दादा कोंडके यांचे चित्रपट

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
26 Jun 2016 - 10:17 am
गाभा: 

मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.

परन्तु त्यानी बनवलेले चित्रपट डीव्हीडी /डाउनलोड या माध्यमातून उपलब्ध नाहीत ,त्याचप्रमाणे मराठी टीव्ही चॅनेल वर देखील दाखवले जात नाहीत . यामागचे कारण नक्की काय आहे? कॉपीराइट संबन्धी किंवा त्यांच्या वारसाहक्कावरून काही वाद असल्याचे मागे ऐकिवात होते . परन्तु अशा कारणासाठी उत्तमोत्तम व सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिन्यापासून जनसामान्य प्रेक्षक वन्चित राहणे योग्य वाटत नाही .

यासंबंधी कोणास माहिती आहे का? व ते चित्रपट डीव्हीडी च्या माध्यमातून किंवा चॅनेलवर लावण्यासन्दर्भात काय करता येइल?

प्रतिक्रिया

दूरदर्शनने (आत्ताच्या सह्याद्री वाहिनीने) दादा कोंडके यांचे चित्रपट कधीही दाखवले नाहीत. अपवाद, त्यांच्या निधनानंतर 'सोंगाड्या' दाखवला, तेव्हढाच. दादांच्या चित्रपटातले द्व्यर्थी संवाद हे एक कारण असावे. पण दुसरे कारण म्हणजे दादांची शिवसेनेशी असलेली बांधिलकी. सेंसॉर बोर्डाने त्यांच्या चित्रपटातील संवादाला आक्षेप घेतला की दादा अ‍ॅड. अधिक शिरोडकरांना घेऊन जात असत बोर्डाच्या अधिकार्‍यांशी युक्तिवाद करायला. तसेच मुंबईतल्या चित्रपटगृहांनी एकदा दादांचा चित्रपट लावायला नकार दिला तेव्हा शिवसेनेने मोठा मोर्चा काढला होता.

बाकी ते डीव्हीडी वगैरेंवर का उपलब्ध नाहीत याबद्दल माहिती नाही.

भोळा भाबडा's picture

26 Jun 2016 - 3:51 pm | भोळा भाबडा

डीव्हीडी मिळतात कि!!!

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 4:06 pm | सतिश गावडे

शाहीरांचे चित्रपट खुप आवडायचे. शहरी माणसांना दादांचा विनोद द्व्यर्थी वाटेल, आवडणार नाही. मात्र खेड्यातील मोकळ्या ढाकळ्या वातावरणातील लोकांना दादा नेहमीच जवळचे वाटतात.

शाहीरांचे "एकटा जीव" हे आत्मचरीत्र वाचले आणि पुस्तक शेवटाकडे जाताना डोळे भरुन आले. इतरांना मनसोक्त हसवणारा हा विनोदाचा बादशहा अतिशय हळव्या मनाचा माणूस होता.

भंकस बाबा's picture

27 Jun 2016 - 8:27 am | भंकस बाबा

दादाचे आत्मचरित्र वाचले आहे, अप्रतिम !
दादानी जो प्रेक्षकवर्ग जमवला तो मुळात कामकरी , कष्टाळु वर्ग होता, मी स्वतः त्यांचे काही चित्रपट सिनेमागृहात बघितले आहेत, तेव्हा हां वर्ग पोट धरून , डोळ्यातून पाणी येइपर्यंत हसायचा.
बुद्धिजीवी काहीही म्हणो, या डोक्यावर चिंतेचे ओझे घेऊन जगणाऱ्या वर्गाला जो आनंद दादानी दिला त्याला तोड़ नाही. दादाचे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टित मैलाचे दगड ठरलेले आहेत.

प्रचेतस's picture

27 Jun 2016 - 8:35 am | प्रचेतस

सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार यांसारखे दादांचे सुरुवातीचे कृष्णधवल चित्रपट सोडले बाकीचे अत्यंत फालतू, उथळ आणि सुमार दर्जाचे विनोद असलेले होते.

सीडीज, डिव्हिडीज अजूनही मिळतात. माझ्याकडे दोन तीन आहेत.

हुप्प्या's picture

27 Jun 2016 - 9:56 am | हुप्प्या

मला वाटते की बोट लावीन तिथे गुदगुल्या ह्या सिनेमात दादांचा वाह्यातपणा वाढला. ढगाला लागली कळ, माझ्या झाडावरती चढू नका अशी गाणी म्हणजे जरा अतीच होते. तशात त्यांचे वाढते वय. नव्या रंगीत सिनेमात त्यांच्याकडे बघवेनासे झाले. आली अंगावर सिनेमात तर नको झाले.
सोंगाड्या, एकटा जीव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार मस्त होते. तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम हेही चांगलेच होते. अशोक सराफ, निळू फुले जोडीला असल्यामुळे सिनेमात मजा होती. गाणीही उत्तम होती.

तमाशात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे दादा कोंडक्यांचे टायमिंग अचूक असायचे. रंगरूप यथातथा असूनही विनोदबुद्धीमुळे ते लोकप्रिय झाले.
त्यांच्या पश्चात त्यांच्या नातेवाईकांनी (माहेरची साडीवाला?) त्यांच्या सिनेमांचे हक्क घेतले आहेत आणि ते त्याचे काहीही करत नाहीत. त्यामुळे ना त्यांचे सिनेमे येतात ना डीव्हीडी.
जे काही सिनेमे उपलब्ध आहेत ते अनधिकृत आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत.