आख्खे काश्मीर भारतात!!

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
12 Sep 2008 - 12:11 am
गाभा: 

आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून. हे पहा...

From Kashmir on BBC

नाहीतर नेहमी ते काश्मीरचा भूभाग हा असा दाखवतात ज्यात पाकव्याप्त काश्मीराला पाकीस्तान कंन्ट्रोल्ड काश्मीर उल्लेखले जाते.
From Kashmir on BBC

आपला,
(अखंड-भारतवादी) भास्कर

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

12 Sep 2008 - 12:21 am | ऋषिकेश

बीबीसी वाल्यांनी चुकुन भारताची भुमिका दाखवली आहे असे वाटते. चित्र बघून काहिसे बरे वाटले.
मात्र सत्य परिस्थिती आहे तीच आहे (असावी) ही जाणीव होताच पुन्हा भानावर आलो

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 7:14 am | विसोबा खेचर

चित्र बघून काहिसे बरे वाटले.

हेच म्हणतो...!

कवटी's picture

12 Sep 2008 - 2:05 am | कवटी

अरेच्चा काही तरी गडबड दिसतेय. नेहमी हे युरोप आणि अमेरिकावाले काशमीर पाकिस्तानात दाखवतात. याची इतकी सवय झाली आहे की परवा चुकुन महाराष्ट्रटाइम्सने तसाच नकाशा छापला आणि मग दुसर्‍या दिवशी माफी मागीतली.
(अखंड भारताचा पुरस्कर्ता) कवटी

गणा मास्तर's picture

12 Sep 2008 - 6:32 am | गणा मास्तर

ऋषिकेशशी सहमत
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मदनबाण's picture

12 Sep 2008 - 7:10 am | मदनबाण

कोणी नकाशात दाखवा अगर दाखवू नका, काश्मीर हे भारतातच होते.. आहे आणि राहील.....!!!
(अखंड हिंदूस्थानचा चाहता)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

एकलव्य's picture

12 Sep 2008 - 8:05 am | एकलव्य

भारतव्याप्त काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर अशी लेबलं झळकवली आहेत. नीट पाहा. काश्मीर हा भारताचा भाग आहे... भारताने व्याप्त केलेला नाही.

बीबीसीचे वरील चित्रातील व्हर्जनही विसंगतच आहे. ते मान्य करून दूधाची तहान ताकावर भागविण्याची आमची तयारी नाही.

(महाभारतीय) एकलव्य

भास्कर केन्डे's picture

12 Sep 2008 - 9:28 pm | भास्कर केन्डे

मित्रवर एकलव्य,

बर्‍याच काळाने आपण पुन्हा या प्रतिसादाने संपर्क साधत आहोत. आनंद झाला.

ते मान्य करून दूधाची तहान ताकावर भागविण्याची आमची तयारी नाही.
-- ह्याला म्हणतात करारी बाणा.

भारतव्याप्त काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर अशी लेबलं झळकवली आहेत.
--ते दुसर्‍या नकाशात. पण पहिला पहा ना.

आपला,
(अखंड भारतवादीच) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सर्वसाक्षी's picture

12 Sep 2008 - 10:16 pm | सर्वसाक्षी

हे दर्शन सुखावह आहे, धन्यवाद.