स्वल्पविराम... चित्रमालेचा.

अभ्या..'s picture
अभ्या.. in मिपा कलादालन
15 Sep 2016 - 7:19 pm

नमस्कार मंडळी
अगदी साष्टांग दंडवतच म्हणा की, नुसते एक आवाहन करतो काय अन ह्ये दणकून चित्रे, फोटो, कविता येतात काय. जब्बरदस्तच काम आपल्या मिपाकरांचे. आभार त्या सार्‍या कलाकारांचे, प्रतिभावंताचे की आम्हाला इतक्या सुंदर कलाकृतींचे बॅनर बनवायची संधी मिळाली. कित्येक जण तर माहीतही नव्हते. अगदी मनापासून आभार.
तर मंडळी सांगायची गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रवेशिका आल्या कशा स्वरुपात याचे कुतुहल सर्वांनाच आहे. तर त्या आल्या अशा
a
मेलवर आलेल्या ह्या इमेजेसना आम्ही फक्त थोडे एडिटिंग केले, फ्रेममध्ये बसवले आणि पब्लिश केले. झाले. नंतर रोज एक बॅनर पब्लिश करायचे अन धागा अपडेट काम मात्र आपल्या प्रशांतरावांनी केले,
बाकी आल्या त्या तुमच्या स्तुतीपर प्रतिसादाच्या लाटा. मस्त वाटले वाचून. नेहमीच आमचे बॅनर असतात. सर्वांनी मिळून बनवलेल्या बॅनरची मज्जा वेगळीच. ते सजवायचे काम करायची मज्जा तर अधिकच. नूलकरकाकांचा ओरिगामी गणपती म्हणा की नूतनचा क्विलिंगबप्पा म्हणा, इतका देखणा दिसत होता आला त्याच वेळी की बस्स. सूडक्या, स्पावड्या, वल्ल्या, मंदार आणि स्वच्छंदी मनोज ह्या मित्रांकडून दर्जेदार काम येणारच ह्याची खात्री होती. सरप्राइज दिले ते यशोमैय्या, घासकडवी गुर्जी आणि झुमकुल्याने. मोक्षदांचा आणि अमोलगवळींचा बाप्पा, माधुरी विनायकांचा काव्यलेखनाने आणखी बहार आली. नीलमोहोरांनी एकाच चित्रात लुकच बदलला. हॉट कलरस्कीम मधला गणेश त्यांनी एकदम कूल माय फ्रेंड गणेशा केला. शिवकन्याताईंचे कोलाज वेळेअभावी बॅनरमध्ये नाही घेता आले पण ते आहेच इथे.
sk
तसेच आपला कलाकार मिपाकर जोशी_ले दरवर्षी थर्मोकोलचे मखर स्वतः बनवतो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असणार्‍या जोशी_ले ची कलाकारी पाह्यली की त्याचा देव कसा प्रसन्न दिसतो ते कळते.
sk2
काही मिपाकरांनी त्यांच्या पाल्यांची चित्रे पाठवली, पण त्यांना नाराज ना करता त्यांचे इथे कौतुक करुयात. न जाणो थोड्या वर्षांनी रंगभुषा मंडळात असतील ही बच्चे कंपनी. हे चित्र आहे मिपाकर पद्माक्षींच्या लाडक्या शुभंकराचे.
sk1
आणि हे बनवणारे चिमुकले हात आहेत हेमंत जकातेंच्या दिनेशचे.
sk3
आता ह्या सार्‍या कलाकारांच्या मेहनतीतून, कलासाधनेतून साकारली गेली यंदाची गणेशचित्रमाला. त्या सर्वांचे आभार. वाचकांचे, प्रतिसादकांचे आभार. असाच लोभ राहु द्या. शेवटी आपल्या अजून एका प्रतिभावंत मिपाकर संदीप चांदणे यांच्या सुंदर गणेशचित्राने अन तेवढ्याच प्रभावी काव्यपंक्तींनी ह्या चित्रमालेचा समारोप....अहं...स्वल्पविराम देतो.
sk4
बुर्‍या बुरसटल्या
सुटेनात चाली
केली ही मतीही
हव्यासाच्या हवाली
जना खेळविती
शहाणे मदारी
आणि काय सांगू
गणेशा तुला रे?

वाजत-गाजत
बाप्पा पुन्हा ये
जल्लोष-हर्ष
आसमंती भरू दे
उपचार नको
फक्त उत्सवाचा
सदाचार आचार
होवो जनांचा
इतुकेच मागणे हे
गणेशा तुला रे!
.
धन्यवाद

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 7:22 pm | बोका-ए-आझम

पुढच्या वर्षी लवकर या! Virtual चित्रप्रदर्शन फारच सुंदर _/\_!रंगभूषामंडळ ठेसात! बाप्पा जोसात!

मोदक's picture

15 Sep 2016 - 7:24 pm | मोदक

+११११

सही रे सई's picture

15 Sep 2016 - 7:25 pm | सही रे सई

प्रचंड सहमत
+ ११११११११११

पथिक's picture

16 Sep 2016 - 11:33 am | पथिक

+१११

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Sep 2016 - 7:31 pm | स्वच्छंदी_मनोज

जबरदस्तच. भारीच.

चित्रमालेची कल्पना बघणार्‍या, ती राबवणार्‍या आणी कौतूक करणार्‍या सर्वांना __/\__.

खास आभार प्रशांत आणी अभ्याचे, त्यांच्या मेहेनतीबद्दल. ही फक्त सुरुवात आहे हे लक्ष्यात असुद्या :)

पद्मावति's picture

15 Sep 2016 - 7:31 pm | पद्मावति

येस्स्स, अगदी सहमत.

बेष्ट होती गणेशचित्रमाला.

सिरुसेरि's picture

15 Sep 2016 - 7:43 pm | सिरुसेरि

सर्वच कलाकॄती खुप छान आहेत . शुभेच्छा .

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2016 - 7:47 pm | स्वाती दिनेश

रोज उत्सुकता असे की आज कोणते गनेशरुप पहायला मिळणार? कोणाचा आगळावेगळा छंद वाचायला मिळणार आणि प्रसाद काय असणार?
सगळा उपक्रमच देखणा झाला. 'स्वल्पविराम' ही आवडला.
थोड्या विश्रांतीनंतर दिवाळीअंकाचे वेध लागतीलच.:)
स्वाती

पिलीयन रायडर's picture

15 Sep 2016 - 7:51 pm | पिलीयन रायडर

वा! छानच! पुढच्या वर्षीसुद्धा असेच सुंदर बॅनर पहायला मिळोत!

जोरदार चित्रे आलीयेत. सगळीच आवडली. त्यांना नेटक्या स्वरुपात सादर केल्याबद्दल अभ्याचे आभार.

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 8:07 pm | जव्हेरगंज

हेच म्हणतो!
अगदी आकर्षक पायंडा आहे हा!

अश्या चित्रमाला वारंवार येवो!

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 8:09 pm | जव्हेरगंज

निमोताईंच डिजेवाला गणपती कुठेय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2016 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती वेळचा शोधतोय. डिजेवाला रॉकस्टार गणेशा ?

-दिलीप बिरुटे

भाऊ त्यांनी आक्खे रेडीमेड बॅनरच दिले ना. ते लावले की बोर्डावर.

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2016 - 8:28 pm | टवाळ कार्टा

जब्राट

लालगरूड's picture

15 Sep 2016 - 9:15 pm | लालगरूड

आमचा पण आहे याच्यात misalpav पासून बनवलेला

अमित खोजे's picture

15 Sep 2016 - 9:28 pm | अमित खोजे

अगदी मस्त उपक्रम होता हो हा. आवडला. फोटोवर कलाकुसर करून अगदी रुपच पालटवून टाकले गणपतीचे. अगदी छान बॅनर बनवलेत. असाच प्रयोग दिवाळीलासुद्धा करा!

अतिशय सुरेख चित्रमाला झाली.
मिपाकरांच्या उत्तमोत्तम कलाकृती आणि त्यांना तितक्याच सुरेख रितीने सजवून ब्यानरस्वरूपात आणणाऱ्या रंगभूषा मंडळाचे ख़ास आभार.

खटपट्या's picture

15 Sep 2016 - 9:46 pm | खटपट्या

खूप छान

छान उपक्रम होता. सहभाग घेणार्‍या सर्वांचे आणि रंगभुषा मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद! यानिमित्ताने आपल्यातले अजून लपलेले कलाकार बाहेर येतील ही आशा!

पैसा's picture

15 Sep 2016 - 9:57 pm | पैसा

भाग घेणार्‍या सर्व मंडळीना धन्यवाद!

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 10:03 pm | संदीप डांगे

काय बोलायचं राव! कल्पना आपल्याला ऐकताक्षणीच आवडली व्हती. सगळ्यांनी भरभरुन सहकार्य केलं, एक से एक कलाकृती दिली. लय झ्याक वाटलं... सर्वांचे हा आनंद दिल्याबद्दल अनेक आभार! _/\_ _/\_ _/\_

गणपतीच्या काळात (बोले तो धंदेके टएममेंच) अभ्यावर ह्या सगळ्याचा किती ताण आला असेल ह्याची व्यवस्थित कल्पना आहे. जियो मेरे शेर और रंगभूषामंडळ! तुमचे कष्ट अनसंग हिरोजप्रमाणे आहेत. _/\_

महासंग्राम's picture

16 Sep 2016 - 4:38 pm | महासंग्राम

+१११११११

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2016 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम प्रकल्प !

मिपाकरांमध्ये अनेक उत्तम छुपे कलाकार आहेत हे गुपित या निमित्ताने बाहेर आले !

अप्रतिम! सूडचा ग्लास पेंटिगचा गणपती यात अॅड करायचा राहिलाय का? तो पहायला आवडेल. छोट्या दिनेशचा गणपती गोड आहे!

ganesh

हा फ्रेम केल्यानंतरचा!!
ganesh

रातराणी's picture

15 Sep 2016 - 11:29 pm | रातराणी

सुरेख! मोदक काय करता, चित्र काय काढता, कविता काय लिहिता! _/\_

नीलमोहर's picture

16 Sep 2016 - 12:02 am | नीलमोहर

खूप सुंदर दिसतेय चित्र फ्रेमसकट,
ते मोदक तर घरच्यांनाही दाखवले, बघा असे करतात उकडीचे मोदक म्हणून,
ती स्टेप बाय स्टेप कृती, त्या खतरनाक कळ्या पाहून पेठेतील अस्सल सुगरणींनाही कॉम्प्लेक्स येईल :)

सतिश गावडे's picture

15 Sep 2016 - 11:51 pm | सतिश गावडे

फ्रेम अप्रतिम आहे. मी जर सश्रद्ध असतो तर एक फ्रेम माझ्यासाठी बनवायला सांगितली असती. :)

चांदणे संदीप's picture

16 Sep 2016 - 11:06 am | चांदणे संदीप

दंडवत घ्या! ___/\___

Sandy

अभिजीत अवलिया's picture

15 Sep 2016 - 10:46 pm | अभिजीत अवलिया

चित्रमालेची कल्पना मस्त होती.

सतिश गावडे's picture

15 Sep 2016 - 11:53 pm | सतिश गावडे

अतिशय स्तुत्य उपक्रम होता हा. या निमित्ताने मिपाकरांचे वेगळेच कला गुण पाहायला मिळाले.

कविवर्य संदिपभाऊ चांदणे-पाटील यांची कविताही खुपच सुंदर आहे.

नीलमोहर's picture

15 Sep 2016 - 11:53 pm | नीलमोहर

चित्रमालेची कल्पना एक नंबर होती,आणि ती प्रत्यक्षात उतरलीही अगदी सुंदररित्या,
एकसे एक सुरेख चित्र, फोटो पाठवलेत मिपाकरांनी. त्यांना अजून सुंदर बनवणाऱ्या अभ्या डब्या जब्याचेही तेवढेच कौतुक !!
शिवाय अनेक आभार मालक नीलकांत प्रशांत यांचेही, इतका सुंदर आनंदाचा ठेवा लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल :)
मिपावर भविष्यात असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जावोत यासाठी शुभेच्छा !!

मिपामध्ये इतके छुपे कलाकार आहेत हे माहिती नव्हतं. एक नंबर! अभ्याचं अँकरिंगही मस्तच. कॉलेजात करायचास काय बे अँकरिंग?

संपूर्ण गणेश चित्रमाला तर आवडलीच पण कलाकारांची ओळख करुन देणेही भावले.
दरवर्षी अशी चित्रमाला बघायला आवडेल.

स्मिता चौगुले's picture

16 Sep 2016 - 9:54 am | स्मिता चौगुले

सुंदर कलाक्रुती आणि तितकाच सुंदर हा ओळख लेख .

जोरदार काम आहे अभ्या भौ !!! लय भारी

अनिता ठाकूर's picture

16 Sep 2016 - 5:20 pm | अनिता ठाकूर

फारच सुंदर 'स्वल्पविराम'!

शिव कन्या's picture

19 Sep 2016 - 7:06 pm | शिव कन्या

सगळेच banners एक से एक झालेत हा अभ्या.
खूप आवडले काम.
रच्याकने , बाप्पांनी आणखी एखाद दिवस मुक्काम वाढवला असता तर आमचे नामधारी गणेश पण अवतरले असते काय कि! :):)

तुमचा बाप्पा अवश्य अवतरला असता शिवकन्याताई. तुमचाच भाऊ ना तो. ;)
बाकी इतर पण लैनीत होते, तुमचा कोलाजचा एकमेव होता आणि मस्त दिसत होता. फक्त दिवस एखादा वाढवून घ्यायला पाहिजे होता बाप्पाने.

सुंदर आणि समावेशक असा उपक्रम.

शब्दबम्बाळ's picture

20 Sep 2016 - 6:14 pm | शब्दबम्बाळ

मस्तच काम केलंय की सगळ्यांनी!
अभिनंदन सगळ्यांचेच! सुंदर सुंदर कला आहेत मिपाकरांकडे! :)