तुम्ही अशा वेळी काय करता १

विदेशी वचाळ's picture
विदेशी वचाळ in काथ्याकूट
15 Jan 2017 - 10:35 pm
गाभा: 

तुम्ही अशा वेळी काय करता १

हा प्रश्नच असा आहे कि प्रत्येक कडे काही ना काही उपाय असतोच. आणि हा प्रश्न अनेक कॉन्टेक्सत मध्ये विचारला जाऊ शकतो. मला वाटते कि मी एका कॉन्टेक्सट मध्ये विचारतो आणि मग बाकीचे बरेच जण वेग वेगळे धागे काढून कॉन्टेक्सट बदलून हाच प्रश्न विचारातील .

विचाराचे आदान प्रदान आणि जमलेच तर चांगले उपाय मिळणे एवढाच एक ध्यास आहे. चला तर मी सुरुवात करतो.

मला महिन्यातून दोनदा तरी खूप मोठा प्रवास स्वतः ड्राईव्ह करून जावा लागतो. अंतर सुमारे ५५० की मी आहे. जाणे येणे एकाच दिवसात करावे लागते. आदी अडचणी, ट्राफिक वैगेरे जमेस धरले तर सुमारे ६ तास एका बाजूने लागतात. गाडी मध्ये जोरात रेडिओ वैगेरे लावता येत नाही कारण गाडीत मंडळी झोपलेली असते. जाणे येणे हे मेडिकल ट्रीटमेंट साठी असते त्यामुळे मी रेडिओ लावणार काय करायचे ते करा, असे म्हणता पण येत नाही.

अंतरात सुमारे ९० की मी चा घाट लागतो (अंतर एकत्र आहे. एकाच ९० की मी चा घाट नाही ). रास्ता सुंदर आणि रिकामा आणि सरळ असल्यामुळे झोप येणे स्वाभाविक आहे .

ज्या दिवशी जातो त्या दिवशी नेमका माझा उपास असतो. त्यामुळे खात खात वेळ काढता येत नाही. एक मोठा कॉफी चा कप घेऊन जाणे आणि तेवढाच घेऊन येणे असा क्रम मी आचारतो . उगाच उपासाच्या च्या दिवशी "हाणायचे " नाही असा माझा होरा असतो.

अशी स्थिती कोणी हाताळली आहे का?

अशा वेळी तुम्ही काय करता?

विदेशी वाचाळ

प्रतिक्रिया

साहना's picture

15 Jan 2017 - 10:52 pm | साहना

होय ह्या प्रकाराशी माझी चांगलीच ओळख आहे. गाणी लावून स्वतः सुद्धा ती मोठ्याने गात राहणे ह्यामुळे झोप जाते असा अनुभव आहे. मुळांतच गाडी चालवण्याची फार आवड असल्याने झोप तेव्हडी येत नाही.

इतर उपाय :

१. काही तरी स्ट्रॉंग मिंट खाणे आणि त्यावर पाणी पिणे. ह्यामुळे डोक्याला झिणझिण्या येऊन झोप कंट्रोल मध्ये राहते.
२. Ice कोल्ड पाणी पिणे. पाणी किंवा कोल्ड्रिंक इत्यादी आपण थोड्या थोड्या वेळाने पिऊ शकता.
३. कॉफी चांगली आहे पण ५ hour energy प्रमाणे काही स्ट्रॉंग फॉर्मुला असला तर आणखीन चांगला

संदीप डांगे's picture

15 Jan 2017 - 11:02 pm | संदीप डांगे

इअरफोन मधे विनोदी कथाकथन इत्यादी ऐकू शकणार नाही का?

६ तासाच्या ड्राइवमधे झोप येणे मला थोडेसे पटत नाहीये. दोन दोन तासांनी ब्रेक घेऊ शकता.

हे ड्रायविंग भारतात आहे की कुठे? तुम्हाला अडचण नसेल तर... हा नेमका कोणता मार्ग आहे ते सांगू शकाल काय?

बाकी, साहना यांनी लिहिल्याप्रमाणे केल्यास प्रयोग बहुतांशी यशस्वी होतात.

मग जवळची ट्रीटमंट बघा.

विदेशी वचाळ's picture

16 Jan 2017 - 1:18 am | विदेशी वचाळ

धन्यवाद, सर्वांनाच धन्यवाद ,

संजय भाउ जवळची ट्रीटमेंट मिळत नाही आहे . शोधून काढून मगच हा मार्ग पत्करला आहे. रोग असाध्य असा आहे ट्रीटमेंट ही क्लिनिकल ट्रायल आहे . मिळेल तेथेच घावी लागाते आहे . शिवाय इफ्फेक्टिव्ह असल्यामुळे ट्रीटमेंट सोडणे नाही.

संदीप भाऊ ड्रायविंग अमेरिकेत आहे . आपल्या बे एरिया मधून लॉस अँजेल्स ला जाणे येणे. दार ते दार ३३५ मैल अंतर आहे . सकाळी चार वाजता निघणे . व दुपारी ३ वाजता तिकडून निघणे . राम प्रहरी चार ला निघायचे म्हणजे लवकर उठावे लागते. तसा ११० मैल वार एका स्टॉप घेतो. आणि फ्रेंच व्हॅनिला चा कप भरून घेतो. मग शेवट पर्यंत थांबत नाही . ट्राफिक चा नेम नसतो त्यामुळे थांबणे टाळतो.

साहना ताई तुम्ही म्हणता उपाय करून पाहतो. तसेही चेविंग गम चालू असतो. त्याचा पण उपयोग होतो.

आणि हो पॉड कास्ट पण ऐकतो. पण आता नवीन कायदा आला आहे कि दोन कानात कांड्या घालायच्या नाहीत. आणि फोने पण माऊंट असलेला हवा आहे. नाहीतर तिकीट मिळते हो. आणि ते पण $६०० लागतात ते काढायला.

विनोदी कथांचा साठा फार मोठा नाही आहे. मिळतात का ते पाहतो .

असो. परत एकदा धन्यवाद .

विदेशी वाचाळ

ड्रायविंग अमेरिकेत आहे हे ठाऊक नव्हते. i-५ तर अगदी सरळ सोपा रास्ता आहे पण रस्त्यावर नवीन ड्रॉयव्हर्स फार असतात त्यामुळे तुम्ही वेगाने चालवणार असाल तर काळजी घ्यावीच लागते. रात्रीच्या वेळी भरपूर निष्काळजी चालक पाहायला मिळतात. तुम्ही ज्याला घाट म्हणत आहात तो कदाचित पाशेको पास (५८) हा अमेरिकेतील काही सर्वांत अपघातप्रवण रस्त्यांपैकी एक आहे. इतका कि हा रास्ता भुताटकीचा आहे असे सुद्धा म्हटले जाते. मी महिन्यातून एकदा SF तो वेगस आणि एकदा SF-Barstow असा प्रवास करते. त्यामुळे संपूर्ण I५ (बेकर्सफील्ड पर्यंत)आणि १०१ अगदी तोंडपाठ आहे. अमेरिकेतील रस्त्यावर लेन चेंज करताना वळून पाहणे अतिशय आवश्यक असल्याने हेडफोन शक्यतो घालू नये असेच सुचवीन. उगाच मान वळवायला फ्रिक्शन नको. पाचेको पास मध्ये जराही रिस्क घेऊ नये.

कॉफी किंवा कोला मी लॉस्ट हिल्स मधील Loves मध्ये घेते. ह्यांचा कप फार मोठा असतो. कॉफी नेहमी डार्क रोस्ट वाली. डोळ्यावर झोप असल्यास मिन्ट्स. Ice-Breaker ची मोठी डबी इथे मिळते. Loves हे ट्रॅकर्स लोकांचे आवडते स्थान असल्याने इथे तुम्हाला विविध प्रकारची energy drinks, ५ hour energy, केळी इत्यादी मिळेल.

ज्यांना आरोग्यविषयक समस्या आहे त्यांच्या आरोग्यांत झपाट्याने सुधारणा व्हावी अशी प्रार्थना.

पद्मावति's picture

16 Jan 2017 - 1:47 pm | पद्मावति

आइस ब्रेकर्स आणि डार्क रोस्ट कॉफी ...साहना +100
आईस ब्रेकर्स कूल मिंट मस्तं झोप घालाविण्यासाठी.

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 12:03 pm | संजय क्षीरसागर

तीन हम खास उपाय आहेत.

१) श्वास घेतांना सोsss असं (मनात म्हणत) दीर्घ श्वास घ्या आणि हंsss असं म्हणत श्वास सोडा. हे दोन्ही उनुच्चारित आणि मनातल्या मनात करत राहा. यानं मनाची एकाग्रता कायम राहील आणि विचार हे-वेअर झाल्यामुळे झोप येते ती येणार नाही. गाणी किंवा कथा ऐकण्यापेक्षा यानं मूड लाइट राहील आणि मानसिक अ‍ॅक्टीविटीमुळे येतो तो थकवा येणार नाही. एकदा तुम्हाला लय पकडता आली की संपूर्ण ड्रायवींग मजेचं होईल.

२) इतर कोणत्याही पेयापेक्षा, तिकडे मिळत असेल तर, पतंजलीचं दिव्य पेय घ्या (विदाउट मिल्क). हा हर्बल टी आहे आणि त्यात कायकाय घातलंय कोणजाणे, पण त्यानं ज्याम उत्साह येतो आणि अलर्टनेस टिकून राहातो.

३) बाकी उपास, देव वगैरे निव्वळ छूगिरी आहे हे किमान तिकडच्या रहिवाशांना कळायला काहीच प्रॉब्लम नाही. थोडक्यात, भूक लागली की खाण्याची मजा घ्या.

आणि त्याहून थोडक्यात, सहलीला निघाल्याचा मूड ठेवा. कारण प्रसंग काय आहे यापेक्षा मूड काय आहे हे महत्त्वाचं. मूड मस्त असेल की कोणताही प्रसंग सहज हँडल होतो.

साहना म्हणताहेत ते कराच. अजुन एक म्हणजे कार मधल्या निदान एकाला तरी तुमच्या बरोबर गप्पा मारायला सांगा. अंताक्षरी खेळा. तुम्ही मेडिकल रीज़न साठी ही ये जा करत आहात तेव्हा मला जाणीव आहे अंताक्षरी खेळण्याची तुमची मनस्थीती नसणार. पण अंताक्षरी खेळल्याने डोक्याला जरा चालना मिळते त्याने तुमचे माइंड अलर्ट राहील.
शक्य असल्यास परतीचा प्रवास सुरू करण्याच्या आधी थोडी झोप काढा. कारच्या बॅक्सीट वर थोडं आडवे झालात तरीही पुन्हा ड्राइव करायला सोपे होईल. गाडीतच एखादी उशी आणि ब्लॅंकेट ठेवा.
मी हे सगळं सांगतेय कारण मी सुद्धा एकेकाळी आठवड्यातून दोन दिवस तरी असे पाचशे, साडेपाचशे कीमी ड्राइविंग दिवसाला करायचे शिक्षणाच्या कारणाने. रात्रीचे ड्राइविंग असायचे पण हे असेच उपाय करून सुरक्षितपणे घरी परत यायचे.

कंजूस's picture

16 Jan 2017 - 6:28 am | कंजूस

सलाम!
आंजावरचे एक "चेतन सुभाष गुगळे" यांची आठवण झाली।( माबोवर) .नॅानस्टॅाप पुणे -दिल्ली मारुतीमधून गेलेत. तेच उत्तम सल्ला देतील.

या लाईटची वेव्हलेन्गंथ सुर्यप्रकाशाशी मिळणारी असते. त्यामुळे आपल्या मेंदुला भर दुपार असल्याचा संदेश मिळतो व झोप उडते. जेटलॅग लवकर घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. तो वापरुन झोप आवरता येईल.

लँप थोडा महाग आहे, पण झोपेमुळे अ‍ॅक्सिडेंट, ट्राफीक टीकीट वगैरे मुळे येउशकणार्‍या कर्चाच्या तुलनेत काहीच नाही.

एक लिंक देत आहे, थोडे शोधल्यावर आपल्याला पाहीजेतसा मिळु शकेल. Edge Light Therapy Lamp

तुम्ही काही न खाता ड्राईव्ह करताय त्यानेही कंटाळल्यासारखे होत असेल. निदान फळे खाल्लीत तर जरा एनर्जी राहील असे वाटते.

उपास करणे निरर्थक आहे. उपास करणे टाळा किंवा इतर कुठल्या दिवशी करा.

खेडूत's picture

16 Jan 2017 - 9:50 am | खेडूत

अग्दी बरोबर.
सर्व देव सारखेच हे प्रथम स्वीकारले तर उपवासाचा दिवस बदलायला अडचण येऊ नये!
मग निम्मा प्रॉब्लेम तर संपलाच!.. उपचार संपले की पुनः मूळ उपवास धरा. देव लई समजुतदार आहेत आपले.

गुलाब राव..'s picture

16 Jan 2017 - 1:12 pm | गुलाब राव..

पाणी भरपूर प्या.. त्यामुळे लघुशंका येवून गाडी थांबवावी लागेल.. पाय मोकळे झाल्यामुळे झोप जाईल.. चोकलेट चागाळणे इत्यादी.....

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 3:34 pm | मराठी कथालेखक

सकाळी न्याहारीनंतर आणि ड्रायविंग सुरु करण्यापुर्वी वर्टिगोची (vertin किंवा अन्य कुठलीतरी) कमीत कमी mg ची गोळी खा.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 4:19 pm | मराठी कथालेखक

तुमच्या गाडिबद्दल माहीत नाही .. पण भारतात सर्वसाधारणपणे कारच्या एसी मध्ये आतली हवा पुन्हा आत फिरत रहावी (recirculate) किंवा बाहेरील हवा आत यावी (fresh air) याचं सेटींग असतं. साधारणपणे recirculate चा पर्याय ठेवलेला असतो. अर्थात या पर्यायातसुद्धा काही प्रमाणात बाहेरील हवा आत येत असावीच . पण तरी लांबच्या प्रवासात हे सेटिंग जास्त वेळ fresh air वर ठेवून बघा. कधी कधी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झोप येते (मला अनेकदा बंद ए.सी खोलीत अनेक जण जमलेत की जांभया येवू लागतात)

विदेशी वचाळ's picture

16 Jan 2017 - 7:09 pm | विदेशी वचाळ

परत एकदा सगळ्यांना धन्यवाद,

उपासाचे म्हणाल तर देवा पेक्षा स्वतः करीत जास्त करतो. मध्यंतरी भरपूर वाचन करून सुटलेले पोट कमी करण्या साठी म्हणून उपास आणि पळणे सुरु केले. त्याचा भरपूर उपयोग झाला. पोट कमी आणि वजन योग्य तेवढे झाल्यावर उपास थांबवता येऊ शकले असते पण जी गोष्ट उपयोगाची ती कशी सोडायची? म्हणून चालूच ठेवले. आणि हो उपास खिचडी खाऊन आणि जूस पिऊन करत नाही . बुधवारी रात्री जेवल्यानंतर एकदम गुरुवारी रात्री जेवतो. मध्ये दोन ते तीन कप चहा होतो.

लॉस अँजेल्स वरून येताना जर का ग्लानी वाटली तर उगाच थांबत नाही काहीतरी खातो. शक्यतो नट्स खायचे. २०० कॅलोरीस भरपूर होतात. सोबत फ्रेंच वॅनिला असेल तर मग ३०० कॅलोरीस होतात पण काम चालते. सध्या तरी असेच चालवतो. उपास सोडायचे मनाला भावात नाही आहे कारण परत सुटलेले पोट पाहायचे नाही आहे. माझ्यावर घर अवलंबून आहे, मला स्वतःला फिट असणे गरजेचे आहे. उपासाचा दिवस बदलणे जरूर शक्य आहे . तो एका चांगला उपाय वाटतो आहे .

कर मध्ये गप्पा मारणारे आणखीन कोणीच नसते . मीच असतो आणि मग विश्रांती घेणारी रुग्ण . सो हम चा जप जरूर करता येईल. मी तो पुढच्या वेळेस करून पाहीन .

शक्यतो झोप हि सरळ रस्त्यावरच येते. ग्रेप वाईन भागात येत नाही. कारण तेथे बरेच लक्ष द्यावे लागते. सरळ रस्त्यावर काहीच नसते, मग मन भरकटते, झोप येते.

असो . आपण सगळ्यांनी चांगले उपाय सांगितले आहेत त्याबद्दल धन्यवाद.

ज्यांनी वैयक्तिक सद्भावना दाखवल्या आहेत त्यांच्याबद्दल मी आभारी आहे.

विदेशी वाचाळ

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 8:02 pm | संजय क्षीरसागर

माझ्यालेखी तो जप वगैरे नाही , श्वासावर नियंत्रण मिळवून देणारी सोपी युक्ती आहे . साधा दीर्घ श्वास घ्या आणि त्याचवेळी मनानं सो म्हणा आणि लक्षपूर्वक श्वास सोडा आणि सोडतांना मनात हं म्हणा . बास ! तुम्हाला कायम उत्साह राहील .

आणखी एक उपयोगी गोष्टे . डोळे मिटतात तेव्हा त्यांची दखल घ्या . ही कमालीची रिलॅक्सींग प्रक्रिया आहे . प्रवासात किंवा दीर्घ काळ काम करतांना ही प्रोसेस फार उपयोगी आहे. डोळयांवर सगळयात जास्त ताण येतो पण आपण तो बेदखल करतो त्यामुळे अनावर झोप येते . या मेथडनं डोळे जाम रिलॅक्स होतात . तशी अदरवाईज सुध्दा ही आयुष्यभर उपयोगी होईलशी हॅबीटे .

कळवा !

डोळे मिटतात तेव्हा त्यांची दखल घ्या

म्हंजे नक्की काय करायचे..

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 8:31 pm | संजय क्षीरसागर

दॅटस ऑल ! आपली डोळे उघडझापीची प्रक्रिया पूर्णतः प्रतिक्षिप्त झालीये . बाहेरच्या जगाचं प्रेशर आत शिरून ती वाजवीपेक्षा फास्ट झालीये . थोडक्यात इंग्लिश पिक्चर बघतांना जरा डोळा लवला की नेमकी गोष्ट हुकलसं वाटतं आणि डोळे उघडेच राहातात तसं लाईफ झालंय . सो, या प्रोसेसनं आपण ती प्रक्रिया नॉर्मल करतो .

लिओ's picture

16 Jan 2017 - 11:20 pm | लिओ

एकदा ड्राईव्ह करत असताना डुलकी आली होती, दिवसभराच्या धावपळीत असे होऊ शकते म्हणुन माझे बाबा माझ्याकडे अखंड लक्ष देवुन होते म्हणुन काही अनर्थ घडला नाहि.

एक गोष्ट मी निरीक्षणात घेतली, आपण जेव्हा ड्राईव्ह करतो (खास करुन भारतात) आपल्या पुढे, मागे, डावीकडे , उजवीकडे फार कमी अंतरावर वाहने असतात (हायवेवर सुध्दा). त्यामुळे ड्राईव्ह करताना ड्राईव्हरला फार अलर्ट रहावे लागते. हायवेवर ड्राईव्ह करताना जर का मला मोकळीक मिळाली तर ( मोकळीक म्हणजे पुढे मागे डावीकडे , उजवीकडे जर सुरक्षित अंतरावर सर्व वाहने असतील तर) सुरक्षित वेगात वाहन ठेवुन मी डावीकडे व उजवीकडे हळु मान वळवुन पाहतो. यामुळे मानेला थोडा व्यायाम तर मिळतोच सतत पुढे पाहुन जो डोळ्यावर ताण येतो त्यातुन थोडी मोकळीक मिळते.

अशी युक्ति कोण वापरते का ??? मत जाणुन घ्यायला आवडेल.

होय, मी असेच करते. सतत डोळे रस्त्यावर ठेवले तर थोड्यावेळाने हिप्नोटाईज झाल्यासारखे वाटते. त्यापेक्षा इकडे तिकडे डोळे फिरवणे, मागील वाहनाकडे आरश्यातून बघणे वगैरे करते. तरीही आपले मुक्कामाचे ठिकाण जवळ येण्याआधी म्हणजेच 'अपने इलाकेमे' येण्याची चाहूल लागताच अपार कंटाळा दाटून येतो तेंव्हा जास्त लक्ष द्यावे लागते व अश्यावेळी नवरा शेजारी बसून लक्ष ठेवत असतो. संध्याकाळ, रात्र होत आली असेल तर रणगाणे छाप गाड्या फार जोरात जातात.

विदेशी वचाळ's picture

17 Jan 2017 - 12:12 am | विदेशी वचाळ

लिओ ,

मी पण तसे करतो . गाडी चालवताना दिवस असेल तर रास्ता सोडून नजर जरा दूरवर फिरवायची. त्याने झोप थोडीशी जाते . पण ते फार तर फार मध्ये एकदा करता येते. शिवाय जर हेडफोन असेल तर त्याचा त्रास वेगळाच असतो.

विदेशी वाचाळ

कवितानागेश's picture

21 Jan 2017 - 11:57 am | कवितानागेश

हवाबाण हरडे टाईप्स स्ट्रॉंग खारट चवीच्या गोष्टी चघळा. झोप उडते.
नॉट जोकिंग. गंभीरपणे दिलेला सल्ला आहे.