॉक, तुम्हाला भेटून त्या दिवशी फार बरं वाटलं. अशीच सायकल चालवत राहा, हीच मनापासून शुभेच्छा! तुम्ही ते च्यालेंज सुरु करून फारच भारी काम केलय. लवकरच आम्ही त्यात भाग घेऊ.

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:34 am | डॉ श्रीहास

तुमच्या हातचं चिकन खायचं आहे बरं का केडी सर !!

केडी's picture

20 Feb 2017 - 10:38 am | केडी

ये वादा रहा!

एस's picture

13 Feb 2017 - 11:09 am | एस

_/\_

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:35 am | डॉ श्रीहास

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 11:44 am | मराठी कथालेखक

पण जास्त प्रथिनं (प्रोटीन्स) मिळण्यासाठी काय केलंत ? सकाळचे ऑम्लेट वगळता प्रवासात तुमच्या आहारात प्रथिनं दिसत नाहीत.
की काही दिवस आधीपासूनच प्रथिनयुक्त आहार वाढवला होता का ?
एकंदरीतच अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी आहाराच्या दृष्टीने काय तयारी करायला हवी (खास करुन शाकाहारी लोकांनी ) ?

डॉक सविस्तर उत्तर देतीलच.
सायकलिंग प्रत्यक्ष करताना फार जास्त प्रथिनयुक्त आहारापेक्षा हलका पिष्टमय आहार, जो लवकर पचून लवकर ऊर्जा देईल. सोबत थोडाफार प्रथिनयुक्त आहार जर दूरवर सायकलिंग करायचे आहे.
आणि सायकलिंग नंतर स्नायू ची झीज भरून निघण्यासाठी भरपूर प्रथिने
मी स्वतः जवळपास शाकाहारी आहे (अंडी खातो पण फार जास्त प्रमाणात नाही)

रेग्युलर सायकलिंग नंतर चांगला प्रोटीन युक्त आहार - दूध आणि पदार्थ, कडधान्ये इ. खावा.

डॉक नि केलाय तसे दूरवर सायकलिंग करायचे तर आदल्या दिवशी भरपूर फळे आणि पिष्टमय पदार्थ (बटाटा) खावे. प्रत्यक्ष सायकलिंग वेळी देखील असेच पदार्थ व सोबत थोडेफार प्रोटीनयुक्त पदार्थ उदा. इडली, डाल-खिचडी. चीज, ड्राय फ्रुट पण खाऊ शकतो.

आम्ही रांजणगाव ला विश्रांती घेताना पेरू, केळी, भुईमूग, हरभरे खात बसलो होतो.

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 3:31 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

डॉ श्रीहास's picture

13 Feb 2017 - 5:23 pm | डॉ श्रीहास

खाल्लंय ना ..... लिलीयम पार्क च्या CCD ला चिकन सॅन्डवीच .... रात्री पोहोचल्यावर मिपाकरांसोबत भरपूर नाॅनव्हेज

माझ्या आहारात अंडी ही असतातच.. नाॅनव्हेज खाणं नेहमी नाही होत...शाकाहारी लोकांनी पाध्येंनी सांगीतल्याप्रमाणे दुध,चिज,डाळी आणि कडधान्यं यांचा जेवणात समावेश करावा..मुग डाळी मध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात प्रथिनं असतात त्यामुळे मुगडाळीचा वापर वाढवणं चांगलं!!

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 6:15 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.

देशपांडेमामा's picture

13 Feb 2017 - 12:07 pm | देशपांडेमामा

जबरदस्त राईड होती ती डॉक!

छान वाटलं तुम्हाला प्रत्यक्ष भेटुन. त्यालाही बरेच दिवस झाले म्हणा आता. काढा एक पुणेवारी परत दर्शन द्यायला :)

सायकलने नागपुरचा प्लॅन करायचाय ..काय म्हणताय ?

देश

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:32 am | डॉ श्रीहास

तुमच्यासोबत नागपूर काय पूणे बंगलोर सुध्दा करू की... मोदक दादा आणि कंपनी क्रु म्हणून येणार आहेतच !!

सूड's picture

13 Feb 2017 - 3:42 pm | सूड

भारीच!!

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:29 am | डॉ श्रीहास

_/\_

नितीन पाठक's picture

13 Feb 2017 - 4:03 pm | नितीन पाठक

साधारण ऑक्टोबर मध्ये समजले होते की, औरंगाबादचे डॉक श्रीहास हे त्यांच्या सायकलवरून औरंगाबाद ते पुणे १० डिसेंबर ला जाणार आहेत अर्थात नगर मार्गे (नगर म्हणजे अहमदनगर. आम्ही नगरी "नगर"च म्हणतो). नगर मार्गे जाणार असल्यामुळे मी त्यांना नगरला थांबायची विनंती केली होती. त्यांनी ती मान्य पण केली होती. नगर मध्ये थांबून नाष्टा करायचा असा डॉक सरांची ईच्छा होती.
परंतु अचानक पणे मला दि. ०९-१० डिसेंबर ला माझ्या जवळच्या मित्राच्या मुलाचे लग्नाचे निमंत्रण आले, या लग्नाला जावेच लागणार होते. त्यामुळे नाईलाजाने माझी आणि डॉक सरांची ची भेट नगरमध्ये होउ शकली नाही. मी दि. १० डिसेंबर ला दुपारी पुण्याहून नगरला यायला निघालो होतो. आमचे मोबाईल वर बोलणे झाले होते. वेळापत्रकाप्रमाणे डॉक शिरूर (घोडनदी) च्या आसपास कोठेतरी भेटतील अशी अपेक्षा होती. मी आणि माझी पत्नी सकाळी मोटारसायकल वर पुण्यावरून निघालो. त्याचवेळेस आमच्या आधी मोदक, खुद्द सरपंच, सागर पाध्ये आणि नकुल ही मंडळी सायकल वर रांजणगावला डॉक सरांना कंपनी द्यायला निघाले होते. ही मंडळी आम्हाला वाघोलीला भेटली. आम्ही सगळ्यांनी मिळून लोणीकंदजवळ "माई वडेवाले" येथे झक्कास नाष्टा केला. मी पुढे निघालो. मी पूर्ण रस्त्यावर लक्ष ठेवून होतो की कुणी "सायकलवाला" दिसतो का ? शिरूर जवळ आले पण डॉकचा काहीच पत्ता नव्हता. रस्ता पहात पहात शिरूर ओलांडले तरी नाही. अजून पुढे आलो, राळेगण सिध्दी (मा. अण्णा हजारेंचे गाव) फाटा आला आणि समोरून डॉक दिसले, जोरात सायकल चालवत. मी ताबडतोब माझी बाईक बाजूला लावली आणि डॉक ला हाक मारली आणि आडवा गेलो.
मग काय, डॉक भेटले, सायकल चालवणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व भेटले. एकमेकांची ओळख झाली, थोडावेळ गप्पा झाल्या, डॉक काही चहा, ज्यूस घ्यायला तयार होईना. शेवटी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि डॉक सरांनी त्यांच्या सायकल वर टांग मारली, पुढील प्रवासासाठी........ मी फक्त पहात राहिलो पाठमो-या डॉककडे ............ मनातल्या मनात सलाम करीत त्यांच्या जिद्दीला, सायकलींगला, त्यांच्या सहनशक्तीला आणि त्यांच्या ह्या सफरीला .... ___/\___ धन्य डॉक
डॉक यांना पुढील मोठ्या सायकल सफरी साठी माझ्याक्डून शुभेच्छा .........
आणि पुन्हा नगरला याच हे आग्रहाचे निमंत्रण (मस्तानी प्यायला)

तुम्हा लोकांच्यामुळे हा सायकलप्रवास शक्य झाला.... तुम्ही वर्णन केलंत तो दुसराच कोणी डाॅक आहे असं वाटतय :))

खूप मस्त लिहिलय. पुन्हा एकदा तुमची राईड एंजॉय केली.
२०१६ च्या औरंगाबादच्या सफरीत भेट झाली. एकदम दिल्खुलास व्यक्तिमत्व. आमचा सायकल सायकल ग्रुप जिवंत राहण्यात मोठा हातभार यांचाच. बर्याच जणांच्या सायकलिंग साठी प्रेरणा हेच उधार देतात. :)
__/\__

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:24 am | डॉ श्रीहास

धन्यवाद शलभदादा_/\_

मला हा नव्हे, एक वेगळा प्रश्न पडला.. कसं जमतं हो!! (अरे! हा प्रश्न आहे, तिथं प्रश्नचिह्न पाहिजे, पण आपोआप ते उद्गारवाचक झालं)

असो: माई वडेवाले खराडीत नसून तिथून नगरच्या दिशेने अंदाजे १६ किमीवर लोणीकंद गावानंतर आळंदी फाटा आहे, तिथे आहे. कदाचित त्यामुळे स्ट्रावाने अंतराची गडबड केली असावी. सांबार बकवास याच्याशी सहमत.
(अवांतरः 'माई'शेजारी एक सोमेश्वर मटकी भेळ आहे. लई फेमस जागा. फटफटीवर जर कधी कंपनीत आलो तर घरी जाताना, तिथं थांबणं कम्पलसरी! तिथला चहा मात्र एकदम रिफ्रेशिंग! भरपूर विलायची टाकलेला..)

'माई वडेवाले' बेकार आहे. अजिबात नाही आवडलं.

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:14 am | डॉ श्रीहास

सांबार नव्हतं चांगलं..... लाल रंगाची तर्री होती सांबार म्हणून

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:22 am | डॉ श्रीहास

प्रश्न मला पण पडला होता..... खरंच जमलं कसं ?
वेडं असावं लागतं अश्या गोष्टींसाठी त्या शिवाय होणे नाही...

बादवे ... २०० किमी सायकलींग नंतर खराडी काय लोणीकंद काय मला सगळं सारखंच दिसत होतं... पण पुढच्या वारीला सोमेश्वर मटकी भेळ ला थांबून चहा नक्कीच घेतला जाईल आणि तुम्हाला त्यावर प्रतिक्रीया देण्यात येईल ;)

Ranapratap's picture

13 Feb 2017 - 6:29 pm | Ranapratap

क्या बात है, डॉक्टर. औरंगाबाद ते पुणे सायकल प्रवास. keep it up

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:12 am | डॉ श्रीहास

:) :)

अरिंजय's picture

13 Feb 2017 - 7:01 pm | अरिंजय

मस्त जमलाय दादा. भारी.

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:11 am | डॉ श्रीहास

मला आठवतंय कि तुम्ही स्ट्रावा वर बघून सांगीतलं होतं कि ६००-७०० मी टोटल क्लाईंम्बीग केलं.... तेव्हा फार भारी वाटलं होतं.._/\_

छान लिहिलय. तुमच्या सायकल चालवण्याबद्दल मला काही प्रश्न नाही पण बाकीची मोठी (म्हणजे सगळीच) वाहने काळजी घेऊन चालवतील असे नाही म्हणून भीती नक्की वाटेल.

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 7:07 am | डॉ श्रीहास

सायकल स्पष्ट दिसणे गरजेचे आहे... माझ्या हेल्मेट च्या मागे एक ब्लिंकर लाईट होता, सायकल वर मागच्या बाजूला दोन ब्लिंकर्स होतेच... शिवाय अंगावर रिफ्लेक्टीव्ह पट्टी होतीच.... सांभाळून रस्त्याच्या अगदी डावीकडून सायकल चालवणे हा सगळ्यात महत्वाचा भाग!!

राहिला प्रश्न भितीचा , तर ती असावीच पण थोडीशी.

धर्मराजमुटके's picture

13 Feb 2017 - 7:41 pm | धर्मराजमुटके

मस्तच !

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 6:59 am | डॉ श्रीहास

_/\_

अल्पिनिस्ते's picture

13 Feb 2017 - 7:52 pm | अल्पिनिस्ते

पुढ्चा वेळेस नक्की येणार तुम्हाला भेटायला
आता लिहायची पण प्रेरणा देणार म्हण्जे तुम्ही _/\_

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 6:59 am | डॉ श्रीहास

भेटायला नक्कीच आवडेल... जमलच तर सायकलवर या :))

नकुल पाठक's picture

14 Feb 2017 - 12:10 am | नकुल पाठक

आदल्या दिवशी मोदक, सागर आणि सरपंच यांचा प्लॅन कळाला कि सगळेजण डॉक्टर साहेबांना भेटून परत येणार आहेत सोबत. मनात विचार आला लगेच एवढा सायकलिंग कधी केला नाही आधी, एका दिवसात रांजणगावला जाऊन येणं होईल का! मोदकरावांशी फोन झाला रात्री. माझे विचार हलके करत म्हणाले "अरे चल बिनधास्त, आपण थांबत थांबतच जाउ!". त्याच वेळी ठरवलं कि जे होईल ते होईल, उद्या १०० करायचं!
ठरल मग, मित्राला फोन लावले सायकलसाठी. त्याचा होकार कळताच सकाळच प्लांनिंग केल. अशा प्रकारे सकाळी सरपंचांना वाटेत भेटून पुढे निघालो. डेकॅथलॉन ला थोडा खरेदी केली, मग पुन्हा पुढचा प्रवास चालू. थंडी असल्यामुळे मस्त वाटत होत. भरपूर खात खात, राइड करण चालू होता. मिसळ, लस्सी वर आधीच ताव मारून झाला होता.
तिकडे जाऊन फलाहार सुरु केला डॉक्टरसाहेब येईपर्यंत . ते आलय नंतर भरपूर गप्पा मारल्या, आणि परतीचा प्रवास सुरु.

परत निघताना लक्षात आल कि जाताना वाट लागणार आहे, पण पूर्ण करायची एकच इच्छा होती. अर्धा प्रवास पूर्ण केल्या वर बाकी सगळे पुढे होते, आणि मी आपल हळू हळू पुढे सरकत होतो. ऊन डोळ्यावर येत होता. एकटाच असल्या मुळे डोक्यात विचार यायला लागले "कुठे ह्या उन्हाचा घरी बसायचा सोडून बाहेर सायकलिंग करत बसलोय, मस्त घरी बसून झोपलो असतो", पण नंतर पुढे पुन्हा थोडा वेग पकडून पुढे आलो. सगळेजन थांबले होते खाण्याकरता. अजून ३० किमी होता अंदाजे, आता खरी परीक्षा होती, कारण सोबत कोणीच नसणार होत पुश करायला. थोडं रडतखडत, ट्रॅफिक ला वैतागून केलं पूर्ण!

११९ किमी ची राइड झाली होती, मित्राला सायकल दिली आणि घरी निघालो. मस्त समाधान वाटत होता काही तरी केल्याच. सगळ्यांच्या मदतीने आणि प्रेरणेने हे शक्य झाल.

रात्री बाकी सर्व सायकल सायकल ग्रुपच्या सदस्यांची ओळख आणि गप्पा झाल्या. मनसोक्त खादाडी पण!

सर्वाना मनापासून धन्यवाद!

डॉक, पुढच्या वेळी या, इथून पुढच्या गावाला कुठे तरी जायचा प्लॅन करूया!

मस्त झाली होती ती राईड आणि फक्त सोबत द्यायला म्हणून तुम्ही लोकं १००+ किमी राईडींग केलतं.... खरोखर नशिब लागतं असे मित्र मिळायला !!

पुढच्या वेळी नगरलाच या की मग तिथूनच सोबत येऊ म्हणजे ३-४ तास तर सहज गप्पा होतील आपल्या ;)

रश्मिन's picture

14 Feb 2017 - 10:18 am | रश्मिन

हे म्हण्जे कोहली चे २०० + बघुन साहा चे १०० ! झक्कास

निनाद's picture

14 Feb 2017 - 4:29 am | निनाद

मस्त !

ज्यांना सायकल समुहाचे निमंत्रण
https://chat.whatsapp.com/Hwf3zsuTZ3MDNr4xp6PDXh

चिनार's picture

14 Feb 2017 - 10:00 am | चिनार

जबरदस्त साहस !!
आणि प्रेरणादायीसुद्धा !!

रश्मिन's picture

14 Feb 2017 - 10:15 am | रश्मिन

असेच म्हणतो !!

सानझरी's picture

14 Feb 2017 - 10:14 am | सानझरी

_/\_

बाबा योगिराज's picture

14 Feb 2017 - 2:15 pm | बाबा योगिराज

सायकल चालवणे हा माझा दिवसभरातील खूपच आनंदाचा भाग आहे.
तुझ्या सोबत केलेल्या मागील 3 दिवसाच्या राईड आठवल्या कि वरील वाक्य १००% खरं आहे हे पटत.
डॉक, तुझी पुणे वारी खरच जबरदस्त होती. त्या वेळी मी सकलिंग च्या एकदम प्राथमिक अवस्थेत होतो. परंतु, इथून पुढे तू कुठली हि, कितीही मोठी राईड ठरव मी तुझ्या सोबत येईलच. १० डिसेंम्बर २०१७ रोजी मी पण सोबत येणार.
मला सायकल विश्वात चकटफू प्रवेश दिल्याबद्दल धन्यवाद डॉक. तुंझ्या सोबत एक मोठी राईड मारण्याची वाट बघत आहे.
नुकल म्हणतोय तस एकदा सायकल बस मध्ये टाकून पुण्याला नेऊ आणि थेथुन पुढे एखादी कोकण वारी(सायकल वर) करून येऊ. काय म्हणता मित्रहो.

बाबा योगीराज

sagarpdy's picture

14 Feb 2017 - 3:26 pm | sagarpdy

+११११११

शलभ's picture

14 Feb 2017 - 5:26 pm | शलभ

+२२२२२२

प्रत्यक्ष बाबा योगीराज सोबत असताना सायकल बसमध्ये घालून न्यायची होय. काहीतरीच बोलता राव. नीट्ट टांग मारुन निघायचं.

बाबा योगिराज's picture

14 Feb 2017 - 8:25 pm | बाबा योगिराज

हाणला का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2017 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, पुणे वारीचं खरंच कौतुक आहे. सालं इतक्या दूर जाऊ शकतो यावर विश्वासच बसत नै. पण, मनापासून तुमचं कौतुक आहे.
दुसरं आपली भेट झाली नाही, त्याबद्दल सॉरी म्हणतो. आपण किती वाजता निघणार आणि किती वाजता अंदाजे पोहचणार, याचं आपलं तपशीलवार बोलणं झालं नाही, त्यामुळे मी तुम्हाला इच्छा असूनही भेटू शकलो नाही. नै तर पाच मिनिटात पोचतो मी गाडीवर पुलावर माझ्या गावापासून.

बाकी, प्रशांत तुमचं सायकलवारीचं नेहमी कौतुक करत असतो. आपल्या इच्छाशक्तीला सलाम करतो आणि लवकरच भेटू असे म्हणतो.

-दिलीप बिरुटे

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 9:04 pm | डॉ श्रीहास

पुढच्या वारीला आठवडाभर आधी सगळं ठरवू आपण... ह्यावेळेस नाही भेटलात पेनल्टी म्हणून पुढल्या वेळेस चहा तुमच्याकडून ;))

राघवेंद्र's picture

14 Feb 2017 - 11:25 pm | राघवेंद्र

मस्त झाली राईड !!!

डॉ श्रीहास's picture

15 Feb 2017 - 7:37 am | डॉ श्रीहास

_/\_

अभिजीत अवलिया's picture

15 Feb 2017 - 12:32 pm | अभिजीत अवलिया

झकास. इतकी सायकल चालवणे म्हणजे खूपच झाले.
मी दिवसाचे १२-१४ तास बाईक अथवा कार चालवू शकतो. पण सायकल नाही जमायची.

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2017 - 6:17 am | डॉ श्रीहास

तसं सांगायचं म्हणजे मी काही फार जास्त सायकल नाही चालवली आहे... मी २३०-४० किमी केलं आहे खरं पण BRM करणारे लोक ३००,४००,६०० आणि १२०० किमी करतात , त्यामुळे हा प्रवास तसा फार मोठा जरी नव्हता तरी स्वत:ला दिलेलं चॅलेंज होतं जे पूर्ण करण्याचा आनंद काही औरच होता.

स्थितप्रज्ञ's picture

15 Feb 2017 - 8:56 pm | स्थितप्रज्ञ

डॉक, यु लीड बाय ऍन एग्झाम्पल.

या वेळी भेटू नाही शकलो. पुढील राईड ला नक्की.

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2017 - 6:26 am | डॉ श्रीहास

सायकल वारी नंतर छोटासा कट्टा जे होतो ना त्याची मजा फार असते.... सगळे जण भेटततात तुमच्या श्रमाचं चीज होतं _/\_

पैसा's picture

15 Feb 2017 - 9:40 pm | पैसा

आता तुमाला चांगला आत्मविश्वास आला असेल. वृत्तांत लिहिलात पण अगदी छान!

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2017 - 6:35 am | डॉ श्रीहास

लिहीतांना परत एकदा सायकलवर स्वार झालो होतो.... मोदकदादांच्या टिप्स फारच प्रभावी ठरल्या हे ही तितकचं खरयं !!

पर्णिका's picture

16 Feb 2017 - 2:15 am | पर्णिका

जबरी सायकलवारी... अभिनंदन !

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2017 - 6:36 am | डॉ श्रीहास

_/\_

सिरुसेरि's picture

16 Feb 2017 - 1:39 pm | सिरुसेरि

उत्साह वाढवणारा प्रवास लेख . +१००

डॉ श्रीहास's picture

17 Feb 2017 - 3:51 pm | डॉ श्रीहास

_/\_

दीपक११७७'s picture

17 Feb 2017 - 1:37 am | दीपक११७७

छान लेख - प्रवास वर्णन उत्तम

डॉ श्रीहास's picture

17 Feb 2017 - 3:50 pm | डॉ श्रीहास

=)

दिपस्वराज's picture

20 Feb 2017 - 10:26 am | दिपस्वराज

डॉक्टरसाहेब, पुणे वारीचं खरंच कौतुक आहे. सालं इतक्या दूर जाऊ शकतो यावर विश्वासच बसत नै. पण, मनापासून तुमचं कौतुक आहे.

+++++११११११

डॉ श्रीहास's picture

20 Feb 2017 - 10:39 pm | डॉ श्रीहास

हेच कौतुकाचे बोल...पुढच्या अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक साहस/सफरीसाठी पुरेशी उर्जा देऊन जातात....
Appreciation साठी _/\_.

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Feb 2017 - 10:47 pm | लॉरी टांगटूंगकर

सही आहे. एक कडक सेल्यूट!

डॉ श्रीहास's picture

22 Feb 2017 - 3:40 pm | डॉ श्रीहास

धन्स..._/\_

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2017 - 12:58 am | टवाळ कार्टा

चायच.....भन्नाट

डॉ श्रीहास's picture

24 Feb 2017 - 8:46 am | डॉ श्रीहास

;))

प्रशांत's picture

2 Apr 2017 - 5:27 pm | प्रशांत

डॉक सोबत सायकलिंग करायचे भाग्य लाभणार होते म्हणुन रांजनगाव पर्यंत सायकल ने जायचे आणि डॉकसोबत परत यायचे असे ठरले. मोदक दादा यांनी नगर पर्यंत जाण्याचा प्रस्ताव मांडला पण डॉकची रोड बाईक आणि स्पीड याचा अंदाज असल्याने तो प्रस्ताव नामंजुर झाला.

सकाळी ९ वाजता decathlon भेटायचे ठरले सागर (जर्मन टाईम) ९ ला पोहचला मी आणि मोदक ९:४५ पर्यंत पोहचलो.

डॉक येण्यापुर्वी आपण रांजनगावला पोहचलो पाहिजे, तुम्हि नाहि आलात तर मी एकटा जाईल -- ईती सागर. त्यामुळे आम्हि लगेच निघालो. व डॉक येण्याच्या आढी आधी पोहचलो ...... पुढचा प्रवास आणि खादाडी याबद्दल डॉक ने लिहिले आहेच.

या वर्षी नगर पर्यंत येण्याचा प्रयत्न करुत सोबत आनंदराव आणि ईतर मिपाकर असतीलच, अणि शेफ केडी कट्ट्याची तयारी करतील

महासंग्राम's picture

12 Sep 2020 - 2:52 pm | महासंग्राम

कसल जब्बरदस्त वर्णन केलंय