मयत नातेवाईकाच्या कर्जफेडीची समस्या कशी सोडवावी ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Apr 2016 - 5:10 pm
गाभा: 

या धागा लेखाचे नाव भविष्यात, वारसदारांकडून कर्ज परतफेडीच्या समस्या असे काही ठेवावे का या विचारात आहे, वारसदारांकडून कर्जपरत फेडी सोबत; दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची चर्चा सुद्धा तुर्तास याच घाग्यात करुयात.

कुणा नवागताने खालील एक समस्या मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मांडली आहे. मराठी विकिपीडियाशी संबंधीत नसलेल्या समस्या विषयक चर्चा मराठी विकिपीडियाच्या कक्षेत येत नाहीत समस्या मिपावर चर्चा करण्यासाठी अधिक सोईची वाटली म्हणून चर्चेस घेण्याचा विचार केला.

माझ्या वडीलांचे १९८८ पासून ट्रक साठी घेतलेले बँकेचे जुने कर्ज थकबाकी आहे. वडील आता मयत झाले असुन माझी कर्ज फेडण्याची क्षमता नाही मग मी काय करावे?
संदर्भ

इंटरनेटवर अद्यापही मार्गदर्शक वकील मंडळींची आणि पुरेशा विश्वासार्ह माहितीची कमतरता आहे तेव्हा मार्गदर्शन हवे असणार्‍यांनी वकीलांना/ तज्ञांना भेटून मार्गदर्शन घेतले पाहीजे, पण माझ्या सहित बहुतेकांना अशा समस्यांचे विषय नवखे असतात. संभाव्य तोडगे काय असू शकतात हे नेमकेपणाने सांगणे कठीण असले तरी माहितीची अल्पप्रमाणात का होईना देवाण घेवाण होते. हा विषय मला स्वतःसही आणि चर्चेत सहभागी इतरांनाही नेमकेपणाने ठाऊक नसण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) नमुद/लागू करत आहे.

माझ्या अंदाजानुसार काही किमान स्वरुपाची माहिती असावी
१) कर्ज थकीत आहे म्हणुन व्यक्तींकडून गुलामी, वेठबिगारी किंवा कर्जबाजारी व्यक्तींची खरेदी विक्री करता येत नाही, शिवाय व्यवसाय स्वातंत्र्य हा मुलभूत अधिकार आहे. ह्या संबंधाने किमान मानवाधिकारांची माहिती खासकरुन ग्रामीण, आदीवासी आणि गरीबांना असावयास हवी

२) प्रायव्हेट लिमिटेड/लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचा तोटा नुकसानामुळे व्यक्तीगत मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता कमी असते. अर्थात भागीदारी अथवा व्यक्तिगत प्रोप्रायटरी व्यवसाय करणार्‍यांना याचा फायदा होत नाही त्यांच्या तारण आणि व्यक्तिगत मालमत्तातून देणी भागवावी लागू शकतात

३) मयत (मृत) व्यक्तीच्या नावाने कर्जाचा दावा आला तर वारसदारांनी

३.१) मृत व्यक्तिच्या नावाने असलेले कर्ज -तो जर गॅरंटर/हमीदार नसेल तर- वारसदाराच्या व्यक्तिगत उत्पन्नातून/ त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत कमाईवर घेतलेल्या मालमत्तेतून वळते करता येत नसावे (चुभूदेघे) समजा उपरोक्त मुलगा कुठे नौकरी करतो आहे आणि त्याने स्व कमाईतून प्रॉपर्टी घेतली आहे अथवा वडीलांनी सुद्धा गिफ्ट म्हणुन दिलेली प्रॉपर्टी आहे तर तांत्रिक दृष्ट्या अशा उत्पन्न अथवा प्रॉपर्टीवर टाच येणे कठीण असावे, किंवा मयत व्यक्तीची जोडीदार पत्नी अथवा पती यांची व्यक्तिगत नावावरची मालमत्ता सुद्धा स्वतंत्र असावी त्यातून कर्जाची रक्कम परस्पर वळती करणे शक्य नसावे.

३.२) मृत व्यक्तीची त्याच्या वाट्यास आलेली अथवा मृत व्यक्तीच्या कमाईतून झालेली मालमत्तेतून मात्र वारसदारांना देणी भागवावी लागू शकतात, देणि देऊन उरलेली मालमत्ताच केवळ वारसदारांना घेता येत असावी. (हिंदू एकत्रकुटूंब पद्धतीतील (मयत झालेल्या) कर्त्याने केलेल्या कर्जाबाबत काय होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा -इथे केवळ कायदे विषयक बाजूवर चर्चा करावी- अस्मीतांच्या विषयावर अवांतर नको)

३.३) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज खरोखर अस्तीत्वात आहे का याची खात्री करण्याच्या दृष्टीने सविस्तर कागदपत्रे मागून घेऊन अभ्यासून कर्जाऊ देणे खरोखर अस्तीत्वात आहे याची खात्री करावी.

३.४) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज झालेल्या व्यवसायात अजून कुणि भागीदार नव्हता याची खात्री करावी तसा भागीदार असल्यास मृतव्यक्तीच्या नावाने खरोखरच किति देणे होते याची स्वतंत्र वकीलांकडून स्वतंत्र खात्री करुन घ्यावी.

३.५) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी वारसदारांनी आपण खरोखरच वारसदार आहोत आणि मृताची मालमत्ता मृत्यूपत्राने किंवा इतर कारणाने इतर कुणाच्या नावाने होणार नाही याची खात्री करुन घ्यावी.

३.६) मयत नातेवाईकाचे कर्जाबद्दल त्याची राहती जागा अथवा उत्पन्नाचा मुख्यस्रोत गहाण असून त्यावर टाच येत असेल व राहणे आणि उदर निर्वाहावर बाधीत होत असेल तर मयताच्या वारसदारांनी खडबडून जागे होऊन आर्थीकबाजूची गणिते खडबडून जागे होऊन समजून घेण्याची गरज असू शकते. मुख्य म्हणजे अनावश्यक घरगुती खर्चांवर कठोरपणे कात्री लावणे आणि खेळत्या भांडवलाचे कठोर व्यवस्थापन महत्वाचे ठरु शकते.

३.७.१) मयताचे कर्ज व्यावसायिक असेल आणि व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत कर्जाची पुर्नरचना करण्याची विनंती करता येऊ शकते पण त्या कर्जाची मग कदाचित जबाबदारीही स्विकारावी लागेल आणि मग तसे असेल तर चालू व्यवसायावरील कर्ज खरेच फिटले जाणे शक्य आहे का ? व्यवसाय सांभाळण्यात साहाय्य करणारी मुख्य कारभारी (मुख्यत्वे उत्पादन, अकाऊंट आणि विक्री ) मंडळींची वेव्हलेंथ किती जमते आहे ते सहकार्यपुर्ण आणि विश्वासार्ह आहेत का? या मंडळीत नाते संबंध आहेत का आणि त्या नाते संबंधाचे मयताच्या मृत्यूत्तर रोल कसा राहण्याची शक्यता आहे ?

३.७.२) या बाबत त्या व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक, आणि केवळ व्यावसायिकांच्या सल्ल्यावरही अवलंबून राहू नये, चार्टर्ड अकांउंटंटचा सल्ला, मार्केटींगंच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिंचा सल्ला, वकीलाचा सल्ला, कर्जदात्यांचे सहकार्य असे विवीध ठिकाणचे सल्ले घेऊन विचार पुर्वक निर्णय घ्यावेत, यातील केवळ कोणत्याही एकाच सल्लागारावर अवलंबून राहू नये

३.८.१) मयताचे कर्ज व्यावसायिक असेल आणि व्यवसाय पुढे चालू ठेवायचा नसल्यास सुद्धा वरील व्यक्तींचा सल्ला तर लागेल पण कर्जदाते कर्जखाते बंद करण्यासाठी किती रकमेची आणि परतफेडीच्या कोणत्या पद्धतीची अपेक्षा करतात.

३.८.२) -तुम्ही व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा आणि कर्ज स्व नावावर घेण्याचा जाणीवपुर्वक निर्णय घेतला नसेल तर- सरते शेवटी काहीही झालेतरीही वारसदार म्हणून मयताच्या नावे असलेल्या मालमत्ते पेक्षा कर्ज+व्याज जबाबदारी अधिक असली तरी त्याची अधिकतम परतफेड मयताच्या नावे असलेल्या मालमत्ते एवढीच असू शकेल त्या पेक्षा अधिक नव्हे पण ही प्रक्रीया विश्वासार्हपणे कशी पुर्ण करुन घ्यावी ह्याची जाणकारांकडून माहिती हवी आहे.

खालील एका प्रतिसादात "वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे असतात. कर्जाचे नाही!" अशीही काँमेट आलेली आहे याचाही अधिक उहापोह जाणकारांकडून करुन हवा आहे.

मुख्य म्हणजे ज्यांना महत्वपुर्ण निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी त्याक्षेत्रातील विश्वासार्ह तज्ञांचा सल्ला घ्यावा. आंतरजालीय चर्चा उपयूक्त असल्यातरी त्यांना मर्यादाही आहेत. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) नमुद/लागू करत आहे.

* दिवाळखोरी जाहीर करण्याचा मयतांच्या वारसदारांशी सरळ संबंध नसावा पण मयताने आधीच दिवाळखोरी जाहीर केली असेल तर उपरोक्त चर्चा विषयावर काय परिणाम होऊ शकतात याची एक माहिती हवी आहे. शिवाय दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची सुद्धा या धाग्यातून अथवा स्वतंत्र धाग्यातून माहिती हवी आहे.

चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

खरोखर माहिती पाहिजे आहे. मी बँकेत असताना पाहिलेल्या एका केसमधे एका बिल्डरने कर्ज घेऊन थकवले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. खाते आधीच एनपीए झाले होते. त्या बिल्डरच्या मृत्यूनंतर पत्नीने आपल्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही म्हणून वन टाईम सेटल्मेंटमधे थोडे पैसे भरून कर्ज खाते बंद केले होते असे आठवते. पत्नी को ऑब्लिगंट होती. त्यामुळे त्या केसला हा वारसाचा मुद्दा बहुधा लागू होत नाही.

माहितगार's picture

14 Apr 2016 - 6:52 am | माहितगार

"...मी बँकेत असताना पाहिलेल्या एका केसमधे एका बिल्डरने कर्ज घेऊन थकवले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. खाते आधीच एनपीए झाले होते. त्या बिल्डरच्या मृत्यूनंतर पत्नीने आपल्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही म्हणून वन टाईम सेटल्मेंटमधे थोडे पैसे भरून कर्ज खाते बंद केले होते असे आठवते. पत्नी को ऑब्लिगंट होती. त्यामुळे त्या केसला हा वारसाचा मुद्दा बहुधा लागू होत नाही."

१) समजा या बिल्डरच्या व्यवसायात एखादा भागिदार असेल आणि पत्नि व्यवसायात भागीदार नाही पण आपण वर्णन केल्या प्रमाणे केवळ गॅरंटर (को- ऑब्लिगंट) आहे तर मयताच्या कर्जफेडीची जबाबदारी भागीदारांची आधी असेल का गॅरंटरची अशी एक शंका या चर्चे दरम्यान मला समजून घ्यावयाची आहे.

२) याच पद्धतीने गॅरंटर वेगळा म्हणजे बिल्डरचा मित्र आहे किंवा दुरचा नातलग आहे पण मालमत्तेचा वारस नाही, कर्ज फेडण्या एवढी मालमत्ता मयताकडून वारसाकडे जाते तर मयताच्या नावे असलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी कुणाची गॅरंटरची का मयताच्या वारसदाराची ?

३) एखाद्या उद्योजकास किंवा वारसास लक्षात येते की कर्ज आता फेडता येणे शक्य नाही किंवा खूप अधिक काळ लागणार आहे तेव्हा सेटलमेंटचे कोण कोणत्या प्रकारचे ऑप्शन्स बँका कर्जदारास देऊ शकतात ?

-माहिती नसलेल्या माहितगारच्या काही शंका

१) भागीदार असेल तर तोही कर्जदार असतो. त्यामुळे कर्जफेडीची जबाबदारी आधी त्याची असेल. त्यानंतर गॅरेंटर. पण गॅरेंटर/को ऑब्लिगंटकडूनही संपूर्ण वसुली करता येते. त्यामुळेच मल्ल्या पळून गेल्यावर कर्जांना त्याची पर्सनल गॅरेंटी आहे का हा प्रश्न सर्वात आधी पुढे आला होता. त्याची खाजगी मालमत्ता कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असल्याने तशी गॅरेंती असल्यास बँका संपूर्ण कर्ज वसूल करून घेऊ शकतात त्यामुळेच बँकानी त्याची ४००० कोटी रुपयांचे ऑफर नाकारली असावी.
(थोडे अवांतरः ९००० कोटीचा आकडा हा बँकाच्या कन्सॉर्शियम कर्जाचा आहे. मात्र अशा कन्सॉर्शियमच्या बाहेरही वेळोवेळी अनेक कर्जे त्याच कर्जदाराला द्यायची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्यक्षातली त्याची कर्जे याहून खूप जास्त असू शकतील. त्याच्या सर्व कंपन्यांचे बॅलन्स शीट नीट तपासल्यानंतरच सगळा घोटाळा समजू शकेल.)

२) कर्जदाराची प्रॉपर्टी परंपरागत वारशाने चालत आलेली आहे की स्वकष्टार्जित यावरही वारसाचा हक्क प्रॉपर्टी आणि कर्जात किती याचे गणित होईल असे वाटते. यासंदर्भात अजून एक केस आठवली. एका माणसाने गृहकर्ज घेतले होते. तो इंग्लंडमधे परागंदा झाला. साहजिकच खाते एन पी ए झाले. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर आणि त्याचा ठावठिकाणा लागत नाही हे कळल्यानंतर बॅंकेने त्याच्या घराचा लिलाव करून कर्ज वसूल केले.

३) सेटलमेंटच्या अटी बँका आणि कर्जदार दोघांनाही मान्य होतील अशा घासाघीस करून ठरवतात.

वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे असतात. कर्जाचे नाही!

माहितगार's picture

14 Apr 2016 - 6:54 am | माहितगार

वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे असतात. कर्जाचे नाही!

हे नेमके कसे जरा इस्कटून सांगाल का ?

-साशंक आणि गोंधळलेला माहितगार

स्वतः जबाबदार असते. त्यामुळे त्याने/तिने केलेले व्यवहार हे इतर लोकांकडून वसूल करता येत नाहीत. जर एखादा व्यावसायिक हा sole proprietor किंवा partner असेल तर त्यांची unlimited liability असते. तसंच Indian Partnership Act नुसार partners are agents of each other. त्यामुळे जर एखादा partner कर्ज घेऊन ते न फेडताच मरण पावला तर त्याच्या भागीदाराकडून ते वसूल करता येतं, पण त्यावेळी partnership अस्तित्वात पाहिजे. कर्ज घेताना partners होते आणि नंतर partnership संपुष्टात आली तर कर्जाची रक्कम कोणी आणि किती फेडायची हे appropriation नुसार ठरवावे लागते. एसभौंच्या म्हणण्याचा हाच मतितार्थ असावा. एखादा sole proprietor समजा कर्ज परत करु शकला नाही आणि त्याची वैयक्तिक मालमत्ता नाहीये - सगळं समजा त्याच्या पत्नीच्या नावे आहे, तर त्या मालमत्तेवर टाच आणता येत नाही. जर पत्नी business partner असेल तर मात्र असं करता येईल.

माहितगार's picture

14 Apr 2016 - 11:58 am | माहितगार

त्याची वैयक्तिक मालमत्ता नाहीये - सगळं समजा त्याच्या पत्नीच्या नावे आहे, तर त्या मालमत्तेवर टाच आणता येत नाही. जर पत्नी business partner असेल तर मात्र असं करता येईल.

कर्जदार असलेल्या व्यक्ती बाबत तारण असलेल्या आणि तारण नसलेल्या मालमत्ता गिफ्ट करण्याच्या संदर्भाने काही संकेत नियम अटी कायदे असतात का ? असेल तर त्यांचे स्वरुप कसे असते ?

आपल्या माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी आभारी आहे.

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2016 - 10:47 pm | बोका-ए-आझम

तारण नसलेल्या मालमत्ता gift करता येतात. तारण म्हणून असलेल्या मालमत्ता त्यांच्यावर कर्ज असताना gift करता येत नाहीत. पण चेक करुन सांगतो.

पैसा's picture

14 Apr 2016 - 11:03 pm | पैसा

१९८८ साले घेतलेले कर्ज थकित म्हणजे नेमके कोणत्या अवस्थेत आहे? कोर्टात केस घातलेले (सूट फाईल्ड)असू शकेल. कदाचित टाईम बार्ड ही असू शकेल. कारण गृहकर्ज फक्त दीर्घ मुदतीचे असते. ट्रकासाठीचे कर्ज एवढ्या दीर्घ मुदतीचे असणार नाही.

कर्जाला तारण म्हणून करारपत्रात जे जे लिहून दिलेले असेल ते आणि कर्जातून तयार झालेल्या अ‍ॅसेट्स (इथे ट्र्क्स) यातूनच बँकेने कर्ज वसुली करून घ्यावी लागेल. अ‍ॅसेट्स नाहीशा झाल्या तर बँकेचे कर्ज बुडीत जाईल या भीतीने बँकवाले कर्जदाराकडे जे काही मालमत्ता स्वरूपात असेल त्यावर प्राथमिक किंवा दुय्यम बोजा टाकतात. सहसा बायकोला कर्जात भागीदार किंवा निदान गॅरेंटर करून घेतात. तुम्ही म्हणता तसे कर्जदाराच्या नावावर कोणतीही अ‍ॅसेट नसताना कर्ज मिळणे जवळपास अशक्य आहे.

गोव्यात समान नागरी कायद्यानुसार पती आणि पत्नी दोघांचा प्रत्येक मिळकतीत समान हक्क असतो. (काही वर्षांपूर्वी तर पत्नी काम करत नसेल तर पतीचा पगार दोघात विभागलेला दाखवून लोक इन्कम टॅक्समधून सुटून जात असत.) या कारणाने गोव्यात बँका कोणतेही कर्ज देताना डोळे झाकून बायकोला//नवर्‍याला एकमेकांच्या कर्जात कर्जदार्/गॅरेंटर म्हणून सामील करून घेतात.

माहितगार's picture

15 Apr 2016 - 9:16 am | माहितगार

१९८८ साले घेतलेले कर्ज थकित म्हणजे नेमके कोणत्या अवस्थेत आहे?

असाच काहीसा प्रश्न मलाही पडला, माहिती मागणरी व्यक्ती येथे येऊन चर्चेत सहभागी होत नाही तो पर्यंत वाट पहावी लागेल (विपी वरील स्थानांतरीत चर्चेतील नवागतांचे सहभाग येतात पण मध्ये सहसा बर्‍यापैकी विलंबही होतो असा सर्वसाधारण अनुभव आहे)

बाकी आपण दिलेली माहिती रोचक आणि उपयूक्त आहे.

नितिन थत्ते's picture

15 Apr 2016 - 7:04 am | नितिन थत्ते

बहुतांश करारांमध्ये दोन पार्ट्यांचे वर्णन असते "अमुक तमुक बिइंग द फर्स्ट पार्ट" आणि त्या पुढे "Including their heir and / or assignees" अशी प्रोव्हिजन असते. कर्जाच्या करारातसुद्धा ती असेल तर कर्ज वारसांना फेडावे लागेल.

पैसा's picture

15 Apr 2016 - 7:27 am | पैसा

असते.

आणि वारसदार अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या परिपक्व नसल्यास अशी provision करता येत नाही. मला वाटतं हिंदू अविभक्त कुटुंब असेल तर ही arrangement असते. मुख्यत्वेकरून कर्ज विभागण्यासाठी.

माहितगार's picture

15 Apr 2016 - 11:23 am | माहितगार

परिच्छेद पुर्ण वाचता येतील असे कुणि उदाहरणा दाखल दस्तएवज उपलब्ध किंवा दुवा देऊ शकतील का ?

माहितीपुर्ण चर्चा सहभागासाठी आभार

देशपांडे विनायक's picture

15 Apr 2016 - 10:28 am | देशपांडे विनायक

कर्ज घेतले तेंव्हा ज्या कागदपत्रावर सह्या केल्या होत्या त्या कागदपत्रांचे नुतनीकरण केंव्हा झाले ?
कर्जाची वसुली होण्यापूर्वी कर्ज time bar झालेले नसणे महत्वाचे आहे

जामीनदार बद्दल असलेला गोड गैरसमज जितका लवकर दूर कराल तितके लवकर शहाणपण येते
'' कर्जदाराला सोडूनही ,त्याच्याकडे पैसे असतानाही जामीनदाराकडून कर्जवसुली करता येते ''
कर्ज फिटेपर्यंत जामीन रद्द होत नाही [ दुसरा जामीनदार देत येतो पण बॅंकेने तो मान्य करावा लागतो ]
५० रुपये देऊन मदत करावी पण ५ रुपयास जामीन राहू नये असा अनुभव घेऊन बसलो असल्याने हे लिहले !!

माहितगार's picture

15 Apr 2016 - 11:28 am | माहितगार

'' कर्जदाराला सोडूनही ,त्याच्याकडे पैसे असतानाही जामीनदाराकडून कर्जवसुली करता येते ''

असे का होत असावे ?

कर्ज फिटेपर्यंत जामीन रद्द होत नाही [ दुसरा जामीनदार देत येतो पण बॅंकेने तो मान्य करावा लागतो ]

ह्या अटी रिझनेबल वाटतात.

५० रुपये देऊन मदत करावी पण ५ रुपयास जामीन राहू नये असा अनुभव घेऊन बसलो असल्याने हे लिहले !!

कटू अनुभव आला दिसतोय, आपला अनुभव सवडीने सविस्तर शेअर करु शकाल का ? कर्ज घेणार्‍या व्यक्तीने जामीनदारावर अनावश्यक ओझे शक्यतोवर पडू नये म्हणून काय काळजी घ्यावयास हवी असे वाटते.

देशपांडे विनायक's picture

15 Apr 2016 - 2:56 pm | देशपांडे विनायक

' असे का होत असावे ?''
कायदेशीर
उत्तर म्हणजे '' तसा नियम आहे '' आणी कोर्ट नियमाला बांधलेले आहे
जामीनदार हा कर्जदारापेक्षा जास्त जबाबदार असतो कर्जासाठी हे लक्षात घ्या
कर्जदार हे साधन आहे कर्ज फेडण्याचे
आणि हे साधन योग्य रीतीने चालून कर्जफेड होईल अशी हमी जामीनदार देत असतो
त्यामुळे थकीत कर्ज जामीनदारास देणे भाग पडते .

देशपांडे विनायक's picture

15 Apr 2016 - 2:58 pm | देशपांडे विनायक

' असे का होत असावे ?''
कायदेशीर
उत्तर म्हणजे '' तसा नियम आहे '' आणी कोर्ट नियमाला बांधलेले आहे
जामीनदार हा कर्जदारापेक्षा जास्त जबाबदार असतो कर्जासाठी हे लक्षात घ्या
कर्जदार हे साधन आहे कर्ज फेडण्याचे
आणि हे साधन योग्य रीतीने चालून कर्जफेड होईल अशी हमी जामीनदार देत असतो
त्यामुळे थकीत कर्ज जामीनदारास देणे भाग पडते .

असाच अनुभव माझ्या वडिलाना आला. ते एका मित्राला जामीन राहिले होते. ज्यानी कर्ज घेतले होते ते गृहस्थ मरण पावले. त्यांच्या व्यवसाय मुलाने सांभाळला मात्र तो कर्ज फेडीची टाळाटाळ करत राहिला. पेमेम्टच्या फॉलोअप साठी मृताच्या वारसा ऐवजी ब्यांकेने जामिनदाराम्च्या मागे तगादा लावला.
कोर्टात केस उभी राहिली. कोर्टाने ब्यांकेला तसे करण्याचा अधिकार आहे असे सांगितले.
नंतर मृताच्या मुलीने / जावयाने मिळून ब्यांकेशी बोलणी करून काही व्याज माफ करण्याच्या बोलीवर कर्जफेड केली.
एका अशाच उदाहरणात माझ्या एक परिचितानी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कंपनीच्या अ‍ॅसेट पर्चेस साठीच्या कागदाम्वर जामीनदार म्हणूण सह्या केल्या होत्या. नोकरी सोडल्याचे ब्यांकेला कळवल्यानंतरही ब्यांकेने ते पैसे याम्च्याकडून वासूल केले.

पैसा's picture

15 Apr 2016 - 6:21 pm | पैसा

दुर्दैवी आहे, पण सह्या करताना आपण नेमके कोणत्या कागदांवर सह्या करतोय हे लोक समजून घेत नाहीत त्यामुळे असे प्रकार होतात. गॅरेंटर याचा अर्थाच असा असतो की कर्जदाराने कर्ज परतफेड केली नाही तर ते कर्ज परत फेडायची हमी गॅरेंटर घेत आहे.

माहितगार's picture

17 Apr 2016 - 2:59 pm | माहितगार

कर्जदाराकडून अथवा त्याच्या मालमत्तेतून कर्जवसूलीचे सर्व कायदेशीर मार्ग आटले तरच जामिनदारांकडे वसूली तगादा लावला पाहीजे आणि शिवाय जामिनदाराने पेमेंट केले तर जामिनदारास कर्जदाराकडून वसुली करण्याची तरतुद असण्याचीही गरज असावी. बँका सरळ जामिनदारांकडूनच वसुलीचा शॉर्टकट मारत असतील तर उद्योजकता विकासाच्या वातावरणास हे मारक ठरु शकेल का असे वाटते.

सुबोध खरे's picture

15 Apr 2016 - 12:35 pm | सुबोध खरे

५० रुपये देऊन मदत करावी पण ५ रुपयास जामीन राहू नये
लाख मोलाचा सल्ला.
कुणाच्या हि गृह किंवा कोणत्याही कर्जाला (आणी क्रेडीट कार्डाला सुद्धा) जामीन राहण्यापूर्वी त्या माणसाची पूर्ण खात्री असावी. केवळ ओळखीचा आहे किंवा कार्यालयात कामाला आहे या कारणास्तव जामीन मुळीच राहू नये.

गॅरी शोमन's picture

15 Apr 2016 - 1:10 pm | गॅरी शोमन

नॅशनलाईझ बॅक असेल तर एव्हाना ते खाते बंद झाले असेल. तुम्ही इतकच समजा की जो कर्ज घेतो तो जबाबदार असतो. खाजगी बँक असेल तर एव्हाना ट्रक ओढुन नेला असेल. तुमच्या लेखनावरुन काहीच अर्थ बोध होत नाही. पण व्यवसायासाठी वडीलांनी घेतलेली कर्जे मुलांना नक्कीच फेडावी लागत नाहीत.

जर कोणी जबरदस्ती करत असेल तर पुण्यात विद्याधर अनास्कर यांनी सकाळ मध्ये लेख लिहुन याबाबत सर्व माहिती दिली असेल. या विषयावर त्यांचे एखादे पुस्तकही प्रकाशीत झाले असेल.