आभासी जगातल्या आभासी भाषा : वलारमोर्गुलिस

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in लेखमाला
23 Jan 2017 - 8:25 am

*/

बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली, एकपेशीय जीवापासून विविध सजीव निर्माण झाले, त्यांची उत्क्रांती झाली. प्राणी असोत वा आजचा प्रगत (??? कदाचित १४ कोटी वर्षांनी सगळे सुपरमॅनही असू शकतील.) मानव, उत्क्रांतीबरोबरच कंपूबाजीलाही सुरुवात झाली. कंपूला ‘समाज’ असं गोंडस नाव मिळालं. आता समाज म्हटलं की चालीरिती आल्या, परंपरा आल्या आणि त्याच्या जोडीला ह्या कंपूला बांधून ठेवणारी एक देणगी मिळाली, ती म्हणजे 'संभाषणकला'.

आता उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांना गृहीत धरलं, तर आदिमानवाच्या काळामध्ये गेरूने रंगवलेली चित्रं म्हणजे म्हणजे संभाषणाची सुरुवात म्हणता येईल. कार्बन डेटिंग परीक्षेमध्ये ह्या आढळलेल्या चित्रांचं वय ख्रिस्तपूर्व ३०,००० वर्षं असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पिक्टोग्राफ्स, हातांच्या खाणाखुणा, स्वरयंत्राचा वापर करून काढलेले आवाज, अक्षरनिर्मिती वगैरे वगैरे गोष्टींमधून संभाषणकला आजच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचली. व्यवहारांबरोबरच करमणुकीमध्येही संभाषणाचा वापर व्हायला लागला. चित्रपट, डेलीसोप्स, नाटकं, व्हिडिओ गेम्स वगैरे गोष्टींमध्ये भाषांचा वापर आपण पाहतोच. ह्यापैकी चित्रपटांमध्ये आणि व्हिडिओ गेम्समध्ये फँटसी अर्थात काल्पनिक संस्कृती वगैरेंचा वापर करून अस्तित्वात नसलेल्या गोष्टी चित्रपटांच्या, सिटकॉम्स आणि व्हिडिओ गेम्सच्या पडद्यावर आणायला सुरुवात झाली. अवतार, स्टार वॉर्स/ स्टार ट्रेक, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, गेम ऑफ थ्रोन्स यासारख्या कार्यक्रमांमधून, एल्डर स्क्रॉल्स-स्कायरिम, फारक्राय प्रायमल, जेड ड्रॅगन वगैरे व्हिडिओ गेम्समधून काल्पनिक विश्वांचा मोठा खजिना लोकांसमोर खुला झाला.

आता संपूर्ण वेगळ्या संस्कृती दाखवायच्या, तर त्यांच्यामधली भाषा खरीखुरी असून कशी चालेल? त्यासाठी नित्यनैमित्तिक वापरल्या जाणाऱ्या भाषांबरोबरच खास बनवल्या गेलेल्या भाषांचा वापर सुरू झाला. अवतारमधली नावी, स्टार वॉर्समधली क्लिंगॉन, लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये वापरलेल्या एल्व्हन स्पीच, तसंच ब्लॅक स्पीच ऑफ मोर्डॉर, गेम ऑफ थ्रोन्समधली वलेरियन भाषा वगैरेंनी लोकांना वेगळ्या अनुभवाची सफर घडवून आणली. व्हिडिओ गेम्सविषयी बोलायचं, तर एल्डर स्क्रॉल्स : स्कायरिममधली डोवाहझुल (ड्रॅगनटंग), फार क्राय प्रायमलसाठी खास अश्मयुगीन भाषा वगैरेंनी माझ्यासारख्या व्हिडिओ गेमप्रेमींना (गेमाडपंथींना) एक हटके अनुभव दिला.

ह्यापैकी क्लिंगॉन, वलेरियन, डोवाहझुल वगैरे भाषांनी लोकांना एवढं वेड लावलं की त्या भाषांना वाहून घेतलेले क्लब्ज वगैरे लोकांनी चालू केले. वाचून विश्वास बसणार नाही, पण ह्या वेड्या लोकांनी चक्क ह्या भाषांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्यातले काही लोक ह्या भाषांमध्ये अस्खलितपणे संवादही साधू शकतात. गेम ऑफ थ्रोन्स लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, त्यातल्या वलारमोर्गुलिस, वलारडोहारिस वगैरे वाक्यांनी लोक एकमेकांना हाय-हॅलो करायला लागले की! (हा वेडेपणाच म्हणायचा, कारण वलारमोर्गुलिसचा अर्थ ‘ऑल मेन मस्ट डाय’ असा होतो. एकमेकांना वलारमोर्गुलिस म्हणून हाय म्हणणं केवढं वेडेपणाचं आहे. त्यातला एक वेडा मीसुद्धा आहे. तस्मात णो कमेंट्स). हापिसातल्या एका मॅनेजर मुलीच्या हापिशियल औटलुक सिग्नेचरमध्ये 'वलारमोर्ग्युलिस' लिहिलंय. आता सांगणार कोण? ;)!!!
त्यातल्याच एका क्लिंगॉनवेड्याचा हा एक व्हिडिओ :

लोक ज्या काल्पनिक भाषांचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये अर्थपूर्ण संभाषण करू शकतात, ती भाषा तयार करण्यासाठी किती कष्ट करायला लागले असतील, ह्याचा एक अंदाज यावा, म्हणून हा सगळा लेखाट्टाहास. ह्यातल्या एकेका भाषेची निर्मिती, निर्माते, काही प्रसिद्ध वाक्यं वगैरेंचा एक आढावा आपण घेऊ.

क्लिंगॉन स्टार वॉर्सियन ट्रेकियनः

स्टार ट्रेकमध्ये जो काही एलियन कंपू दाखवलेला आहे, त्यांना ‘क्लिंगॉन’ असं नाव दिलंय. (ह्या सिरीजमध्ये प्रीक्वेलचे आणि सिक्वेलचे बक्कळ घोळ असल्याने मला अंमळ गंडायला होतं टाइमलाइनबद्दल). स्टार ट्रेक मोशन पिक्चरच्या आधी जेवढे चित्रपट आले असतील, त्यामध्ये क्लिंगॉन जमाती इंग्लिशमध्येच बोलताना दाखवलेलं आहे. जेम्स डोहान हा स्टार ट्रेकीय अभिनेता आणि प्रोड्युसर जॉन पॉविल ह्यांनी मिळून क्लिंगॉन भाषा, त्यामधले शब्द आणि भाषेला बांधून ठेवणारं व्याकरण वगैरे बनवायला सुरुवात केली. पुढे जाऊन मार्क ओक्रँड नावाच्या भाषातज्ज्ञाला ह्या सिरीजचे संवाद लिहिण्याचं काम दिलं गेलं. हा त्यांचा प्रयोग लोकांनी डोक्यावर उचलून घेतला. पुढे आलेल्या प्रत्येक स्टार ट्रेकीय चित्रपटात आणि टीव्ही सिरीजमध्ये क्लिंगॉन भाषेचा वापर चालू झाला.

ही चित्रपट आणि टीव्ही मालिका क्लिंगॉनमुळे एवढी लोकप्रिय झाली की लोकांनी क्लिंगॉन क्लब चालू केले. त्या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास चालू केला. डिक्शनरीज बनवल्या. (ह्या डिक्शनरीचे कॉपीराईट्स सी.बी.एस. कडेच आहेत.) अ क्लिंगॉन वे नावाचं पुस्तक लिहिलं, त्यामध्ये क्लिंगॉन भाषेची लिपी, लोकप्रिय संवाद, त्यांचं क्लिंगॉन टु इंग्लिश भाषांतर, क्लिंगॉनमधल्या म्हणी वगैरे वगैरे गोष्टींचा समावेश आहे. हाताच्या (खरं तर एका हाताच्या) बोटावर मोजता येईल एवढे लोक अस्खलितपणे एकमेकांशी संवादही साधू शकतात. क्लिंगॉनवेडातून त्यातल्या दोघांचं लग्नही झालेलं आहे. (घरी बहुधा प्रेमसंवाद आणि भांडणं क्लिंगॉनमधून होत असावीत) ;).
ह्या वेडाची हैट्टं म्हणजे ह्या लोकांनी शेक्सपिअरचं प्रसिद्ध नाटक 'हॅम्लेट' क्लिंगॉनमध्ये रूपांतरित केलं.

a

क्लिंगॉन अक्षरं (स्मॉल)

aa

क्लिंगॉनअक्षरं (कॅपिटल)

aaa

स्टार ट्रेकमधला एक प्रसिद्ध प्रसंग : (१०८० पी - बँडविड्थचा अंदाज घेऊन पाहणे).

स्टार ट्रेक सोडूनही अनेक चित्रपटांमध्ये, इंग्लिश मालिकांमध्ये क्लिंगॉन भाषेमधले संवाद दाखवले गेले. सगळे संवाद लिहून काढणं अशक्य आहे. पण एक ड्वायलॉक मराठी कॉलेज नमुन्यांमध्ये थोडीशी भाषा बदलून असल्याने तो लिहायचा मोह आवरत नाही. ;)

हाउ आय मेट युअर मदर नावाच्या सिरियलमध्ये रॉबीन (गोड आहे राव पोरगी ;). रेवाक्कांची कै ओळख निघते का... पाहणं आलं) नावाची मुलगी एका क्लिंगॉन नर्डाबरोबरची डेट अचानक रद्द करते. त्यावर तो तिला फोनवर क्लिंगॉनमधून झापतो. ते वाक्य असं :
'हाबसोस'लीक्वाचं' (इंग्लिश भाषांतर : युअर मदर हॅज स्मूथ फोरहेड.) ह्याचं मराठीत भाषांतर करायची अज्याबात आवश्यकता नाही. बहुतेक लोकांनी कॉलेजात असताना वापरलेलं वाक्यं आहे हे ;).

झालंच तर साउथ पार्क (कोणी फ्यान आहेत का इथे?) नामक सिरीजमध्ये 'पॅशन ऑफ द ख्राइस्ट' नावाचा एपिसोड आहे, त्यामध्ये क्लिंगॉनमधला 'क्वोपा' अर्थात 'पकड त्याला/ तिला' अशा अर्थाने सतत वापरलेला आहे. आता कॉलेजकुमारांनी 'क्वोप अप विथ हर'चा हा नवा अर्थ वापरून पाहायला (स्वतःच्या जबाबदारीवर) हरकत नाही. ;)

तर १९८५पासून सुरू झालेला हा क्लिंगॉन भाषेचा प्रवास असाच सुरू राहो, हीच स्पॉकचरणी प्रार्थना.

डोथ्रोकी आणि हायवलेरियन भाषा (गेम ऑफ थ्रोन्स) :

गेम ऑफ थ्रोन्सचा पंखागट खूप मोठा आहे. मिपावरचेही अनेक लोक्स हा शो न चुकता परत परत पाहतात, त्याविषयी व्हॉट्स अॅपवर, चेपुवर आणि ईमेलींवर लांबलचक चर्चा करतात. स्रुजा वगैरे लोक्स स्पॉयलर अॅलर्ट वगैरे भानगडीमध्ये न पडता कोण खपलं यंदाच्या सिझनमध्ये.. वगैरे माहिती बिनदिक्कत पुरवतात ;). असो.
ह्या पाप्युलर (व्हय. ‘पाप्यु’लरच. लै पापी लोक्स भरल्यात शोमंदी.) शोमध्ये इंग्लिशबरोबरच सांस्कृतिक फरक दाखवण्यासाठी वलेरियन भाषा वापरण्यात आलेली आहे. ह्या मालिकेचे आणि मालिका ज्या पुस्तकांवर बेतलेली आहे, त्याचे लेखक जॉर्ज मार्टिन (म्हातारं लैच आळशी आहे. क्रमशः वापरून वापरून लोकांना हैराण करणं ह्यांचा आवडता छंद आहे.) बावाजी ह्यांच्या सुपीक डोक्यामधून ह्या भाषेचा उदय झाला. त्यांच्याबरोबरच डेव्हिड पीटरसन नावाचे भाषातज्ज्ञ ह्या भाषेच्या निर्मितीमध्ये हातभार लावत असतात. ह्या दोघांच्या कष्टाला सलाम केलाच पाहिजे, कारण त्यांनी एखादी खरी भाषा असावी, एवढ्या शब्द- आणि व्याकरण-समृद्धीची भाषा ह्या लोकांनी बनवली आहे. प्रचंड मोठा शब्दसंग्रह, मराठी-इंग्लिशएवढंच तगडं व्याकरण ह्या गोष्टींमुळे उद्या परीक्षांसाठी ही फोर्थ लँग्वेज म्हणून अभ्यासक्रमात लावली, तरी मला नवल वाटणार नाही.

ह्याच सिरिजमध्ये डोथ्रोकी नावाची एक जमात दाखवलीये. त्यांच्यासाठी डोथ्रोकी नावाच्या भाषेचीही निर्मिती केली गेली. ही भाषा मात्र हायवलेरियनएवढी सखोल बनवलेली नाही. ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्सचं पुस्तक वाचलं असेल, त्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल. तसंही डोथ्रोकी भाषेला वलेरियनच्या तुलनेने कमी स्क्रीनटाइम मिळत असल्याने कदाचित ह्यावर फारशी मेहनत घेतली गेली नसावी.

आपल्याकडे मराठी भाषेला ‘दर १२ मैलांवर बदलणारी भाषा’ असं म्हणतात. वलेरियन भाषेचंही तसंच आहे. वलेरिया भाषा अगदी दर १२ मैलांवर बदलत नसली, तरी सगळ्या ९ पुढारलेल्या शहरांमध्ये तिचा वेगवेगळा लहेजा दाखवलेला आहे. ढोबळमानाने त्यांना अॅस्टापोरीवलेरियन आणि मीरसीवलेरियन अशा प्रकारांत विभागलेलं आहे. श्रीमंत लोकांची वलेरियन आणि गुलाम जी वलेरियन बोलतात, त्यामध्ये फरक दाखवलेला आहे.

पीटरसन साहेबांनी ही भाषा निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, ह्या मेहनतीमध्ये त्यांचे आणि मार्टिन साहेबांचे अनेक वेळा खटके उडालेले आहेत. ह्या मालिकेमधलं पहिलं पुस्तक 'अ साँग ऑफ आईस अँड फायर' जेव्हा लिहिलं गेलं. त्या वेळी जे काही शब्द वापरले गेले होते, ते लॅटिनमधून थोडासा शब्दबदल करून घेण्यात आले होते. उदा. ड्रॅकारस (ड्रॅगनफायर) हा अनेक वेळा वापरला गेलेला वलेरियन शब्द ड्रॅक ह्या लॅटिन शब्दावरून उचलला गेलाय. पीटरसनसारख्या अनुभवी भाषातज्ज्ञाला (ह्यांनी ९ काल्पनिक भाषा निर्माण केल्या आणि एकही शब्द ह्या भाषेतून त्या भाषेमध्ये नेला नाही.) अर्थातच हा प्रकार पसंत नव्हता. त्यामुळे पुढच्या पुस्तकांपासून ह्या पूर्ण भाषेची आणि व्याकरणाची जबाबदारी पीटरसनने उचलली.

हायवलेरियनच्या व्याकरणामध्ये कर्ता, कर्म, नाम, सर्वनाम, क्रियापद, एकवचन, अनेकवचन, संबोधन इत्यादी इत्यादी गोष्टींचा काटेकोर विचार करून ष्टँडर्डाइझ्ड नियम बनवलेले आहेत. गेम ऑफ थ्रोन्सच्या पंख्यांनी एकदा 'वलेरियन भाषा : व्याकरण' ह्या पानाला भेट देऊन तोंडओळख करून घ्यायला हरकत नाही.

सध्यातरी इंग्लिश मुळाक्षरं वापरूनच ही भाषा लिहिली जाते. सदर भाषेसाठी इजिप्शिअन भाषेसारख्या चित्रलिपीचा वापर करायची कल्पना पीटरसननी मांडलेली. (एका भागामध्ये तालिसा वेगळ्या अक्षरांमध्ये वलेरियन चिट्ठी लिहिताना दाखवली आहे, पण ती लिपी लॅटिन मुळाक्षरं आहेत). त्याचं पुढे काय झालं, हे आत्तातरी माहीत नाही. अशी एखादी लिपी अस्तित्वात यावी, म्हणजे जी काही वेगळी संस्कृती वगैरे दाखवायचा प्रयत्न ह्या सिरीजमुळे होतोय, तो 'लै भारी' होईल.

काही हौशी लोकांनी ह्याही भाषेचा अभ्यास करून सुमारे ३८०० शब्द वापरून इंग्लिश ते वलेरियन ट्रान्सलेटरही बनवलाय. तो इथे पाहता येईल. वलेरियनट्रान्सलेटरValar ēdruta pikībagon misalpav. बघा करून भाषांतर ;).

Bōsa glaesagon dārys bōsa glaesagon Valyrīha

डोव्हाझुल अर्थात ड्रॅगनटंग (एल्डर स्क्रोल्स : स्कायरिम) अर्थात गेमाडपंथी लोकांची फेवरेटः

जे व्हिडिओ गेमप्रेमी लोक्स मिपावर आहेत आणि त्यातल्या त्यात आर.पी.जी. अर्थात रोल प्लेयिंग गेम्स ज्यांना आवडतात, त्यांनी हा गेम नक्की खेळलेला असणारे. किंबहुना खेळला नसेल, तर नक्की स्टीमवरून विकत घेऊन खेळा, असा सल्ला देईन. तलवारी, चाकू, चिलखतं, जादू, ड्रॅगरअनडेड्स, व्हँपायर्स, वेअरवुल्फ्स, अॅसेसिन्स, लिजन्स आणि इंपेरिअल्स आणि स्ट्रॉर्म क्लोकांमधला सत्तासंघर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षानुवर्षं रखडलेल्या सत्तासंघर्षांमध्ये एक निर्णायक वळण आणू शकणारा आपला हिरो म्हणजे ड्रॅगनबॉर्न, असं काहीसं ह्या गेमचं स्वरूप आहे. ह्यामध्ये अर्थातच बोलू शकणारे ड्रॅगन्स आणि त्यांची भाषा हा आकर्षणाचा मुद्दा आहे. ड्रॅगनच्या शब्दांमध्ये जादुई ताकद असते आणि त्या ताकदीच्या जोरावर एकेकाळी सगळ्या स्कायरिम जगावर अल्डुइन नावाचा एक ड्रॅगन राज्य करत असतो. माणसं, एल्फ्स, ऑर्क्स वगैरे लोक ह्या ड्रॅगनचे गुलाम असतात आणि हलाखीत जगत असतात....वगैरे वगैरे.

आता एवढी ड्रॅगन भाषेची डोवाहझुल (ड्रॅगनटंग) महिती वर्णन केलीच आहे, तर आता तिच्या निर्मितीमागचे कष्टही पाहू. ड्रॅगनच्या तोंडी (अथवा ‘जबडी’) असणार्‍या शब्दांचे दोन प्रकार गृहीत धरलेत. एक म्हणजे झुल (शब्द) आणि थुम्म्म (ताकदवान शब्द). सामान्य शब्द फक्त सामान्य परिस्थितीमध्ये ड्रॅगन्सकडून वापरले जातात, तर थुम्म्ममात्र फक्त आणि फक्त युद्धामध्ये अथवा मारामारीमध्ये वापरले जातात. त्याचे काही व्हिडिओ शेअर करतो.

ड्रॅगन आणि ड्रॅगनबॉर्न यांच्यामधला संवाद(१०८०पी ३०६ एम.बी. बँडविड्थचा अंदाज घेऊन पाहणे)

ह्या भाषेचा एक असा निर्माता गेमच्या क्रेडिट व्हिडिओमध्ये दिसत नाही. पण बेथेस्डा स्टुडियोच्या लोकलायझेशन आणि आर्ट टीमचा ह्यामध्ये प्रमुख सहभाग असावा, असं वाटतं.

ड्रॅगनटंगची लिपी ही गेमच्या थीमला अनुसरून ठेवण्यात आलेली आहे. नखं आणि ताकदवान पंजे असणार्‍या एखाद्या प्राण्याने दगडावर आपल्या नखांनीच रेघ उमटवून अक्षरं लिहावीत, अशा स्वरूपामध्ये ही अक्षरं कोरलेली आढळतात.

ड्रॅगन लिपीचा गेममधला एक आर्टिस्टिक नमुना :

aaaaaa

ह्या गेमने विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यामध्ये ह्या ड्रॅगनटंगचा मोलाचा वाटा आहे, हे नक्की.

आणखी गमतीची गोष्ट म्हणजे, वरच्या दोन नमुन्यांप्रमाणे ह्याही भाषेच्या पंख्यांनी ह्या काल्पनिक भाषेचा सखोल अभ्यास केलाय. ती भाषा इतरांनी शिकावी, म्हणून फोरम्स चालू केलेत. क्लिंगॉन आणि वलेरियन यांच्या तुलनेत ही भाषा अस्खलितपणे बोलणार्‍या, लिहिणार्‍या लोकांची संख्या फार मोठी आहे. एका हौशी यू ट्यूब ब्लॉगरने ही भाषा शिकवणारी स्वतःची चॅनलही चालू केलीय. ह्या भाषेचा प्रसार व्हावा, ह्यासाठी चाहत्यांच्या एका ग्रूपने थुम्म.ऑर्गनावाने वेबसाइटही चालू केलीये.

एका फोरमवर मागे एकदा ह्या भाषेमध्ये लेखी वादविवाद स्पर्धाही पाहिलीये. दुर्दैवाने तो फोरम आता अस्तित्वात नाही. पण वर दिलेल्या थुम्म.ऑर्ग वेबसाइटवर नित्यनेमाने भर घालणार्‍यांची संख्याही पाच आकडी आहे.

तर अशी ही सगळी भाषांची गंमतजंमत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अस्तित्वात असलेल्या भाषांमधला संवाद तुटत चाललाय आणि ह्या काल्पनिक आणि मर्यादा असणार्‍या भाषांमध्ये संवाद साधायची आस मात्र वाढत चाललीये. तिकडेतरी फक्त आणि फक्त सुसंवादच असोत, अशी एक माफक अपेक्षा.

रच्याकने मीच लिहिणार होतो, पण टंकाळा आलाय. कोणी ह्याच्यावर लिहू शकेल काय?
a

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Jan 2017 - 10:31 am | यशोधरा

क्लिंगॉन मधे के नाही का?
बाकी दुवे घरुन पाहण्यात येतील. खूपच इंटरेष्टींग आहे हे!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. थेट के नाही. तो वापरायला लागलाचं तर C किंवा Q बरोबर वापरला जातो.

उदाहरणार्थ एक शब्दं क्वापला (सक्सेस अश्या अर्थाने वापरला जाणारा). आज्ञा देताना त्याचं स्पेलिंग Quap'la असं होतं तर वर्णन करताना (अर्थात भुतकाळ) Qkapla असं वापरतात. अ‍ॅपॉस्टॉपी नुसार काळ आणि उच्चार बदलतो. मिळाला तर ऑडियो डकवेन नंतर. :)!!

पैसा's picture

23 Jan 2017 - 1:12 pm | पैसा

*****

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

*** ** **** ** ***???

कवितानागेश's picture

23 Jan 2017 - 1:25 pm | कवितानागेश

मस्त प्रकार आहे हा.

सामान्य वाचक's picture

23 Jan 2017 - 2:01 pm | सामान्य वाचक

क्लिंगॉन भाषे ची ओळख झाली

स्टार ट्रेक न बघितल्यामुळे माहित नव्हती

पद्मावति's picture

23 Jan 2017 - 2:13 pm | पद्मावति

फारच इण्टरेस्टिंग आहे हे. आवडला लेख खूप.

आदूबाळ's picture

23 Jan 2017 - 2:18 pm | आदूबाळ

लैच भारी!

ऑरवेलच्या १९८४ मधल्या 'न्यूस्पीक'विषयी टिपण येईल म्हणून वाट बघत होतो.

पुंबा's picture

23 Jan 2017 - 5:38 pm | पुंबा

मी पण.. लेख अतिशय आवडला.

चौकटराजा's picture

23 Jan 2017 - 6:27 pm | चौकटराजा

न्यू स्पीक चा तसा फारसा गर्द उल्लेख १९८४ मधे असल्याचे स्मरत नाही. लोकाना अधिक शेडस असलेली भाषा समोर असेल तर ते अधिक सखोल विचार करतात तो त्यानी करू नये म्हणून न्यूस्पीक चा जन्म. हे सारे प्रस्तावनेत आहे. जाणे म्हण्जे जाणे येणे म्हणजे नयेणे. अशी ती भाषा त्यात कल्पिलेली आहे.

आदूबाळ's picture

23 Jan 2017 - 10:19 pm | आदूबाळ

माझ्या आठवणीप्रमाणे "द प्रिन्सिपल्स ऑफ न्यूस्पीक" असं एक परिशिष्ट १९८४ला आहे. त्यात ऑरवेलने बराच विचार करून न्यूस्पीक बनवली आहे हे जाणवतं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही न्युस्पीक विषयी मला काडीचीही माहिती नाही. :(!

वेल्लाभट's picture

23 Jan 2017 - 2:35 pm | वेल्लाभट

खरं सांगू का?
ते 'आय हॅव नॉट सीन अ सिंगल एपिसोड ऑफ जीओटी. येस वी एग्झिस्ट' गटातला मी आहे. मी वासाला सुद्धा फिरकलेलो नाही त्या सिरीज च्या. पण या बोलीबद्दल थोडंसं वाचलंय. आणि तुमचा लेख अफलातून झालाय, त्यामुळे आता अजून वाचावंसं वाटतंय या भाषेबद्दल.

क्या बात है! वाह. कितीही आभासी म्हटलं तरी खरं वाटतं असंच आहे हे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बघा बघा. यायाम करता करता जीओटी च्या चर्चा केल्याने सिक्स पॅक अ‍ॅब्ज येतात म्हणे ;) ;)!!!

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 3:49 pm | फेदरवेट साहेब

तुमचे परिश्रम दिसून येतात. भाषाशास्त्राचा इतका जबर उपयोग करणारी डोकी अफलातूनच असतात. ह्याची एक लेखमाला करा, त्यात ह्या भाषा त्यांचा उगम, सध्याची स्थिती, व्याकरण इत्यादींवर माहिती द्यावीत ही विनंती करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ए भावसाहेब ठँक्यु बरंका!!!

ए शाला पण हे शांगताना बेअरिंग सुटला की रे...!! ;)!!! ;)!!

नीलमोहर's picture

23 Jan 2017 - 5:40 pm | नीलमोहर

वरीलपैकी कोणतीही सीरिज, चित्रपट न पाहिलेल्या अडाण्यांपैकी मीही एक आहे. मात्र लेख आवडला.
रोचक, वेगळा विषय, माहितीपूर्ण लिखाण.

अस्वस्थामा's picture

23 Jan 2017 - 5:50 pm | अस्वस्थामा

मस्त लिहिलंय कॅप्टन. या प्रकाराची (काल्पनिक भाषा वगैरे) पहिली ओळख 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' वाचताना झाली. फुल इम्प्रेस होतो त्या बाबाच्या कष्टांबद्दल. म्हन्जे तेव्हा आम्ही विंग्रजी शिकायचा कसाबसा प्रयत्न करत होतो आणि याने एक अख्खी भाषाच जन्माला घातली म्हन्जे अचाटच. :)

मग गेम ऑफ थ्रोन्स मधल्या भाषा समोर आल्या तेव्हा तितकेसे आश्चर्य नाही वाटलं. हा पण त्या लोकांचे कष्ट आणि कल्पनाशक्तीस रिस्पेक्ट.!

क्लिंगॉन बीबीटीमध्ये जास्त पाहिली, तेव्हा थोडं गुगललं होतं त्याबद्दल पण ते उत्सुकतेपुरतंच.

झालंच तर साउथ पार्क (कोणी फ्यान आहेत का इथे?)

मी मी मी ..! ;)
सध्याचा सिझन (२०) बघताय का बादवे ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 6:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद :).

सौथ पार्क आत्ता सिझन १ चं पहातोय. =))

अद्द्या's picture

23 Jan 2017 - 6:08 pm | अद्द्या

चिमण .. सलाम रे .. या सगळ्या शो साठी आणि त्यातल्या दिलेल्या माहिती साठी .

बाकी शेवटचा फोटो बघून स्वतःला थांबवू शकत नाहीए.. म्हणून हे खालचं पालुपद ..
black speech मध्ये हे असं

Ash nazg durbatulûk, ash nazg gimbatul,
Ash nazg thrakatulûk agh burzum-ishi krimpatul

त्यांचं इंग्रजी सगळ्यांना माहीतच आहे..

One ring to rule them all, one ring to find them,
One ring to bring them all and in the darkness bind them

प्रचेतस's picture

23 Jan 2017 - 6:30 pm | प्रचेतस

भारी.
साऊथ पार्क सोडून इतर सर्वच पाहिलेले असल्याने लेखाशी थेट रिलेट होता आलं.

अगदी आपल्या 'बाहुबली' मध्ये देखील राजामौलीने कालकेयासाठी नवी भाषा निर्माण केली होती अर्थात ती कितपत परिपूर्ण ते माहिती नाही.

चौकटराजा's picture

23 Jan 2017 - 6:32 pm | चौकटराजा

मिपावर मलाच एकट्याला एक भाषा येते असा माझा गैरसमज होता. पण प्रभाकर पेटकर व मी एकाच वयोगटातले असल्यानी त्यानाही ती भाषा येते हे समजल्याने आनंद वाटला होता. च ची भाषा आज मौज म्हणूनही कोण्णी वापरीत नाही. तशी आमची " ही" भाषा १९६५ ते १९६८ या काळात पुण्या मंबईकडे बरीच वापरली जायची.

प्रचेतस's picture

23 Jan 2017 - 6:41 pm | प्रचेतस

मी ही च ची भाषा कधीतरी गंमत म्हणून वापरतो.

चौकटराजा's picture

23 Jan 2017 - 9:19 pm | चौकटराजा

पेठकर वाली भाषा "च" ही नव्हे. मराठीच पण दुसर्याला कळायला अवघड .

अमोल मेंढे's picture

23 Jan 2017 - 8:29 pm | अमोल मेंढे

बाहुबली या चित्रपटात सुद्धा कालकेय राजाची भाषा अशाच प्रकारे निर्माण केलेली आहे.

एस's picture

23 Jan 2017 - 11:23 pm | एस

जबरदस्त लेख. शेवटचा परिच्छेदही खास.

सही रे सई's picture

24 Jan 2017 - 12:13 am | सही रे सई

एक नवीनच दालन उघडल आहे या लेखामुळे आम्हा पामरांसाठी.
लेखावर एक नजर टाकली आहे. निवांत खोलात जाऊन वाचण्यात येणार आहे.
सध्या ही पोच लेख भारी झालाय याची.

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2017 - 10:56 am | टवाळ कार्टा

खत्रा लेख, साऊथ पार्कचे काही चविष्ट एपिसोड सोडून बाकी अज्जून काही बघितले नाहीये....वेळ मिळाला की बघेन...बाकी ते रोल प्ले गेमबद्दल लिहिताना सगळ्या शक्यता विचारात घेतलेल्या नाहीत....

अवांतर - मराठीत किंकीसाठी प्रतिशब्द आहे का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jan 2017 - 1:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फक्तं व्हिडिओ गेम बद्दल बोलत असल्याने आपला पास. बाकी किंकी ला ठरकी म्हणत असावेत असा अंदाज.

मराठीत किंकीसाठी प्रतिशब्द आहे का?

वाकुडपणा ;)

लेख भन्नाट, मी जीओटी चा पहिला सीझन पाह्यला आणि त्यानंतर कार्यबाहुल्यामुळे जमले नाही.

पाटीलभाऊ's picture

24 Jan 2017 - 5:00 pm | पाटीलभाऊ

मस्त लेख आहे हा

उगा काहितरीच's picture

24 Jan 2017 - 7:27 pm | उगा काहितरीच

मस्त लेख ... आवडला रे मास्मुका (वर उल्लेख केलेल्याच एका भाषेतील शब्द आहे. ;) )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jan 2017 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्या रे? नेव्हर हर्ड ऑफ इट बीफोर.

उगा काहितरीच's picture

25 Jan 2017 - 7:03 am | उगा काहितरीच

अवतार ... नावी ... आणि अर्थ आहे "भाऊ" मास्मुकान म्हणजे भाईयो , मास्मुकेन म्हणजे बहनो..

खो खो मधे शिद्द्या पन अगम्य बोलताना दाखवलाय की,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2017 - 5:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

नूतन सावंत's picture

26 Jan 2017 - 5:07 pm | नूतन सावंत

अभ्यासपूर्ण आणि अभ्यास करायला लावणारा लेख,धन्यवाद दिल्याशिवाशिवाय राहवत नाही.

बापरे.. जबरदस्त आहे हे सगळं! यातलं काहीच पाहिलेलं नसल्यामुळे असं काही असतं, अशी खास काही भाषा असते हेच माहीत नव्हतं! नवीनच माहिती मिळाली.

sagarpdy's picture

1 Feb 2017 - 6:15 pm | sagarpdy

आथदावंर्राझार

[डोथ्राकी पंखा]

रच्याकने बाकी भाषांबद्दल माहित नाही पण किमान डोथ्राकी शिकायला मोबाईल ऍप पण उपलब्ध आहेत.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 9:26 am | पिलीयन रायडर

क्लिंगॉन वगैरे बद्दल बिग बँग मध्येच ऐकलं होतं. गेम ऑफ थ्रोन्स वाल्यांची एक वेगळीच भाषा आहे हे ऐकुनही धक्का बसला होता. इतकं डिट्टेलमध्ये लोक त्यावर काम करत असतील ह्याची अजिबातच कल्पना नव्हती. पण कॅप्टन लिहीत आहेत म्हणल्यावर थोडं फार सर्च केलं तेवढंच काय ते. पण प्रत्यक्ष लेख पाहिल्यावर डोळेच पांढरे झाले! अरे काय कमाल माणसं असतात!!

गोष्ट सादरीकरणाचे नेहमीचे पैलु तर सगळ्यांनाच माहिती असतात.. नेपथ्य.. कपडे.. लाईट्स.. मेकप.. वगैरे वगैरे... पण भाषा ह्या त्यातला एक इतका महत्वाचा भाग असेल ह्याच विचार जन्मात कधीही केला नव्हता बुवा!

कप्तानसाहेब, या भाषांची दखल मराठीत घेतलेली प्रथमच पाहिली तुमच्या लेखाच्या निमित्ताने. एक नंबर लिहिलंय! आपण विशेषतः एल्व्हिश, मॉर्डॉरची काळी भाषा, क्लिंगॉन, आणि आमची ही खलीसी बोलते म्हणून डोथ्राकी आणि व्हॅलेरियन या भाषांचे जबरदस्त चाहते आहोत. त्यातही मॉर्डॉरीय आणि एल्व्हीय यांचा परिणाम खासच बघा. आर्वेन उंडॉमिएलच्या तोंडून एल्व्हिश ऐकताना दैवी सूर ऐकतोय असं वाटत राहतं राव.

जाता जाता:

दनेरिस स्टॉर्मबॉर्न आणि भुंकारिसची ही अतिगोग्गोड क्लिप सादर भेट.

https://www.youtube.com/watch?v=YNgU4BtWQuU

वलार मोर्गुलिस, वलार दोहैरिस!