कोणती सायकल घ्यावी?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
19 Nov 2015 - 12:15 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी
एक मदत हवी आहे. ईयत्ता ७ वी ते बी.एस्सी. सायकल माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. साधी बी.एस.ए. सायकल, पण तिच्यावर मी रोज कॉलेजचे १० कि.मी. जायचोच. शिवाय गणेशपुरी,वज्रेश्वरी,शिर्डी , अष्टविनायक अशा कितीतरी सहली केल्या. पण ९८ साली ती सायकल चोरीला गेली आणि नंतर पुन्हा सायकल घेतलीच नाही. आता पुन्हा सायकल घ्यावीशी वाटत आहे.
उपयोग - आठवड्यात २-३ वेळा ५-७ कि.मी.
बजेट- १०-१२ हजार
गियर-असल्यास उत्तम, पण सर्व्हिसिंग साध्या दुकानात पण झाली पाहीजे. उदा.डेकॅथलॉनमध्ये गेलो होतो. पण तिथे बिटीविन हा एकच ब्रँड मिळतो आणि सायकल रिपेअर करायला पुन्हा तिथे जावे लागेल किंवा इतरत्र स्पेअर मिळायची मारामार.
श्नेल सायकलच्या दुकानात एक चक्कर टाकली पण जरा महाग वाटते आहे. नॉन गिअर ९ ह्जार पासुन व गिअरवाली १४ पासुन पुढे.

क्रॉसच्या एक दोन सायकली आवडल्या त्यातील एक लिंक खाली देतोय

http://www.snapdeal.com/product/kross-globate-10-sports-bicycle/66045979

तर हा गोंधळ निपटायला मिपावरचे एक्सपर्ट मोदक आणि मार्गी यांचे आणि ईतरांचेही मत जाणुन घ्यायला आवडेल. तेव्हा कृपया मार्गदर्शन करा.

प्रतिक्रिया

मोदक's picture

19 Nov 2015 - 12:45 pm | मोदक

अभिनंदन.

बजेट थोडे वाढवा व माँट्रा किंवा फँटम कंपनीची सायकल घ्या. क्रॉसची सायकल घेतल्यानंतर थोड्या महिन्यात त्या सायकलचा कंटाळा येवू शकतो आणि नंतर ती सायकल अपग्रेड करण्यासाठी पुन्हा तितके बजेट गुंतवणे दर वेळी शक्य नसते.

...आणि मधल्या स्प्रिंगची सायकल शक्यतो घेवू नका.

महेश हतोळकर's picture

19 Nov 2015 - 12:50 pm | महेश हतोळकर

...आणि मधल्या स्प्रिंगची सायकल शक्यतो घेवू नका.

का? मेंटेनन्स खूप जास्त आहे का?

नाही. मेंटेनन्स जास्ती नाही. (बादवे... सायकल चे सर्विसिंग सहा महिन्यातून एकदा केले तरी चालते आणि एका सर्विसिंगला ४०० ते ७०० रू खर्च येतो - हे इम्पोर्टेड गिअरच्या सायकलचे रेट आहेत. बाकी सायकलींना कमी रेट असावेत)

.

या सायकलकडे नीट बघितले तर लक्षात येईल आपण सीटवर बसून सायकल चालवताना K40 लिहिलेल्या बारची उभी हालचाल होणार आहे (Vertical Movement) आणि आपण जमिनीला समांतर असा प्रवास करत असू (Horizontal Movement). यामुळे सायकलचा वेग विलक्षण कमी होतो आणि Vertical Horizontal घोळामध्ये आपले श्रम वाया जातात.

थोडक्यात जरी आपल्याला या सायकलने रेस खेळायची नसेल तरी आपले श्रम उगाचच वाया जाणार आहेत आणि अशा सस्पेंशनचा कितीसा फरक पडणार आहे हा प्रश्न आहेच.

(मी अशी सायकल २ महिने वापरली आहे!)

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2015 - 2:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

चांगली माहीती...ही पण एक सायकल बजेटमध्ये असल्याने आवडली होती आणि शॉर्ट्लिस्ट केली होती. ( क्रॉस के ४०)
पण आता काट मारतो. शिवाय स्पा ने सुचवलेले तुमचे धागे वाचतो आहे.

निनाद's picture

1 Dec 2015 - 4:06 am | निनाद

श्रम वाया जातात हे मान्य आहे. परंतु मधली स्प्रिन्ग घट्ट करण्याचीही सोय असते. तसे केले तर सस्पेन्शन कडक होउन तेव्हढे श्रम वाया जात नाहीत. जर फक्त जवळपासच्या जाण्यासाठी हवी असेल तर अशी सायकल आरामदायी असते. कोणतेही सस्पेन्शन नसलेली आणि असलेली सायकल चालवून पाहा. मगच ठरवा.

दुकानातील सर्व्हिसिंग विषयी फार कल्पना नाही. पण सायकल वापरणार असाल तर त्याचे सर्व्हिसिंग घरीच करता आले तर बरे. कारण यामुळे तुम्हाला तुमच्या सायकलीचे चांगली ओळख असते. दुरुस्ती कशी करायला हवी याचे जुजबी ज्ञान असते. त्याचा फायदा होतो.

गियर अलाइनमेंट किंवा चाकाचे ट्र्युइंग (डग काढणे) हे ही घरी करता येण्यासारखे असते, मी केले आहे. एक प्राथमिक हत्यारांचा संच मात्र आवश्यक असतो.

- सर्वसाधारणपणे गियर्स नियमितपणे स्वच्छ राखणे
- गियर्स सह सर्व हलणार्‍या सांध्यांना योग्य ते तेलपाणी करणे
- महत्त्वाचे नटस जसे चाकाचे नटस हे अधून मधून घट्टपणासाठी तपासणे

इतके केले तर इतर काही करण्याची फारशी गरज पडत नाही असा माझा अनुभव आहे.

आनंदी गोपाळ's picture

1 Dec 2015 - 9:05 pm | आनंदी गोपाळ

मी तरी क्यालरी बरनिंग व कार्डिओ व्यायामासाठी म्हणून सायकल चालवत असल्याने, बेसिकली श्रम 'वाया घालवणे' हेच उद्दिष्ट आहे. तेव्हा थोडी कंफर्टेबल दणके फ्री राईड असली की जास्त छान वाटते.

मार्गी's picture

19 Nov 2015 - 1:58 pm | मार्गी

नमस्कार!

पहिले सायकलिंगसाठी शुभेच्छा!

तुम्ही आठवड्यातून २-३ वेळेस ५-७ किलोमीटर चालवणार म्हणता. तुम्ही जरी आठवड्यातून ३-४ वेळेस ५०+ किलोमीटर चालवणार असाल; तरी तुम्हांला ९-१० हजारांपर्यंत मस्त सायकल मिळू शकते. गेअरची प्रायमरी रेंजमधली. खरं तर इतक्या कमी अंतरासाठी कोणतीही सायकल चालेलच, नव्हे पळेलच! पण शक्यतो गेअरवाली लो रेंज ठीक राहील. मेंटेनन्स तसा काही नसतो (अनलेस तुम्ही सायकलचा पुरेपूर वापर कराल). ९- १० पर्यंत क्रॉस बाईक मिळेल; श्नेलही मिळेल. किंवा सेकंड हॅण्डमध्येही ट्राय करू शकता.

शेवटी इतकंच म्हणेन की, सायकल, सायकलच्या एक्सेसरीज, सुविधा ह्यांपेक्षा सायकलिंगवर जास्त फोकस असावा. मी साडेपाच हजारच्या सायकलीने दोन- अडीच हजार किलोमीटर केले आहेत. अनेक शतकं केली आहेत. तुम्हांला सायकलिंगमध्ये जास्त रस असेल तर मी म्हणेन अजून एडव्हान्स्ड सायकलिंगपेक्षा पंक्चर, गेअर सेटिंग, ब्रेक सेटिंग इ. शिकण्याचा जास्त विचार करा. ते जास्त उपयोगी पडतं. आणि जसा स्टॅमिना, नियमितता वाढेल, तशी तीच सायकल एडव्हान्स्ड सायकलचा रिजल्ट देत जाते. :) धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2015 - 2:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद मार्गी...उपयुक्त माहीती दिलीत.

निनाद's picture

1 Dec 2015 - 4:07 am | निनाद

पंक्चर, गेअर सेटिंग, ब्रेक सेटिंग इ. शिकण्याचा जास्त विचार करा. ते जास्त उपयोगी पडतं. आणि जसा स्टॅमिना, नियमितता वाढेल, तशी तीच सायकल एडव्हान्स्ड सायकलचा रिजल्ट देत जाते.
सहमत आहे!

महेश हतोळकर's picture

19 Nov 2015 - 4:02 pm | महेश हतोळकर

मस्त माहिती मीळतेय

मीही सायकल घेण्यापूर्वी बराच रिसर्च केला , माझे बजेट खूपच कमी होते साधारण ८ हजारापर्यंत
मला कुठल्या मोठ्या टूर करायची इच्छा नव्हती, स्वताच्या आनंदाकरता आणि एकूण फिटनेस वाढवा एवढेच टार्गेट होते
त्यामुळे रोड बाईक , हायब्रीड हे प्रकार बाद केले , आणि mountain बाईक घ्याचे ठरवले.

आता मस्त खाडीच्या किनारी , शेताड, टेकड्यांवर ओफरोडिंग करतो मजा येते

८ हजारात मला atlas ची छान बाईक मिळाली. गेले ३ महिने वापरतोय

ghjh

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2015 - 7:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

जरा अधिक माहीती द्याल का? मॉडेल ,गियर आहेत का?

मी आॅनलाइन न घेता दुकानात जाऊन सायकल घेतल्याने आणी हा देशी ब्रांड असल्याने माॅडेल कुठले असे स्पेसिफिक नाही.

अँटलास अल्टिलेट गुगल करुन पहा, कदाचित दिसेल
याला १८ गेअर्स आहेत. ६ मागे, ३ पुढे

काळा पहाड's picture

19 Nov 2015 - 8:44 pm | काळा पहाड

समदे शिरीमंत दिसतेत. गरीब लोकांच्या बिना गियरच्या सायकल बद्दल पण लिवा कुणीतरी

निनाद's picture

1 Dec 2015 - 4:10 am | निनाद

गरीबांची सायकल बिना गियरची असते असे काही नसते.
काही वेळा फिक्सी (म्हणजे एकच एकच फिक्स गियर असलेली) महागही मिळते. या किमती फक्त सध्या 'काय ट्रेंड मध्ये आहे' यावर ठरतात.

पहाड, अरे नविन सायकल घेऊनच श्री गणेशा केलापाहिजे असे काही नाही. सेकंड हँड सायकल घेऊन सुद्धा उद्देश साध्य करता येतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Nov 2015 - 11:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

टिळक रोडवर लाईफसायकल मॉलमध्ये माझा सायकल शोध संपला आणि मी ही सायकल घेतली.

http://www.suncrossbikes.com/bike_detail.php?bikeId=212&BikeCatId=2&Bran...

सध्या रोअज थोडी थोडी चालवतोय.

अभ्या..'s picture

1 Dec 2015 - 7:02 pm | अभ्या..

डिस्क ब्रेका है रे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Dec 2015 - 7:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

फक्त पुढे आहेत

आनंदराव's picture

1 Dec 2015 - 1:48 pm | आनंदराव

अरे वा
झकासच
चला मग भेटताय का रोज सकाळी ६.३०.वाजता सायकाल घेऊन?
एक से भले दो.

सायकलिंग ग्रुप तयार करणेबाबत आलेल्या धाग्याचा दुवा कोणाकडे आहे का ?

नितीन पाठक's picture

9 Dec 2015 - 3:19 pm | नितीन पाठक

हा घ्या सायकल समूहाचा दुवा ...............

http://www.misalpav.com/node/33936

sagarpdy's picture

9 Dec 2015 - 3:39 pm | sagarpdy

धन्स

मित्रहो's picture

14 Dec 2015 - 7:10 pm | मित्रहो

म्हणून धागा वर काढतोय (वरील प्रतिसाद आणि लिंक वाचल्या)
माझ्याकडे सध्या सिंगल स्पीड अॅटलस सायकल आहे. साधारण आठशे किलोमीटर झाले असतील, तीस ते पस्तीस किलोमीटरच्या तीन चार राइड झाल्या दुसरी घेतपर्यंत अजून होतील. समस्या काही नाही तरी गिअरची सायकल घ्यावी वाटते.
गरजा
- वेग वगेरेची गरज नाही. शांतपणे फिरायला आवडते. राइड कंफर्टेबल असावी हीच अपेक्षा.
- आठवड्यातून दोन दिवस पन्नास किलोमीटर तर इतर दिवशी पाच ते दहा किमी.
- रोड बहुधा,थोडेबहुत ऑफ रो़ड
- एकदा घेतल्यानंतर दोन वर्षे तरी दुसरी बाइक घ्यावी असे वाटू नये. (परत आमचा उत्साह किती दिवस टिकेल सांगता येत नाही)
- क्विक रीलीज, कमीत कमी समोरचे व्हील आणि सीट तरी

दुकाने आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्या बाइक आवडल्या त्या अशा
- फायर फॉक्स सायक्लोन आणि बटविन रॉक ३४०
- फायर फॉक्स टारगेट , मॉंट्रा रॉकराइडर १.१(२०१५)(सहा ते सात हजार गुंतवणुक वाढवून काय मिळनार हा प्रश्न आहे)

मिपावरच्या जाणकारांचे याबाबतीत मत जाणून घ्यायला आवडेल.

सहा-सात हजार गुंतवणूक असलेल्या सायकल्स मध्ये अधिक चांगले गिअर सेट आहेत. समजा तुमचा बेत भविष्यात घाट वगैरे चढण्याचा बेत असेल तर हि गुंतवणूक जरूर करावी. परंतु तुमचे सध्याचे सायकलिंग फारसे बदलणार नसेल तर बीट्वीन अधिक बरी.
बाकी फायर फॉक्स पेक्षा मॉंट्रा अधिक चांगल्या आहेत असे ऐकले (मेंटेनन्स च्या दृष्टीने).

थोडेबहुत ऑफ रो़ड करता तो रस्ता म्हणजे अगदीच पायवाट असते कि कच्चा रस्ता ? कारण कच्च्या रस्त्याला हायब्रीड सायकल पण चालते.

मित्रहो's picture

16 Dec 2015 - 8:07 pm | मित्रहो

धन्यवाद sagarpdy
सायकल चालवायचा उत्साह किती दिवस टिकतो हे फार मोठे गूढ आहे. हव तर वर्षे टिकू शकतो नाहीतर पुढचे सहा महीने सुद्धा नाही.
माँट्रा विषयीच्या फिडबॅकबद्दल धन्यवाद.

मोदक's picture

28 Dec 2015 - 1:03 pm | मोदक

माँट्रा चांगली आहे.

माझ्याकडे एक MTB आहे गेली २ वर्षे. चांगली चालली आहे.

आशु जोग's picture

16 Dec 2015 - 8:55 am | आशु जोग

पण सायकल कशासाठी हवी आहे

फॅशन म्हणून की गरज भागविण्यासाठी

म्हणजे हाफपॅंट टि शर्ट नळीला पाण्याची बाटली

कानाला वॉकमन

पायात स्पोर्ट शूज पाहिजेच
अन्यथा लोक कष्टकरी वर्गातले समजतात

अन्यथा लोक कष्टकरी वर्गातले समजतात

समजुदेत की.. काय फरक पडतो?

उलट सायकलवरून जाताना रस्त्याकडेच्या फळवाल्यांकडे चिकार घासाघीस करता येते ;)