बेसन पोळा / पिझ्झा काहीही ......

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
24 Nov 2015 - 11:21 am

राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;)
आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात.
पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न
सगळ्याना आवडला देखील म्हणुन इथे हा रेसेपी प्रपंच :) पदार्थ झालाय पण बारस कै जमल नै आपल्याला :)

साहित्य :
१ )शिळ्या पोळ्यांचे तुकडे.
२ ) बेसन एक वाटी.
३) जिर आणी ओवा प्रत्येकी १ छोटा चमचा.
४ ) मुठभर मेथीपाने चिरुन न धुवुन ( कांदापात /पालक किंवा कुठलीही , तुमची आवड )
५ ) मिठ चविनुसार.
६ ) हिरवी मिरची + लसुन पेस्ट - १ चमचा. (तुम्हाला झेपेल तितकी )

क्रुती :
वरिल सर्व मिश्रण ( पोळ्यांचे तुकडे सोडून ) भज्याला कालवतो तसेच कालवून घ्या.
त्यात पोळीचा तुकडा बुडवून मिश्रण चांगले लावून घ्या.
A
C
तव्यावर थोड तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. बरोबर सॉस / चटणी / लोणच जे काही हाती लागेल ,सापडेल ते , नसले तरी हरकत इल्ले :)
B
आत पोळी असल्याने कमी तेलात हे प्रकरण होत शिवाय तव्याला चिकटत नाही सहज उलटल जात ह्यासाठी नॉन स्टिकची गरज नाही :)
E
D

चमचमीत न कमी तेलातल गावरान पिझ्झा / पोळी नक्की आवडेल तुम्हाला :)

(मनीच्या बाता : " फोटु जरा असे तसेच आलेत खाण्याची घाई , सुड ह्या आयडीची जाम भीती वाटायलिय " ) ;)

प्रतिक्रिया

मयुरMK's picture

24 Nov 2015 - 11:50 am | मयुरMK

पोस्ट चविष्ट. :p

पिवडी राॅक्स अगेन! झकास रेसिपी.नक्की करुन पाहणार.माझ्या लेकाला आवडेल हा प्रकार असं वाटतंय.

माहितगार's picture

24 Nov 2015 - 2:11 pm | माहितगार

आयडीया आवडण्यात आली, नक्की करून पाहीन, टोमॅटो प्युरी अ‍ॅडवूनही पहावी म्हणतोय कदाचीत टोमॅटो ऑम्लेट सारखे लागू शकेल.

असलं काहीतरी चटकमटक खाती अन कॅल्शम कमी पडते. नखे पाहा जरा. ;)
.
एनीवे छान आहे रेसिपी. अंडे वगैरे ट्राय करायला हरकत नै शिळ्य चपातीसोबत.

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2015 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर

अंड्याच्या बॅटरमध्ये पाव बुडवून, तव्यावर किंचित तेल टाकून, चरचरीत भाजून घेतले की त्याला 'फ्रेंच टोस्ट' म्हणतात तसेच ह्याला 'इंडीयन टोस्ट' (विदाऊट एग) का म्हणू नये?

करून पाहण्यात येईलच.

माहीतीय हे! आम्ही पण करतो.

आमच्याकडचा बदल असा की पोळी दोन्ही बाजूनी शेकवून झाली, की मग त्यावर हे डाळीचं बॅटर पातळ पसरवायचं आणि उलटवून फक्त ती बाजू तेलावर खरपूस भाजून घ्यायची.

मितान's picture

24 Nov 2015 - 4:52 pm | मितान

येस्स ! असंच !

अभ्या..'s picture

24 Nov 2015 - 4:54 pm | अभ्या..

बदलापूरी वगैरे नाव दे मग. किंवा बदलापोळी. ;)

बदलापोळी म्हटलं तर कोणीतरी बदलून द्यायचं!!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Nov 2015 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

काय आहे हे विषारी?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2015 - 5:44 am | अत्रुप्त आत्मा

काय आहे हे विषारी?

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-040.gif

_मनश्री_'s picture

24 Nov 2015 - 4:47 pm | _मनश्री_

1

पैसा's picture

24 Nov 2015 - 4:49 pm | पैसा

जरा जास्त तेलात भाजले तर पोळीची भजी होतील ना!

चमचमीत दिसतायत फोटू !आलेच खायला ...

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 5:01 pm | सस्नेह

न फुगलेल्या पोळ्या खपवायची युक्ती भारीय हं पिवशे ! (ह घे)

एस's picture

24 Nov 2015 - 7:14 pm | एस

चांगली ऐड्या हय ये!

पोळ्या संवण्याची आयडीया चांगली आहे.

रेवती's picture

24 Nov 2015 - 7:19 pm | रेवती

संपवण्याची असे वाचावे.

पिशी अबोली's picture

24 Nov 2015 - 8:17 pm | पिशी अबोली

असलं कायतरी पोळ्या करायला शिकले तेव्हा माहिती हवं होतं गं पिवशे.. बरीच इज्जत वाचली असती..किचनातले अपमान अजून ठसठसतात.. :-P

स्रुजा's picture

24 Nov 2015 - 8:20 pm | स्रुजा

क्या बात हे !!! रेसिपी वर रेसिपी.. ऐकत नाय ! करुन बघणार नक्की..

मधुरा देशपांडे's picture

24 Nov 2015 - 8:24 pm | मधुरा देशपांडे

मस्त वाटतेय पाकृची कल्पना.

सानिकास्वप्निल's picture

24 Nov 2015 - 11:55 pm | सानिकास्वप्निल

बेसनाचा पोळा आवडतोच त्यामुळे ही पाकृ खूप आवडली :)

पद्मावति's picture

25 Nov 2015 - 12:04 am | पद्मावति

अरे वाह, मस्तं टेस्टी वन डिश मील!

प्रचेतस's picture

25 Nov 2015 - 9:05 am | प्रचेतस

भारी.

दिपक.कुवेत's picture

25 Nov 2015 - 12:51 pm | दिपक.कुवेत

मस्तच. एकदा नक्कि ट्राय करीन.

सविता००१'s picture

25 Nov 2015 - 2:48 pm | सविता००१

पिवशी रॉक्स

बॅटमॅन's picture

25 Nov 2015 - 3:09 pm | बॅटमॅन

अरेवा! मस्त रेसिपी.

रच्याकने, आम्ही पोळ्या व्यवस्थित करत असल्याने शिळी पोळी कशी खपवायची हा प्रश्नच अम्हांस लागू होत नाही. ;)

अनन्न्या's picture

25 Nov 2015 - 5:58 pm | अनन्न्या

करून पहायलाच हवी

आहाहा मस्त दिसतय अगदि! करुन पहाते आता.

पिलीयन रायडर's picture

26 Nov 2015 - 12:01 pm | पिलीयन रायडर

आज सकाळीच करुन पाहिलं. माझ्याकडे दुधी भोपळा होता म्हणुन तो किसुन टाकला. मस्त झालं!! आणि महत्वाचं म्हणजे झटपट!

पोळीच्या एकाच साईडला मिश्रण लावण्याचे वेरिएशनप पण केले. तेही छान झाले होते!!

फारच उपयुक्त रेसेपी हां पिवशे! किप इट अप!

पियुशा's picture

26 Nov 2015 - 12:58 pm | पियुशा

अरे वा गुणी बालिका :) बाकीच्यांचे पण आभार्स :)

मीता's picture

26 Nov 2015 - 2:08 pm | मीता

मस्तच

कविता१९७८'s picture

26 Nov 2015 - 2:45 pm | कविता१९७८

वाह छान आयडीया

स्वाती दिनेश's picture

26 Nov 2015 - 8:29 pm | स्वाती दिनेश

छान आहे आयडियाची कल्पना!
स्वाती

मुक्त विहारि's picture

27 Nov 2015 - 3:34 pm | मुक्त विहारि

नक्कीच करून बघणार...

एकदम मस्त. करुन पाहिले आणि खूप आवडले. मीही त्यात दुधी किसून टाकला.