उडुपी पासून कुठे कुठे जाऊ शकतो?

स न वि वि's picture
स न वि वि in भटकंती
25 Apr 2016 - 11:21 am

मी हा नवीन धागा काढतेय कारण मला लवकर फ्रेश प्रतिसाद हवेत आणि जो धागा मला चटकन मिळेल. नंतर हवे तर धागा उडवला किन्वा सरकवला तरी चालेल.
आम्ही सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी ट्रीप ला जायचे म्हणतोय . नोवेंबर एका मित्राचे लग्न आहे उडुपी मध्ये, लग्नाचे २ दिवस तोच सोय करून देणार आहे . पण त्यानंतरचे ३-४ दिवस थोडे फिरायचे म्हणतोय . तर मग आता तुमची पाळी… उडुपी पासून कोणती ठिकाणे आहेत जी आम्ही फिरू शकतो? जसे एक कुर्ग आहे, पण ते उडुपी पासून ९ तासांच्या drive वर आहे. मला ठिकाणे आणि तिथे काही अश्या जागेची माहिती हवीय जिथे आम्ही ८-९ च्या ग्रुप ने जाऊ शकतो. आम्हाला एखाद्या बंगल्यात राहायची इच्छा आहे. तसे काही पर्याय असतात का आणि कुठे?

प्रतिक्रिया

मलाही तो भाग पाहायचा आहे परंतू माडिकेरी ( कूर्ग, कावेरी उगम,दुबारे हत्ती केंद्र ) सोडल्यास इतर सर्व धार्मिक ठिकाणे आहेत.शाकाहारी जेवणाबद्दल साशंकच आहे माडिकेरीत. हसनजवळ पुन्हा हळेबिडु बेलुर इतरांना आवडेल का शंका आहे.

राजकुमार१२३४५६'s picture

25 Apr 2016 - 4:44 pm | राजकुमार१२३४५६

उडुपी जवळची पाहण्याची ठिकाणे मंदिरे सोडून. १३७ किलोमीटर च्या अंतरामध्ये
१) Agnmbe Hills
२) Hanging bridge udupi
३) Kodi Bengre Beach
४) St,Mary's Island

a

aa

aaa

aaaa

aaaaa

सस्नेह's picture

25 Apr 2016 - 5:11 pm | सस्नेह

सुरेख चित्रे !

चौकटराजा's picture

25 Apr 2016 - 9:35 pm | चौकटराजा

उडुपी जवळ याना नावाचे अजब ठिकाण आहे.नेट वर शोध घ्या

कंजूस's picture

25 Apr 2016 - 11:50 pm | कंजूस

राजकुमार१-५,चित्रे झकास.
ग्रुपमधल्या व्यक्तींची आवड आणि वय यावर जागा ठरवा.

असंका's picture

26 Apr 2016 - 9:24 am | असंका

मुरडेश्वर
गोकर्ण महाबळेश्वर
शृंगेरी

पण ही तीर्थयात्रा स्वरुपाची होइल...

सुनील's picture

26 Apr 2016 - 9:32 am | सुनील

मुर्डेश्वर आणि गोकर्ण-महाबळेश्वर ही उडुपीच्या पुढे नव्हेत तर अलिकडे आहेत (लेखक मुंबई-पुण्याचे आहेत असे गृहित धरल्यास). आणि शृन्गेरीदेखिल लांबच पडेल उडुपीपासून.

असंका's picture

26 Apr 2016 - 9:46 am | असंका

-१ ?

=))

अहो तीन चार दिवस आहेत म्हणत आहेत ते. अगदी स्टेट ट्रान्स्पोर्ट वापरलं तरी तीन चार तासाचा प्रवास आहे प्रत्येक ठिकाण उडुपीपासून. त्यांनी तर पार ९ तासावरचं कूर्ग पण विचारात घेतलेलं.

त्यात ती ठिकाणं अलिकडची का नकोत म्हणे? अलिकडे पलीकडेचा काय संबंध? उडुपीला गेल्यावर कुठे कुठे जाता येइल असं ते म्हणत आहेत. ते मी सांगितलं.

सुनील's picture

26 Apr 2016 - 10:03 am | सुनील

उडुपीला गेल्यावर कुठे कुठे जाता येइल असं ते म्हणत आहेत. ते मी सांगितलं

बरोबरे!!

मलाच नीट मांडता आले नाही. मला म्हणायचे होते की, उडुपीला जातानाच ही ठिकाणे करून घेता येतील (जर मुंबै-पुण्याहून निघणार असतील तर). वेगळा वेळ काढायला नको.

पण कारने स्वत:च्या जाणार का? / रेल्वे / आणि मुंबई - पुणे कोल्हापूर यावर सर्व प्लॅन देता येईल शिवाय वयोगट फार महत्त्वाचा आहेच.माझ्याकडच्या माहितीपत्रकातून काही फोन पत्ते देता येईल. जवळची ठिकाणं नकाशात उडुपी -कारकल- कुद्रेमुख - श्रिंगेरी-भद्रा वाडल्ड लाइफ -मन्दनगड्डे वाडल्ड लाइफ -आगुंबे - उडुपी अशी राउंड ट्रिप ३०० किमी दिसते.