भले तर देऊ...

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in काथ्याकूट
29 May 2016 - 8:01 pm
गाभा: 

तर मंडळी, "अशा वेळी आपण काय कराल?" या कोंबडी प्रेमींच्या धाग्यावर कट्टर मिपाकर श्री मुवि यांनी प्रतिसादातून संत तुकारामांच्या अभंगवाणीतली एक ओळ टंकली आहे. निमीत्त मुवि असले तरी सर्रास ह्या ओळी चुकीच्या लिहिल्या जातात आणि चुकीच्या शब्दानिशी स्वीकारल्याही जातात! अर्थात अश्लील शब्दांचा वापर व प्रसार टाळण्यासाठी एखादा शब्द बदलून प्रचलित केला तर हरकत नाही पण अभंगातील एकापेक्षा जास्त शब्द बदलून किंवा शब्दक्रमच बदलणे हे चूक आहे. कवीत्वाशी विश्वासघात केल्यासारखेही आहेच! अर्थ जरी एकच असला तरी मूळ शब्दांना टाकून का द्यावे? हा माझा प्रश्न आणि चर्चेचा विषय आहे.

तर मी ज्या अभंगाबद्दल बोलत आहे त्यातल्या प्रसिद्ध ओळी सर्वसाधारणपणे अशा प्रकारे जनमानसात लोकप्रिय आहेत:

"भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी ||"

आणि मूळ अभंग याप्रमाणे :

"मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु ||
मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ ||
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ ||
अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ ||
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||"

संदर्भ : अभंग क्रं. ९८७, "श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा" , (संपादक) श्री विष्णु परशुराम शास्त्री पंडित, आवृत्ती प्रकाशनवर्ष इसवीसन १९५५

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 May 2016 - 8:30 pm | प्रचेतस

कासेची लंगोटी हा बदल मला वाटतं आचार्य अत्रे ह्यांनी केलाय.

अत्रन्गि पाउस's picture

29 May 2016 - 9:12 pm | अत्रन्गि पाउस

ह्याला गाथेची शुद्धी असे समजले गेले होते (म्हणे)...
खाली चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे असे बदल योग्य नव्हेत असं मलाही वाटते.

जव्हेरगंज's picture

29 May 2016 - 8:53 pm | जव्हेरगंज

हे अगोदरच माहीत होते!

अजून काही उदाहरणे आहेत काय?

चित्रगुप्त's picture

29 May 2016 - 9:08 pm | चित्रगुप्त

'गांडीची लंगोटी' यात जो एक सच्चेपणा, जोम वटतो, तो 'कासेची' मधे हरपला आहे. थोर संतांच्या कथनात अशी ढवळाढवळ करणे योग्य नोहे. 'गांठी' म्हणजे 'काठी' का?

चांदणे संदीप's picture

29 May 2016 - 9:34 pm | चांदणे संदीप

गांठी हे विचार किंवा हेतू अशा अर्थाने आहे! अर्थात हे माझे इंटप्रिटीशन आहे. जाणकार व अभ्यासूंनी आधिक योग्य प्रकारे निरसन करावे.

काकू काढायचे कारण म्हणजे, "गांठी" ह्या शब्दाचेच मला जास्त वाईट वाटते. काठी काय काठी?? काहीही!!

Sandy

स्पा's picture

29 May 2016 - 9:44 pm | स्पा

काठी काय काठी?? काहीही

>>> ह्ही ह्ही ह्ही

यांनी हा बदल केला असे कुठेतरी वाचले होते.

चांदणे संदीप's picture

30 May 2016 - 4:09 am | चांदणे संदीप

तुम्ही म्हणताय ते शास्त्रीबुवा वर उल्लेखलेले असतील तर तुमची माहिती चूक आहे!

Sandy

चित्रगुप्त's picture

30 May 2016 - 12:38 am | चित्रगुप्त

"नाठ्याळा चि गांठी देऊं माथां"... याचा नेमका अर्थ काय आहे ?

चांदणे संदीप's picture

30 May 2016 - 10:37 am | चांदणे संदीप

अक्कलहुशारीने समोरच्याचा अर्थात नाठाळाचा बेत हाणून पाडू अशा अर्थाने असावे ते बहुधा. परंतु जिथे तिथे ती "काठी"च प्रचलित असल्याने ती माझ्याच माथ्यात कोणी घालायचे याच भीतीने आजवर कोणाला विचारले नाही!

मुळात "नाठ्याळा चि गांठी देऊं माथां" ही "नाठाळाचे माथी हाणू काठी" पेक्षा सरस काव्यात्मक रचना आहे. माझ्या मते त्यात एक अजूनच वरच्या-वेगळ्या तीव्रतेची गर्भित चेतावणी आहे.

कृपया मूळ अभंग कोणाला माहित असून त्यावर चिंतन झालेले असल्यास नक्की या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी माणसाच्या माथ्यातून तेवढी "काठी" बाहेर काढावी ही कळकळीची विनंती! ___/\___

Sandy