फिडेल कॅस्ट्रो

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
28 Nov 2016 - 7:06 pm
गाभा: 

फिडेल कॅस्ट्रो नुकतेच वारले. त्यांच्याबद्दल, चे बद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आणि क्युबा या देशाबदल अधिकाधिक चर्चा घडावी म्हणजे थोडी फार माहिती पदरात पडेल या हेतूने हा धागा काढत आहे.
येथे http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/editorial/fidel-castro/... महाराष्ट्र टाईम्स चा अग्रलेख वाचला. चांगला वाटला.

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2016 - 7:07 pm | अप्पा जोगळेकर

आणि हो, RIP फिडेल. हे विसरायला नको होते.

जयन्त बा शिम्पि's picture

28 Nov 2016 - 11:03 pm | जयन्त बा शिम्पि

गेल्याच आठवड्यात " My Little Assassin " ह्या नावाच्या चित्रपटाची DVD आणुन बघितली होती व उत्सुकता म्हणुन सहज म्हणुन विकिपीडिया वर फिडेल कॅस्ट्रो बाबत अधिक माहिती वाचली. आणि गेल्या शनिवारीच, वयाच्या ९० व्या वर्षी ते हे जग सोडून गेले. मटा चा अग्रलेख सुद्धा वाचला. येथेच अधिक माहिती लिहिणार आहे.

फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत समाजवादी विचारांच्या प्रभावात वाढलेल्या पिढीत आकर्षण होते. अमेरिकेसारख्या भांडवलशाही बलाढ्य राष्ट्राच्या अंगणातच साम्यवाद फुलावा आणि टिकून राहावा हेच मुळात आश्चर्य. ते कॅस्ट्रो यांनी करून दाखवले. ज्यांना क्यूबन मिसाईल क्रायसिस माहीत आहे त्यांना अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांनी थेट अणुयुद्धाची दिलेली धमकी, त्यामुळे जग कसे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते आणि सोवियेत महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी पडती बाजू स्वीकारून कशी माघार घेतली हे आठवत असेल. अमेरिकेच्या दहा अध्यक्षांच्या कारकीर्दीत फिडेल कॅस्ट्रो यांना मारायचे हर तऱ्हेचे प्रयत्न झाले. कॅस्ट्रो त्यांना पुरून उरले. क्यूबातली आरोग्यसेवा, शिक्षणव्यवस्था आणि दळणवळणव्यवस्था उत्तम आहे. याचे श्रेय कॅस्ट्रोंना द्यावे लागेल. परंतु त्यांच्या हुकूमशाही राजवटीत त्यांच्या विरोधकांचे आणि सामान्य जनतेचे हालदेखील तेव्हढेच झाले हेही विसरायला नको.

भारताच्या दृष्टीने पाहायचे झाले तर फिडेल कॅस्ट्रो हे भारतमित्र होते. त्यांना श्रद्धांजली!

गामा पैलवान's picture

29 Nov 2016 - 8:20 pm | गामा पैलवान

लोकहो,

फिडेल नशागुंड (ड्रगलॉर्ड) होता. १९८५ नंतर सोव्हियेत मदत आटू लागली. मग साहेबांनी ड्रग ट्राफिकिंग सुरू केलं. पनामाचा मनुएल नोरीयेगा होता तसाच हा क्यास्ट्रो. मात्र नोरीयेगा जसा सीआयेच्या विरोधात गेला तितकी वेळ क्यास्ट्रोने स्वतःवर येऊ दिली नाही.

बतीस्ता आणि क्यास्ट्रोची लढाई अशी झाली नाहीच. अमेरिकेने बतीस्ताची रसद तोडून क्यास्ट्रोला पुरवायला सुरुवात केली. यावरून इतर सेनाधिकाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. क्यास्ट्रोचं दहशतवादाचं (म्हंजे क्रांतिकार्याचं बरंका) प्रशिक्षण मेक्सिकोत झालं. यावरून यायला पाहिजे ते लक्षात येतं.

अमेरिका जर स्वातंत्र्याचा संदेश घेऊन पॅसिफिक ओलांडून व्हियेतनाममध्ये दहा वर्षे लढाई करायला जाते, तर फ्लोरिडापासून अवघ्या १०० किमीच्या आत असलेल्या क्युबात का गेली नाही? कारण की कॅस्ट्रो अमेरिकेचा चमचा होता.

कॅस्ट्रो ऐषारामी होता. बाकी, गप्पा मारायला श्रमिकांची क्रांती वगैरे ठीक आहे. तो चे गव्हारा देखील असाच गावगुंड. त्याने एकही लढाई जिंकली नाही.

असो.

माफियांना उगीचंच डोक्यावर घेण्यात काय अर्थ आहे.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

5 Dec 2016 - 12:23 pm | मिल्टन

क्युबामधील आरोग्यसेवा उत्तम आहे असे म्हणतात. उत्तम आरोग्यसेवेसाठी सिटी स्कॅन, एम.आर.आय, डायलिसिस, पेसमेकर इत्यादी उपकरणे वापरली जात असतील असे वाटते. ही सगळी उपकरणे क्युबामध्ये बनविली जातात का? की ही उपकरणे इतकी वर्षे रशियातून आयात केली जात होती का? की परत भांडवलशाही असलेल्या अमेरिकेतील भांडवलदारांच्या माजावर उभ्या असलेल्या अमेरिकन कंपन्यांकडूनच विकत घेतली जात होती? हे विचारायचे कारण काही वर्षांपूर्वी कॅलिफॉर्नियामधील एका अशा वैद्यकीय उपकरणे बनविणार्‍या कंपनीच्या जर्मन सबसिडिअरीने क्युबामध्ये काही उपकरणे निर्यात करायचा निर्णय घेतल्यावर कॅलिफॉर्नियातील पालक कंपनी आणि जर्मन सबसिडीअरीमध्ये वाद झाले होते असे वाचल्याचे आठवते.

की क्युबामध्ये अशी उपकरणे न वापरताच अन्य कोणत्या उपचारपध्दतीद्वारे उपचार केले जातात? याविषयी कोणाला काही माहिती आहे का?

गामा पैलवान's picture

24 Jul 2017 - 6:17 pm | गामा पैलवान

लोकहो,

मे महिन्याच्या अखेरीस नोरीयेगा साहेबांनी कॅस्ट्रोप्रमाणे परलोकाची वाट सुधरली.

https://www.theguardian.com/world/2017/may/30/manuel-noriega-former-pana...

अमेरिकेचा उघड चमचा असल्याने फारशी चर्चा झाली नाही. चालायचंच!

आ.न.,
-गा.पै.