रंगावली प्रदर्शन - २०१६, ठाणे !!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in मिपा कलादालन
5 Nov 2016 - 1:37 pm

रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे !!

यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात कला-छंदने गेल्या पंचवीस (१९९२-२००१६) वर्षात रांगोळीच्या माध्यमातून घेतलेया उपक्रमांचा धावता आढावा घेतला. मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळत दिवाळी दरम्यान रांगोळी प्रदर्शन भरवले जाते. गेल्या पंचवीस वर्षात जवळपास पाऊणशे कलाकार या मंडळाने घडवले. सध्या फक्त २५ कलाकार गेल्या १२ वर्षांपासून नियमितपणे या प्रदर्शानासाठी रांगोळी काढायला येतात. प्रदर्शनात रांगोळी काढण्यासाठी जवळपास चार ते पाच दिवस लागतात आणि इथले कलाकार घरचे, कार्यालयातले व्याप सांभाळून अगदी आनंदाने हे करण्यासाठी येतात.

कला-छंद रांगोळीकार मंडळ, ठाणे!
Kala Chand

प्रदर्शनाची सुरूवात श्रीगणेशाच्या सुरेख रांगोळीने.
Ganpati

'संत वाङ्मय' या विषयावर काढलेली ज्ञानोबा-तुकारामाची रांगोळी.
Sant Vaadmay

'महाराष्ट्राची संस्कृती' या विषयावर काढलेली पंढरीच्या वारीची सुरेख रांगोळी.
Vaari

या रांगोळीत म्हातार्‍या वारकर्‍याच्या चेहर्‍यावरील बारकावे अगदी दाद देण्याजोगे.
Mhatara Varkari

अमित सावंत या कलाकाराने 'स्क्लप्चर्स' या विषयांतर्गत बुद्धाच्या मूर्तीची काढलेली रांगोळी.
Buddha

प्रदर्शनात मला अतिशय आवडलेली ही रांगोळी. 'शिवराज्याभिषेक' या विषयावर काढलेली प्रचंड सुंदर रांगोळी.
Chatrapati

रायगडावर होळीच्या माळावर असलेल्या छत्रपतीच्या पुतळ्याचे हे हुबेहूब चित्र होते. निव्वळ अप्रतिम !!
Shivraay

दरवर्षीच्या प्रदर्शनात ही एक रांगोळी ठरलेली असतेच. या रांगोळीचे विशेष म्हणजे मंडळात कलाकारांच्या हाताखाली लागेल ते काम करणार्‍या मदतनीसाने मदत करता करता ही कला आत्मसात करत स्वकर्तूत्वावर मदर तेरेसा यांची ही रांगोळी काढली.
Madar Teresa

'स्त्री भ्रुण हत्या' हा विषय डोळ्यासमोर ठेवून सध्या या मंडळाचे सर्वेसर्वा असलेल्या श्री. उमेश सुतार यांनी रांगोळी चितारली.
Stri Bhrun Hatya

'समाजकारण'
Anna Hajare

बाळासाहेबांच्या मार्मिकमधल्या व्यंगचित्रांनी काही काळ मराठी वाचकांच्या मनावर गारूड केलं होतं.
Balasaheb

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो !!
Narendra Modi

सद्यस्थितीत भारत-पाक सीमेवर असणारा वाढता तणाव, पाकचे घुसखोरीचे प्रयत्न आणि आपल्या शूरवीर जवानांनी त्यांना दिलेले सडेतोड प्रत्यूत्तर. कला छंद मंडळाची शहीदांना ही आगळीवेगळी आदरांजली !!
Sainik

काळानुरूप भारतीय क्रिकेटच्या नेतृत्वात झालेले बदल
Cricket

'शास्त्रज्ञ' या विषयवार काढलेली भारताच्या पूर्व राष्ट्रपतींची रांगोळी.
APJ Kalam

भारतीय शास्त्र संगीताच्या परंपरेत सितार हे एक मानाचं वाद्य आणि सितारीचा विषय असल्यावर आपोआप पंडीत रविशंकर हे नाव रसिकांच्या डोळ्यासमोर येतं.
Pandit Ravishankar

त्या विषयाला वाहीलेली ही आणखी एक रांगोळी
Pandit Zakir Husain

सैराटची जादू इथेही पाहायला मिळाली नसती तर नवलच होतं.
Sairat

'कृष्णधवल' विषय
Ambedkar

नल-दमयंती रांगोळी, तैलचित्र या विषयांतर्गत.
NaL Damyanti

कट्यारचे पंडीतजी
Shankar Mahadevan

नाटकाच्या रंगमंचावरून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्‍या या दोन्ही अभिनेत्यांसाठी कला-छंदने 'नाट्य परंपरा' हा विषय निवडला होता.
Natak

लहानपण देगा देवा. यात लहान बाळांच्या चेहर्‍यावरून ओघळणार्‍या पाण्याचा इफेक्ट जबरदस्त दिसत होता.
Lahan Mule

चित्रपट 'बाजीराव-मस्तानी' होता, पण इथे मात्र त्यांनी मस्तानीऐवजी काशीबाईलाच चितारलं, अर्थात काशीबाईच्या भूमिकेतली प्रियांकाही तेवढीच छान दिसत होती. :)
Bajirao Mastani

नानाने रंगवलेला नटसम्राटही अगदी तितक्याच ताकदीचा होता जितक्या ताकदीने श्रीराम लागूंनी साकारला होता.
Nana

प्रतिक्रिया

सुंदर आणि देखण्या रांगोळ्या.

पद्मावति's picture

5 Nov 2016 - 1:54 pm | पद्मावति

काय अप्रतिम रांगोळ्या आहेत. सुंदर.

यशोधरा's picture

5 Nov 2016 - 1:54 pm | यशोधरा

वा! सुरेख!

अप्रतिम सुंदर रांगोळ्या !

शार्दुल_हातोळकर's picture

5 Nov 2016 - 2:46 pm | शार्दुल_हातोळकर

कलाकारांना दंडवत.... __/\__

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2016 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

+१

खरच दंडवत.. अप्रतिम कलाकारी.

नाखु's picture

7 Nov 2016 - 4:25 pm | नाखु

आणि एकाग्रता लागते या प्रकारात.

काही धार्मीक कार्यक्रमात मोठ्ठी रांगोळी चितारताना पाहिले आहे.

कडक सलाम

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Nov 2016 - 3:25 pm | माम्लेदारचा पन्खा

हाडाचे कलाकार आहेत सगळे.....

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 7:33 pm | नूतन सावंत

अतिशय सुरेख रांगोळ्या.इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद,किसन.

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2016 - 7:38 pm | स्वाती दिनेश

सुंदर रांगोळ्या..
ठाण्यातले रांगोळी प्रदर्शन म्हणजे गुणवंत मांजरेकरांचे नाव डोळ्यासमोर येतेच येते. राम मारूती रोड वर न्यू गर्ल्स स्कूल मधल्या हॉलमध्ये ते प्रदर्शन दर दिवाळीच्या सुटीत असायचे. त्याची आठवण झाली.
स्वाती

किसन शिंदे's picture

5 Nov 2016 - 7:57 pm | किसन शिंदे

२०१४ पर्यंत न्यू गर्ल्स स्कूलमध्येच हे रांगोळी प्रदर्शन भरायचे. सध्या त्या शाळेच्या नूतनीकरणामुळे हे प्रदर्शन विष्णू नगर येथे १९ नंबर शाळेत भरले होते.

अजया's picture

6 Nov 2016 - 6:45 pm | अजया

अप्रतिम!
होळीच्या माळावरचे शिवराय _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसनदेवा, रांगोळीची चित्र टाकलीस धन्स. आमचीही रांगोळी प्रदर्शनाला भेट झाली.
मला सर्वच चित्र आवडली. म्हातारं, लैच भारी आलं आहे. ग्रेट.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

6 Nov 2016 - 7:46 pm | सतिश गावडे

अप्रतिम रांगोळ्या. काही कलाकृती तर अक्षरशः ब्रशने चित्रे रंगवली आहेत असे वाटण्याईतकी जीवंत वाटतात.

वरुण मोहिते's picture

7 Nov 2016 - 4:20 pm | वरुण मोहिते

वेळ मिळाला तर जरूर पहा कधी . मुलुंड ला हि डिसेम्बर मध्ये किंवा जानेवारीत महारांगोळी फेस्टिवल असतं सध्या 2-3 वर्ष झाली संभाजी पार्क ला. चेंबूर आणि शिवाजी पार्क दादर ला पण असतं आता. ह्या कलाकारांचं कौतुक करावा तितका कमी आहे.

सचिन चौगुले's picture

7 Nov 2016 - 4:50 pm | सचिन चौगुले

अप्रतिम कलेचे प्रदर्शन वाह वाह!!!!!!!!!!!!

पैसा's picture

7 Nov 2016 - 5:21 pm | पैसा

सुंदर रांगोळ्या!

पाटीलभाऊ's picture

7 Nov 2016 - 5:23 pm | पाटीलभाऊ

निव्वळ अप्रतिम.
धन्यवाद किसनबुआ.

कसल्या भारी रांगोळ्या आहे ह्या.

रविशंकर आणि वारकरी भारी आहेत.

शब्दबम्बाळ's picture

7 Nov 2016 - 6:21 pm | शब्दबम्बाळ

बापरे! काय सुंदर आहेत एक एक!
तो पाण्याचा इफेक्ट तर जबरदस्तच... काय कला असते काही लोकांकडे! सुंदरच...

खटपट्या's picture

7 Nov 2016 - 8:37 pm | खटपट्या

खूप सुंदर रांगोळ्या.
धन्यवाद कीसन

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2016 - 1:14 am | पिवळा डांबिस

कलाकारांना _/\_

रुपी's picture

8 Nov 2016 - 1:21 am | रुपी

अप्रतिम!

सही रे सई's picture

8 Nov 2016 - 1:44 am | सही रे सई

अहाहा काय त्या एक एक सुंदर रांगोळ्या. डोळ्याच पारण फिटलं यांना पाहून. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असा भास निर्माण करता आहेत या.

कविता१९७८'s picture

8 Nov 2016 - 5:01 am | कविता१९७८

अप्रतिम सुंदर रांगोळ्या !

अभिजीत अवलिया's picture

8 Nov 2016 - 8:06 am | अभिजीत अवलिया

सुंदर

प्राची१२३'s picture

8 Nov 2016 - 10:39 am | प्राची१२३

खुप छान रांगोळ्या !!!

सुरेख.. केवळ अप्रतीम.. आपल्या हातात अशी कला हवी होती अशी चुटपूट लागून राहीली.

नीलमोहर's picture

8 Nov 2016 - 1:30 pm | नीलमोहर

एकसेएक सुंदर कलाकृती आहेत,
किती पेशन्स लागत असेल इतके बारीक,नाजूक काम करण्यासाठी,

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2016 - 5:39 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम !

कलाकारांचे कौतुक करायला शब्द नाहीत
सर्व कलाकारांना सलाम !

किसनराव , भारी कलाकृती पोहोचवल्यात तुम्ही आमच्या पर्यंत

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2016 - 5:39 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम !

कलाकारांचे कौतुक करायला शब्द नाहीत
सर्व कलाकारांना सलाम !

किसनराव , भारी कलाकृती पोहोचवल्यात तुम्ही आमच्या पर्यंत

नि३सोलपुरकर's picture

10 Nov 2016 - 3:07 pm | नि३सोलपुरकर

सर्व कलाकारांना मानाचा मुजरा _/\_

सुरेख.. केवळ अप्रतिम !

रुस्तम's picture

10 Nov 2016 - 3:34 pm | रुस्तम

अप्रतिम सुंदर रांगोळ्या _/\_

अन्नू's picture

10 Nov 2016 - 3:59 pm | अन्नू

निव्वळ अप्रतिम :)
मी कॉलेजच्या कॉम्पिटीशन साठी एकदा गांधी आणि एकदा आंबेडकरांची रांगोळी काढली होती. कदाचित रेडीमेड रंगाच्या रांगोळ्या वापरल्या नसल्याने पांढर्‍या रांगोळीत कलर मिक्स करुन रंगसंगती तयार करायलाच मला भरपुर वेळ लागला होता. एक तासही त्यावेळी पुरा पडला नव्हता! :(

डोळ्यावर्‍ विश्वास बसत नाहीय ह्या रांगोळ्या आहेत म्हनुन ---/\---

फारच सुंदर रांगोळ्या!मेहनतीला _/\_

मदनबाण's picture

16 Nov 2016 - 9:36 am | मदनबाण

झकास्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Secret World Of Indian Currency Printers