थॅन्क्स बट नो थॅन्क्स

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
21 Sep 2008 - 10:22 pm
गाभा: 

बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर फिरताना दिसले.मला बघून खूष झाले.
मला म्हणाले,
" खूप दिवसानी दिसला तुम्हाला बघून बरं वाटलं."
मी पण त्याना म्हणालो,
"भाऊसाहेब,मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला"
मी पुढे त्यांना म्हणालो,
"तुमचा चेहरा जरा उतरलेला दिसतो,बरं आहे ना तुम्हाला?"
त्यावर भाऊसाहेब म्हणाले,
"आता बरं काय आणि वाईट काय जो जातो तो दिवस आपला.सकाळी उठल्यावर जर का प्रकृतीने काही कुरकुर केली नाही की समजावं खाही खरं नाही.पण ते जाऊ दे तुमची कविता काय म्हणते? अलीकडे आम्हाला तुमची नवी कविता ऐकाला नाही मिळाली."
मी त्यांना म्हणालो,
"भाऊसाहेब तुम्ही मला स्फुर्ती दिली नाहीत तर मला कविता कशी सुचणार?"
"असं म्हणता तर आज मी तुम्हाला कविता ऐवजी एका विषयावर चिन्तन करायला स्फुर्ती देतो बघा.आहे का तुमची तयारी?"
मी थोडा विचारात पडलो मनात म्हणालो भाऊसाहेब आज काहीतरी नवीन विषयावर चर्चा करणार असं दिसतं.

त्यांनी अशी सुरवात केली.ते म्हणाले,
"त्यादिवशी माझ्या एका मित्राने मला एक ईमेल पाठवली ती इंग्रजीतून होती.त्याचा मी मराठीतून अनुवाद सांगतो.तो असा.
एका एअरफोर्स पायलटने आय-आयटीच्या स्पेशल सेमीनारला सांगीतलेली गोष्ट.

"माझे आईवडील गावाला जायला निघाले.आणि आम्ही सर्व एअरपोर्टवर त्याना निरोप द्यायला गेलो होतो.खरं तर माझ्या आईवडीलानी विमान प्रवास कधीच केला नव्हता, त्यांच्या अनुभवासाठी मी त्यांना ह्या प्रवासाने पाठवीत होतो.खरं म्हणजे मला त्यांनी गाडीच्या प्रवासाची तिकीटं काढून आणायला सांगितली होती.मी त्याना जेट एअरवेजची तिकीटं काढून आणली.

विमानाची तिकीटं पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं.त्यांच्या चेहर्‍यावरची उत्सुकता आणि एखाद्या शाळकरी मुलासारखी त्यांच्या अंगातली स्फुर्ती पाहून,त्या दिवसाची जाण्याची तयारी करीत करीत एअरपोर्टवर पोहचण्यापासून त्यांच्या, सामानासाठी ट्रॉली घेण्यापासून ते बॅगेजे चेकिंग करून विन्डो सीट मिळण्यासाठी चेकीनची वाट अधीरतेने पहात होतो.माझे वडील हे सर्व आनंदाने अनुभवत होते.आणे मी पण त्यांचा अनुभव आननंदाने अनुभवत होतो.सेक्युरीटी चेकला जाण्यापुर्वी माझे वडील साश्रुनयनाने माझ्याकडे येऊन मला थॅन्क्स म्हणाले.ते खूप भावनावश झालेले पाहून,आणि मी काही प्रचंड केलं असं नसता,त्यांना ते प्रचंड वाटत होतं.मी त्यांना म्हणालो,
"नका मला थॅन्क्स म्हणू"

तो पायलट पुढे म्हणतो,
"नंतर ही घटना आठवून मी ज्यावेळी अन्तर्मुख झालो,त्यावेळी मी माझ्या भुतकाळात डोकावून पाहिल्यावर लक्षांत आलं की आपल्या आईवडीलानी किती स्वप्नं पाहिली असतील? आणि ती किती खरी ठरली असतील?त्यांच्या सांपत्तीक परिस्थीचा विचार न करता त्यांना परवडेल न परवडेल याचा विचार न करता क्रिकेट ब्याट,खेळणी,कपडे वगैरे आणि बाहेरच्या ट्रिपांसाठी कितीदा पैशाची मागणी आपण केली असावी?आणि त्यांनी आपल्या सर्व गरजा पुरवील्या पण.कधी काळी आपण विचार तरी केला का त्याना ह्यासाठी किती त्याग करावा लागला असेल?कधी काळी आपण त्यांचे आभार पण मानले का?
आता आपण आपल्या मुलांसाठी त्यांना चांगल्या शाळेत घालायचा विचार करतो.पैसे कितीही पडो आपण त्यांच्या सुखसोईसाठी धडपडत नाही का?पण आपल्या आईवडीलांच्या त्यागाचा विचार करणासाठी आपली मनस्थिती कुठे होती?तेव्हां ते तरूण असताना त्यांची अपुरी राहिलीली स्वप्नं आता पुरी करण्याची जबाबदारी आपली नाही का होत?"

परत तो पुढे म्हणतो,
"पुर्वी बरेच वेळा वडीलांना मी उद्धट उत्तरं दिल्याची आठवतं.आता माझ्या मुलीने काही विचारलं की मी अतिशय नम्रतेने उत्तर देतो.पण त्यावेळी त्यांना किती वाईट वाटलं असेल याची जाणीव आता मला होते.ह्यावरून आपण एक गोष्ट नक्कीच लक्षांत ठेवली पाहीजे, वृद्धावस्था हे एक दुसरं बालपण आहे.आणि ज्या तर्‍हेने आपण आपल्या मुलांची काळजी घेतो,आणि त्यांच्याकडे जसं लक्ष देतो तसं आपल्या आईवडीलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे.माझ्या वडीलानी माझे थॅन्क्स मानण्या ऐवजी त्यांच्या या लहानश्या स्वप्नपुर्ततेसाठी एव्हडा विलंब लावल्या बद्दल मिच त्यांची माफी मागायला नको का?माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी मला आता पुर्ण जाणीव झाल्याने मीच त्यांच्या आशा आकांक्षापुर्तीकडे जास्त लक्ष देण्याची पराकाष्टा करीन.ते वयस्कर झाले याचा अर्थ परत त्यांनी आपले सर्वस्व देऊन नातवन्डासाठी पण त्याग करत रहावं काय?त्याना पण इच्छा आहेत.त्यांची पण काळजी घेतली पाहिजे."

भाऊसाहेब मग मला म्हणाले,
"ही ईमेल मी माझ्या मित्राना आणि नातेवाईकाना पाठवली.काहीनी त्याला रिसपॉन्स दिला.त्यात तिन स्त्रिया होत्या.
एकीने
" मुलाने वडीलांचे थॅन्क्स मानल्यामुळे मुलगा कसा भावनावश झाला,आणि थॅन्क्स ह्या शब्दाबद्दलची पावर लक्षात घेण्यासारखी असून सर्वानीच त्या शब्दाचा भरपूर वापर करून नाती जास्त मजबूत करावी"
असा विचार मांडला.
दुसरीला लेख आवडला.म्हणून तिने आपल्या मुलीना वाचायला पाठवून दिला.
आणि तिसरीने तो लिख वाचून तिला खूप रडू आल्याने,
"आपण आपल्या आईवडीलांची ते जीवंत असे पर्यंत आणखीन सेवा करणार"
असा विचार मांडला.

दुसर्‍या दिवशी माझी प्रो.देसायांची भेट झाली त्यावेळी मी त्यांना म्हणालो,
"थॅन्क्सचा उपयोग सर्व ठिकाणी करून नाती जास्त मजबूत करावी" हे म्हणणं खरं आहे. पश्चिमी देशात त्याचा भरभरून वापर करायचा मोठा रीवाज आहे.ह्याचं मुख्य कारण त्यांची कुटुंब पद्धती आणि लग्न पद्धती आहे.नातेवाईकांत प्रेम,कर्तव्याची जाणीव असूनही ते कुणालाही बारीक सारीक गोष्टीतही "थॅन्कस"आनंदाने म्हणतात.आणि आनंदाने ऐकूनही घेतात.

आपल्या इथे आईवडील, मुलं, नातवंडं,आणि इतर नाती ह्या नात्यात प्रेम आणि कर्तव्य ह्यांच्या बंधनानी ही नाती पश्चिमी लोकांसारखी एकरूप असतातच.आणि ही नाती अशी आहेत की ती निवडता येत नाहीत.
"आई थोर तुझे उपकार" असं मुलं म्हणतील बाबडी पण आई म्हणेल,
"बाबारे,मी माझं कर्तव्य केलं"
पण आईवडेलानी म्हटलं, "मुलांनो,तुमचे फार उपकार आमच्यावर झाले त्याबद्दल थॅन्क्स"
तर मुलंच आईवडीलाना असं म्हणू देणार नाहीत.
म्हणूनच वरील गोष्टीत तो पायलट वडीलांचा "थॅन्क्स " हा शब्द ऐकून प्रव्होक-चांगल्या अर्थाने-झाला. हे ऐकायला त्याला आवडलं नाही तो शब्द त्याला अनावश्यक वाटला आणि म्हणून त्याला त्याचं वर्तमान,भूत आणि भविष्य आठवलं."थॅन्क्स" असं त्याला दुसर्‍या कोणी म्हटलं असतं तर तो नक्कीच
"द्दाट्स ओके"
सारखं काही बोलला असता.असं मला वाटतं.ह्यांचा अर्थ मुलांचे थॅन्क्स मानु नयेत असं मुळीच नाही.काहीना ते आवडत नसावं.असं मला वाटतं.

आता जे व्यवहारातून जुळलेले संबंध असतात ते नात्या सारखे नसतात.
हे संबंध निवडावेही लागत नाहीत.व्यवहाराच्या ओझ्याखाली हे संबंध क्षणासाठी किवा संबंध असे पर्यंत असतात.उ.दा. रसत्यात क्षणभर भेटलेले लोक-हाय म्हणण्या पुरते-किंवा दुकानदार, सहकारी वगैरे,वगैरे.ह्या संबंधात प्रेमाचा भाग नसतो आणि असलाच तर तो तात्पुरता असतो.मात्र ह्या संबंधात झालेल्या कामाच्या संबंधाने उपकृतता दाखवीण्यासाठी "थॅन्क्स" ला खूप महत्व आहे.त्या एका शब्दाने एकमेकाच्या चेहर्‍यावर आनंदाच स्मित दिसतं.आणि अशा ठिकाणी "थॅन्क्स" ह्या शब्दात चांगलीच पॉवर असते."

भाऊसाहेब ऐकत होते आणि मी बोलत होतो.क्षणभर मी प्रोफेसर झालो होतो आणि जणू त्यांनाच लेक्चर देत होतो.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

शिवा जमदाडे's picture

22 Sep 2008 - 9:18 am | शिवा जमदाडे

सामंत काका,
खरोखर मोलाचे विचार. माझ्या आई-वडिलांना कुठे जायचे असल्यास कितीही आग्रह केला तरी ते AC चे तिकीट काढायला नेहमीच नाही म्हणतात. ते पैसे तुम्हाला कामी येतील, हा त्यामागचा विचार.

"ते वयस्कर झाले याचा अर्थ परत त्यांनी आपले सर्वस्व देऊन नातवन्डासाठी पण त्याग करत रहावं काय?त्याना पण इच्छा आहेत.त्यांची पण काळजी घेतली पाहिजे."

अगदी खरे....

सुंदर विचार आणि त्यांची पध्दतशीर मांडणी आवडली.

- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Sep 2008 - 7:43 pm | श्रीकृष्ण सामंत

शिवा जमदाडेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपले आईवडील सुद्धा तसेच ग्रेट आहेत.आणि आपण पण त्यांच्यावर तसच प्रेम करता.दोघांना आनंद होईल असं करावं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com