कच्च्या पपईचे लोणचे

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
26 Oct 2015 - 4:19 pm

papai
असे लगडलेले झाड पाहून लोणचे करायचा मोह आवरेना!
साहित्य: कच्च्या पपईच्या फोडी चार वाट्या, पाऊण वाटी लाल मोहोरी, दोन चमचे लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल, मेथी दाणे अर्धा चमचा, एक लिंबू.
सानिकाची आयडिया चोरलीय, पण माझ्याकडे तसे चमचे नाहीत म्हणून मग साध्या चमच्यांवर समाधान!
papai
papai
कृती: पपईचे दोन भाग करून चीक धुवून घ्या. आता त्याची साले काढून आवडीप्रमाणे फोडी करून घ्या. फोडींना मीठ, हळद लावून ठेवा. अर्धी वाटी तेल तापत ठेवा. मेथी दाणे तळून घ्या. उरलेल्या तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करायला ठेवा.
लाल मोहोरी मिक्सरच्या भाड्यात बारीक करा. थोडे पाणी घालून मोहोरी छान फेसून घ्या. तयार फोडींमध्ये लाल तिखट, फेसलेली मोहोरी मिसळा. गार झालेली फोडणी मिसळा. एक लिंबू पिळा. सर्व मिश्रण चमच्याने ढवळा. दुसय्रा दिवशी लोणचे खाण्यास तयार होईल.
लोणचे खाताना मात्र जरा जपून, मोहोरी नाकात झणझणते. हे लोणचे लगेच खायचे असेल तर पपई किसून घ्यावा. दह्यात कालवून खाल्यास सौम्य होते.
काळी मोहोरी घातल्यास लोणचे कडू होते, म्हणून लाल मोहोरी...असे आईचे मत आहे. आपल्या जबाबदारीवर काळी मोहोरी वापरण्यास हरकत नाही!
papai

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2015 - 4:27 pm | पिलीयन रायडर

पपईचे लोणचे!!! मी तर हात टेकलेत तुम्हा बायकांपुढे.. कशाचं काहीही बनवु शकता राव तुम्ही!

रेवती's picture

26 Oct 2015 - 5:40 pm | रेवती

लोणचे छान दिसतेय.
तू दिसेल त्या भाजीचे लोणचे करू शकतेस का? ;)
मी यावर्षी दोन कैर्‍यांचे लोणचे पहिल्यांदा घातलेय तर धन्य वाटले आहे. तुला तसे काही वाटतच नसेल किंवा नेहमीच धन्य वाटत असेल.

मी हा धागा बघताना हाच विचार करत होते की लोणचं वगैरे मी अजुन एकदा ही बनवलं नाहीये. २ वेळा एकाच वर्षात लोणचं घालणारी तू सुद्धा माझ्या दृष्टीने सुपर वूमन च आहेस.

अनन्या.. झकास.. एकदा तुझ्याकडे याय्लाच हवंय आणि काही तरी प्रेरणा घ्यायलाच हवीये

हीहीही, २ कैर्‍यांचं का होईना लोणचं घातलंस , आधी मी वाचलं वर्षातून दोनदा !! काय तो उत्साह म्हणलं ;)

अमृत's picture

27 Oct 2015 - 11:39 am | अमृत

अहो हैद्राबादला तर नॉन व्हेज लोणची सुद्धा मिळायची.

स्वाती२'s picture

26 Oct 2015 - 6:05 pm | स्वाती२

छान दिसतयं. सॅलडसाठी कच्ची पपई आणली की करुन बघेन.

तू दिसेल त्या भाजीचे लोणचे करू शकतेस का? हा हा हा.. पण अत्याचार नाही गं खरच तोंपासु लागते!

सानिकास्वप्निल's picture

26 Oct 2015 - 6:18 pm | सानिकास्वप्निल

वाह!! वाह! छान दिसतेय लोणचे :)
फोटो पण मस्तं, कच्च्या पपईचा असा ही वापर करता येऊ शकेल हे तुझ्या पाकृमुळे समजले.

नूतन सावंत's picture

26 Oct 2015 - 6:53 pm | नूतन सावंत

मला कच्च्या पपईची फरसाणसोबत येणारी चटणी कम कोशिंबीर फार आवडते.आता तुझे हे लोणचे नक्की करुन पाहीन.मस्त दिसतंय अगदी.

स्वाती दिनेश's picture

26 Oct 2015 - 8:51 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसत आहे.. करून पाहिन एकदा.
स्वाती

अनन्न्या's picture

27 Oct 2015 - 8:41 am | अनन्न्या

सुरंगीताई, कोशिंबीर, दुधीसारखी भाजीही मस्त होते! माझा लेक कसलीही भाजी खातो,पिकलेला पपई मात्र नाही. मग त्याला भाजी देते.

कवितानागेश's picture

27 Oct 2015 - 11:31 am | कवितानागेश

मोहरी मिक्सरमध्ये वाटली की जास्त चढते का?
खलाबत्त्यात कुटली तर बेतानी चढेल असा अंदाज आहे.

अमृत's picture

27 Oct 2015 - 11:40 am | अमृत

पपई आवडत नसल्याने पास :-(

स्नेहल महेश's picture

27 Oct 2015 - 11:43 am | स्नेहल महेश

मी सुद्धा या वर्षी कैरी आणि करवंदाचे लोणचे केले पण पपईचे लोणचे पहिल्यांदा समजले.
एक शंका हे लोणचे किती दिवस टिकत

अनन्न्या's picture

27 Oct 2015 - 7:13 pm | अनन्न्या

हे तात्पुरते असते. असेच मोठ्या काकडीचे/तवशाचेही करतात.
देईन दोन्हीची क्रुती!

स्नेहल महेश's picture

29 Oct 2015 - 11:08 am | स्नेहल महेश

वाट बघतेय काकडीच्या लोणच्याची

मस्तं आणि हटके पाककृती. आवडली.

अजया's picture

27 Oct 2015 - 2:17 pm | अजया

पपईचे लोणचे! अनन्न्या झिंदाबाद !! छान पाकृ.

त्रिवेणी's picture

27 Oct 2015 - 4:19 pm | त्रिवेणी

तेवढे koshambir आणि भाजीची रेसिपी पण दे बायो.
बाकी धन्य आहे तुझी.

पलाश's picture

29 Oct 2015 - 9:43 am | पलाश

असेच म्हणते. :)

कविता१९७८'s picture

27 Oct 2015 - 7:25 pm | कविता१९७८

मस्त रेसीपी

मदनबाण's picture

28 Oct 2015 - 6:21 am | मदनबाण

ओह्ह... सॉलिड ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राधा ना बोले ना बोले ना बोले रे... :- Azaad

पैसा's picture

28 Oct 2015 - 8:17 pm | पैसा

मस्त पाकृ!

दिपक.कुवेत's picture

29 Oct 2015 - 6:49 pm | दिपक.कुवेत

ईकडे कच्ची काकडी मीळतेच जमेल तसं करतो.

समप्रीत's picture

2 Nov 2015 - 4:29 pm | समप्रीत

मस्त

काकडीच्या लोणच्याची रेशिपी येऊ द्या आता लवकर!! आमच्या ओळखीच्या एक काकू मोहरी फेसून आवळ्याचं लोणचं करतात. असलं भारी लागतं!!

अनन्न्या's picture

5 Nov 2015 - 3:39 pm | अनन्न्या

फक्त पपई ऐवजी तवसं(जून काकडी)घ्या.

अक्षया's picture

5 Nov 2015 - 3:59 pm | अक्षया

छान दिसतय लोणचं..
तोंपासु :)

मंजूताई's picture

6 Nov 2015 - 3:34 pm | मंजूताई

दिसतंय. मेथांबा टाईप कच्च्या पपईचे एका हाॅटेलात खाल्ले होते गोडसर चवीचे त्याची पाकृ माहिती आहे का?