घडी मिलनकी आयी

गाभा: 

A Happy Child-> A Happy Adult-> A Happy Couple-> A Happy child is the essence of all my naarrations todate.४०० पानाचे अप्रकाशित पुस्तक काही लेखात कसे पोचवु? आणि माझ्याकडे चतुरंग्,रामदास्,भडकमकर मास्तर्,विसोबा , मुक्तसुनित आणि बरेच इतराप्रमाणे लेखन प्रतिभा पण नाही आहे. त्यामुळे थोडेसे जड जाते हे मला मान्य आहे. पण मूळ सुत्र एकच.
आणि समजा मला येथे बुकर बक्षिस मिळाले तर मी ते तुम्हा सर्वाना अर्पण करीन त्यातल्या पैशासकट.
आज रेडीयोवर (जुना फिलिप्स) एक गाणे ऐकले.
घडी मिलन कि आयी
तू छुट्टी लेके आजा
प्यार कि बिन बजेना अकेले
तु पुरा साथ निभाजा.
तुम्ही रामदासांची एक श्रुंगारिक कविता, आणि समस्यापुर्ती वाचलय का? वाचलेल्या सर्वांना त्या आवड्ल्या त्या कविता. पण त्यातला क्रिप्टीजम फार थोड्या जणाना कळाला असे प्रतिक्रिया वाचल्यावर मला वाटले.त्यातला श्रुंगार सगळ्याना कळ्ला पण त्यातला निरोप फार थोड्याना पोचला. अगदी माझ्या माय जगो आणि मावशी जगो प्रमाणेच.
मी मला स्व्तःला दुसर्या ट्प्य्यात (चिरंजिवांचा १ ते ९ वी चा प्रवास) फक्त ४ मार्क देतो. कारण मी ह्या टप्प्यात एक सुशिक्षित अडाणी होतो. माझ्या भाची च्या एका क्रिप्टिक वाक्याने बर्यापैकी सुशिक्षित झालो.. " मामा मुलगा ९ वीत आला. तयारी झाली आहे ना. लग्नच असते ते." खाड्कन डोळे उघडले ह्या वाक्याच संपूर्ण विचार केल्यावर. आणि तीच क्रिया आयुष्यातील इतर विचार सरणी वर नेल्यावर तर सब आनंद ही आनंद. सर्वात प्रथम मला माझा मी सोडावा(इगो) लागला. सर्वज्ञ सर्वपरिपूर्ण असल्याचा आभास सोडावा लागला. स्वतःत अडाणी तेव्हाच मिळतो. असो.
वर लिहिलेले सुत्र परत एकदा वाचा. आणि खालील प्रष्नाचे उत्तर प्रामाणिक पणे द्या.(मास्तर प्रष्न विचारणारच). फक्त स्व्तःला फसवू नका. ह्या प्रश्नाची अनेक खोटी उत्तरे मी रोज बघतो. ह्या प्रश्नाचे उत्तर सगळ्य्यानी द्यायला हरकत नाही. अगदी लग्न न झालेल्यानी सुद्धा. कधितरी लग्न होणारच. मुले सुद्धा होणारच.
समजा तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. (इथे ऑफिशियल बद्दल बोलतो आहे). ह्या आधी तुम्ही काय केले नाही केले याचा येथे प्रष्न नाही. तुम्ही सहचरणीची ( काय शब्द आहे हा)मनातल्या मनात वरिल गाणे म्हणत वाट बघत आहात. हातात दुधाचा पेला घेउन ती आत प्रवेशते. तुम्ही काय पुढाकार घेणार इतक्यात तीच म्हणते. " जरा थांबा, मी फ्रेश होउन येते." बाथरुम मधुन बाहेर येताना तीच्या अंगावर लग्नाच्या साडीऐवजी डीझाइनर ड्रेस्(अशा मोक्यासाठी खास) आहे. आणि ती अचानक तुमच्यासमोर " यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया" हा नाच सुरु करते.(स्वप्न रंजन आहे हे) काय होईल तुमची अवस्था. काय राहील तुमची प्रतिक्रिया दुसर्या दिवशी . भगिनीनी ह्या फँट्सी त भाग घेण्यास माझी हरकत नाही. (अर्थात तो च्या रोल मध्ये) माझ्या हरकतीला विचारतो कोणं म्हणा.
जाता जाता: बॉट्मलाईन-शेपटीचा नीट वापर न केल्यामुळे ती गळाली.
ग्रुहपाठ : प्रतिक्रिया आली ह्याचा समास करा.
ता.क.

आपली मुले अभिमन्यु होणार का? ह्या प्रष्नावर बरीच मोठी मोठी मंड्ळी विचार करत आहेत त्यात परदेशी असलेला माझा एक विद्यार्थी ( ऍड्वान्स्ड जेनेटी क रिसर्च)सुद्धा आहे. मि.पा. वाचक आहे. फोन आला होता,कुठे असतो ते सांगणे त्याने टाळले. नाना चँगट लस घेतली असावी. ताईचे धन्यवाद.

प्रतिक्रिया

विप्र...

आणि ती अचानक तुमच्यासमोर " यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया" हा नाच सुरु करते.(स्वप्न रंजन आहे हे) काय होईल तुमची अवस्था. काय राहील तुमची प्रतिक्रिया दुसर्या दिवशी .

मला काहिही फरक पडणार नाही. माझे ध्येय मी गाठेनच गाठेन. किंबहुना या प्रसंगा मुळे काय फरक पडावा कोणालाही? मला तर माझ्या सहचारिणीच्या रसिकतेचे कौतुकच वाटेल.

बिपिन.

अवांतर १ - गृहपाठ झेपला नाही.
अवांतर २ - सहचारिणी की सहचरिणी - मला वाटतं की सहचरिणी म्हणजे 'जी तुमच्या बरोबर चरते ती'. मी काहि चराऊ प्राणी नसल्याने मी सहचारिणी असा शब्द घेतला. ;)

अर्रे वा !! सगळ्यात पहिला खुलासा ... दुध मला आणि तिलाही आवडत नाही .. त्यापेक्षा मग पार्सल मस्तानी वर तहान भागवू. दुसरा टप्पा मात्र अंमळ शॉकींग नसेल... किंबहुना नसावाच. :) आणि हे केवळ माइंड ब्लोइंगच नसावं ... काय ?

बिपीन भाउ .. उत्तर असं होउ शकेल का ?
.... "ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट" आणि ""मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार?"

बाकी कोणी तरी म्हंटलेलंच आहे ... "मेन लुक कॉन्फिडेंट व्हेन दे आर इरेक्ट ... आय ऍम ऑव्हर कॉन्फिडेंट"

बॉटमलाइनचा जर मी काढलेला अर्थ असेल तर --- =)) =)) =)) =)) ज ह ब ह र्‍या
जन्मात गृहपाठ केलेला नाही.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

http://vipravani.wordpress.com/
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यावाद टार्झन,बि.का., संजय अभ्यंकर

http://vipravani.wordpress.com/
चला तुम्चे बरोबर. मोत्याचा चारा नाही मिळाला तर?...... अरे बाप्..रे नको ती कल्पना.

की सहधर्मचारिणी ?

नंतर परत वाचेन शांतपणे पण आत्ता लेख बाऊंसर गेला! :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मलाही नाही समजला! विप्रकाका, पुन्हा वाचून नाही समजला तर पुतणीला गाईडपण द्या!

ऋषिकेश -- धन्यवाद मित्रा, मला वाटले होते कि मलाच काही कळत नाही आहे,,
विनायक भो--जरा जास्त कळु द्या तुम्हाला काय लिहायच ते... जे काही कळाले त्याबद्द्ल..

>>>आणि ती अचानक तुमच्यासमोर " यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया" हा नाच सुरु करते.(स्वप्न रंजन आहे हे) काय होईल तुमची अवस्था. काय राहील तुमची प्रतिक्रिया दुसर्या दिवशी .

मग काय, मि दादा कोंडकेंच्या "वर ढगाला लागली कळ ......" वर नाच सुरु करेल....

जश्यास तसा माननारा,
टुकुल.

विप्र साहेब, हे तर पूर्ण हेलिकॉप्टर होतं....

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मास्तर!

अभिमन्यु न होऊन जातील कूठे?
आयुष्य हा एक संगर (लढा) आहे!

आपण सारे अभिमन्युच आहोत, मुले त्याला अपवाद कशी असतील?

बायको "माहीया" डांन्स करीत आली तर, तीला स्विकारावेच लागेल.
जगात बदलांना सामोरे जाण्यात व ते स्विकारण्यातच शहाणपण असते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

समजा तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे
इथेच 'ग्यानबाची मेख' आहे.
अहो पहिल्या रात्री सर्व काही मान्य असते.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

http://vipravani.wordpress.com/
मान्य आहे.दुसर्या दिवशी - डोक्याचा जाळ

१) रामदासजी यांच्या कविता आधी परत वाचतो
२) यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया हे गाणे कुठे यु ट्युब वर आहे की असेच काहीतरी शब्द टाकले आहेत?
३) जाता जाता: बॉट्मलाईन-शेपटीचा नीट वापर न केल्यामुळे ती गळाली.?????
४) ग्रुहपाठ : प्रतिक्रिया आली ह्याचा समास करा.??????

काय राव परत हायर मॅथ्यस ललीत लेखनात?

शयनेशु रंभा, भोज्येशु माता असे काहीसे ऐकले नाही का? एव्हरीबडी वाँट्स ईट टू बी माईंड ब्लोइंग.

पुस्तक प्रकाशित व्हावे, बुकर पारितोषीक देखील मिळावे व त्यातील पैशातुन लेखनाचा कोर्स करावा असे वाटते.

२) यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया हे गाणे कुठे यु ट्युब वर आहे की असेच काहीतरी शब्द टाकले आहेत?
हे घ्या ... शोधल्यावर लगेचच सापडलं!

तुमची आख्खी फॅमिलीच क्रिप्टीक आहे का हो? म्हणजे भाचीही? - ह. घ्या. पण जर हा हल्ला असेल तर

जाता जाता: बॉट्मलाईन-शेपटीचा नीट वापर न केल्यामुळे ती गळाली.
ग्रुहपाठ : प्रतिक्रिया आली ह्याचा समास करा.
ता.क.

आपली मुले अभिमन्यु होणार का? ह्या प्रष्नावर बरीच मोठी मोठी मंड्ळी विचार करत आहेत त्यात परदेशी असलेला माझा एक विद्यार्थी ( ऍड्वान्स्ड जेनेटी क रिसर्च)सुद्धा आहे. मि.पा. वाचक आहे. फोन आला होता,कुठे असतो ते सांगणे त्याने टाळले. नाना चँगट लस घेतली असावी. ताईचे धन्यवाद.

हे हल्ले का बरे?

आणि हो, डिझाईनर ड्रेस का? हल्ला रे हल्ला रे हल्ला रे म्हणत काहीही न घालताच आली तर? :)

तसे आपण विचारलेला प्रश्न आता २०-२५ वर्षे जुना झाला आहे. आता प्रश्न असा की -

लग्नाच्या रात्री घरात माणसे आहेत. अचानक तुमची बायको येऊन सर्वांसमक्ष तुम्हाला सांगते "चल ना! इथे काय टाईमपास करतोस. वर बेडरुममध्ये चल, मी तुला खरा टाईमपास दाखवते." तर विप्र तुम्ही काय कराल? अहो लोकांना प्रश्न विचारत सुटण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हीच द्यायला सुरुवात करा की आणि मग इतरांची मतं आजमावा.

बाकी, नेहमीप्रमाणेच हल्ली प्रबोधने आणि समुपदेशने नेमकी कोणासाठी आणि का चालतात असा प्रश्न पडू लागला आहे.

आपली,
(क्रिप्टोनाईट्)प्रियाली

ग्नाच्या रात्री घरात माणसे आहेत. अचानक तुमची बायको येऊन सर्वांसमक्ष तुम्हाला सांगते "चल ना! इथे काय टाईमपास करतोस. वर बेडरुममध्ये चल, मी तुला खरा टाईमपास दाखवते." तर विप्र तुम्ही काय कराल? अहो लोकांना प्रश्न विचारत सुटण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हीच द्यायला सुरुवात करा की आणि मग इतरांची मतं आजमावा.

=)) =)) =))

आम्ही तर लेख वाचायएवजी दरवेळेस प्रतिक्रियाच वाचतो, कोणतरी सज्जन कोडे सोडवतोच !!

अचानक तुमची बायको येऊन सर्वांसमक्ष तुम्हाला सांगते "चल ना! इथे काय टाईमपास करतोस. वर बेडरुममध्ये चल, मी तुला खरा टाईमपास दाखवते."

अशी बायको असेल तर लग्नाच्या रात्री काहीच काम नसेल कारण टाईमपास आधीच झालेला असेल असे वाटते.

(अनुभव नाही. चु भु दे घे)

http://vipravani.wordpress.com/
प्रियाली ताई, एका चांगल्या विचार मंथनाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिले प्रामणिक पणे त्यात कसला आला हल्ला. मला तुम्ही काहिही म्हणा मला प्रॉब्लेम नाही. पण ह. घ्या करु नका. तो तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे(,जी आहे असे मी मानतो, आणि आदर करतो.)
हा प्रष्न निदान भारत देशात जुना व्हायला अजुन १५ वर्षे आहेत. मी काय केले अस्ते ते पण सांगणार आहे की? मी विचारलेल्या प्रष्नाचे उत्तर मीच पहिले द्यायला पाहीजे असा काय नियम आहे का मि.पा. वर. तसा पायंडा दिसत नाही आहे मला.
प्रबोधन आणि समुपदेशन ह्यातला फरक नंतर कधी.
विश्वास ठेवा आपल्यावर कुठलाही हल्ला मला करायचा नाही. हा लेख तुम्ही सुरु केलेल्या मंथनाचा प्रिलुड आहे.

अहो मी हल्लेच हल्ले एकत्र जोडून प्रतिसाद तयार केला. थोडी गंमत, सिरिअसली घेऊ नका - माझा प्रतिसाद क्रिप्टीक झालेला दिसतोय. ;)

विश्वास ठेवा आपल्यावर कुठलाही हल्ला मला करायचा नाही. हा लेख तुम्ही सुरु केलेल्या मंथनाचा प्रिलुड आहे.

होय हो! मला विश्वास आहे, लिहा तुम्ही बिनधास्त. आम्ही आहोतच क्रिप्टोनाईटसह हजर. :)

बाकी, ते हल्ला रे हल्ला गाणं बघाच.

हल्ला रे हल्ला...

मी बघितलं... आणि बघतच राहिलो... ;)

बिपिन.

http://vipravani.wordpress.com/
नविन नाव पडले तुम्हाला त्ताई.मी तिथे लिहिले वेग॑ळ्याच कारणाने. झाले भलतेच. तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला.असो क्रिप्टिक लो़कांचे असेच असते. मी ह. घ्या. म्हणणार नाही. पण नाव शोभते आपल्याला. टींमीड च्या विरुद्ध.

आम्हाला ते पयल्या छूटच सुचले होते.. पण नाही लिहिले. :)

>> अचानक तुमची बायको येऊन सर्वांसमक्ष तुम्हाला सांगते....
कस्सला हसलोय प्रियाली :)

बाकी सगळे ठिक आहे

पण पहील्या रात्री कपडे ... काय काम कपड्यांचे ... काय जमेना बुवा डोक्यात गणित.

अदुगर वाटल कि
इतने दिनों के बाद आयी सजना रात मिलन की
बद्द्ल काही लिहित्यात कि काय?
प्रकाश घाटपांडे

विप्र तुम्ही एकतर फार किचकट लिहता किंवा तुमचा हेतु काही औरच आहे. तुमचे लेख जे आम्ही सिरीयसली घेतो कारण बहुतेक सगळे लेखक काही चर्चा, लेख गंभीरपणे लिहीत असतात. निदान तुम्ही लिहता त्या विषयावर असे वाटते. पण तुमचे प्रतिसाद बरेचदा चक्क टवाळी वाटते.

एक तर बघा, इथे तुमची ओळख एक शिक्षक कम समुपदेशक अशी आहे. त्यातुन लहान मुलांच्या समस्या इ. आता तुम्ही लेखात बरेचदा लहान मुले इ. १ ते ९ असा उल्लेख करता मग पुढे त्या लेखात मधुचंद्राची रात्र म्हणुन एक गृहपाठ सांगता. नक्की कसले समुपदेशक आहात? लहान मुलांना माफक लैंगीक शिक्षण [जे खरे तर चुकीचे काही करु नये अश्या अर्थाने] की चक्क कामजीवनचे?

जे काय लिहता, कोणासाठी लिहता. ते स्पष्ट लिहा, तुम्ही कुठल्या विषयावर लिहता त्यावर काहीही आक्षेप नाही पण पहा तुम्ही सुरवात नेहमी तुमचे विद्यार्थी [म्हणजे लहान मुले असे समजतो] मग विषय बर्‍याचदा केवळ कामजीवनावर फोकस्ड असतो. कदाचित शक्य आहे की माझी काही गल्लत होत असेल तुमचे लेख समजुन घेण्यात पण तुमचा लिखाणाचा नक्की हेतु, चर्चा लहान मुलांच्या संदर्भात की मोठ्यांच्या कामजीवनाबद्दल ते स्पष्ट लिहा, ते जमणे शक्य आहे.

कृपया राग मानु नका. तुमचे लेख सगळ्या निसंदिग्धपणे कळावे ही इच्छा.

पण तुमचे प्रतिसाद बरेचदा चक्क टवाळी वाटते.
असहमत आहे... प्रभु राव आज तागायत तरी आम्हाला टवाळ वाटले नाही .. त्यांनी जे लिहीलं ते मिपावर लिहायला फार मोठी छाती लागते ... दुसरे असे की ते लिहितात त्यात बाष्फळ बडबडही नसते ना ते आजकाल मिपावर येणार्‍या पुचाट लेख किंवा कौलांसारखे नसते...
आपल्याला 'काम' हा विषय अवघडल्यासारखा वाटतो .. त्यात डायरेक्ट बोलणे कधी उचित नसते किंबहुना तसं कोणी लिहीलं तर ते "असभ्य" , "निर्लज्ज" मर्यादे बाहेरील ... इइ प्रतिक्रिया पडतील याची मी गॅरेंटी देतो ... मलाही ज्यावेली त्याचा पहिला "चित्रकले"चा लेख आलेला त्यावेळी असं वाटलेलं .. परंतु आपल्याला आता प्रभु काय आहेत काय लिहीतात .. हे अंमळ कळालं असेल ... असो .. तुम्ही प्लेन लिहा असं म्हणताय खरं .. पण तिकडून ही बोलणारी दहा तोंड आहेत ... ते १०-२० सहज पैदा होतील ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

http://vipravani.wordpress.com/
तुमच्या सर्व प्रष्नांचे उत्तर पहिल्या वाक्यात आहे. मला लहान, मोठा अशी कप्पे करताच येत नाही. सर्व जिथे सुरु होते तिथेच प्रॉब्लेम असले की ते प्रॉब्लेम सर्व आयुष्यावर परिणाम करतात. परत वाचा माझे पहिले वाक्य. ज्याला तुम्ही टवाळकी म्हणता ती नक्की टवाळ्की आहे का? कदाचित मी तुम्हाला हे नंतर स्पष्ट करेन.

मग त्या पहिल्या वाक्याला धरुन "हॅपी/अनहॅपी चाइल्डहूड" व त्याचे मोठेपणी कामजीवनावरचे परिणाम हे सांगणारा सुस्पष्ट लेख लिहायला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या वरच्या कधी सर्वात पहीली लाईन, मग रामदास यांची कविता मग माईंड्ब्लोईंग, मग मधुचंद्राची रात्र, गृहपाठ,विद्यार्थ्याचा, वास्तव्य कुठे हे न सांगण्याचा आणि नाना चेंगटांचा . तुम्हाला खरचं वाटतय तुम्ही तुमचा मुद्दा स्पष्ट करण्यात यशस्वी झालात? माझी खात्री आहे बर्‍याच जणांना तुमचा लेख / नक्की काय म्हणायचे ते पुरेसे स्पष्ट झाले नसेल.

असो तुमचे लिखाण अजुन सुस्पष्ट व्हावे व जास्तीत जास्त लोकांना कळावे असे वाटते ह्या भावनेने लिहतो आहे, गैरसमज नसावा.

मनापासून सांगू का? आपले लेख पेलण्याची सर्वसाधारण माणसाची कुवत नाही असेच म्हणावे लागेल ..
सुरूवातीची दोन वाक्ये वाचल्यावर असं वाटलं की, समजेल लेख.. पण पुढे रामदास सर आले, त्यांची कविता आली .. ते हिंदी गांणं आलं. कशाचाच संबंध नाही समजला.
रामदास सरांची ती कविता लिहिताना कदाचीत खुद्द रामदास सरांना सुद्धा कल्पना आली नसेल की आपण काहीतरी क्रिप्टीक लिहितो आहोत.
माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सर, आपण विद्यार्थ्यांना समुपदेशन करता, तर त्यांच्याशी ज्या भाषेत बोलता त्याच भाषेत लेख लिहाल तर आम्हाला(मिपा वरच्या विद्यार्थ्यांना) तो समजेल अशी आशा आहे.
आपला ता.क. समजला नाही. म्हणजे त्यातला आपल्या विद्यार्थ्याचा, त्याच्या वास्तव्य कुठे हे न सांगण्याचा आणि नाना चेंगटांचा आणि या ताई.. या कोण? सगळंच अगम्य..!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजू आणि सहजरावांशी सहमत!
"ढ" विद्यार्थ्यांनाही समजेल असं लिहा ना प्लीज!

("दहावी फ" मधली) अदिती

सहजरावांशी, प्राजूशी, सहमत !!!
आपला मुद्दा अधिक स्पष्ट झाला पाहिजे असे वाटते, आणि नेमके ते होत नाही किंवा राहून जाते असे वाटते. ( चुभुदेघे)

-दिलीप बिरुटे
वर्ग तिसरी तुकडी (ढ)

सहजरावांशी एकदम सहमत.
बाकी विप्र नी अगम्यता मुद्दामुनच जोपसली आहे असे वाट्ते त्याच्यांच। भाषेत सांगायचे तर त्यांना अ़जुन बरेच खांब सोडायचे आहेत.
आनंद

लेख न समजलेले माझ्यासारखे बरेच लोक आहेत हे पाहून बरे वाटले.

'... माहिया' प्रश्न वाचून एका मित्राने प्रेयसीला खुश करण्यासाठी काय करशील या प्रश्नावर 'स्ट्रिप्टीज़' असे उत्तर दिलेले आठवले.

आपल्याला काय पन नाय कल्ला !!!

पन परतीसाद वाचून मस्त टायीमपास झाला... मी तं आता ठरवून टाकलाय, यीप्र सायेबांचा लेक आसला का आदी सगले परतीसाद वाचायचे... फुल धमाल आसते सगली... मग लेक वाचायाची गरजच नाय... (तसा त्ये काय लिवतात त्ये आम्च्यासारक्या आडान्याला कलत पन नाय म्हना... )

(अवांतर : लेकाच्या नावावरना आमाना वाटला व्हता का आतमदी कायतरी आंबट चींबट लिवला आसल... तं कसला काय ना फाटक्यात पाय... आसु दया !!! )
हा. घे ;) (ह. घे.)

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रभू साहेबांचे लेखन वेगळ्याच प्रकारचे आहे. उदा. हॅरी पॉटर चे पुस्तक मी एकदा वाचले. एका परिच्छेदाचा दुसर्‍याशी तसा संबंध नसायचा. शेवटी शेवटी मी काय वाचत आहे हेच समजेनासे झाले. मी माझ्या एका पॉटर चाहत्याला विचारले की अरे मला तर काहीच समजत नाही. त्याचे उत्तर होते की हिच तर मजा आहे.

प्रभू साहेंबाचे इतर लेख ( आय पील सोडून) वाचले नाही पण या लेखात हीच पॉटरच्या पुस्तकासारखी गम्मत आहे.

मी खूप मागे कधीतरी एक विनोदी वाक्य वाचले होते : "विज्ञानात अनाकलनीय अशा अनुभवांना शक्य तितके सोपे करून समजून घेण्याकडे कल असतो . काव्यामधे नेमके या तत्त्वाच्या उलट असावे !" बोलणार्‍याचा इशारा अर्थातच ग्रेस बिस सारख्या कवींकडे असावा.

हे वाक्य इथे आठवण्याचे कारण उघड आहे. प्रभू साहेबांचा - त्यांनी अनेक वेळा घोषित केलेला - लोकप्रबोधनाचा हेतू (याला "समुपदेशन" असेही नाव आहे असे दिसते. बहुदा इंग्रजी शब्द काऊंसेलिंग च्या अर्थी) अतिशय स्पृहणीय आहे. मात्र त्यांनी अंगिकारलेली व्यक्त होण्याची पद्धती , शैली दुर्बोध आहे , क्रिप्टीक आहे . ( हे त्यांनाही मान्य असावे असा माझा कयास आहे. )

तुमच्या मूळ हेतूला ही गोष्ट सुरुंग लावते असे तुम्हाला वाटते का ? जे सांगायचे आहे ते प्रसंगी दुर्बोधता तर प्रसंगी व्यंगात्मक शब्दयोजना यांच्या ऐवजी मुद्देसूद पद्धतीने तुम्ही मांडलेत तर जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचणार नाही का ? प्रस्तुत लेखातला मुद्दा १-२ वाचनानंतर कळल्यासारखा वाटतो न वाटतो. जर तो इतक्या दुर्बोध पद्धतीने लेखकाला समजावावासा वाटला असेल तर त्याबाबतीत लेखक स्वतःच कितपत कन्विन्स्ड आहे (मराठी शब्द ?) अशीही शंका चाटून जाते.

असो. तुम्ही असेच लिहा आणि तसेच लिहा असा अनाहूत सल्ला देणे उद्धटपणाचे होईल. परंतु याबातीत जे वाटले ते न सांगणेही चुकीचेच ठरले असते.

काका, मला अत्ता पर्यंत असे वाटत होत की तुम्ही लिहलेल मलाच कळत नाही..(फक्त आय पील चा लेख सोडुन्)पण बहुतेक मिपाकर मित्रांना देखील तोच प्रश्न पडला आहे..
बाकी प्राजू ताईशी सहमत.....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

जल्ला मनमोहन देसाइचे पिक्चर सारक दिसतय, तीन भाव बिछडले, येगयेगले झाले न लासला मिलाले

लिंक जुलवा न क्लायमॅस करा कि राव

कई बी समजना बग

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

http://vipravani.wordpress.com/
ह्यां सगला क्लायमॅस बद्द्ल् हाय की

जेआयला आवरा समजना अस्ता त खारपाड्यान कना राह्यलो अस्तो

समझवा की !!!
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

http://vipravani.wordpress.com/
सेक्रेट्रिचि वाट पघुन राय्लो. ती आली कि लगेच समझवतो. तीला आदि समझवावे लागेल.

सेक्रेट्रिचि वाट पघुन राय्लो. ती आली कि लगेच समझवतो. तीला आदि समझवावे लागेल.
=)) =)) =))
विनायकराव, या धाग्यातील तुमचे लिखाणातले (मूळ लेख आणि अनेक प्रतिसाद धरून) फक्त वरील वाक्यच आम्हाला पूर्ण उमजले....
ठाणे जिल्हा (ग्रामीण) मध्ये राहिल्याचा हा एक फायदा!!!!:)

भले शाब्बास, क्रिप्टिक किंग!!!!

आम्ही हि ठाणेकर , टुकुल.

पीवला दादुस,

तुमाना समझवता येत आसन त तुमी बी समझवा

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

आहे लेख बरा आहे....वाचायला सुरवात केली आणि पुर्ण वाचेपर्यंत थांबु शकलो नाही...

फुल घसरगुंडी आहे...या लेखात्..एकदा वाचायला सुरवात केली ..आणि शेवटपर्यंत वाचतच गेलो.ही या लेखाचि खासियत होऊ शकते..

राम दादा..

काय बी कळ्ळं नाय :(
डोचक्यावरुन ३ फुट गेला लेख :( :(
मी लैच ढ हाय का काय ?????

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

तुमी लै ढ नाही साध्या ढ.. कारण मी ढ + आहे.. माझ्या डोक्यावरून ६ फूट गेला हा लेख.. :)
पुण्याचे पेशवे

समजा तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. (इथे ऑफिशियल बद्दल बोलतो आहे). ह्या आधी तुम्ही काय केले नाही केले याचा येथे प्रष्न नाही. तुम्ही सहचरणीची ( काय शब्द आहे हा)मनातल्या मनात वरिल गाणे म्हणत वाट बघत आहात. हातात दुधाचा पेला घेउन ती आत प्रवेशते.

दुधाचा पेला? विप्र, तुम्ही हिंदी शिणेमे फारच बघता बुवा! :)

तुम्ही काय पुढाकार घेणार इतक्यात तीच म्हणते. " जरा थांबा, मी फ्रेश होउन येते." बाथरुम मधुन बाहेर येताना तीच्या अंगावर लग्नाच्या साडीऐवजी डीझाइनर ड्रेस्(अशा मोक्यासाठी खास) आहे. आणि ती अचानक तुमच्यासमोर " यू आर माय माईंड ब्लोईंग माहिया" हा नाच सुरु करते.(

हा हा हा! मस्त लेख... :)

आपला,
(हानिमुनी) तात्या. :)

माझे एक गुरुवर्य ( डॉ अरोरा)सेक्स विषयक काउन्सीलिंग करताना
सेक्स आणि सुहाग रात्र याचे एक उत्तम उदाहरण देतात.
ते म्हणत.
तुम्हे क्या लगता है सुहाग रात को क्या होता है. तुम जब पहली बार सेक्स करते हो तो क्या होता है.
वो फिल्मोमे दिखाते है वैसे उपरसे आसमान से फूल बरसते है?
फिजॉ खुश्मिजाज हो जाती है? स्वर्ग से देवता आके तुमपर फूल बरसाते है?
ऐसा कुछ नही होता.
मै बताता हुं कैसा लगता है
ऐसा समझो के तिम्ह जोरकी टट्टी लगी है. बहुत देर तक कोई संडास मे जा बैठा है . तुम एक हात पिछे और दूसरा हात पेट पर रख्खे खडे हो.
संडास खुल जाता है तुम अन्दर जातो हो. और मौका मिलता है इतनी देर के बाद पेट विस्फोटक ढंग से खाली हो जाता है. तुम्हे उस समय जो सुकुन मिलता है. ठीक उतनाही और वैसाहे सुकुन उस वक्त भी मिलता है जब तुम्हारा पहली बार हो जाता है.
तरुणामधले ते आकर्षण डॉ अरोरा एका फटक्यात काढुन टाकत असत.
रजनीश म्हणतात की हम ये बाते आदतन करते है. बचपन मेम चलना सीखा अब हम चलनेवाली मशीन बन गये है. वो बात भी हम आदतन करते है. इट बीकम्स अ रुटीन
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

http://vipravani.wordpress.com/
जय जय जय जय हे