भाग अकरावा -
आज सकाळी जरा लौकर उठलो आणि आवरून नाश्ता करून निघालो कारण आज आम्हाला मादाम तुस्साद्स ला जायचे होते. तिथे खूप गर्दी असते तिकिटासाठी. त्यामुळे लौकर पोहोचणं गरजेचं होतं. आमच्या घरापासून जवळ होतं. बेकर स्ट्रीट हे सगळ्यात जवळचं ट्युब स्टेशन आहे इथे जाण्यासाठी. या स्टेशनला उतरल्यावर ३ ते ५ मिनिटे चालत जायला लागतं. आम्ही पोहोचलो तेंव्हा खूप लाईन लागलेली होती तिकिटांसाठी. आम्हाला बराच वेळ लाईन मध्ये थांबावं लागलं. माणशी ३५ पौंड तिकीट आहे इथे. तिकीट काढून आतमध्ये गेलो आणि रेड कार्पेट वरून आतमध्ये गेल्यावर आमचे स्वागत हॉलीवूड सेलिब्रिटीजने केले. एक एक मेणाचे पुतळे बघत पुढे चाललो होतो. हॉलीवूड सेलिब्रिटीज चे पुतळे छानच आहेत

Ema Watson

Julia Roberts

Jhonny Dep

Tom Hanks

Benedict Cumberbatch

Kate Wisnlet
वर नमूद केलेले सगळे पुतळे मला खूप आवडले आणि ते खऱ्या सेलिब्रिटीज शी बरेच मिळते जुळते वाटले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं न तर मला आपले बॉलीवूड सेलिब्रिटीज चे पुतळे इतके नाही आवडले. त्या पुतळ्यांमध्ये आणि खऱ्या सेलिब्रिटीज मध्ये काहीच साम्य नाही दिसलं मला. हॉलीवूड सेलिब्रिटीज चे पुतळे जितके चांगले आहेत तितके चांगले मला बॉलीवूड सेलिब्रिटीज चे पुतळे नाही वाटले.
स्पोर्ट्स विभागामध्ये नदाल , पेले , सचिन ,बोरीस बेकर हे मस्त जमले आहेत. डायना आणि राणीच्या कुटुंबाचे पुतळे सुद्धा खूपच छान आहेत. सगळ्यात जास्त आवडला म्हणजे राणीच्या परिवाराचा पुतळा. मस्तच जमलाय !! बरेच लोकं राणीच्या पुतळ्या बरोबर फोटो काढून घेत होते. Albert Ainstine, Nuton, Charlie chapline , ET , पॉप स्टार मध्ये MJ , Britney, lady Gaga , Ammy Winehouse राजकारण क्षेत्रातील Obama, Mahatma Gandhi, Benazir Bhutto आणि बाकी Dalai Lama, Shrek यांचे पुतळे मला आवडले. सर्व फोटो न देत काही निवडक छायाचित्रेच देत आहे.

Charlie Chaplin

ET

आपला सचिन तेंडूलकर

Rafel Nadal 
राणीचा परिवार
Nelson Mandela

दलाई लामा

महात्मा गांधी

मादाम तुस्साद्स
हा विभाग बघायला आम्हाला २ तास लागले. त्यानंतर खालच्या मजल्यावर हे पुतळे कसे बनवतात आणि मादाम तुस्साद्स चा सगळा इतिहास आणि त्याबद्दल ची माहिती दिलेली आहे. पुतळ्यासाठी खऱ्या माणसांची मेजरमेण्ट्स कशी घेतात, त्यांचा स्किन टोन , केस डोळे कसे बनवतात याबद्दल तपशील माहिती या विभागात दिलेली आहे. याच्या खालच्या भाग होता हॉरर विभाग हा काही मला इतका आवडला नाही. इथून आपण शेवटच्या मजल्यावर जातो जिथून बाहेर पडल्यावर आपल्याला एक छोटी राईड असते जी मला खूप आवडली. लहान मुलांना खूप आवडेल अशी. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे आपल्याला एक 4D फिल्म दाखवतात. तो पण अनुभव खूप छान होता. यानंतर पुढे सुपर हिरो आणि स्टार वार्स चे पुतळे होते. ते पाहून आम्ही बाहेर पडलो. हे सगळं पाहायला आम्हाला ३ तास लागले
इथून आम्ही जाणार होतो लंडन आय पाहायला. Waterloo हे ट्युब स्टेशन लंडन आय ला जाण्यासाठीचे सर्वात जवळचे ट्युब स्टेशन आहे. इथे गेलो आणि तिथला आजूबाजूचा भाग जो southbank या नावाने ओळखला जातो तो फिरलो. लंडन आय मध्ये जाण्यासाठी पण खूप लाईन होती. इथे पण २० मिनिटे लाईन मध्ये थांबून तिकीट काढले, तिकीट शुल्क साधारण २५ ते ३० पौंड च्या मध्ये होतं. मग व्हील मध्ये जाण्याच्या लाईन मध्ये जाऊन उभे राहिलो.. इथेही खूप गर्दी होती त्यामुळे वेळ लागला. लंडन आयची राईड ही साधारण ४० ते ४५ मिनिटांची असते. एका केबिन/ कॅप्सूल मध्ये १५ ते २० लोकं बसवतात. तुम्हाला स्वतंत्र केबिन हवी असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. इथेही १५ ते २० मिनिटे लाइन मध्ये उभे राहून शेवटी आमचा नंबर आला. केबिन मध्ये बसल्यावर चांगली जागा पटकावली आणि क्लिकक्लिकाट सुरु केला. खूप हळू हळू हे जायन्ट व्हील वर जात होते. जसे जसे वर जात होते तसे तसे आजूबाजूचे लंडन दिसत होते. खूप छान अनुभव होता हा. ४० मिनिटे कशी संपली कळलंच नाही.लंडन आय मधून काढलेले फोटो






खाली आल्यावर अंधार पडायला लागला होता आणि लंडन आय वरील लाल दिवे लागले होते. त्या दिव्यांमध्ये लंडन आय खूप छान दिसत होता. आता पोटात कावळे ओरडत होते. वाटेत काहीच खाल्लं नव्हतं. लंडन मध्ये हि एक चेन रेस्टो आहे Gourmet Burger Kitchen. इथे गेलो आणि खाल्ल्यावर आत्मा शांत झाला. सरप्राइजिंगली शाकाहारी बर्गर खूपच छान होता. लंडन मध्ये गेलात तर इथे जरूर जा. आता तुम्ही म्हणाल बर्गरच खायचा असेल तर बाकीच्या फास्ट फूड चेन आहेत की!! पण हा अगदी वर्थ वाटला मला. आणि या होटेलचा ambiance पण छान वाटला मला. हे पहा फोटो पण काढून ठेवलाय.

बीन्स आणि चिकन बर्गर विथ फ्रेंच फ्राइज आणि चीज + हॉट चॉकलेट :) आणि हो बटर कॉर्न
खाऊन झाल्यावर बाजूच्याच टेस्को नावाच्या अजून एका डिपार्टमेंटल स्टोअर मधून घरगुती सामान घेतलं आणि घरी जायला निघालो. आता उद्याची उत्सुकता होती. उद्या मी जाणार होते Warner Brothers Studios बघायला.
क्रमश :
प्रतिक्रिया
16 Jun 2016 - 6:40 am | चौकटराजा
आपले पुतळ्याबद्द्लचे निरिक्षण अगदी बरोबर आहे. सचिन व म गांधी जमलेले नाहीत तर जॉनी डेप, मण्डेला, राणी उत्तम !
मादाम तुसा व आय व कोहिनूर यांचे एकच तिकिट मिळते ना ? ते काढलेले दिसत नाही. बाकी आपल्या सर्वच धाग्यातील
फोटो सुरेख आले आहेत. एकच गोष्ट दिसतेय की लंडनला वर्षामधे फारसे उन मिळत नसावे .धन्यवाद !
16 Jun 2016 - 7:57 am | सुनील
+१
हे तीनच नव्हेत तर 'लंडन पास' मध्ये अजून अनेक ठिकाणे अम्तर्भूत आहेत. खेरीज, हे पास ऑनलाईन घेता येतात. पैसेही वाचतात आणि लायनीत उभे राहण्याची गरज नसल्यामुळे वेळही वाचतो.
बाकी लेखमाला सुरेख.
16 Jun 2016 - 10:44 am | मेघना मन्दार
दहाव्या भागामधे पहिल्या परिच्छेदात मी नमूद केले आहे की आम्ही या सर्व ठिकाणी एकावर एक टिकिट फ्री या सुविधेचा लाभ कसा घेतला यामुळे आमचे बरेच पैसे वाचले. ही सुविधा बहुदा या एकत्रित टिकिटावर उपलब्ध नसावी आणि आम्ही विचारले नाही. लंडन पास किंवा या एकत्रित टिकिटा पेक्षा आम्हाला ही एक वर एक फ्री वाली सुविधा जास्त सोयीची वाटली
17 Jun 2016 - 3:37 pm | पूर्वाविवेक
गांधीजी, तेंडूलकर हेच नाही फक्त, सगळेच भारतीय पुतळे त्यांना जमलेले नाहीत. इंदिरा गांधीकडे तर बघवत नाही. माझे आई-बाबा जावून आले, मादाम तुस्सातले भारतीय पुतळे पाहून त्यांची घोर निराशा झाली.

16 Jun 2016 - 9:20 am | अजया
छान आहे लेख.
लंडन पासची माहिती द्या ब्वा कोणीतरी. उपयोगी पडेल नक्कीच.
16 Jun 2016 - 9:48 am | चौकटराजा
https://www.londonpass.com या साईटवर सर्व माहिती मिळेल या पासाची.
16 Jun 2016 - 10:13 am | खेडूत
छान.
राणीची नातवंडं पूर्वी नव्हती तिथे. माधुरी पण आलीय म्हणे अता.
पलीकडच्या गल्लीत शेरलॉक होम्स संग्रहालय पण आहे. पुनः गेलात तर पहा.
16 Jun 2016 - 1:34 pm | पद्मावति
सुंदर लेखमाला.