स्पेन - परतीचा प्रवास

Mrunalini's picture
Mrunalini in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

स्लोव्हाकियातून सुट्टीत फिरायला म्हणून स्पेनला गेलो असतानाचा हा एक अनुभव. सहल माद्रिदला सुरू झाली आणि पुढे इतर प्रसिद्ध जागा/शहरं बघून शेवटचा मुक्काम होता बार्सेलोनात.

२४ जून २०१५ -

बार्सेलोनामधला आमचा हा तिसरा दिवस. आजची गौडी (Gaudi) ची टुर दुपारी १ ला चालु होणार होती त्यामुळे सकाळी आरामात उठलो. दुपारचे जेवण करून मेट्रो स्टेशन गाठले. मेट्रो समोर तिकीट काढत असताना एक म्हतारी बाई आली आणि म्हणाली ""Be careful of your bags, Barcelona is full of pickpocketers and they are very smart, you will never know, when your belongings would be gone. Keep your bag safe" असे म्हणुन निघूनसुद्धा गेली. युरोपमधे गेली अनेक वर्ष फिरत असल्यामुळे, ही सुचना काही नवीन नव्हती. कॅमेरा बॅग पाठीवर न घेता नेहमी पुढे ठेवणे, त्यातल्या आतल्या कप्प्यात पासपोर्ट आणि पाकीट ही नेहमीची पद्धत. तरी पुन्हा एकदा खात्री करुन मेट्रो मधे चढलो. ५ मिनिटात आम्ही आमच्या स्टॉपवर पोहोचलो आणि तिथून मिटींग पॉइंटवर गेलो. बरोबर १ वाजता टुरची सुरवात झाली. टुर गाईडने सुचना देण्यास सुरवात केली. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सुचना - बार्सेलोना मधील La Rambla - फेमस रोड आणि सगळे मेट्रो स्टेशन्स ही टुरीस्टसाठी सगळ्यात धोक्याची ठिकाणे आहेत. सर्वात जास्त चोर्‍या ह्या ठिकाणी होतात.

आमचा २० जणांचा ग्रुप निघाला. जूनचा महिना, कडक ऊन, ४० अंश से. तापमान त्यामुळे घामाच्या धारा वहात होत्या. गौडीच्या स्थपत्यकलेल्चे उत्तमोत्तम नमुने बघत आम्ही टुरचा शेवटचा पॉईंट असलेल्या 'ला साग्रादा फामिलिया कॅथेड्रल'ला (La Sagrada Familia Cathedral) ५.३० च्या सुमारास पोहोचलो. टुर संपली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन काहीतरी खाऊन घ्यावे म्हणुन जवळ्याच रेस्टॉरंटमधे गेलो. रेस्टॉरंट फुल्ल होते, बसायला सुद्धा जागा नव्हती त्यामुळे तिथून निघालो. घामाने कासावीस झालो होतो, त्यात भूक लागली होती. त्यामुळे आता हॉटेलवरच जाऊ आणि फ्रेश होऊ असे ठरवले आणि मेट्रो स्टेशन गाठले. 'साग्रादा फामिलिया'ला लागूनच त्याचा मेट्रो स्टॉप आहे.

मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी तिकीट मशिनजवळ आलो. खिशातले सुट्टे युरो संपले होते. त्यामुळे बॅगेतून पाकिटातून पैसे काढून परत बॅगेत ठेवुन आम्ही तिकिट काढले आणि पुढे निघालो. तिकिट पंचिंग मशिन जवळ लाईन होती, आमच्या पुढे २-३ माणसे होती आणि बाजुच्या रांगेत २-३ माणसे. नवरा निशांत पुढे होता. तो तिकिट पंच करत होता, तेवढ्यात एक जिप्सी बाई आली आणि ती त्याला मदत करायला लागली. आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करुन तिकिट पंच करुन पुढे आलो.

तिथे दोन जिने होते. आपल्याला कुठल्या जिन्याने जायचे आहे ते बघून नवरा पुढे निघाला. मी त्याच्या मागेच उभी होते. तितक्यात पंचिंग मशिन जवळच्या लोखंडी गेटचा मोठा आवाज झाला. माझे आवाजाच्या दिशेने लक्ष गेले, तर मघाच्याच त्या जिप्सी बाईनेच ते गेट आपटले होते. ह्या १ मिनिटांमधे माझ्या पुढे २ तरुण मुले गेली. त्यामुळे आता जिन्यावर सगळ्यात पुढे निशांत, त्याच्या लगेच मागे ते २ तरुण आणि ४-५ पायर्‍या सोडून मी असे सगळे उभे होतो.
दिवसभर फिरुन निशांतने थोड्यावेळासाठी बॅग पाठीवर घेतली होती. मी त्याला मागून सांगत होते की तुझ्यामागे २ मुले आहेत आणि ती काहीतरी विचित्र वाटत आहेत. त्यामुळे बॅगपुढे घे. तो बॅग पुढेच घेत होता. हे सर्व जिने उतरत असताना घडत होते. त्याने बॅग पुढे घेणे, त्या २ मुलांनी लगोलग उड्या टाकुन मागे पळणे आणि त्याच वेळेला निशांतचे ओरडणे की बॅग उघडी आहे आणि त्यात पाऊच दिसत नाहीये! हे सर्व इतक्या वेगात घडले की १ मिनिट काय झाले ते समजलेच नाही.

आम्ही दोघे जोरात ओरडलो पासपोर्ट गेला. तो पर्यंत आम्ही वर आलो होतो. तिथे बघितले तर कोणीच नव्ह्ते. ती जिप्सी बाई आणि ते २ तरुण पळून गेले होते. आम्ही पुन्हा ला साग्रादा फामिलियाजवळ पोहोचलो. तिथे एक पोलिस उभा होता. त्याने त्याच्या जवळचा पोलिस स्टेशनचा पत्ता आणि नकाशा असलेला कागद दिला. आम्ही पोलिस स्टेशनकडे निघालो.

माझे तर रडणे काही थांबत नव्हते. निशांतलाही काही सुचत नव्हते. पो.स्टे. चा रस्ता पुर्ण चढाईचा होता. सकाळ पासुन चालून चालून पायाचे तुकडे पडले होते. त्यात आता हे नसते प्रकरण! ३० मिनिटे चालत, लोकांना विचारत आम्ही एकदाचे पो.स्टे. गाठले. तिथे बरेच लोक बसले होते. त्यात आमच्या सारखेच २-३ टुरिस्ट होते.

आमचा नंबर आला तेव्हा आम्ही पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. त्याने एक फॉर्म भरायला दिला आणि सांगितले की सगळ्यात आधी बँकेचे कार्डस ब्लॉक करा. आमच्याकडे बँकेचा नंबर नव्ह्ता. आम्ही पोलिसांना बँकेचे नाव सांगताच त्याने आम्हाला बॅंकेचा नंबर लावुन दिला. फोनवरुन आम्ही सगळ्यात आधी कार्ड्स ब्लॉक केले. पोलिसांना सांगितले की आमचा पासपोर्ट चोरीला गेला आहे. त्यांच्या मते, बार्सेलोनामधे चोरीचे प्रकार रोज चालु असतात आणि एकदा चोरीला गेलेली वस्तु परत सापडणे जवळ जवळ अशक्य आहे. तर तुम्ही आता नवीन पासपोर्टकडे लक्ष द्या.

आम्ही लगेच पो.स्टे, मधुन निघालो. खिशात एक दमडी नव्हती. सकाळी काढलेले मेट्रोचे टिकिट काढले होते ते '१०X जर्नी' असे होते, म्हणजे आम्ही १० वेळा मेट्रो किंवा बसने कुठेही प्रवास करु शकतो. तिथून बस आणि मग मेट्रो असे करत कसे बसे हॉटेलवर पोहोचलो. तो पर्यंत ८ वाजुन गेले होते. घडलेला सगळा प्रकार आम्ही रिसेप्शनवर असेलेल्या मुलाला सांगितला. त्याने सांगितले की त्याचे सुद्धा दोन दिवसांपुर्वीच पाकिट चोरीला गेले होते. इथे चोरीचे प्रमाण खूप असल्यामुळे स्थानिक लोक अंगावर ३-४ ठिकाणी पैसे ठेवतात. संध्याकाळपर्यंत सुंदर वाटणारे स्पेन आता नकोसे झाले होते. आमचा हॉटेलचा रिसेपशनीस्ट क्युबाचा होता. त्याचे नाव कार्लोस. त्याने आम्हाला बराच धीर दिला.

दुपारच्या जेवणानंतर आम्ही काहीच खाल्ले नव्हते आणि आता तर भुकच मेली होती. २७ तारखेला आमची रिटर्न फ्लाईट होती आणि आता २४ तारीख संपली होती. फक्त मधले दोन दिवस राहिले होते, त्यात आम्हाला पासपोर्ट मिळवायचा होता आणि त्यासाठी युरोजसुद्धा! कोण देणार होते आम्हाला ह्या परक्या देशात युरो आणि का? आमचे इथे कोणीच ओळखीचे नव्हते. कार्लोसने आम्हाला सांगितले की काही युरोपियन विमान कंपनी पासपोर्ट कॉपीवर बोर्ड करण्याची प्रवानगी देतात. तरी माझ्या मनात शंका होती. सकाळी आता फोनाफोनी करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री १० च्या सुमारास आम्ही बार्सेलोनामधल्या भारतीय वकिलातीला (Indian consulate) ला मेल केला. त्यांच्या कडून सकाळी उत्तराची अपेक्षा होती.

रुममध्ये आलो आणि पाणी पिऊन बेडवर आडवे झालो, तरी डोळ्याला डोळा लागेना. सतत एकच विचार - आम्ही ह्या देशातून आता निघणार कसे?

२५ जून २०१५ -

रात्रभर डो़क्यात सगळ्या प्रश्नांची मांडणी केली. भारतीय वकिलातीकडुन मदतीची बरीच अपेक्षा होती. आम्ही घरी कोणालाचा काही सांगितले नव्हते. घरच्यांना त्रास नको असा विचार केला होता. पहाटे ५ पासुन सगळ्या मित्र-मैत्रिणींना मेसेजेस केले. ऑफिस मधले, मिपा वरचे, स्लोव्हाकियातील जवळचे सगळ्यांना मेसेजेस टाकुन ठेवले. सगळ्यांनीच लगेच मदतीची तयारी दर्शवली.

पहिलं उत्तर आलं ते निशांतच्या स्पॅनिश मैत्रिणीकडून. तिने सांगितले की तिच्या स्पॅनिश अकाऊंट मध्ये ७० युरो आहेत. ती ते लगेच पाठवायला तयार आहे. काहीच नसण्यापेक्षा ७० युरो बरे. आता ते पाठ्वायचे कसे. मग युक्ती सुचली. कार्लोसच्या आकाऊंटमध्ये तिने पैसे पाठवले. २ तासात पैसे ट्रान्सफर झाले. ९ ला बँक उघडताच कार्लोसने पैसे काढून आमच्या हातात ठेवले. तो पर्यंत आमच्या ऑफिसमधल्या पोर्तुगीज मित्राचा मेसेज आला की त्याचा भाऊ बार्सेलोना मधेच शिकत आहे. तो मदत करु शकतो. त्याचा फोन नंबर आम्ही घेतला. अजुन एका आमच्या स्लोव्हाकियातील एका मित्राचा मेसेज आला. त्याची बहीण किरण पुर्वी बार्सेलोनामध्ये होती आणि आत्ता मेक्सिकोमधे राहते ती सुद्धा मदत करु शकते. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा नक्की किती युरो लागतील त्याचा हिशेब करुन ठेवला. हे सगळे होई पर्यंत भारतीय वकिलातीचं उत्तर आलं होतं:


"Thank you for your kind mail dated the 24th of June.

We sincerely apologize for the situation that you have been found in Barcelona .
Unfortunately the Consulate General of India in Barcelona don’t intervene in the issue of passports.
We beg you, in order to obtain a new passport, to contact the Embassy of India in Madrid.
In order to travel to Madrid you can take a plane from the airport or a train AVE (high speed) from Sants Station in Barcelona."

हा रिप्लाय वाचून डोक्यालाच हात मारला. आता माद्रिदला जायचे कसे? युरोज कठुन मिळवायचे?

आम्ही सर्वात आधी एअरलाईन कस्टमर सर्विसला फोन केला. त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही फोटो कॉपीवर प्रवास करु शकतो. थोडासा जीव भांड्यात पडला, पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती. मी ठरवले की विमानतळावर जाऊनच चौकशी करु.

विमानतळावर जाण्याआधी माद्रिदमधल्या भारतीय दूतावासाच्या वेबसाईटवर बघितले. तिथे 'स्टोलन पासपोर्ट कॅटेगरी' मधील फॉर्म भरुन ठेवला. दूतावासाची अपाँइंटमेंट मिळाली २६ जुन - दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता.

अजून एक विचार मनात आला. स्लोव्हाकियन वकिलातीमधे गेलो. तिथे त्यांना घडलेली हकिकत सांगितली. तिथे असलेल्या स्लोव्हाकियन काउंसेलर फार प्रेमळ होत्या. त्यांनी आम्हाला आत बोलावले, विचारपूस केली. स्लोव्हाकियन पोलिसांना फोन करुन काहि मदत होऊ शकेल का तेही विचारले. त्यांनी सांगितले की स्लोव्हाकियन रेसिडेंस परमिट फक्त स्लोवाकियामधेच मिळू शकते. त्यांनी भारतीय वकिलातीला देखील फोन करुन विचारले. इथे सुद्धा असेल सांगितले की नवीन पासपोर्ट हा फक्त माद्रिद मध्येच मिळु शकतो. बार्सेलोनामधील वकिलातीमधे काहीच होऊ शकत नाही.

आता आम्हाला विमानतळावर जाऊन कंफर्म करायचे होते. एअरपोर्ट शटल फ्री असल्यामुळे, ७० युरो आणि पासपोर्ट कॉपीज घेउन एअरपोर्ट वर आलो. प्रचंड तणाव जाणवत होता. जर तिथल्या लोकांनी आम्हाला फोटो कॉपी वापरुन प्रवास करण्याची परवानगी दिली तर सगळा व्याप कमी होणार होता, नाही तर सगळेच अशक्य वाटत होते.

देवाचे नाव घेत चौकशी केंद्रापाशी पोहोचलो. आमच्या पुढे एक जर्मन माणूस उभा होता. तो काय बोलतोय ते आम्ही ऐकत होतो. त्याचा पण पासपोर्ट चोरील गेला होता आणि त्याला जर्मनीला जायचे होते. खिडकीच्या पलीकडच्या माणसाने त्याची पासपोर्ट कॉपी आणि पोलिस कम्प्लेन्ट बघितली आणि त्याला एक फॉर्म भरायला दिला. तो फॉर्म त्याने भरला आणि त्याला सांगितलं की तो जर्मनीला जाऊ शकतो. आम्ही मागे उभे राहुन सगळे ऐकत होतो. आता आम्हाला सुद्धा जाऊ देणार असे वाटु लागले. आत्मविश्वासाने आम्ही पुढे गेलो आणि त्याला आमची पासपोर्ट, व्हिजाची कॉपी, फ्लाईट तिकीट आणि पोलिस कम्प्लेन्ट लेटर सरकवले. त्याने ते नीट वाचले, तपासले आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पेपर परत आमच्या हातात दिले.

"No, You cannot fly to Slovakia without a valid original passport or id card. I am sorry. For more information please contact our duty manager who is sitting on the check-in counter"

आमचे धाबे दणाणले. त्या मॅनेजरकडे आम्ही गेलो. त्याला झालेली सगळी हकिकत सांगितली. त्याने पहिला प्रश्न विचारला -

"Show me a valid original ID that will prove and convince me that you are a Citizen of India and not a refugee from some country trying to escape"!!

आम्ही उडालोच! तो आम्हाला निर्वासित म्हणत होता. पण त्याने आम्हाला बॉर्डर क्रॉसिंग लॉबद्द्ल एक महत्त्वाची माहिती दिली ती अशी -

"If you are in a foreign country and you lose your passport, then you are allowed to fly with the photocopy of your passport to and only to your home country. In your case it is India, that is only if you can produce a ticket to India!!" you are not allowed to leave Spain otherwise. If you wish to travel to Slovakia or any other country in the EU, you need to carry at least your original passport and for that you will have to go to Madrid and visit your embassy. There is no other way out. I am sorry".

इतके सांगून तो निघून गेला. दुपारचे १२ वाजले होते. माद्रिदला कसे जायचे हा विचार मनात चालु होता. १२ दिवसांपूर्वी स्पेनचा प्रवास आम्ही माद्रिदहूनच सुरु केला होता. आता पुन्हा माद्रिदला उद्या सकाळी ११ च्या आत पोहोचायचे होते आणि एकच मार्ग होता. बार्सेलोना ते माद्रीद हा ६२३ किमीचा पल्ला आम्हाला इतक्या कमी वेळात फक्त 'AVE ही हायस्पीड ट्रेनच पोचवु शकली असती. पण त्याचे तिकिट काढणार कसे. त्यात सकाळी भारतीय दूतावासाचा जो फॉर्म भरला होता त्यात लिहिले होते की तात्काळ पासपोर्टची किंमत माणशी २०० युरो असणार. म्हणले आम्हाला फक्त पासपोर्ट साठीच ४०० युरो आणि ट्रेनचे तिकीट त्याचा तर अजून हिशेबच केला नव्हता.

पासपोर्टसाठी आम्हाला दोन फोटोसुद्धा काढायचे होते. ते एका मेट्रो स्टॉपवर फोटो बुथ मधुन काढुन आलो. तिथून आम्ही आता हॉटेलवर पोहोचलो. वाय-फायमुळे आता सगळे मेसेज वाचले. मित्राची मेक्सिकोला असलेली बहिण आणि पोर्तुगीज मित्राचे मेसेजेस आले होते. मित्राच्या बहिणीने किती युरो लागतील हे विचारले होते आणि मित्राने त्याच्या भावचा फोन नंबर पाठवला होता.

आम्ही इंटरनेटवर बार्सेलोना-माद्रिद-बार्सेलोना तिकिट बघितले. त्याची किंमत होती, ८०० युरो २ माणसांसाठी!
आमचा होता नव्हता तो सगळा विश्वास खचला होता. आमच्या बँकेचे इथे एकही ऑफिस नव्हते, त्यामुळे पैसेही काढू शकत नव्हतो. आम्ही लगेचच मित्राच्या बहिणीला मेसेज केला की आम्हाला आज संध्याकाळ पर्यंत १५०० युरोची गरज आहे. आयुष्यात अशी परिस्थिती प्रथमच उद्भवली होती. कधीही न बघितलेल्या व्यक्तीकडे आम्ही १५०० युरो मागत होतो. तिचा मेसेज आला.
"How do I transfer and Will you give me back my money?"
"I am trying to figure out how and yes, I will transfer, please trust me. I am not a con man."
- निशांत

लगोलग मित्राचा भाऊ मिगेलचा देखिल फोन आला. त्याला आम्ही हॉटेलवर बोलावले. अर्ध्या तासात मिगेल रुमवर आला. आमचे चेहरे बघून त्याला समजले असावे. त्याने विचारले आम्ही काही खाल्ले आहे का? आम्ही २४ तासांपेक्षा जास्त फक्त पाण्यावर होतो. परंतु दडपण इतके प्रचंड होते की भूक लागेना. त्याला आम्ही सगळे सांगितले. एकुण १५०० युरो लागणार होते. त्याने त्याच्या क्रेडिट कार्डवर आम्हाला ट्रेनचे तिकिट बुक करुन दिले. परंतु आता तो देखिल विद्यार्थी असल्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे आता उरलेली कॅश मित्राच्या बहिणीकडून घ्यायचे ठरले.

आता प्रश्न होता मेक्सिको मधुन स्पेनला इतके पैसे पाठवायचे कसे आणि ते ही २ तासाच्या आत. किरणच्या लक्षात आले की मेक्सिकोमधील तिची बँक आणि मिगेलची बार्सेलोनामधील बँक एकच आहे, मग एटीएम मनी ट्रान्सफर सिस्टीमची तिनेच माहिती सांगितली. यामध्ये, ती तिच्या बँकेच्या वेबसाईट वरुन बार्सेलोनामधील एटीएम मशिन शोधणार होती. त्या मशिनच्या इथे आम्ही जाऊन उभे राहणार. मग ती त्या पैसे ट्रान्सफर करणार. पैसे ट्रान्सफर झाले की एक कोड जनरेट होणार आणि हा कोड ती आम्हाला देणार. आम्ही तो कोड एटीएम मशिनमधे पीन प्रमाणे टाकणार आणि युरो काढणार!! मोठे दिव्य होते.

तिने आम्हाला हॉटेल जवळच्याच एका एटीएम मशिनचा पत्ता दिला. आम्ही लगेचच तिथे पोहोचलो. तिने सांगितले की ती आता पैसे ट्रान्सफर करत आहे आणि मग कोड जनरेट झाल्यावर ती आम्हाला मेसेज करणार होती. ३० मिनिटे झाली, तरी तिचा काही फोन आला नाही. आमचे टेन्शन वाढत होते. मी, निशांत आणि मिगेल त्या मशिन समोरच उभे होतो. तिचा मेसेज आला. पहिले ट्रान्झॅक्शन फेल झाले होते. ज्या मशिन समोर उभे होतो ते हे चलन स्विकारत नव्हते. तिने बँकेत फोन करुन दुसरे एटीएम मशिन शोधले. सुदैवाने ते जवळच होते. आम्ही परत त्या मशिन जवळ गेलो. ५ मिनिटात तिने परत मेसेज करुन नविन कोड सांगितला. मिगेलने पटापट तो कोड एटीएम मशिन मधे टाकला आणि जादूची कांडी फिरवावी तसे ते एटीएम मशिन जिवंत झाले आणि त्यातुन ७०० युरो बाहेर पडले.

किरणला अनेक धन्यवाद देत आम्ही ते पैसे घेउन हॉटेलवर आलो. माद्रिदमधल्या भारतीय दूतावासाला फोन लावला. समोरुन एका उत्तर भारतीय माणसाचा आवाज आला. आमचे संभाषण खालील प्रमाणे:

Embassy - Hello, Indian Embassy Madrid.
निशांत - Hello, Sir, my appointment number for tomorrow is *******.
मेरा पासपोर्ट चोरी हो गया है|
Embassy - तो आप कल आ जाओ ना सुभे, अभी कॉल क्यु किया? अभी हमारा घर जाने का टाईम हो गया है|
निशांत - सर, लेकिन एक बार डॉक्यूमेंट्स फिरसे बता दो ना, कौनसे लाने है, हम बार्सेलोनासे आने वाले है|
Embassy - तो वेबसाईट पे लिखा है वो ओर साथमे २ फोटो और कॅश. अभी मे फोन रखता हुं|
(फोन कट)

आता आमचे सगळे कागदपत्र, युरो, फोटो तयार होते. सर्व मित्रमैत्रिणींना आम्ही हे कळवले. उद्या पहाटे ५ ची ट्रेन होती जी आम्हाला ९ पर्यंत माद्रिदला पोहोचवणार होती. तिथुन पुढे मेट्रो करुन भारतीय वकिलातीत जायचे होते. रात्रीच आम्ही कार्लोसला सांगुन ट्रेन स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली होती.

रात्री बेडवर आडवे झाल्यावर मनात विचार आला. २४ तासांपुर्वी आपल्या बॅगेची चोरी झाली तेव्हा हातात १ पैसा देखील नव्ह्ता आणि आम्ही २४ तासात पुर्णेपणे अनोळखी देशात, आयुष्यात कधी न भेटलेल्या माणसांची मदत घेऊन - ७०० युरो कॅश आणि ८०० युरोचे ट्रेन तिकिट काढले होते! हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते.

२६ जून २०१५ -

सकाळी अगदी वेळेवर टेक्सी आली आणि आम्ही ट्रेन स्टेशनवर जाऊन पोहोचलो. आम्ही बार्सेलोनावरुन निघालो. माद्रिद आधीच फिरुन आल्यामुळे आम्हाला मेट्रोची पुर्ण कल्पना होती. त्या प्रमाणे माद्रिद स्थानकाहून मेट्रोने लगेच भारतीय वकिलातीत पोहोचलो.

एका रागीट दक्षिण भारतीय माणसाने आमचा नंबर आल्यावर आम्हाला बोलावले. आमचा फॉर्म तपासला आणि तो कडाडला -

"Are you people ashamed of writing your parents name in your passport? You young generation have no manners"

फॉर्म भरताना आम्ही "First name" ह्या कॉलम मधे फक्त आमचे पहिले नाव टाकले होते. तेथे fathers name किंवा middle name असे काही विचारले नव्हते. तरी आता दुसरा पर्याय नव्हता. त्याची बोलणी शांतपणे मान खाली घालून ऐकली. शेवटी त्याने आम्हाला ४ तासांनी या, पासपोर्ट तयार असेल असे सांगितले. ४ तास आम्ही मेट्रो स्टेशन वरच काढले. हातात पैसे असल्याने आता थोडे खाऊन घेतले. वायफाय कनेक्ट करुन सगळ्यांना अपडेट दिले. अजुनही आम्ही घरी काहीच सांगितले नव्हते.

दुपारी २ ला आम्ही पुन्हा दूतावासात पोहोचलो. २० मिनिटात आमचा नंबर आला. पासपोर्ट तयार होता. पासपोर्ट घेउन लगेच परत ट्रेन स्टेशनवर आलो. परतीच्या प्रवासाची वेळ झाली. रात्री ११.३० च्या सुमाराच आम्ही हॉटेलवर पोहोचलो. आमच्या हातात आता नवा कोरा पासपोर्ट होता.

दुसर्‍या दिवशी ७ ला हॉटेल खाली आमची एअरपोर्टला घेउन जाणारी टॅक्सी येणार होती. आमच्याकडे आता फक्त एकच कागद नव्ह्ता, स्लोव्हाकियाचे आमचे रेसिडेन्स कार्ड/व्हिसा
एअरपोर्टवरच्या मॅनेजरचे शब्द आठवले - - "You can travel with only one ID proof - that is ok, but at times even if you are travelling within the European Union, the Emigration authority or even the person who issues your boarding pass may ask for your Residence Permit or Visa of the destination country and in case you fail to produce so, he has full authority to keep you grounded on Spanish Soil until furhter action is taken"

हा विचार केला आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली आणि झोपायचा प्रयत्न चालू केला.

२७ जून २०१५ -

सकाळी टॅक्सी हजर होती. सर्व सामान रात्रीच पॅक करुन ठेवले. कधी एकदा स्पेनमधून बाहेर पडतोय असे झाले होते. कार्लोसला मनापासुन धन्यवाद देत आम्ही टॅक्सी मधे बसून विमानतळावर पोहोचलो. चेक-इन करण्यासाठी रांगेत उभे होतो. बॅग चेक-ईन झाल्या, त्याने आमचा पासपोर्ट पाहिला, तिकिट पाहिले, बोर्डिंग पास दिला आणि म्हणाला, "Your seat is 8A and 8B, please proceed to security and onto Gate B" पहिला टप्पा बाहेर पडला. सिक्युरिटीचा टप्पा देखिल पार पडला.

आम्ही एकदाचे विमानात बसलो आणि विमानाने उड्डाण केले. खिडकीतून बार्सेलोना शहराचा मोठा पसारा दिसत होता, याच शहरात कुठे तरी ते दोन तरुण होते ज्यांनी आमची बॅग चोरली आणि प्रचंड मानसिक त्रास दिला होता. पण ह्याच शहराने आम्हाला माणुसकीची वेगळी झलक दाखवुन दिली होती.

चोरी झाली त्या रात्री, आम्हाला मानसिक पाठिंबा देणारा आमच्या हॉटेलचा क्युबन रिसेप्शनिस्ट - कार्लोस

दुसर्‍या दिवशी आमच्यासाठी माहिती काढणारी स्लोव्हाकियन एम्बसीची कौन्सेलर

आम्हाला सर्वात प्रथम ७० युरो देणारी स्पॅनिश मैत्रीण - पॉला

कसलीही ओळख नसताना आमच्यासाठी ट्रेनचे तिकिट काढणारा - मिगेल

फक्त तिच्या भावाच्या शब्दावर विश्वास ठेवुन आम्हाला ७०० युरो पाठवणारी मिक्सिकोस्थित - किरण

आणि त्याचबरोबर वॉट्सअ‍ॅप, इमेल, फेसबूक आणि व्हायबरवरून सतत आमच्या संपर्कात राहणारे आमचे मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी आणि अर्थात मिपाकर - सानिकास्वप्निल, अजया ताई आणि पैसा ताई.

या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच आम्ही स्पेन मधून सुखरुप परतु शकलो. युरोपमधे रेफ्युजी क्रायसिस वाढत असताना घडलेली ही घटना ज्यामुळे आमच्यावर देखील रेफ्युजी होण्याची वेळ आली होती!

स्लोव्हाकियामधे पोहोचल्यावर सर्वप्रथम आम्ही सगळ्यांचे पैसे परत केले. रेसिडेन्स परमिट्साठी पुन्हा एकदा अप्लाय केले आणि एका सुरळीत आयुष्याला सुरवात केली.

ह्या घटनेतून घेतलेले काही धडे -

१. तुम्ही स्वत: कितीही प्रवास करत असलात तरी पासपोर्ट, पैसे, डेबिट्/क्रेडिट कार्ड्स आणि पैसे एकत्र ठेवू नये.
२. दोघांकडे थोडे थोडे पैसे ठेवावेत.
३. पासपोर्ट कधीही बॅगेत किंवा पिशवीत ठेवुन प्रवास करु नये. जॅकेटच्या किंवा शर्टच्या आतल्या कप्प्यात ठेवावे.
४. हे सगळे करुन सुद्धा जर का दुर्देवाने चोरी झाली आणि पासपोर्ट हरवला तर प्रथम पोलिस तक्रार करावी. त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही.
५. कितीही वाईट परिस्थिती आली तरी स्वत:वर विश्वास ठेवावा आणि लगेच मदतीची हाक द्यावी. एकटे रडत बसण्यात अश्यावेळी काही अर्थ नसतो.

...and ofcourse Barcelona is a very beautiful city and a must visit if you are in Spain. but make sure you take care of your belongings all the time ;-)

Have a safe journey.!! :)

(चित्र- किलमाऊस्की)

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 4:16 pm | वेल्लाभट

सतर्क करणारा, जागृत करणारा अनुभव!

मोदक's picture

9 Mar 2016 - 3:00 pm | मोदक

+१

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 6:54 pm | प्रीत-मोहर

हे राम!!! पैसाक्काकडुन याच्या अपडेट्स आम्हाला मिळत होत्या तेव्हा ते आठवले. शहाराच आला अंगावर एक्दम.

इशा१२३'s picture

10 Mar 2016 - 11:18 pm | इशा१२३

हेच म्हणते.
कसकायवर त्यावेळी कळत होत.आता हे वाचुन परिस्थितितील दाहकता अजुन जाणवली.अवघड प्रसंग निभावुन नेलात.

आरोही's picture

19 Mar 2016 - 11:08 am | आरोही

+१ खरेच अवघड प्रसंग ...

पद्मावति's picture

9 Mar 2016 - 2:54 pm | पद्मावति

बापरे, कठीण आहे. नुसतं वाचुनही अंगावर काटा आला. नाईटमेअर अक्षरश:...
स्पेन मधे असे चोरीचे प्रकार बरेच ऐकलेय. आमच्या एका माहितीतल्या माणसाचा पासपोर्ट मालागाला विमानतळावर चोरीला गेला होता.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 3:14 pm | वेल्लाभट

आमच्या ओळखीत एक मुलगा बॅकपॅकिंग प्रकारच्या टूरला युरोपला गेला होता. भारतातलाच ग्रूप होता, भारतातलाच टूर ऑपरेटर. ते अशाच टूर नेतात, ट्रेनमधे रात्रीचा प्रवास इत्यादी मार्गांनी टूर इकॉनोमिकल केलेल्या असतात. तर, त्या ग्रूपमधे दोन काकू होत्या. त्यांना या मुलाने (हा बरंच जग फिरलाय) आधीच कल्पना दिली होती एकंदरित त्यांच्या वागण्याकडे बघून. की बाबा, इटली मधे फार चोर्‍या मार्‍या होतात भुरट्या. सांभाळून रहा हे करा, हे करू नका इत्यादी. ट्रेनचा प्रवास होता. त्याने त्या दोघींसकट इतर सर्वांना एक टिप दिली की ट्रेनमधे चढल्यावर आधी कुठली सीट घेऊ असं शोधत बसू नका जिथे पहिली सीट दिसेल तिथे बसा लगेज जवळच ठेवा पायाच्या. ट्रेन सुटली, दारं बंद झाली की मगच हला. ऐकलं नाही यांनी, आत गेल्या गेल्या लगेच 'ए वर जाऊ' म्हणत डबलडेकर ट्रेनच्या वरच्या भागात जाऊ लागल्या. त्या जिन्यावर असतानाच वरून दोन तरूण मुली खाली लगबगीने उतरल्या, धक्का दिला यांना, आणि ट्रेनच्या बाहेर उतरल्या. हे सगळं घडलं जेमतेम २५ सेकंदात. दारं लागली, त्या दोघींनी दारातून हात केला या दोघींना; हातात त्यांच्या पर्सेस होत्या. खेळ खलास. पुढे २ दिवस यांना इटलीत फॉर्मॅलिटीज करत बसावं लागलं, बाकी ग्रूप पुढे गेला.

सविता००१'s picture

9 Mar 2016 - 3:14 pm | सविता००१

सगळं त्यावेळी व्हॉट्स अ‍ॅप वर कळत होतं. तुला किती मनस्ताप झालाय त्याची पूर्ण कल्पना आहे...
शहारे येतात अजूनहे ते सगळे मेसेजेस आठवून.

आपली वकिलात सुधारणार नाहीच म्हणजे. ऐकूनही न घेता फोन कट. घर जाने का टाईम :(

सस्नेह's picture

9 Mar 2016 - 3:18 pm | सस्नेह

बापरे ! भलते धीराचे हां तुम्ही दोघे !

आदूबाळ's picture

9 Mar 2016 - 3:33 pm | आदूबाळ

बाप रे! भयंकर अनुभव.

मृ, ते दोन दिवस आम्ही पण विसरणार नाही.आम्ही एकाच विचारात होतो तुम्हाला पैसे कसे पाठवता येतील,तुमचं कसं चाललं असेल,तुमची काळजी, अशी काय हलगर्जी म्हणून राग...ते सगळं तुमचा आम्ही घरी पोचलो मेसेज आला आणि हुश्श झालं.जगात चोर आहेत आणि माणुसकीही याचं प्रात्यक्षिकच तुमच्यासोबत आम्हीही अनुभवलं..

खरच गं ताई... ते दोन दिवस आम्ही दोघेपण कधीच विसरणार नाही. हा जन्मभरासाठीचा धडा घेतला आहे आम्ही.

नंदन's picture

9 Mar 2016 - 7:39 pm | नंदन

बाप रे, परक्या देशातलं परकेपण अशा वेळी एकदम अंगावर आलं असेल. तेव्हा भयंकर मनस्ताप झाला असला तरी सजग करणारा अनुभव.

२४ तासांपुर्वी आपल्या बॅगेची चोरी झाली तेव्हा हातात १ पैसा देखील नव्ह्ता आणि आम्ही २४ तासात पुर्णेपणे अनोळखी देशात, आयुष्यात कधी न भेटलेल्या माणसांची मदत घेऊन - ७०० युरो कॅश आणि ८०० युरोचे ट्रेन तिकिट काढले होते! हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते.

+१

भाग्यश्री कुलकर्णी's picture

10 Mar 2016 - 9:16 am | भाग्यश्री कुलकर्णी

बाप रे कसं निभावलंत सगळं.तुम्हाला मदत करणारी माणसं मिळाली हे बर.नाहीतर. ...प्रवास करताना काय काळजी घ्यावी ते ही कळले.

स्मिता.'s picture

10 Mar 2016 - 1:16 pm | स्मिता.

त्यावेळी किती मनस्ताप झाला असेल याची कल्पनाही करवत नाही. स्पेनबद्दलचे हे अनुभव अनेकांचे ऐकले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक अनुभव ! पण त्यातही अनेक जणांच्या माणूसकीचे दर्शन झाले ही काळ्या ढगाला रुपेरी झालर !
त्या माणुसकीच्या यादीत भारतिय वकिलातीचे नाव येत नाही याचे आश्चर्य वाटले नाही, दुर्दैवाने :(

खरच हा प्रसंग खुप अवघड होता आमच्यासाठी. त्यातुन भारतीय दुतावासातील आचरण खुप मनस्ताप देणारे होते. पण काय करणार.. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी अवस्था झाली होती आमची.

बाप रे !! केवढा ताप झाला असेल डोक्याला :(

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 3:19 pm | मधुरा देशपांडे

याबद्दल अगदी थोडक्यात कळलं होतं, लेख वाचून कल्पना आली की किती भयंकर अनुभव होता.
त्यातून अशाच पद्धतीचे २ अनुभव घेतलेत त्यामुळे अगदी समजू शकते कसं वाटतं ते. फक्त दोन्ही वेळा आम्ही थोडक्यात वाचलो इतक्या कटकटीतून. प्रागला माझं वॉलेट गेलं तेव्हा त्यात शुन्य पैसे होते, पण कार्ड ब्लॉकिंग त्यात दुसरा देश मग ते रोमिंग, भाषा यात ते ब्लॉक होईपर्यंतचे ३ तास काहीही सुचत नव्हतं. नंतर बुडापेस्टला असेच पासपोर्ट असलेली बॅग चोरीला गेली आणि पैसे काढून बाकीचं परत मिळालं. तेव्हा नशीबाने आम्ही आधीच्या अनुभवातून पैसे ३ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे आमचे दोघांचे पैसे आमच्याकडे तसेच होते त्यामुळे तेवढा प्रश्न आला नाही. नुकसानही कमी आणि तिथे राहताना पण काही अडलं नाही. त्यात आमचा व्हिसा वेगळ्या कार्डवर असल्याने फक्तच पासपोर्ट हा प्रश्न होता. पण ताबडतोब अ‍ॅक्शन घेण्याची संधी मिळाली आणि ते परत मिळाले. पण तरीही पैसे जाणे, तो मनस्ताप अजूनही आठवलं तरी त्रास होतो. तुम्हाला तर फारच त्रास झाला.

समीरसूर's picture

11 Mar 2016 - 3:43 pm | समीरसूर

अर्रर्रर्र...खतरनाक अनुभव! आणि लिहिलं एकदम भारी आहे. कमालीचं उत्कंठावर्धक! अशी चांगली माणसे आहेत म्हणून जग चाललंय. अगदी वेगळा अनुभव!

पैसा's picture

12 Mar 2016 - 7:38 pm | पैसा

पुन्हा शहारा आला. तेव्हा तुमची अवस्था पहिल्यांदा कळली तेव्हा जिवाचं पाणी पाणी झालेलं. संपूर्ण परक्या ठिकाणी असा अनुभव आला आणि त्यातून तुम्ही निभावून बाहेर पडलात हा काही लहान सहान चमत्कार नव्हे. त्यात भारतीय वकिलातीच्या लोकांचे वागणे पार डोके खलास करणारे. वाईट म्हणजे तुम्ही किती वाईट अवस्थेत होतात ते दर मेसेजवर कळत होतं आणि आपण काही करू शकत नाही ही हतबलता अजून वाईट. नुसता धीर देण्यापलिकडे काहीच करू शकलो नाही ग. पण चुटपुटत्या ओळखीवर तुम्हाला पैशांची मदत करणारी माणसे म्हणजे जगात अजून चांगुलपणा शिल्लक असल्याचं लक्षण.

हो गं ताई.. पण तुमचे धीराचे शब्दसुद्धा खुप आधार देत होते आम्हाला. :)

सुबोध खरे's picture

19 Mar 2016 - 11:50 am | सुबोध खरे

शहारा आणणारा अनुभव. अशा वेळेस मती गुंग होऊन जाते आणि एक अतिशय असहाय्यतेचा अनुभव येतो.

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2016 - 12:18 pm | सानिकास्वप्निल

कधीच विसणार नाही ते दोन दिवस,काळजी लागून राहिली होती, चेपु,मेल,फोन सगळे प्रयत्न करुन झाले होते तरी जीवाला घोर लागून राहिला, तुम्ही सुखरुप घरी पोहोचलात आणि खरं सांगते जीवात जीव आला. प्रेग्नंसीमुळे फार धावाधाव करू शकले नाही याची खंत वाटत होती. पण आता जेव्हा भेटू तेव्हा तूला आमचा ओरडा खावा लागणार आहे ;)

हो गं खरय... तरी आपल्यासोबत कोणीतरी आहे, हेच खुप आधाराचे होते.
ओरडा खायला नो प्रॉब्लेम. ;)

स्वाती दिनेश's picture

21 Mar 2016 - 3:23 pm | स्वाती दिनेश

अनुभव भयंकर आहे.. त्या वेळी तुटक तुटक समजत होते पण सलग असे तुझा लेख वाचल्यावर समजले आणि आमचे रोमायण आठवले.
स्वाती

बापरे... स्वाती ताई.. हे पण भयंकर होते... हॉटेलच्या खिडकीतुन सामान चोरीला गेले ते पण ५व्या मजल्यावर. म्हणजे कहरच. पण नशीब कि ते पासपोर्ट आणि बाकिच्या गोष्टी परत मिळाल्या.
तुम्हाला त्या पेपरवर जर्मनीला जाऊ शकता हे सांगितले हे नवलच. आम्हाला एअरपोर्टच्या अधिकार्‍याने सरळ नाहि सांगितले होते. तो बोलला तुम्ही फक्त भारतात जाऊ शकता, बाकी कुठेच नाही.

अनन्न्या's picture

21 Mar 2016 - 6:00 pm | अनन्न्या

प्रत्येक शब्द अंगावर काटा आणतोय, तुम्ही खूप धिराने सामोरे गेलात. मदत करणाय्रांचे खरच कौतुक वाटतेय.

जुइ's picture

1 Apr 2016 - 10:35 pm | जुइ

प्रवासात सतत सतर्क आणि आपल्या वस्तूंची काळजी घेणे हे किती महत्त्वाचे आहे अधोरेखित करणारा अनुभव.

अरे देवा..भयंकरच मनस्ताप झाला की..

अभिनाम२३१२'s picture

27 Dec 2016 - 6:31 pm | अभिनाम२३१२

सर्वप्रथम आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ..... अशा प्रकारात होणारी जीवाची घालमेल .....याची कल्पना न केलेली बरी .....असो .....

आम्ही (म्हणजे मी आणि सौ) हल्लीच बार्सिलोना ची वारी केली ....अगोदरच सर्वानी सावध केलेलं असल्याने सुदैवाने आम्हाला असा काही अनुभव आला नाही आणि आमची सर्व सहल सुखरूप झाली ..... सदर वारीचा अनुभव मी लवकरच मिपा वर शेअर करेन .....

धन्यवाद........!!!!!

कौशी's picture

28 Dec 2016 - 7:10 am | कौशी

कसं निभावले असेल कल्पना करवत नाही..

बाजीप्रभू's picture

28 Dec 2016 - 8:17 am | बाजीप्रभू

अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

रुपी's picture

28 Dec 2016 - 12:56 pm | रुपी

बापरे.. फारच अवघड परिस्थितीतून गेलात तुम्ही...