फोन हरवला ...आहे

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
26 Sep 2008 - 6:53 pm
गाभा: 

नमस्कार..

आज सकाळी ऑफीस ला जात असतांना लोकल ऑटो रिक्शा मधे माझा नोकिया एन गेज क्युडी हा फोन हरवीला आहे..
पोलीस मधे तक्रार नोंदवीली आहे...IMEI NO.. नोट करुन ठेवला होता तो पण दीला पोलीसांना ....विचारल काही चान्सेस आहे का परत मिळ्ण्याचे...म्हणाला सायबर शाखेकडे पाठ्वतो तक्रार बहु...

तुम्हाला काय वाट ते फोन पुन्हा मिळेल आता पर्यंत जे एक्त आलो त्यानुसार एकदा हरवीला की गेला....

महाग नव्हता...पण खुप भावना जुड्ल्या आहेत त्यासोबत माझ्या आईने भेट म्हणुन दीलेला माझा पहीला-वहीला मोबाईल फोन होता तो....

मि माझ्याक्डून आणखी काही करु शकतो काय तो फोन ट्रेस करायला???

प्रतिक्रिया

खादाड_बोका's picture

26 Sep 2008 - 7:19 pm | खादाड_बोका

नवीन फोन घे पटकन्...म्हणजे विसरायला सोपी पडतो....
:S :S :S :S
मला तर स्वप्नातही भुक लागते....

सुनील's picture

26 Sep 2008 - 7:54 pm | सुनील

आणि नवीन फोन घेण्याआधी

http://www.misalpav.com/node/3736

इथे पहा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पांथस्थ's picture

27 Sep 2008 - 1:13 am | पांथस्थ

...IMEI NO.. नोट करुन ठेवला होता तो पण दीला पोलीसांना ....

हा नंबर बदलता येतो असे सॉफ्टवेअर आजकाल मिळते....हि माहिती आम्हाला गुन्हा शाखेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याकडुन मिळाली होती...असो...

(फिरता दूरध्वनी कधीही न हरवलेला) पांथस्थ...

नि३'s picture

27 Sep 2008 - 7:50 am | नि३

IMEI NO. पण बदलता येतो.???.सुरक्षेच्या नावावर आजकाल काही राहीले की नाही....
फोन ला IMEI NO. असतो हेच कीत्येक मोबाईल धारकांना आज माहीत नसेल त्या अगोदरच त्यावर उपाय तयार..

---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:53 am | विसोबा खेचर

महाग नव्हता...पण खुप भावना जुड्ल्या आहेत त्यासोबत माझ्या आईने भेट म्हणुन दीलेला माझा पहीला-वहीला मोबाईल फोन होता तो....

गांधीसाहेब, आपल्या भावना मी समजू शकतो परंतु इतके भावनाशील राहू नका हो! साला, ही दुनिया खूप वाईट आहे!

असो,

रिक्षा स्टँडवर जाऊन सांगून पाहा. त्या रिक्षावाल्याच्या हाती लागला असेल आणि तो रिक्षावाला जर प्रामाणिक असेल तर कदाचित मिळेलही आपला मोबाईल...

शुभेच्छा...

तात्या.

गांधी साहेब , पहिल्या- वाहिल्या गोष्टीच अप्रूप फार असते आणि त्यात आईने दिलेल्या भेटी चे तर फार...............पण जी गोष्ट आता आपल्यजवळ नाही
तिला विसरून जाणे ठीक.........नवीन मोबाइल घेऊन टाका. आणि असे समजा की तुमच्या आई ची भेट आता तुम्ही कुणाला दुसर्याला दिली आहे.....!

दिपक's picture

27 Sep 2008 - 3:59 pm | दिपक

नितीन भाऊ...

ह्याच महिन्यात १६ तारखेला अंधेरी स्टेशनला रिक्षामध्येच माझा ६२३३ गेला.
IMEI नंबरचा काही फायदा होत नाही. पोलीसात तक्रार नोंदवली. तेव्हा पोलीसांनीच मला विचारले "तुम्हाला काय वाटते मिळेल काय?"..

त्या संदर्भात नोकिया आणि एअरटेल दोघांना मेल पाठवला, अद्याप उत्तर नाही..

तिसर-या दिवशी N 73 घेतला. विसरायला मदत झाली.:)