विंगेत गलबला - पुष्कर श्रोत्री आले बरं का !!

Primary tabs

ढ.अदिती's picture
ढ.अदिती in लेखमाला
16 Jan 2017 - 8:03 am

पुष्कर श्रोत्री हे नाव मराठी प्रेक्षकाला नवं नाही. महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून सुरुवात करून इथवर पोहोचलेला एक गुणी कलाकार. हजारो - लाखो प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणार्‍या एका नामवंत टीव्ही-सिने-कलाकाराला आमच्या ३०००० लोकांसाठी "मुलाखत द्याल का हो?" असं विचारल्यावर एकदम "अरे देऊ की! का नाही? तुम्हाला सांगतो, ३०००० मराठी माणसं एकत्र येऊन एका संस्थळासाठी काही काम करताहेत ही कल्पनाच फार भारी आहे!" असं दिलखुलासपणे सांगितल्यावर आमचाही धीर चेपला आणि त्यांचा पुण्यातला एकच धावपळीचा दिवस असताना तिथे त्यांना गाठून, मुलाखतीसाठी आम्ही गेलोच! पुन्हा एकदा मोकळंढाकळं स्वागत! साधा टॅबलेट घेऊन गेलो होतो आम्ही, पण एक चकार शब्द नाही त्याबद्दल. उलट आम्हाला कॅमेर्‍याचा अँगल सेट करून दिला, लाईट सेट केले. काही केल्या तो अँगल त्यांना पूर्ण कव्हर करेना. मग, "हरकत नाही हो, मी बसतो ना असा शेषशायी भगवानासारखा" असं म्हणत त्यांनी अँगलजोगी आपली बैठक सेट केली आणि आम्ही मुलाखत सुरू केली. या बैठकीत सगळ्यात जास्त त्यांची गैरसोय होती, हाताला थोड्या वेळाने रग लागली असणार. पण पूर्ण वेळ चेहर्‍यावरचे प्रसन्न भाव कायम ठेवून त्यांनी अगदी मनापासून आमच्याशी गप्पा मारल्या...! पडद्यावर दिसणार्‍या वलयामागे किती प्रचंड मेहनत आणि चिकाटी असते, याचं हे एक बोलकं उदाहरण! अशा मेहनतीतून इतकी नामी कला सादर न होती तरच नवल... या उत्कृष्ट अभिनेत्याची आणि त्याहून दिलदार माणसाची भेट झाली, त्याबद्दल अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय...!

मुलाखतकारः स्रुजा

कॅमेर्‍यावर: ढ.अदिती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Jan 2017 - 11:07 am | कंजूस

व्वा!

पद्मावति's picture

16 Jan 2017 - 11:30 am | पद्मावति

वॉव...क्या बात है! पुष्कर श्रोत्री यांची सुंदर मुलाखत. आवडली.

प्रचेतस's picture

16 Jan 2017 - 11:43 am | प्रचेतस

मुलाखत खूपच उत्कृष्ट झालीय.

छान वाटलं पुष्कर श्रोत्रीला पाहून.

सपे-पुणे-३०'s picture

16 Jan 2017 - 12:53 pm | सपे-पुणे-३०

वा! पुष्कर श्रोत्रीचं काम अतिशय आवडतं. अचकट-विचकट अंगविक्षेप न करता चेहऱ्यावर अगदी साळसूद भाव ठेऊन तो विनोदी अभिनय करतो. 'धोबीपछाड' मधली त्याची 'बाब्या' ची भूमिका अगदी लक्षात राहते.

फेदरवेट साहेब's picture

16 Jan 2017 - 2:04 pm | फेदरवेट साहेब

येस , आपुनला बी त्येंचा एक डाव धोबीपछाड मधला रोल लै आवडलेला हाय. फर्स्ट म्हंजी रूरल/कंट्रीसाईड ऍक्सेन्ट त्येंनी मस्त ग्रास्प केला हुता, सेकंडली, अशोक सराफ एटले टायमिंग नू बादशाह संगे त्यांनी थोडा बी उन्नीस बीस न होता मॅचप केला अने एक रिटायर्ड डॉन संगे त्याचा डीमविट लॅकी हा भारी लाफ्टर रायट आपुनलोगला मिळाला.

यंग पोरेलोक मंदी पुष्कर श्रोत्री जसा नॅचरल वाटते तसाच आपुनला लक्ष्मणराव देशपांडे ह्यांचा 'वऱ्हाड निघालंय लंडनला' वापीस एकवार स्टेजवर पॉवरफुली आणायच्या चॅलेंज सहज complete केलेला संदीप पाठक बी लै भावते.

पुंबा's picture

18 Jan 2017 - 2:44 pm | पुंबा

चोक्कस..!

पुंबा's picture

18 Jan 2017 - 2:47 pm | पुंबा
पुंबा's picture

18 Jan 2017 - 2:49 pm | पुंबा

चोक्कस..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2017 - 3:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम मुलाखत !

पडद्यावर आपण कलाकारांना आपण नेहमीच पाहतो. पण, त्यांच्या मनाचा तळ गाठणारी ही अशी मुलाखत, तीही चलत्चित्राच्या रुपाने जेथे आपण त्या कलाकाराला त्याच्या अविर्भावासकट पाहून शकतो, खूप आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2017 - 3:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

"गोष्ट तशी मोठी" हा, कोणत्याही संगणकीय संस्थळावरचा "अक्षर-दृक्-श्राव्य अश्या अनेक संवादमाध्यामांचा संमिश्र उपयोग करणारा प्रकल्प" म्हणून, नवीन वाट निर्माण करणारा (पाथ फाईंडर) आहे.

त्यातले आतापर्यंत जे लेख वाचले-ऐकले-पाहिले त्यावरून तो, केवळ नवीन कल्पना म्हणूनच नव्हे तर सादरीकरणच्या प्रतीमुळे, संगणकीय संस्थळांच्या वाटचालीतला एक मैलाचा दगड ठरेल असेच दिसते आहे. अश्या प्रकल्पांमुळेच मिपाचे वेगळेपण अधोरेखित होत आहे !

या प्रकल्पामागे चिकाटीने आपला वेळ-श्रम-बुद्धी-कल्पकता-तांत्रिक कौशल्य उभे करणार्‍या सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

यशोधरा's picture

16 Jan 2017 - 6:22 pm | यशोधरा

बाडीस!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 8:23 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अगदी हेच मनात आले. या मिपाचे आपणही सदस्य आहोतमस्त,एक भाग आहोत . याचा अभिमान वाटतो.मस्त.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 8:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अगदी हेच मनात आले. या मिपाचे आपणही सदस्य आहोत,एक भाग आहोत . याचा अभिमान वाटतो.मस्त.

अस्वस्थामा's picture

16 Jan 2017 - 4:04 pm | अस्वस्थामा

मस्तच हो. :)

स्मिता.'s picture

16 Jan 2017 - 4:52 pm | स्मिता.

मुलाखत फार आवडली, पुष्करचे विचार अगदी भावले. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचाय त्यातल्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचं निरिक्षण, अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे हे प्रांजळपणे पण ठासून सांगितलेलं आवडलं.

ज्योति अळवणी's picture

16 Jan 2017 - 11:05 pm | ज्योति अळवणी

मस्त... मुलाखत मस्त झाली आहे

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 11:51 pm | संजय क्षीरसागर

स्त्रुजानं विचारलेले प्रश्न त्याला पुष्करनी दिलेली मनमुराद उत्तरं सगळंच उत्तम झालंय. अॅक्टिंगविषयी उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकाला पुष्करच्या व्यासंगाचा आवाका बघून कौतुक वाटेल . मुख्य म्हणजे इतक्या कमी साधनात जमवलेली ही गोष्ट तशी छोटी नाही तर या संकेतस्थळाच्या इतिहासात लँडमार्क झाली आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि उपक्रमासाठी शुभेच्छा .

मुलाखत आवडली स्रुजा. पुष्कर श्रोत्रींचं कट्यार मुव्हीमधील व विनोदी काम पाहिले आहे व ते आवडले होते. या मुलाखतीतून त्यांनी किती प्रकारची कामे केलीत हे समजले. आता दिग्दर्शक बनल्याने त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

लाल टोपी's picture

17 Jan 2017 - 9:32 am | लाल टोपी

छान मुलाखत! एका हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास कोणताही मोठेपणाचा आव न आणता सुरेखपणे उलगडला आहे.

पुष्करचा अभिनय नेहमीच आवडतो.
मुलाखत एकदम उत्तम जमली आहे, प्रश्नांची निवड उत्तम झालीये आणि पुष्करने उत्तरेही विचार करुन दिलेली आहेत. उत्तरांमधून त्याचा अभ्यास दिसून येतो.

असेच म्हणेन.उत्तम कलाकाराची दिलखुलास मुलाखत आवडली.अत्यंत साधेपणाने केलेला संवाद,नेमके प्रश्ण आणि स्रुजाचा आवाज. मस्त झालिये मुलाखत.
लेखमालेत उत्तम, वैविध्यपूर्ण आणि चलतचित्र माध्यमातून आलेले लेख मिपा इतिहासात नावीन्यपूर्ण.मस्त.

असेच म्हणेन.उत्तम कलाकाराची दिलखुलास मुलाखत आवडली.अत्यंत साधेपणाने केलेला संवाद,नेमके प्रश्ण आणि स्रुजाचा आवाज. मस्त झालिये मुलाखत.
लेखमालेत उत्तम, वैविध्यपूर्ण आणि चलतचित्र माध्यमातून आलेले लेख मिपा इतिहासात नावीन्यपूर्ण.मस्त.

मुलाखत सुंदर झाली आहे, हापिसात बघता येत नसल्याने पहिले दोन भाग पाहिले. तिसरा पुन्हा घरी जाऊन बघेन.

गवि's picture

17 Jan 2017 - 8:45 pm | गवि

अतीव सुंदर.

उपक्रम अप्रतिम . खूप धन्यवाद.

आनंदयात्री's picture

17 Jan 2017 - 8:58 pm | आनंदयात्री

वाह. मुलाखत अतिशय आवडली! हा उपक्रम मिपासाठी माईलस्टोन आहे असे मतप्रदर्शन होतेय, ते उचित आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे.
अनेक धन्यवाद.

राघवेंद्र's picture

17 Jan 2017 - 10:15 pm | राघवेंद्र

सुंदर मुलाखत. अतिशय आवडली.
पुष्कर रॉक्स !!!

मिपाचा एकदम नवा उपक्रम खूप आवडला.

पियुशा's picture

18 Jan 2017 - 9:31 am | पियुशा

क्या बात है !

सामान्य वाचक's picture

18 Jan 2017 - 2:14 pm | सामान्य वाचक

एकदम lively झाली आहे मुलाखत.
योग्य आणि मोजके प्रश्न, फाफटपसारा नाही

विशाखा राऊत's picture

18 Jan 2017 - 5:13 pm | विशाखा राऊत

वाह :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2017 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुष्कर श्रोत्री त्यांनी केलेल्या भुमिकांच्या व्हरायटीमुळे प्रचंड आवडतात. खास करुन हसवा फसवी बद्दल विशेष कौतुक. एक डाव धोबीपछाड मधला बाब्या लैचं भारी.

भारत गणेशपुरे आणि सुबोध भावे बरोबर काय अफाट धुमाकुळ घातलाय त्यांनी. हा एक भारी सीन.

वेल्लाभट's picture

20 Jan 2017 - 5:15 pm | वेल्लाभट

खत्रा माणूस !
खत्रा मुलाखत !
प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदातच माणसाची खरी ओळख होतेय. बाकी कलाकार म्हणून तर काय विचारा!

Maharani's picture

22 Jan 2017 - 11:25 pm | Maharani

क्या बात!!क्या बात!!

रणजित पारेकर's picture

5 Feb 2017 - 11:23 am | रणजित पारेकर

छान......

मस्त झाली आहे पहिल्या भागातील मुलाखत... मिपाची ओळख आणि मुलाखतीची सुरुवात अगदीच ओघवती झाली आहे, आवडलीच.
शेषशायी भगवान....:) पुढील भाग निवांत बघेन.