"वैद्यकिय मदत" ह्या विषयावर वाहिलेला वेगळा धागा असावा का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
22 Jan 2017 - 3:59 pm
गाभा: 

प्रिय मिपाकरांनो,

एखादा आजार झाला असेल तर, त्या आजाराला बरे करणारे बरेच डॉ. इथेच मिपावर उपलब्ध आहेत. पण त्यांना लवकरात लवकर मिपाकर रुग्णाला मदत करता यावी म्हणून वेगळा विभाग असावा का?

जेणेकरून मिपावर आल्या आल्या ते आधी रुग्णांना हवी असणारी मदत बघून आणि त्यांना योग्य तो सल्ला देवू शकतील.

प्रास, आनंदी गोपाळ,बाबा पाटील, डॉ. म्हात्रे आणि डॉ. सुबोध खरे ह्यांना थोडा त्रास नकीच होईल. (घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे, असाच प्रकार होईल ......शिवाय फूकट सल्ला किंवा खातरजमा तरी किती जणांची करून द्यायची?...."सुबोध खरे" मिपाकरांकडून रोगाची खातरजमा करून घेण्याचे पैसे घेत नाहीत, असा वैयक्तिक अनुभव आहे. तर बाबा पाटील आणि डॉ. म्हात्रे हे मिपाकरांना आणि मिपाकरांच्या मित्राला पण हवी ती मदत करतात, हा पण अनुभव आहे. )

सर्व मिपाकरांच्या आणि मिपाकर डॉ.च्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

(मिपाकर) मुवि.

ताक : बाबा पाटेल, डॉ.म्हात्रे आणि सुबोध खरे ह्यांनी वेळोवेळी वैयक्तिक मार्गदर्शन केले आहे. ह्या धाग्याच्या निमित्ताने, त्यांचे मना पासून आभार मानतो. कदाचित कुणाला, तुमच्या ह्या मिपाकरांकडून फारच अपेक्षा बुवा, असेही वाटण्याचा संभव आहे पण मी तरी मिपा हे एक कुटुंब आहे असेच मानतो, घरच्या मंडळींच्या समोर मत व्यक्त करण्यात लाज कसली? असे माझे मत.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

22 Jan 2017 - 6:31 pm | उगा काहितरीच

नेट डॉक्टर ही संकल्पना काही पटत नाही बुवा . रूग्णाला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय , तपासल्याशिवाय सल्ला देणे निदान मला तरी योग्य वाटत नाही. हा! अमूक अमूक आजारावर अमक्या गावातील चांगला डॉक्टर कोण , तमूक आजारासाठी अजून काही समांतर ट्रीटमेंट कोणती अशा प्रकारची माहिती ठीक आहे .

तमूक आजारासाठी अजून काही समांतर ट्रीटमेंट कोणती अशा प्रकारची माहिती ठीक आहे .

+ १

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2017 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त संस्थळाचा उपयोग एखाद्या आजारासंबंधी...

(अ) कोणत्या रुग्णालयात चांगले उपचार उपलब्ध आहेत

आणि / किंवा

(आ) कोणता तज्ज्ञ कोठे कार्यरत आहे

केवळ एवढीच माहिती मिळविण्यासाठी करणे योग्य व निर्धोक असेल.

======

एखाद्या विशिष्ट रुग्णाचा आजार व त्यावरील उपचारांसंबंधी सखोल चर्चा मुक्त संस्थळावर होणे आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र आणि रुग्णाच्या गुप्तता हक्कांच्या दृष्टीने योग्य होणार नाही.

कारण...

(अ) प्रत्येक रुग्णामध्ये/माणसामध्ये शारिरीक, जनुकिय, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायीक, इत्यादी वस्तूस्थिती वेगळ्या असतात व त्यामुळे एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव व त्यावरील उपचार यामध्ये लक्षणीय फरक असू शकतात.

(आ) प्रत्येक रुग्णामध्ये एकाच रोगाचा प्रकार (टाईप), स्थिती (स्टेज) आणि गांभिर्य (सिरियसनेस) यामध्ये लक्षणिय फरक असून शकतो. त्यामुळे एकच रोग असलेल्या दोन रुग्णांमध्ये आवश्यक असणार्‍या उपचारात लक्षणिय फरक असू शकतो.

(इ) "वन साईझ फिट्स ऑल" हे आधुनिक आरोग्यशास्त्रात (रोग व त्यांच्या उपचारात) बहुदा नसतेच. ते तसे आहे हे गृहित धरण्याने रुग्णाच्या शारिराला आणि/किंवा मनाला आणि/किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

यामुळे, माझे नेहमीचेच मत, परत एकदा...

१. ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकाल असा संबंधीत रोगाचा तज्ज्ञ निवडण्यासाठी स्वतः, नातेवाईक, मित्र, इत्यादींच्या अनुभवाची मदत घेणे जरूर आहे आणि योग्यही आहे.

मात्र, त्यानंतर...

२. त्या तज्ज्ञाने विचारलेली पूर्ण माहिती त्याला देऊन त्याने सुचवलेल्या चांचण्या व उपचार घ्यावा.

३. वेळप्रसंगी, विशेषतः चालू असलेल्या उपचारांनी रुग्णाच्या परिस्थितीत पुरेसा फरक पडत नसल्यास, दुसर्‍या संबंधीत तज्ज्ञाची मदत घेणे (सेकंड ओपिनियन) हा रुग्णाचा अधिकार आहे आणि तो पहिल्या तज्ज्ञांच्या सहकार्याने किंवा सहकार्याविनाही तुम्ही वापरू शकता.

४. मात्र त्याचबरोबर, न चुकता, तज्ज्ञ नसलेल्या कोणत्याही स्वतः, नातेवाईक, मित्र, इत्यादींचे आणि मुख्य म्हणजे केवळ इंटरनेटवरील वाचनाने किंवा ऐकीव माहितीच्या बळावर तज्ज्ञ बनलेल्या लोकांचे सल्ले, त्यांच्या योग्य जागी (पक्षी : कचर्‍याच्या टोपलीत) टाका.

आपला अप्रोच इतका सिस्टेमॅटिक आहे कि आवडला.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 3:39 pm | फेदरवेट साहेब

प्लस अनेक लाख वेळा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2017 - 5:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुविंनी फार दिवसांनी मिपावर हजेरी लावली आहे. सुस्वागतम् !

त्यांच्या नेहमीच्या मदत करण्याच्या स्वभावाला धरूनच हा धागा आहे यात वाद नाही. मात्र अश्या सल्ल्यांतले धोके ध्यानात यावे यासाठी जरा मोठा प्रतिसाद लिहिला आहे.

माझ्या जवळच्या नातेवाईकांनाही मी हाच सल्ला देतो ! माझी स्पेशियालिटी सोडून काही सल्ला घ्यायचा असला तरीही हेच तंत्र मी वापरतो :)

अभिजीत अवलिया's picture

7 Feb 2017 - 9:11 am | अभिजीत अवलिया

प्रतिसादाशी सहमत.

कपिलमुनी's picture

23 Jan 2017 - 4:04 pm | कपिलमुनी

विविध शहरातील एक्सपर्ट डॉक्टरांची लिस्ट आणि चांगले अनुभव लिहिले तर त्याचा जास्त फायदा होइल.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 5:12 pm | फेदरवेट साहेब

प्रॅक्टो (practo) नावाचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन त्याकरता उपलब्ध आहे चकटफू. जास्तीत जास्त practo वरतून डॉक्टरची माहिती घेऊन तिला इथल्या घरगुती वातावरणात क्रॉसचेक करून घेतली तर उत्तम ठरावे. तसेही वैद्यकीय सल्ला हा मिपाकर डॉक्टर मंडळीने देणे अन सहृद मिपाकरांनी त्याच्यावर कारवाई करणे हे वरकरणी उदात्त वाटत असले तरी ते संस्थळ किंवा सन्माननीय डॉक्टर मंडळी कोणासाठीच तितकेसे एडव्हाइजेबल नाही. ह्या बाबतीत मी वरती म्हात्रे भावसाहेबांनी दिलेल्या खणखणीत प्रतिसादाच्या समर्थनार्थ आहे.

पैसा's picture

23 Jan 2017 - 5:27 pm | पैसा

कारण मिपावर सगळे डॉक्टर लोक चांगले आणि मदत करणारे असले तरी अशी नेटवरून डायग्नोस करण्याची रिस्क कोणीच घेणार नाहीत. तुमच्याकडे असलेले रिपोर्ट्स पाहून सेकंड ओपिनियन फारतर देऊ शकतील.

एका धाग्यापेक्षा आरोग्य हा वेगळा साहित्य प्रकार हवा आहे खरं तर. त्याबरोबर अर्थकारण, निसर्ग/शेती असे अजून काही पर्याय असले तर अजून चांगले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2017 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका धाग्यापेक्षा आरोग्य हा वेगळा साहित्य प्रकार हवा आहे खरं तर. त्याबरोबर अर्थकारण, निसर्ग/शेती असे अजून काही पर्याय असले तर अजून चांगले.

याला अनुमोदन...

विशिष्ट रुग्ण समोर न ठेवता आजार, त्यावरचे उपाय आणि मुख्य म्हणजे तो होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय यांच्यावरची ज्ञानवर्धक स्वरूपाची चर्चा केव्हाही स्वागतार्ह व सर्वोपयोगी असेल.

हे केवळ वैद्यक/आरोग्यासंबंधीच नव्हे तर अर्थकारण, निसर्ग, शेती, व्यवस्थापन, फोटोग्राफी (यावर अभ्यासपूर्ण एक मालिका झाली आहे), अकाउंटिंग (यावर एक मालिका सद्या चालू आहे), इत्यादी अनेक विषयासंबंधी होऊ शकते. त्या त्या विषयांच्या जाणकारांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा.

मुविंसाहेबांवर त्यांच्या शेतीविषयक अनुभवांची मालिका उधार आहे, याची त्यांना सविनय आणि सादर आठवण करून दिली जात आहे :)

सध्या शेतात मिरची लावली आहे....

मिरची-शेती बाबत खूप अनुभव आले आहेत.

२०-२२ मे च्या दरम्यान मिरचीचे अर्थकारण समजले की "मिरची पिक" ह्या विषयी नक्कीच लिहिन.

बादवे,

ज्यांना कोकणात मिरची होवू शकते का? ह्या बाबत काही संशय असला तर मला नक्की व्यनि करा.

कोकणात मिरचीचे रोप रुजु शकते, ह्या पुराव्यासाठी आमचे शेत तयार आहे.

आणि मिरची तयार व्हायला अद्याप २-३ महिने अवकाश आहे.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2017 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

"कोकणातली मिरची" या लेखमालिकेची प्रतिक्षा आहे ! :)

"मिरची" हा पहिला भाग असेल.

पुढील वर्षी....

कोकणात पिकणारी कडधान्ये, (मूग, चवळी, वाल. हरबरा, मटार, आणि भूईमूग ) हा भाग असेल.

बादवे,

सध्या चवळीची ५०-५५ रोपे प्रयोग म्हणून लावली आहेत.

चवळीच्या शेंगा नाही लागल्या तरी चवळीच्या पाल्याची भाजी तरी नक्कीच खाता येते.

कष्टकरी शेतकर्‍याला शेत उपाशी पोटी मारत नाही, हे मात्र १००% सत्य.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2017 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर लिहा. तुमच्या सगळ्या रोचक अनुभवांच्या लेखांची प्रतिक्षा आहे !

लेखमालेची वाट पाहत आहे.

आम्हाला तर मिरचीचीच प्रतिक्षा आहे! :)

मुक्त विहारि's picture

23 Jan 2017 - 8:52 pm | मुक्त विहारि

+ १

विर जाधव's picture

24 Jan 2017 - 2:45 pm | विर जाधव

मी येथे नविन आहे. वैद्यकीय मदत शीर्षक वाचुन आलोय. म्हटलं काही सल्ला मिळाला तर बरं..धन्यवाद.

एरवी अगदीच ऑपरेश॑न वगैरेचा निर्णय असेल तरच आपले नातेवाईक डोक्टर सुद्धा आपले मत सुचवितात एरवी माझ्या वाचना प्रमाणे तरी निदानाचे चार भाग पडतात.
अनुभूति- जे रोग्याने डॉक्टराना सागायचे असते. उदा, मळमळ्ते, डोळ्यासमोर काळी वर्ञुळे दिसतात ई,
निरिक्षण- हे डॉक्टरानी करायचे असते उदा. रोगी फार वाळलेला दिसतो. अनॉमिक दिसतो. ई.
परिक्षण- हे ही डॉ नी करायचे असते.. उदा. पोटावर थापटी मारून पहाणे, जीभ पहाणे ई.
संशोधन- हे विशिष्ट डॉ नीच करायचे असते- उदा. बेरियम एक्स रे, रक्त तपासणी, एम आर आय. ई.
शेवटी निदान - वरील चारही बाबीचा साकल्याने विचार करून डाँ चार पाच शक्यताचे निदान करतात काही काळात त्यांचे अगदी निश्चित निदान तयार होते व उपचाराला सुरूवात होते.
हा उहापोह करण्याचे कारण या गोष्टी नेट वर सर्वच शक्य नाहीत. सबब आरोग्य व निदान यात फरक करूनच इथे लिहिले जाते व जावे.

मी मिपावर दाताचे फोटो आणि एक्सरे बघुन कधीकधी सल्ले दिले आहेत!! अर्थात त्यात बर्याचदा त्यांच्या गावातला किंवा जवळचा डेंटिस्ट सांगणे इतकेच करता येते.
इतकी मदत तर आपण मिपाकर एकमेकांना नक्कीच करु शकतो. लोकांनी हक्काने विचारावे :)
आरोग्य विभाग झालाच पाहिजे !