हिड्डेन विल्लेज बद्दल माहिती

चिन्मयी भान्गे's picture
चिन्मयी भान्गे in भटकंती
5 Dec 2016 - 12:19 pm

हिड्डेन विल्लेज बद्दल माहिती हवी आहे. कोणाकडे अनुभव अस्ल्यास क्रुपया द्यावा.

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

5 Dec 2016 - 1:57 pm | इरसाल कार्टं

हिडन व्हिलेज आटगाव रेल्वे स्टेशन पासून काही किलोमीटर्स च्या अंतरावर आहे,
तुम्हाला एक कोट्टेज भाड्याने घ्यावे लागेल.
शक्यतो आधी फोन करून तुमची नोंद करूनच जा. वेळेवर कोट्टेज उपलब्ध असण्याच्या संधी खूप कमी असतात.
बाकी ठिकाण निसर्गरम्य आहे आणि खरोखरच लपलेले आहे.
http://www.hiddenvillage.in/

भुमन्यु's picture

5 Dec 2016 - 2:01 pm | भुमन्यु

सुंदर जागा आहे. वर सांगित्ल्याप्रमाणे आरक्षण करुन जाणे सोयिस्कर पडेल. रिक्शा वाले साधारणतः १०० रु घेतात.

इरसाल कार्टं's picture

5 Dec 2016 - 2:19 pm | इरसाल कार्टं

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या शहरी लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे शांततेचा अनुभव करून देणारे ठिकाण आहे.
माझा गाव शहापूर तालुक्याला लागून असलेल्या वाडा तालुक्यातील असल्याने आमचे दैनंदिन जीवन आणि हिडन व्हिलेज मधील वातावरण बऱ्यापैकी सामान आहे. पावसाळ्यात तर हिडन व्हिलेजच्या चारी बाजूंनी नुसती हिरवळ असते. डोंगरात लपलेले हे गाव खरोखरच शोधायला लागते कारण त्यांनी कुठलाही साइन बोर्ड लावलेला नाही.
तुम्ही जर स्वतःच्या गाडीने मुंबईहून येत असाल तर परतीचा रास्ता थोडा वेगळा निवडून वज्रेश्वरी-गणेशपुरी हि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध असलेली तीर्थस्थळेही बघू शकता. या रस्त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. माझा गाव रस्त्यातच आहे.
माझा व्हाट्सअप नंबर देतोय: ९२२५८४९०३२.

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 2:46 pm | वरुण मोहिते

जाऊन या पुढेच वाशिंद ला आमच्या घरच्यांचा प्रोजेक्ट चालू आहे त्यामुळे बऱ्याचदा जाणं झालंय हिडन व्हिलेज ला . कॉटेज विविध प्रकारचे आहेत त्यामुळे आधीच बुकिंग करून जा .

चिन्मयी भान्गे's picture

6 Dec 2016 - 10:45 am | चिन्मयी भान्गे

धन्यवाद!...
कोणअल्याअस्मिळत अस्लेल्या शाकहारी जेवणाबद्दल माहिती देऊ शकेल का?

चिन्मयी भान्गे's picture

6 Dec 2016 - 10:46 am | चिन्मयी भान्गे

कोणी तिथे मिळत असलेल्या शाकहारी जेवणाबद्दल माहिती देऊ शकेल का?