कोकोनट चिकन मसाला

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in पाककृती
10 Mar 2016 - 1:50 am

चिकन मसाला माझा ऑलटाइम फेवरेट पदार्थ आहे. नेहमीचाच कांदा-टोमाटो पेस्ट मधला चिकन मसाला खायचा कंटाळा आला की त्यावर माझे निरनिराळे प्रयोग चालूच असतात. त्यापैकी हा एक साधलेला प्रकार. यात मसाला बेस म्हणून कांदा-टोमाटो पेस्ट न वापरता ओले नारळ वापरले आहे. पहा करून कसे वाटते ते.
कोकोनट चिकन मसाला
साहित्य:
नारळ- एक मोठी वाटी(100 ग्राम)
नारळपाणी- 1 कप (200 मिली)
एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला.
एक लहान टोमाटो, बारीक चिरलेला.
आलं-लसुन पेस्ट- एक टेबलस्पून
कोथिंबीर- गरजेप्रमाणे
3 हिरव्या मिरच्या, देठ काढून अर्ध्यात कापलेल्या

Ingredients-1
काजू- 50 ग्राम
मगज(टरबुजाच्या बिया)- एक टेबलस्पून
तेल- दोन टेबलस्पून
काश्मिरी लाल मिरची पावडर- दीड टेबलस्पून
गरम मसाला- अर्धा टेबलस्पून
धने पावडर- अर्धा टेबलस्पून
हळद- एक टीस्पून
चिकन (स्किनलेस, करी कट्स)- 250 ग्राम
दही- एक टेबलस्पून
ingre-2
कृती:
प्रथम दीड टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर अर्धी वाटी पाण्यात मिसळून तिचे मिश्रण बनवावे.
initial
काजू व मगज एकत्र करून त्याची बारीक पूड करून घ्यावी
step1
नारळाचे पाणी व तुकडे एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी
step-2
कढइत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा
step-3
कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यावर आले-लसुन पेस्ट टाकून कच्चा वास जाई पर्यंत तळावे
step-4
कांदा व आले-लसुन पेस्ट भाजल्यावर त्यात हळद, धने पावडर व मीठ टाकून मिक्स करावे.
oo
मिश्रणात चिकन घालून त्यात कोथिंबीर व दीड कप पाणी ओतून किमान दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
step-6
step-7
दहा मिनिटानंतर हे चिकन उतरून वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे.
step-8
आता परत एकदा कढइत तेल गरम करून त्यात टोमाटो व मिरच्या टाकाव्यात.
step-9
दोन मिनितंतर यात आपण तयार केलेली नारळ व नाराळाच्या पाण्याची पेस्ट घालून चांगली मिसळून घ्यावी व हे मिश्रण पूर्ण कोरडे होऊन रंग बदलेपर्यंत भाजावे
step-10
आता यात काजू व टरबुजाच्या बियांची पूड घालून किमान दोन मिनिटे आणखीन भाजावे
step-11
दोन मिनिटानंतर यात एक टेबलस्पून दही, अर्धा टेबलस्पून गरम मसाला व आपले काश्मिरी मिरचीचे मिश्रण घालून मसाले या मिश्रणात चांगले मिसळेपर्यंत हलवावे.
step-12
step-13
आता, या मिश्रणात आपण शिजवून ठेवलेले चिकन घालून त्यात दीड कप पाणी ओतावे.
step14
step15
आता हे मिश्रण 15-20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे (पाणी आटून अर्धे होई पर्यंत)
step16

बस्स, तयार आहे आपला कोकोनट चिकन मसाला. चपाती, तंदूर रोटी, नान किंवा राइस सोबत सर्व करा. खाव खिलाओ मज्जा करो!
step1
step1

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

10 Mar 2016 - 8:38 am | जयंत कुलकर्णी

मस्त.... या रविवारी पक्का..... :-)

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 11:17 am | निशांत_खाडे

कळवा...

अभ्या..'s picture

10 Mar 2016 - 11:29 am | अभ्या..

मस्त रे निशांत.
भलताच प्रयोगशील आहेस ब्वा तू. ;)

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 11:48 am | निशांत_खाडे

थांकू थांकू..

संजय पाटिल's picture

10 Mar 2016 - 11:56 am | संजय पाटिल

व्वा!! फोटो बघूनच तोंडाला पाणि सुटले

नाना स्कॉच's picture

10 Mar 2016 - 12:17 pm | नाना स्कॉच

हा लैच जब्राट अन उच्च आइटम जमला आहे निशांतभाऊ!!!

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 12:26 pm | निशांत_खाडे

धन्यवाद.

उमेश पाटील's picture

10 Mar 2016 - 12:18 pm | उमेश पाटील

१ नंबर पाककृती

या रविवारचा बेत पक्का (बायकोपन खुश)

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 12:27 pm | निशांत_खाडे

कसा झाला ते कळवा..

उमेश पाटील's picture

10 Mar 2016 - 5:59 pm | उमेश पाटील

नक्की कळवतो

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2016 - 1:32 pm | दिपक.कुवेत

उद्या खरं अचारी चीकनचा बेत होता पण आता हेच करावं असा विचार करतोय. फोटो जब्राट.

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 1:59 pm | निशांत_खाडे

केल्यास कळवा..

अन्नू's picture

10 Mar 2016 - 2:13 pm | अन्नू

वशाट एकदम वशाट! ;)

तुषार काळभोर's picture

10 Mar 2016 - 3:26 pm | तुषार काळभोर

करून बघा अन् जरूर कळवा!

मग तुम्ही ते निषान्तरावांना फॉरवर्ड करणार का ?

तुषार काळभोर's picture

12 Mar 2016 - 6:23 am | तुषार काळभोर

अन्नू यांच्या प्रतिसादावर सव्वा तासात त्यांचा काही उपप्रतिसाद आला नाही. मग उगाच फ्लो तुटायला नको म्हणून मीच टाकलं.

अन्नू's picture

12 Mar 2016 - 6:35 am | अन्नू

प्रतिसाद कधीच बघितलाय, पण उगीच वर द्यायचा प्रतिसाद चुकून आमच्या प्रतिसादाखाली दिला कि काय असं वाटलं!
बाकी आमच्या उचापती वाचल्यावर तुंम्ही हा पदार्थ करुन बघा म्हणण्याचं डेरिंग दाखवल्याबद्दल हार्दीक(पटेल नव्हे) हाभिनंदन! ;)
सध्या घरात सगळी मंडळी असल्यामुळे आमचा स्वयंपाकघरात प्रवेश कमी केलाय! तिथे फक्त आता वैनींच राज्य चालतं.
तरी बरं अजुन माझ्या 'त्या' पाकृबद्दल एक अवाक्षरही मी घरात काढलेलं नाही, नाहीतर आमचा स्वयंपाकघर प्रवेश कायमचा निषिद्ध केला जायचा! =))

एकदम टेम्पटींग दिसते आहे चिकन. नक्की करुन बघणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2016 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी. तोपासु :)

दिलीप बिरुटे

नूतन सावंत's picture

10 Mar 2016 - 7:43 pm | नूतन सावंत

सुरेख दिसतेय कोंबडी.

पियुशा's picture

11 Mar 2016 - 9:02 pm | पियुशा

बाब्बोव !!! एकदम टस्सल पाकृ फोटो तर जबरा आहे एकदम !

निशांत_खाडे's picture

12 Mar 2016 - 12:46 am | निशांत_खाडे

dhanyavaad