भाग बारावा -
आज ८ फेब्रुवारी २०१६, आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. सोमवार असल्याने नवऱ्याला माझ्या बरोबर मेकिंग ऑफ Harry Potter WB Studios पाहायला येता येणार नव्हतं. दिवसभर एकटीलाच फिरावं लागणार होतं. मी Harry Potter या चित्रपटाची खूप चाहती आहे त्यामुळे इथे जायचेच होते मला काही करून.
इथे जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट काढावे लागते आणि तिकडे जाऊन त्या तिकीटाची प्रिंट दाखवली की प्रवेश मिळतो. तिकीट दर ३५ ते ४० पौंड च्या मध्ये आहे. त्यांच्या वेबसाईट वर आपल्याला हवा तो टाइम स्लॉट बुक करावा लागतो त्याप्रमाणे अर्धा तास आधी आपल्याला पोहोचावे लागते. ३ तासांची ही टूर असते. आमच्या घरापासून तसं खूप लांब होतं हे ठिकाण. इथे जाण्यासाठी Watford Junction नावाच्या एका स्टेशन ला उतरावं लागतं. Lancaster Gate ते Watford Juction पर्यंतचा प्रवास खूप मस्त झाला. इथे पोहोचायला मला २ तास लागले. लंडन शहराच्या बाहेरचं ठिकाण होतं त्यामुळे वेगळी घरं, रस्ते, छोटे बंगले बागा हे सगळं ट्रेन मधून पाहायला मिळालं. लंडन च्या एका टोकाला हे स्टेशन आहे. ९व्या झोन वर हे स्टेशन आहे त्यामुळे तुमचा ट्युब पास मर्यादित झोन पर्यंत असेल तर या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला वरचे तिकीट काढावे लागेल म्हणजेच तुमच्या Oyester कार्ड वर top up करायला लागेल. Watford ला पोहोचल्यावर स्टेशन च्या बाहेरून WB studio टूर ला जायला बस सर्विस आहे ज्याचे रिटन तिकीट अडीच पौंड आहे. तिकडे पोहचायला साधारण १५ मिनिटे लागली.
हि बघा ती बस


तिकीट घेतलं आणि आत जाऊन बघते तर ही भली मोठी लाइन!! आत गेल्या गेल्या चित्रपटातील सर्व पात्रांचे मोट्ठे फोटो लावलेले होते. सर्व वयोगटातील माणसे पाहायला आली होती. अवांतर म्हणजे Harry Potter या चित्रपटाचे सर्व भाग मी खूप वेळा पाहिले आहेत त्यामुळे मला इथे जायची खूप उत्सुकता होती. पण खरं सांगायचं तर इथे आल्यावर हा studio पाहिल्यावर माझी थोडी निराशाच झाली. Harry Potter हा चित्रपट कसा बनला, हा चित्रपट बनवताना काय अडचणी आल्या, या चित्रपटात वापरलेले मोट्ठे सेट्स, Props, मुखवटे, Creatures, प्राणी पक्षी या सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या आहेत. सेट डिझाईन करताना चे मूळ स्केचेस ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक गोष्ट कशी बनवली आहे यावर एक छोटा माहितीपट प्रत्येक विभागात दाखवला आहे. या व्यतिरिक्त वेगळं काहीच नव्हतं त्यामुळे थोडी निराशा झाली.
मी अपेक्षा केली होती कि काही राईड्स असतील पण असा काहीच नव्हता तिथे. इथे काढलेले काही फोटो देत आहे. काही harry potter पंख्यांना आवडतील ;)

harry ची खोली

harry चे घर

Hogwarts School Of Magic


Hogwarts Express

Hagrid

Dobby

harry च विमान ;)

The Famous Digonally


Wonds

Albus Dumbledoor

The Famous Hall

जाण्या येण्याचे मिळून ४ तास आणि studio पाहण्याचे ३ तास असा मिळून माझा अक्खा दिवस आज इथेच गेला. घरी गेले आणि नवरा आल्यावर आम्ही दोघं वापिअनो नावाच्या एका Italian रेस्टो मध्ये जेवायला गेलो लग्नाचा वाढदिवस म्हणून. पीकाडेली सर्कस आणि लाइस्टर स्क्वेअर या स्टेशनच्या मध्ये आहे हे हॉटेल. Italian फूड अगदी उत्तम मिळतं इथे. Ambiance पण मस्त आहे इथला. रात्रीच्या वेळी पीकाडेली सर्कस स्टेशनच्या बाहेरील इमारती खूप छान दिसतात. सगळीकडे दिव्यांनी रोषणाई केलेली असते त्यामुळे आधीच सुंदर असलेल्या इमारती अजून च मस्त दिसतात.




क्रमश:
प्रतिक्रिया
18 Jun 2016 - 9:18 pm | पद्मावति
सही आहे!