भाग पाचवा
हा भाग टाकायला जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !! हा भाग जरा जास्तच मोठा झाला आहे पण फोटो सुद्धा खूप आहेत आणि एका दिवसात खूप फिरणं झालेलं असल्यामुळे शक्यतो एकाच भागात सर्व लिहिण्याचा प्रयत्न होता. पुढच्या भागांची लांबी एवढी असणार नाही याची काळजी घेईन.
आज मी Hyde पार्क चालत फिरायला नाही गेले. दिवसभर एकतर चालणं खूप होत होतं. त्यामुळे सकाळी १ ते दीड तास चालून पुन्हा फिरायला बाहेर पडल्यामुळे जास्त दमायला होत होतं म्हणून ठरवलं की आता रोज Hyde पार्कला नाही जायचं.
आज सुद्धा बाहेर ढगाळ वातावरण होतं. सकाळी थोडा पाऊस पडून गेला होता त्यामुळे बाहेर जरा जास्तीच थंड होतं. नाश्ता करून बाहेर पडले. आजचं पहिलं पाहण्याचं ठिकाण होतं Picadelly Circus. Picadelly Circus हे ट्युब स्टेशन च आहे तिथून बाहेर पडल्यावर एक मोठ्ठ सर्कल आहे.त्यामध्ये एक कारंज आहे आणि त्याला काही पायऱ्या आहेत. ही एक चांगली Hangout प्लेस आहे असं म्हणायला हरकत नाही. या सर्कल च्या सगळ्या बाजूंना इमारतींनी वेढलेला आहे. या जागेवर सदैव खूप वर्दळ असते. Picadelly Circus हा सुद्धा लंडन मधील मुख्य आकर्षण पैकी आहे. इथे बघण्यासारख म्हणजे इमारतींवर लावलेले व्हिडिओ, निओन बोर्ड्स , एरोस चा पुतळा आणि ते कारंज. हे सगळं बघून त्या सर्कल ला एक फेरफटका मारून आले. इथल्या सुद्धा इमारती इतक्या भव्य आहेत.
Picadelly Circus
एक एक इमारती बघत मी पुढे पुढे चालेले होते तर मला दिसला तो Duke of York Monument. किंग जॉर्ज ३ चा सगळ्यात मोठा मुलगा प्रिन्स फ्रेड्रिक याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधलं गेलं. हे स्मारक १३७ फूट उंचीचे आहे. सन १८३४ मध्ये हे स्मारक बांधून पूर्ण झालं.
या जागेच्या पायऱ्या उतरून थोडं पुढे चालत गेले आणि मला एक पार्क दिसलं. पुढे जाऊन बघितलं तर कळलं की हे सेंट जेम्स पार्क. हे पार्क सुद्धा ४ रॉयल पार्क पैकी आहे. रॉयल या उक्तीला साजेसं. सेंट जेम्स पार्क हे ट्युब स्टेशन सुद्धा आहे. आधी बाहेर असलेला पार्कचा नकाशा समजून घेतला आणि मगच आत प्रवेश केला. या पार्क मध्ये एक तलाव आहे. त्या तलावात एक पूल आहे. त्या पुलाच्या मध्ये उभं राहून पूर्वेकडे पहिल की लंडन आय दिसतो आणि पश्चिमेकडे पहिल की Buckingham Palace दिसतो. या पार्क च्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. एक एक ठिकाण बघत मी पुढे जायचं ठरवलं. पार्क मधून पुढे चालत असताना डाव्या बाजूला एक मोकळी जागा आणि त्यामध्ये २ भव्य इमारती दिसल्या. म्हणलं बघूया तरी काय आहे तर कळलं हि इथे हॉर्स गार्डस संग्रहालय आहे. हे संग्रहालय बघण्याकरिता तिकीट आहे.
panorama view from St james park
Horse Guards Museum
ही इमारत ओलांडून मी मुख्य रस्त्याला लागले. बाहेर येउन बघते तर तिथे गर्दी जमली होती थोडं पुढे गेल्यावर कळलं की तिथे घोड्यावर गार्डस बसले आहेत आणि ते या २ इमारतींची राखण करत आहेत. लोकं त्यांचे आणि त्यांच्या बरोबर फोटो काढून घेत होते.
आता मी पार्कच्या पूर्ण बाहेर होते. मला कळत नव्हतं की आता परत आत जाऊ की नको ते कारण मला तो लेक पहायचा होता. एकतर आता पाऊस पडायला लागला होता. आणि माझ्या डाव्या बाजूला मला दिसत होता तो म्हणजे Trafalgar Square. लंडन मधील अजून एक खूप चांगली जागा. सेंट जेम्स पार्क पूर्णपणे पाहून झालं नव्हतं मग ठरवलं की परतीच्या वाटेवर येताना लागणारच आहे तेंव्हा जाऊ तसाही पाऊस जोरात पडत होता. त्याप्रमाणे निघाले Trafalgar square बघायला पण पाऊस जोरात असल्याने थंडी खूप वाजत होती. थोडा वेळ आडोश्याला पाऊस कमी होईपर्यंत थांबले आणि आले trafalgar square ला. ला जाण्यासाठी सगळ्यात जवळचे ट्युब स्टेशन म्हणजे Charing Cross. Trafalgar हा एक मोठ्ठ्या चौकासारखा आहे. हा चौक सामुदायिक सोहळे, निदर्शने , नाताळ आणि वर्ष अखेर म्हणजेच ३१ December साजरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याच्या मध्यभागी एक मोठ्ठा स्तंभ आहे. हा स्तंभ म्हणजेच Nelsons Column. Admiral Horatio Nelson याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ बांधला गेला. या स्तंभाच्या चारही बाजूला ४ सिंह आहेत. या स्तंभाच्या मागे दोन बाजूला २ कारंजी आहेत. या चौकामध्ये लोकांच्या करमणुकीसाठी काही लोकं प्रात्याक्षिके करत असतात जसं की गाणी लावून नाच करणे, पथनाट्ये , म्युसिक वाजवणे , वेगळ्या पोशाखात जमिनीपासून कुठलाही आधार न घेता उभे राहणे. या लोकांबरोबर बरेच जण फोटो काढून घेत होते. त्याच बरोबर एक माणूस खूप मोठे साबणाचे फुगे फुगे उडवत होता. एकंदरीत इथे आल्यावर लोकांची करमणूक करून लोकं देतील ती बक्षिसी घेणे हा उद्देश. हा प्रकार बर्याच ठिकाणी पाहायला मिळाला.
हवेत तरंगणारा माणूस ;)
हा पहा अजून एक :-D
इथेच National Gallary ची मोठ्ठी इमारत आहे. हे एक चित्रकलेशी निगडीत असलेलं खूप मोठ्ठ संग्रहालय आहे. इथे सुद्धा कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या चित्रकारांची , विविध प्रकारची जुन्या काळापासून ते आत्ताच्या आधुनिक जमान्यातील चित्रे इथे आहेत. National Gallary च्या बाहेरून Trafalgar Square खूपच छान दिसतो. इथून जरा लांबवर बिगबेन सुद्धा दिसतं. हे संग्रहालय बघून झाल्यावर बाहेर येउन थोडे फोटो काढले आणि परत निघाले. मला अजून सेंट जेम्स पार्क पाहायला जायचं होतं.
Panorama view of Trafalgar Square
National Gallary ची इमारत
मला तो सेंट जेम्स लेक बघायला जायचं होतं. मगाशी जिथून मुख्य रस्त्याला लागून Trafalgar Square कडे गेले होते त्याच ठिकाणाहून परत आत गेले. इथे एक नकाशा लावला होता त्याप्रमाणे तलाव शोधत त्या दिशेने गेले. तलावाच्या आतमध्ये सुंदर बदकं आणि हंस पोहत होते. तलावाच्या बाहेर काही करड्या रंगाची मोठी बदकं हिरवळीवर दुडुदुडु धावत होती. पटापट फोटो काढले. एका बाजूला सुंदर तलाव आणि दुसरया बाजूला हिरवळीवर पसरलेले पिवळ्या फुलांचे ताटवे आणि मधून रस्ता. मनमोहक दृश्य होतं ते खूप सुंदर जागा आहे ही. इथे बसायला बाकडी आहेत तिथे बसून हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवलं आणि पुढे गेले. या तलावामध्ये एक पूल आहे. वर सांगितल्याप्रमाणे त्या पुलाच्या मध्ये उभं राहून पूर्वेकडे पहिल की लंडन आय दिसतो आणि पश्चिमेकडे पहिल की Buckingham Palace दिसतो. बराच वेळ पुलावर घालवल्यावर पूल ओलांडून पलीकडच्या भागात गेले. ढगाळ वातावरण असल्याने इथे फोटो नीट काढता आले नाहीत.
सेंट जेम्स पार्क
पुलावरून दिसणारा लंडन आय
सेंट जेम्स पार्क
इथून पुढे अजून थोडं पार्क बघत फिरले आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागले. इथून बिगबेन अगदी जवळ होतं म्हणून ते पाहायला जायचं ठरवलं. Westminster स्टेशन च्या बाहेर पडल्या पडल्या समोर बिग बेन दिसतं. बिग बेन हे खरतरं टोपण नाव आहे The Great Bell of the Clock. यालाच Clock Tower असेही म्हणतात. आता याला Elizabeth Tower असेही म्हणतात. हे टोवर Palace of Westminster चाच भाग आहे. १९५९ साली या बिगबेन चे बांधकाम पूर्ण झाले. वातावरण तसं ढगाळ होतं आणि हळू हळू अंधार पडायला सुरुवात होत होती त्यामुळे फोटो नीट आले नाहीत. Palace of Westminster, Parliament Square, Westminster Abby चर्च हे सगळं पहायचं अजून बाकी होतं पण ते पहायला पुढे गेले नाही. इथे पुन्हा यायचं असं ठरवून लंडन आय पाहायला गेले. इथून पुढे रस्ता ओलांडून समोर च लंडन आय आहे आणि खाली थेम्स नदी. लंडन आय जिथून दिसतो तो पूल पूर्ण चालून आले. लंडन आय बघितला आणि घरी यायला निघाले. लंडन आय बद्दल नंतरच्या भागात सविस्तर लिहीन. आज खूप फिरणं झालं होतं पण मज्जा आली हे सगळं भटकायला. आजच्या दिवसाची भटकंती संपली. आता उद्या आणि परवा आम्ही एकत्र फिरणार होतो वीकांत असल्यामुळे. आम्ही जाणार होतो ग्रीनिच ला पण त्याबद्दल आता पुढच्या भागात!!
बिगबेन :)
लंडन आय
क्रमश:
प्रश्न - व्हिडिओ कसा टाकायचा मिपावर कोणी सांगेल का ?
प्रतिक्रिया
11 May 2016 - 11:15 pm | मुक्त विहारि
ग्रीनीच साठी सीट अडवून ठेवतो.
फोटो जरा मोठे आले आहेत.
जाणकार फोटोच्या लांबी-रुंदीविषयी सांगतीलच.
12 May 2016 - 10:43 am | मेघना मन्दार
धन्यवाद !! मुविकाका फोटो मुद्दाम मोठे ठेवले आहेत. लहान केले तर क्लिअर नाही दिसणार फोटो आधीच ते मोबाइल मधून काढले आहेत.
12 May 2016 - 1:17 am | रेवती
छान आलेत फोटू. सेंट जेम्स वगळता बाकी सगळे आठवले.
बिग बेन मात्र काही कारणाने बंद असल्याने पाहता आले नव्हते.
लंडनमधील ट्रेन सेवा अतिषय चांगली आहे.
पावसाळी वातावरण मात्र फार आहे.
12 May 2016 - 10:39 am | मेघना मन्दार
धन्यवाद !! हो न पावसाचा काहीच भरोसा नसतो इथे.
12 May 2016 - 7:21 am | चौकटराजा
लंडन प्रवासाची यु ट्युब वरील एक फिल्म पाहिली असता असे दिसते की तेथील इमारतीना बहुदा ग्रे कलर असतो. त्यामुळे लंडण रंगांच्या बाबतीत काहीसे उदासवाणे वाटते. त्यात वर्षभरातील ढगाळ हवामानाची भर असल्याने हा अनुभव गडद होतो.
ही माझे म्हणणे बरोबर आहे का ? बाकी नेहमीप्रमाणे यावेळचे फोटो ही येकदम ब्येस ! पॅनोरमा ची मजा काही निराळीच.
12 May 2016 - 10:49 am | मेघना मन्दार
काका अगदी ग्रे नाही म्हणता येणार पण पेस्टल शेड्स असतात इमारतींच्या आणि तुम्ही म्हणलात तसं बहुतेकदा ज्या ऋतूमध्ये मी गेले होते तेन्व्हातरी वातावरण बऱ्याचदा ढगाळ होतं त्यामुळे पण ग्रेइश दिसतं आणि त्यामुळे या फोटोमध्ये असं दिसतंय.
12 May 2016 - 10:32 am | प्रीत-मोहर
सुरेख फोटो!!!
12 May 2016 - 2:25 pm | पद्मावति
मस्तं! पु.भा.प्र.
13 May 2016 - 3:12 pm | dhananjay gadkari
मस्त आलेत चित्र .
13 May 2016 - 5:42 pm | विवेकपटाईत
चित्रे पाहून लंडन फिरल्या सारखे वाटले.
13 May 2016 - 5:46 pm | अजया
वा.मस्त.पुभाप्र
15 May 2016 - 9:27 am | बदामची राणी
फारच सुन्दर फोटो आणि सुरेख वर्णन. स्वतः फिरतेय वाटल.
15 May 2016 - 9:44 am | स्पा
मस्त सुरु आहे सफर, एकदा आयुष्यात लंडन फिरायचे आहे,तेही पावसातच
23 May 2016 - 4:24 pm | आदूबाळ
तुम्ही या तर खरे. पाऊस असतोच.
15 May 2016 - 1:02 pm | संजय पाटिल
छान फोटो..
आणि मस्त वर्णन. वाखू साठवली आहे, डिसेंबर मध्ये जायचं चाललय. तेव्हा उपयोगी पडेल..
21 May 2016 - 10:26 am | हृषिकेश पांडकर
पाचही भाग वाचले...छान आहेत..फोटोसमुळे वाचताना मजा आली...लिहित रहा :)
23 May 2016 - 3:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त लंडन भटकंती चालु आहे. चला..आता ग्रीनीचला जाउया. त्या मेरिडियनच्या दोन बाजुला पाय टाकुन फोटो काढायला विसरु नका बरे!!