इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग

तुडतुडी's picture
तुडतुडी in काथ्याकूट
8 Oct 2015 - 3:40 pm
गाभा: 

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही .

संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत .

असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत .

'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

8 Oct 2015 - 5:00 pm | द-बाहुबली

टु बी होणेस्ट प्रीटीन वा टीन एज मधे ज्यावेळी धर्म या गोष्टीची मानवी जिवनातील डेप्थ (खोली /व्याप्ती.. स्थान न्हवे) माहीत न्हवती तेंव्हा मलाही वाटायचे मला एखादी ख्रिश्चन वा मुस्लीम गर्लफ्रेंड अस्ती तर बरे झाले असते... समथींग डिफरंट इन लाइफ... नथिंग एल्स. अँड कमॉन व्हाट इज व्रॉन्ग इन लव ऑर फिलींग लव्ड ?

अर्थात तो काळच तसा असतो. आणी या वा इतर कोणत्याही कारणाने माझ्यासारखे असे इतर अनेकांनाही ( अगदीच प्रत्येकाला नाही पण बरेच) असेच वाटुन गेले असणेही अगदीच शक्य आहे... तेंव्हा हे असे वाटुन गेलेल्यांची संख्या नक्किच जास्त असावी, जे नैसर्गीकच आहे. पण जसा मी मुलगा आहे. तसेच आपल्या समाजात आपल्याच समाज्यातल्या मुलीही राहतात व ज्या मुली आहेत त्यांनाही असे काही आकर्षण कुल वाटुन जाणेही विशीश्ट वयात तितकेच नैसर्गीक. अशा आकर्षणात चुकीचे ते काय म्हणनार, का तो फक्त पुरुषांचा अधिकार ठरतो ?

पण अशा या अविकसीत भावनांचा जेंव्हा प्रेम-धर्मयुध्दासाठी वा धर्मयुध्दासाठी वापर घडत असेल तर ती नक्किच चिंताजनक बाब ठरते कारण की असे घडन्याचे वय वा तशी कृत्ये करताना आपण कीती वल्नरेबल असतो हे फक्त काळ आणी काळच आपल्याला सामजावु शकतो... तेंव्हा हो सामान्य भारतीय नागरिक म्हणून मला अशा प्रकाराची चिंता वाटते. यावर उपाय काय हे जाणकारच सांगु शकतात.

भीमराव's picture

8 Oct 2015 - 5:04 pm | भीमराव

डोंगरदरीमधी एक गाव होतं. गाव भारी इरसाल नमुन्यांच, त्यात दोनचार धर्माची लोकं एकोप्यानं राहात होती. यांची त्यांची पोरं एकमेकांनमधी मिसळुन खेळायची बागडायची. मोठयालोकांमधी पन तुझमाझं कधीच नवतं. ह्यानच्या जत्रला ती त्यांनच्या ऊरसाला ही, गणपती, ईद, नवरात्र सगळे सण मिळुन साजरे व्हायचे. एकदा गावदेवाच्या मंदीराचा कळस बसवला गेला सव्वा महीना मांसाहार वर्ज होता, त्या वर्षी बकरी ईदला सुदा गावात बकरं पडलं नाही, एकंदर सगळ काही निट नेटकं होतं.
पन एक दिवस अचानक काही तरी झालं एकत्र खेळनारी पोरं हातात दगड धोंडे पारी हाथोडे घेऊन गावात चावताळल्यागत फिरु लागली. त्यांची घरं पाडली, गंजी पेटवुन दिल्या, घरावर दगडफेक केली, सारा जमाव त्यांच्या प्रार्थना स्थळाकडे गेला. पाडापाडी एकवेळ चालली असती पन त्या स्थळी पोरांनी नको नको ती घाण केली. अंगातला राग त्वेष भिंतींवर काढुन पोरं आपापल्या घरी गेली.
गाव आता गाव नाही राहीलं. यांचा दबाव खुप होता त्यामुळे केस नाही झाली.
त्या लोकांनी गावतली घरे वापरायची सोडुन दिली. व आपल्या प्रार्थना स्थळाजवळ सगळे राहु लागले.
त्यांचा प्रश्न एकच होता, तुमी अमी रोज बसन्या ऊठन्यातले, ठीक आहे पोरं अजान आहेत, पन मग मोठ्या मानसांनी त्यांना का नाही आडवले?
जे काही झालं ते करण्यात आमचा काही हात नवता, आमी तर तुमच्यातलेच, मग याचा राग आमच्यावर का काढला गेला?

गावातलं ते एकोप्याचं वातावरण नाही राहीलं. मनावर बसलेले घाव अजुन नाही भरले. यांना वेळीच आधार हवा नाहीतर ही आढी पिढयान पिढयाची.

एका सत्य घटनेची कथा.

तुडतुडी, आपल्या लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.

बाप्पू's picture

8 Oct 2015 - 6:16 pm | बाप्पू

तुडतुडी, आपल्या लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.

बाबुदादा.... प्रचंड असहमत. या लोक्कांना कितीही आपले म्हणाले तरी त्यांनी पण आपल्याला "आपले" म्हणायला हवे.
मुळातच यांचे आपलेपणा ठरवण्याचे क्रैटेरिया फारच वेगळे आहेत.

आणि यांना आपल्यापेक्षा काय कमी मिळते इथे? ज्यामुळे त्यांना अश्या संघटना मध्ये भरती होण्याची गरज वाटते ?
वर तुडतुडी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व लोक हे उच्चशिक्षित आहेत. मग थोडा विचार करा, कि जर उच्चशिक्षित मुस्लिम हे पाउल उचलत असतील तर, अशिक्षित किंवा कमी शिकलेला मुस्लिम समाजाला किती सोप्या पद्धतीने जिहाद च्या मार्गावर आणले जाऊ शकते

अश्या घटना थांबव्ण्य्साठी आपण (टु बी मोअर स्पेसिफिक - नॉन मुस्लिम) काहीच करू शकत नाही.
या घटना थांबवण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, शिक्षणसंस्था (सोप्या भाषेत मदरशे ), मुस्लिम धर्मसंस्था, चित्रविचित्र फतवे काढणारे लोक, मुस्लिम सार्वजनिक मंडळे, मुस्लिम राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन धर्मसंशोधन समाजप्रबोधन, आणि मुस्लिम धर्मातील कालबाय्ह आणि वाईट तत्वे रद्दबातल करून, चांगल्या तत्वांचा प्रसार करण्याची गरज आहे. हे ज्या दिवशी होईल तेव्हाच हे सगळे आपोआप थांबेल. परंतु हे कधीच होणार नाही, किंबहुना ते शक्यच नाहीये.
याउलट जग लवकरच यांच्या अल्लाह, खालीफाचे राज्य, जिहाद आणि जन्नत च्या हव्यासापोटी तिसर्या महायुद्धाला सामोरे जाइल.

दत्ता जोशी's picture

9 Oct 2015 - 6:27 pm | दत्ता जोशी

अगदी आरस्पानी वगैरे.

तुडतुडी's picture

8 Oct 2015 - 5:22 pm | तुडतुडी

पण अशा या अविकसीत भावनांचा जेंव्हा प्रेम-धर्मयुध्दासाठी वा धर्मयुध्दासाठी वापर घडत असेल तर ती नक्किच चिंताजनक बाब ठरते कारण की असे घडन्याचे वय वा तशी कृत्ये करताना आपण कीती वल्नरेबल असतो

एकाचं वय ३२ , दुसऱ्याचं ३७ . आजपर्यंत ज्यांना अटक करण्यात आलीये सगळ्यांची वय २५ च्या वर आहेत .

लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.

आपलं म्हणायचं म्हणजे नक्की काय करायचं ?

दत्ता जोशी's picture

9 Oct 2015 - 6:49 pm | दत्ता जोशी

आपलं म्हणायचं म्हणजे नक्की काय करायचं ?
कसले कसले प्रश्न विचारता हो तुम्ही..! इतका कसं कळत नाही?

फुलथ्रॉटल जिनियस's picture

8 Oct 2015 - 5:26 pm | फुलथ्रॉटल जिनियस

इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे पाप आहे हे सर्वप्रथम मुस्लिमांनी सम्जून घेतले पाहीजे,जसे तालिबानला मोठे करुन आपली पोळी भाजून अंकल सॅम नामानिराळे राहिले ,तसेच इसिसचे देखील होणार आहे.इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही.पवित्र कुराण ए शरीफला मानणार्यांनी अश्या गैर ईस्लामी व दहशतवादी संघटनेला विरोधच करायला हवा. इन्शाह अल्ला!

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 10:11 am | टवाळ कार्टा

कधी नव्हे ते आज मुद्द्याचे बोल्लात :)

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 5:45 pm | अस्वस्थामा

लगोलग सत्कार करुन टाका जेपीस सांगून.. परत कधी संधी मिळेल कै म्हैत. ;)

हुप्प्या's picture

9 Oct 2015 - 6:22 pm | हुप्प्या

>>इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही.
आयसिस ही कडव्या वहाबी वृत्तीच्या अरबभाषक लोकांनी बनवलेली संस्था आहे. त्यांच्या ध्वजावर ला इलाह इल्लिलाह आणि खाली महम्मद रसुलउल्लाह अशी वाक्ये आहेत जी मुस्लिम लोक शिरोधार्य मानतात.
आता ते जे करतात ते इस्लामच्या मानवतावादी आणि उदात्त तत्त्वांशी संबंधित नाही असे प्रमाणपत्र देणारे आपण कोण ढुढ्ढाचार्य? आपला इस्लामचा, कुराणाचा कितपत अभ्यास आहे? की केवळ ऐकायला बरे वाटते म्हणून हे आयसिस गैर इस्लामी असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलेत?
माझ्या माहितीनुसार कुराणात पुरेशी संदिग्धता आहे आणि ती वापरून त्याचा हवा तो सोयिस्कर अर्थ लावणे शक्य आहे. आणि तेच आयसिस करत आहे. असे घडत असताना पुन्हा पुन्हा दिसत असताना प्रत्येक वेळी ते इस्लामी नाहीच म्हणून हात झटकण्याचा प्रकार रटाळ, निरर्थक आणि अविश्वसनीय होत चालला आहे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

9 Oct 2015 - 9:20 pm | फुलथ्रॉटल जिनियस

@हुप्प्या ,आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि अरब जगताचे अभ्यासक आहात काय?, मुस्लिम धर्माची प्रतिकं वापरुन त्या धर्माला सहज बदनाम करता येते, नथुराम गोडसे सुंता करुन आणि दाढी वाढवून गांधीहत्या करायला कशासाठी गेला होता? मुस्लिमांना बद्नाम करण्यासाठीच ना? तसेच आहे हे आयसिसचे

हुप्प्या's picture

10 Oct 2015 - 10:16 am | हुप्प्या

माझा अरबी जगताचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे.

एक म्हणजे नथुरामने सुंता केली दाढी वाढवली ह्या आख्यायिका बिनबुडाच्या आहेत. त्याने गांधीना मारले ह्याचे स्वच्छ स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यात तो मुसलमान असल्याचा सुतराम दावा नाही. पण मूळ मुद्दा तो नाही आहे.

बिनलादेन वा जवाहिरी सारखे महाभाग हे कितीही वाईट वागले तरी त्यांची इस्लामवरील निष्ठा अपार होती असे त्यांच्या वागण्यातून दिसते. जन्मभर धर्माची साधना करणारे, कुराण तोंडपाठ असणारे, अस्खलित अरबी बोलणारे हे लोक कुराण समजू शकत नसतील मात्र भारतातले ढुढ्ढाचार्य मात्र तो अर्थ जाणतात हे का बरे खरे मानायचे? ते केवळ आपल्याला रुचते म्हणून? उलटा विचार करुन बघा, भारतातील तथाकथित जाणकारांना इस्लाम हा हिंस्र आहे, कुराणातील वा हदिसातील काही आयते ही अत्यंत घातक आहेत असे ते म्हणू शकतील का? तसे केले तर त्यांना मुस्लिम आणि हिंदू दोघांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही का?

आयसिस ही मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी बनवलेली संघटना आहे? काय वाट्टेल ते! कुठला पुरावा ह्याचा ? उलटे पुरावे भरपूर आहेत. त्यांच्या विविध अधिकार्‍यांची विविध माध्यमातून केलेली विधाने ही सगळी ते कट्टर निष्ठावान इस्लामी असल्याचे दाखवतात. सलाफी, वहाबी असले पंथ अनेक शतके असल्या हिंसक विचारांचा प्रचार करत आहेत. सद्दाम उलथल्यामुळे त्यांना एक हक्काचे मैदान मिळाले इतकेच.
माझ्या मते दुसरी शक्यता आहे. सौम्य प्रकृतीचे मुस्लिम लोक कुराणातील जहाल आयतांकडे दुर्लक्ष करतात.
कडवे हिंसक धर्मांध मुस्लिम लोक अशा आयतांकडे जास्त लक्ष देतात आणि म्हणून हा फरक होत असावा. पण असे काही कुराणात नाहीच असे ठोकून सांगणे ढोंगीपणाचे वाटते. एक नास्तिक ह्या नात्याने १४०० वर्षे जुना ग्रंथ हा अत्यंत काटेकोर आणि आदर्शवत असेल आणि त्यात कुठलेही व्यंग विसंगती नसेल असे मानणे आततायीपणाचे वाटते. आणि हे कुठल्याही ग्रंथाला लागू आहे. बायबल, गीता आणि वेदही.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

10 Oct 2015 - 11:46 am | फुलथ्रॉटल जिनियस

कुराणमध्ये जहाल आयते आहेत? आपल्याकडे काही पुरावा आहे का? कुराणमध्ये जहाल शिक्षा जरुर आहेत, पण त्या ईस्लामची मानवतावादी व आदर्श नैतिक तत्वे न मानणार्यांसाठीच! .

बॅटमॅन's picture

10 Oct 2015 - 3:55 pm | बॅटमॅन

जहाल आयते आहेत ना. मासल्यादाखल हे उदा. बघा.

सूरा क्र. २, आयत क्र. १९१ ते १९३.

सूरा क्र. ३, आयत क्र. ५६.

सूरा क्र. ३, आयत क्र. १५१.

सूरा क्र. ४, आयत क्र. ९५.

सूरा क्र. ५, आयत क्र. ३३.

सूरा क्र. ८, आयत क्र. १२.

सूरा क्र. ८, आयत क्र. ३९.

ही थोडीशीच उदाहरणे आहेत. टोटल १०९ श्लोक तरी तशा थाटाचे आहेत. अधिक माहितीकरिता इथे पहा जीनियस साहेब.

http://www.thereligionofpeace.com/quran/023-violence.htm

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Oct 2015 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्याट्या असा डायरेक्ट पठाणी सलवारीला हात नै घालायचा रे. फुलथ्रॉटल स्पीडमधे सुटला तर?

अस्वस्थामा's picture

12 Oct 2015 - 4:11 pm | अस्वस्थामा

वाल्गुदेया.. हे घे.. __/\__ ..

आता फुजिने प्रतिवाद करावा अन्यथा इतरांना "फुजि उत्तर द्या" मोहिम सुरु करावी लागेल.

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 5:12 pm | dadadarekar

Quran (3:56) - "As to those who reject faith, I will punish them with terrible agony in this world and in the Hereafter, nor will they have anyone to help."

जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही त्याला मी नरकात ढकलतो.... सनातनवाले , गीता , ब्रह्माकुमारीवाले इ इ हेच व्व्गळ्या शब्दात सांगत असतात.

बाकीचेही श्लोक विषादात असलेल्या मरगळलेल्या अर्जुनाला लढाईला उभे करावे त्या प्रकारातील वाटतात.

ते दोन चार दिवसापुर्वी मिपावर एक लेख होता ... गेस्टॉल्ट का काय ... तसं आहे हे.

किंवा मग नेहमीचे आवरण तरी ओढून घेतलेय.

"As to those who reject faith, I will punish them with terrible agony in this world and in the Hereafter, nor will they have anyone to help."

त्या वरच्या वाक्यातले अधोरेखित शब्द वाचू नयेत असा आदेश आलाय बहुधा आपल्याला.

बाकी

The Quran:
Quran (2:191-193) - "And kill them wherever you find them, and turn them out from where they have turned you out. And Al-Fitnah [disbelief or unrest] is worse than killing...
but if they desist, then lo! Allah is forgiving and merciful.

हे शांततावादी आहे का? असल्यास दोन प्रश्नः

१. तुही यत्ता कंची?
२. तुहा ब्रँड कंचा?

खटपट्या's picture

13 Oct 2015 - 9:37 am | खटपट्या

धन्यवाद बॅटमॅन. हे असं तोंडावर मारावेच लागते या लोकांच्या...

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 11:19 pm | काळा पहाड

कुराणः

9:5. Then when the Sacred Months (the 1st, 7th, 11th, and 12th months of the Islamic calendar) have passed, then kill the Mushrikun {unbelievers} wherever you find them, and capture them and besiege them, and prepare for them each and every ambush. But if they repent and perform As-Salat (Iqamat-as-Salat {the Islamic ritual prayers}), and give Zakat {alms}, then leave their way free. Verily, Allah is Oft-Forgiving, Most Merciful.

8:67. It is not for a Prophet that he should have prisoners of war (and free them with ransom) until he had made a great slaughter (among his enemies) in the land. You desire the good of this world (i.e. the money of ransom for freeing the captives), but Allah desires (for you) the Hereafter. And Allah is All-Mighty, All-Wise.

9:29. Fight against those who believe not in Allah, nor in the Last Day, nor forbid that which has been forbidden by Allah and His Messenger and those who acknowledge not the religion of truth (i.e. Islam) among the people of the Scripture (Jews and Christians), until they pay the Jizya with willing submission, and feel themselves subdued.

9:33. It is He {Allah} Who has sent His Messenger (Muhammad) with guidance and the religion of truth (Islam), to make it superior over all religions even though the Mushrikun (polytheists, pagans, idolaters, disbelievers in the Oneness of Allah) hate (it).

सिरा:

Sira, p367: Then he {Kab bin al-Ashraf} composed amatory verses of an insulting nature about the Muslim women. The Apostle said: “Who will rid me of Ibnul-Ashraf?” Muhammad bin Maslama, brother of the Bani Abdu’l-Ashhal, said, “I will deal with him for you, O Apostle of God, I will kill him.” He said, “Do so if you can.” “All that is incumbent upon you is that you should try” {said the Prophet to Muhammad bin Maslama}. He said, “O Apostle of God, we shall have to tell lies.” He {the Prophet} answered, “Say what you like, for you are free in the matter.”Volume 4, Book 52, Number 270; Narrated Jabir bin ‘Abdullah: The Prophet said, “Who is ready to kill Kab bin Al-Ashraf who has really hurt Allah and His Apostle?” Muhammad bin Maslama said, “O Allah’s Apostle! Do you like me to kill him?” He replied in the affirmative. So, Muhammad bin Maslama went to him (i.e. Kab) and said, “This person (i.e. the Prophet) has put us to task and asked us for charity.” Kab replied, “By Allah, you will get tired of him.” Muhammad said to him, “We have followed him, so we dislike to leave him till we see the end of his affair.” Muhammad bin Maslama went on talking to him in this way till he got the chance to kill him.

Sira, p368: Kab bin Malik said: Of them Kab was left prostrate there (After his fall {the Jewish tribe of} al-Nadir were brought low). Sword in hand we cut him down By Muhammad’s order when he sent secretly by night Kab’s brother to go to Kab. He beguiled him and brought him down with guile Mahmud was trustworthy, bold.

Sira, p463-4: Then they {the tribe of Quraiza} surrendered, and the apostle confined them in Medina in the quarter of d. al-Harith, a woman of Bani al-Najjar. Then the apostle went out to the market of Medina and dug trenches in it. Then he sent for them and struck off their heads in those trenches as they were brought out to him in batches. Among them was the enemy of Allah Huyayy bin Akhtab and Kab bin Asad their chief. There were 600 or 700 in all, though some put the figure as high as 800 or 900. As they were being taken out in batches to the Apostle they asked Kab what he thought would be done with them. He replied, “Will you never understand? Don’t you see that the summoner never stops and those who are taken away do not return? By Allah it is death!” This went on until the Apostle made an end of them.

Sira, p515: Kinana bin al-Rabi, who had the custody of the treasure of Bani al-Nadir, was brought to the Apostle who asked him about it. He denied that he knew where it was. A Jew came to the Apostle and said that he had seen Kinana going round a certain ruin every morning early. When the Apostle said to Kinana, “Do you know that if we find you have it I shall kill you?” he said, Yes. The Apostle gave orders that the ruin was to be excavated and some of the treasure was found. When he asked him about the rest he refused to produce it, so the Apostle gave orders to al-Zubayr bin al-Awwam, “Torture him until you extract what he has,” so he kindled a fire with flint and steel on his chest until he was nearly dead. Then the Apostle delivered him to Muhammad bin Maslama and he struck off his head, in revenge for his brother Mahmud.

हवं असेल तर पुढं चालू ठेवतो. ठेवू?

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 11:21 pm | तर्राट जोकर

आता मनुस्मृतीचेही दाखले द्या की दोन चार....

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 11:28 pm | dadadarekar

शत्रूला साम दाम दंड भेदाने संपवावे हे तर महाभारतात आणि चाणक्य नीतीतही आहे . त्याना का हिंस्त्र म्हणत नाही ?

आपल्या तो बाब्या ... ?

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 11:31 pm | काळा पहाड

तसंच समजा. बाकी गुजरात बद्दल कशाला बोंबलत असता सतत मग?

सुबोध खरे's picture

13 Oct 2015 - 9:01 am | सुबोध खरे

ओ हितेसराव
महाभारतात आणि चाणक्य नीतीत "शत्रूला" संपवावे आहे. संबंध नसलेल्या व्यक्तीला किंवा त्रयस्थ माणसाला नव्हे.
आणी कुरणात जो इस्लामला मानत नाही तो आपोआप शत्रू मानला गेला आहे आणी त्याला ठार मारा असे सांगितले आहे मग त्याचा तुमचा संबंध आहे अथवा नाही. समर्थन लंगडंच केलं पाहिजे असा तुमचा शिरस्ता दिसतो. अभ्यास वाढवा.

गामा पैलवान's picture

10 Oct 2015 - 12:49 pm | गामा पैलवान

हुप्प्या,

इस्लाम हिंस्त्र असल्याचं तुमचं निरीक्षण अचूक आहे. भारताचा आणि उर्वरित जगाचा इस्लामशी आलेला संबंध कमालीचा रक्तरंजित आहे. भारतातल्या हिंदूंना अभ्यास केल्याविना इस्लामला शांतीचं प्रमाणपत्र द्यायला आवडतं.

प्रेषितांच्या नंतर जे चार खलिफे झाले त्यापैकी पहिला खलिफा अबू बकर वगळता बाकीचे तीन तलवारीस बळी पडले. जरा कुठे मतभेद झाले की तलवार उपसायची असते. यावरून जे कळायला पाहिजे ते कळून येतं.

आ.न.,
-गा.पै.

dadadarekar's picture

10 Oct 2015 - 1:01 pm | dadadarekar

अरे वा ! तलवारीला बळी पडला की प्रायोपवेशनाने मेला यावर व्यक्तीचा किंवा धर्माचा मोठेपणा ठरतो की काय !

ज्ञानात भर टाकलीत.धन्य्वाद

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Oct 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दरेकर तुम्ही डॉक्टर आहात ना? मग मला आत्महत्त्या आणि हत्त्या मधला फरक सांगा बघु?

पटलं नाही म्हणुन थेट तलवारीला हात घालणारा धर्म (मेजॉरिटी पब्लिक इफ नॉट ऑल) सहिष्णु असु शकतो का?

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 7:07 am | dadadarekar

तलवार न घेणारा व दुसर्‍या कोणत्या तरी कारणाने मरणाराही हिंस्त्र , खुनशी असू शकतो. मला हे सांगायचे होते.

गामा पैलवान's picture

12 Oct 2015 - 5:06 pm | गामा पैलवान

दादा दरेकर,

केव्हा ना केव्हा सगळेच मरणार आहेत. मग सगळेच हिंसक झाले का?

आ.न.,
-गा.पै.

दरेकर दिवसभर फेकाफेकी करुन तुम्हाला झोप बरी येते

दत्ता जोशी's picture

9 Oct 2015 - 6:43 pm | दत्ता जोशी

"इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे पाप आहे हे सर्वप्रथम मुस्लिमांनी सम्जून घेतले पाहीजे"
तरीच तरीच. नाहीतर कशाला .....
इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही.
ते तर म्हणतात कि फक्त तेच खरा इस्लाम जाणतात आणि जगतात. आणि ज्यांना तसा जगायचं त्यांनी एकत्र यावे. इस्लामची सेवा करावी आणि जन्नत मिळवावी . जेणेकरून जगावर उदात्त आणि मानवतावादी लोकांचे राज्य येईल.
अरे..! अमेरिका आणि इस्रायेल.... विसरलोच कि!!

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 5:33 pm | तर्राट जोकर

वरील लेख बहुतांश वर्तमानपत्रीय बातमीसदृश्य आहे. तुमचे स्वतःचे काय मत असेल तर मांडा. चर्चा करायला बरं पडेल. म्हनजे निदान कारणं मांडलीत तर उपाय सापडतील... हवेत तीर चालवून काथ्याकूटाचं खळं होइल...

तुमच्या सोयीनं वेळ भेटला त विचार करा एखाद्याला आपलं म्हणनं याचा मराठी अर्थ काय ते. आमी एकतर नवीन त्यात लहान, तुम्हा मोठ्या लोकांना या पेक्षा जास्त काय सांगनार?

शंभर पक्के ..कस सुचत कस ..

दत्ता जोशी's picture

9 Oct 2015 - 6:52 pm | दत्ता जोशी

टाइम पास ला बरं हाय कि.

dadadarekar's picture

9 Oct 2015 - 7:25 am | dadadarekar

भारत पाकिस्तान एकत्र हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणणारा गोडसे हिरो ठरतो.

दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीने हेच स्वप्न पाहिले तर तो मात्र क्रिमिनल !

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 9:09 am | खटपट्या

काडी क्र. १

नाखु's picture

9 Oct 2015 - 9:28 am | नाखु

विषयात काही माहीती नाही.

पण मिपावर

instigator

disfigured

Satanic

ईडीस डास आहे आणि त्याने डेंग्यू होऊ शकतो तेव्हा

"गप्पी" मासे पाळा आणि हि(र)वाताप टाळा

अखिल मिपा हिरवा ताप प्रतीबंध आणि ईडीस डास निर्मूलन समीतीचा संयुक्त, मिपा वाचक जागर.

कधी जॉईन करताय ?

अजया's picture

9 Oct 2015 - 9:14 am | अजया

=))शंभर मोजायच्या का?

तुडतुडी's picture

9 Oct 2015 - 12:39 pm | तुडतुडी

आपली कृत्यं 'आपलं' म्हणण्यासारखी असली कि कुणाची टाप आहे 'आपलं' न मानण्याची ?.भारताशिवाय जगातल्या कुठल्याही देशात अप्ल्पसंख्यांक इतके सुरक्षित नाहीत . पण तेच काहीतरी टुकार उद्योग करून स्वतःला असुरक्षित करून घेतात . तेव्हा त्यांनी आपलं वर्तन सुधारणं आवश्यक आहे

वरील लेख बहुतांश वर्तमानपत्रीय बातमीसदृश्य आहे. म्हनजे निदान कारणं मांडलीत तर उपाय सापडतील

लेखाच्या सुरवातीलाच म्हटलं आहे बातमी वाचण्यात आली . त्या बातमीचा आधार घेवून लेख लिहिला आहे . तो बातमीसदृश्य आहे मुद्दा गौण आहे . लेखातला मुद्दा ध्यानात घ्या . कारणं स्पष्ट आहेत . खलिफाचं राज्य हवं , आमच्या धर्माचं राज्य हवं . आमचा सगळ्यांवर वचक हवा हा हव्यास .मुल्ला मौलवी स्वार्थासाठी धर्मांधता पसरवतात त्याला खरं मानून चालणं .बाप्पू नी म्हटल्याप्रमाणे इतके उच्चशिक्षित लोक सुधा 'इतरांना मारलं तर जन्नत मध्ये जाल' ह्यावर विश्वास ठेवतात ? सांगितली कारणं . आता उपायांवर बोला .

हिंदूनी मुसलमानांविरुद्ध लढू नये.

हिंदूनी गरीबीविरुद्ध लढावे.

बाप्पू's picture

9 Oct 2015 - 5:48 pm | बाप्पू

साहेब . नरेंद्र मोदी यांनी जो उपाय संगितलय तो भारताच्या प्रगती साठी आहे.
आइसिस किंवा दहशतवाद थांबवण्यासाठी नाहीए.
आणि फक्त हिंदूंनी गरीबी विरुद्ध लाढून हे जिहाद आणि दहशतवादाचे कारखाने कसे थांबतील ब्वा ?

"ज्या ठिकाणी किड लागली आहे तिथेच औषध मारले पाहिजे. ज्या ठिकाणी घाण आहे तिथेच सफाई केली पाहिजे. "

dadadarekar's picture

9 Oct 2015 - 6:02 pm | dadadarekar

आठशे वर्षापासून तुमचे नेते बोंबाच हाणताहेत. पण गनिम संपलाच नाही.

आता तुम्ही प्रयत्न करा.

दत्ता जोशी's picture

9 Oct 2015 - 6:46 pm | दत्ता जोशी

किंवा उलटं..!

dadadarekar's picture

10 Oct 2015 - 3:37 pm | dadadarekar

१९४७ ला गनिम ४० % होते... फाळणी होऊन एक मोठा भाग आपसूक वजा झाला अन मग हे राष्ट्र हिंदुराश्ट्र झाले.

काडी क्र. दोन टाकण्याचा क्षीण प्रयत्न...

विनोद१८'s picture

12 Oct 2015 - 10:30 pm | विनोद१८

अरे, गनिम तर केव्हाच संपला कारण ते होते 'तुर्की, इराणी, अरबी, पठाणी'. आता इथे राहिलेत ते केवळ आणि केवळ 'बाटगे' ????? काय, बरोबर ना नाना ?????

नाना, तु इथेच मिपावर एका प्रतिसादात स्वत:ला 'पुर्वाश्रमीचा ब्राम्हण' असे म्हटले होतेस, पण तुझ्या बाबतीत असे काय घडले की तुला धर्मत्याग करावासा वाटला ?? नाही म्हटले तरी मला याबद्दल जरा कुतूहल आहे, म्हणून जाणुन घ्यायला आवडेल.

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 10:41 pm | dadadarekar

सुनाउंगा एक दिन. सब्र करो

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2015 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिख्खो, लिख्खो । एक लेख लिख्खो मिया । दिल हलका हो जायेगा । दिल, दिमाग और सेहतके लिये आसान हो जायेगा ।

विनोद१८'s picture

12 Oct 2015 - 11:00 pm | विनोद१८

जरूर सुनाओ नाना, वाकईमे सुनाओ, इसमे तो कोइ शक नही यहा तो सब लोग सुनेंगे तुम्हारी कहानी. अगर उसमे असलीयत हो तो.

नाव आडनाव's picture

9 Oct 2015 - 5:32 pm | नाव आडनाव

ठरलं ! नाही जाणार आता मी इसिस जॉइन करायला.

जन्नत मिस केली राव तुम्ही हा निर्णय घेऊन... :P

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 8:32 am | नाव आडनाव

:)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 9:06 pm | टवाळ कार्टा

जा बे....तेव्हडीच ऑनसायीट =))

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 8:33 am | नाव आडनाव

:)

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Oct 2015 - 10:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

हा शवार्मा अन कबाब्स मस्त मिळतील ;)

धर्मराजमुटके's picture

9 Oct 2015 - 7:20 pm | धर्मराजमुटके

काय राव ! काय स्वाभिमान नावाची गोष्ट उरली नाही ! आता भारतात एवढ्या संघटना असतांना पार तिकडं एवढ्या लांब बोंबलत जायचं म्हणजे काय ?

सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .

आत्तापर्यंतचे तुमचे मिपावरील प्रतिसाद पाहता या विषयावर तुमच्यापेक्षा कोण जाणकार असेल असे वाटत नाही बॉ !

बाप्पू's picture

9 Oct 2015 - 8:42 pm | बाप्पू

फिजि -
जगातल्या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या अमेरिका च जबाबदार असते. काहीही झाले तरी अमेरिकेला शिव्या घालून मोकळे व्हायचे...
अमेरिकेला दोष देण्यापेक्षा तुम्ही जरा इस्लाम धर्म, कुराण व इस्लाम मधील आक्रमक अमानवीय तत्वे, चालीरीती. अंधश्रद्धा, अति-धर्मांधता, असहिष्णुता, स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या परंपरा इ, यावर विचार करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करा. आपली लोकसंख्या वाढवणे, टोपी घालणे आणि दिवसातून ४ वेळेला भोंगे वाजवण्यापेक्षा, सुशिक्षित मुस्लिम लोक्कांना एकत्र करून मुस्लिम धर्मावर संशोधन करा

थोडेसे अवांतर : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा मला आदर च आहे. पण त्यांचा पूर्ण रोख हा हिंदू धर्मावर च होता. आपल्या मुलाचे नाव " हमीद" असे ठेवण्य वतिरिक्त त्यांनी मुस्लिम धर्मात काहीच इंटरेस्ट दाखवला नाही. असो. तो त्यांचा वयक्तिक प्रश्न होता. त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ते एक महान कार्य आहे.

परंतु आश्चर्य वाटते कि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एखादा मुस्लिम दाभोलकर का नाही निर्माण झाला ? जर झाला असता... तर बाकीच्या जगाचे माहित नाही परंतु भारतात आपण इसीस आणि दहशतवाद यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवला नसता.

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 9:02 pm | अस्वस्थामा

नै बाकी चालू द्या फकस्त त्यांनी मुलाच नाव "हमीद" का ठेवले तेवढे शोधून वाचलेत तरी तुमच्या या प्रतिसादातील प्रश्नांची उत्तरे मिळतील (पुरवणी म्हणून हमीद दलवाईंबद्दल पण वाचा). "त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ते एक महान कार्य आहे." असं तुम्हाला खरोखरीच वाटतंय असा अंदाज आहे म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.. :)

बाप्पू's picture

9 Oct 2015 - 9:24 pm | बाप्पू

हमीद दलवाई यांच्याबद्दल माहिती आहे. आणि एक मराठी माणूस म्हणून त्यांचा आदर च करतो. माझा मुद्दा असा होता कि दाभोलकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवण्याव्यतिरिक्त मुस्लिम समाजातील चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी काय ठोस प्रयत्न केले? जर काही केले असेल तर कृपया वेगळा धागा काढून त्याची माहिती द्या. म्हनजे माझे अज्ञान दूर होईल आणि ते वाचून थोडेतरी मुस्लिम लोक जागृत होऊन भारताचाच फायदा होईल.
असो आता विषयांतर नको.

सरसकट सगळे मुस्लिम किंवा मुस्लिम धर्मच वाईट आहे असे मी या धाग्यावर कुठेही म्हणलेले नाहीये.
मुस्लिम समजात चुकीच्या लोकांना फोलो करण्याची प्रवृत्ती वाढतीय. त्यामुळे मी फक्त एवढेच सांगू इच्छितो कि धर्मसुधारणा करणाऱ्या लोक्कांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि मुस्लिम लोकांना योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. तर च आपण इसीस सारख्या संघटनांना भारतात शिरकाव करण्यापासून रोखू शकतो.

dadadarekar's picture

9 Oct 2015 - 11:00 pm | dadadarekar

मुस्ल्मानाना योग्य दिशा दाखवणार म्हणजे नेमकं काय करणार ?

हमीद दलवाईंना त्यांच्या हयातीतच त्यांच्या धर्मातील कडव्या लोकांशी प्रखर झुंज घ्यावी लागली होती. माझ्या आठवणीनुसार तेव्हा अंनिस कार्यरत नव्हती त्याकाळी मे. पुं. रेगे व अ. भि. शहा ह्यांचा एक मंच समाजसुधारणेविषयी बराच कार्यरत होता, पण दलवाईंना त्यांनीही मदत केल्याचे मला आठवत नाही.

हमीदच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नि मेहरून्निसा दलवाई ह्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या परीने केला. मात्र त्यांना कर्मठाच्या झुंडीपुढे शरण जावे लागले व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य गूंडाळावे लागले. ह्याविषयी त्यांनीच त्यांच्या आत्मचरीत्रात सविस्तर लिहीले आहे. तेव्हा त्यांना डॉ. दाभोळकर अथवा अन्य कुणाचीही साथ मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे मला आठवत नाही. त्याविषयी ठोस काही माहिती असल्यास कृपया येथे सांगावी.

बॅटमॅन's picture

10 Oct 2015 - 5:45 pm | बॅटमॅन

इंडीड.

हुसेन दलवाई हे हमीद दलवाईंचे कोण ?

प्रदीप's picture

10 Oct 2015 - 8:55 pm | प्रदीप

होते, असे वाटते.

विनोद१८'s picture

11 Oct 2015 - 1:26 am | विनोद१८

ते दोघेही सख्खे भाउ.

हुसेन दलवाईंमधे भावाचा एकही गुण नाही. :(

प्रदीप's picture

12 Oct 2015 - 5:45 pm | प्रदीप

तो नाही.

अंनिस समर्थक अनेकदा दाभोळकरांनी हमीदचे नाव आपल्या मुलास दिले आहे, ह्याकडे निर्देश करतात. त्यांनी अथवा अंनिसने हमीदच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळीच्या कामात हमीद हयात असतांना अथवा/ आणि त्यांच्या पश्चात काय मदत केली त्याविषयी कुणी काही ठोस सांगण्याची, अथवा तशी ती केली नसल्यास त्याची काही सयुक्तिक कारणे असतील ती विशद करण्याची वाट पहातोय.

dadadarekar's picture

9 Oct 2015 - 11:07 pm | dadadarekar

परंतु आश्चर्य वाटते कि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एखादा मुस्लिम दाभोलकर का नाही निर्माण झाला ? जर झाला असता... तर बाकीच्या जगाचे माहित नाही परंतु भारतात आपण इसीस आणि दहशतवाद यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवला नसता

तस्लिमा नसरीन , मलाला व इतर अनेक आहेत.

एक दाभोळकर झाल्याने हिंदू धर्म १०० % शुद्ध व स्वच्च झाला काय? मुसलमानांच्यात दाभोळकर झाल्यास तो धर्म कसा स्वच्छ होइइल ?

दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.

हे म्हणजे मी आठ तास एच आय व्हीचे पेशंट बघतो म्हटल्यावर तुम्ही हाड मोडलेले पेशंट का बघत नाही असे विचारल्यासारखे आहे.

दत्ता जोशी's picture

10 Oct 2015 - 10:53 am | दत्ता जोशी

तस्लिमा नसरीन , मलाला व इतर अनेक आहेत.
होय ना . तस्लिमा नसरीन आणि मलालाने भारतात समाज सुधारणेसाठी आयुष्य वेचले. तरीही असं कसं काय म्हणू शकतात हे करंटे !!!!!!!!!!!!!!?????
दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.

त्याला हास्यास्पद नाही, उत्तर नसल्याने हसून साजरे करणे (वास्तवापासून दूर पळणे) म्हणतात.
हे म्हणजे मी आठ तास एच आय व्हीचे पेशंट बघतो म्हटल्यावर तुम्ही हाड मोडलेले पेशंट का बघत नाही असे विचारल्यासारखे आहे.
^^^^^^^^^^^ काय समजलं नाही बुवा हे उदाहरण.
एच आय व्ही चा पेशंट तो एच आय व्ही चा पेशंट मग मी यालाच बघणार आणि त्याला बघणार नाही असा दुजा भाव डॉक्टर ने करावा का असा धोपट प्रश्न आहे. पण तो हास्यास्पद आहे हे पटतंय इथे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Oct 2015 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मलाला हा चेहेरा आहे. ओव्हरहाईप्ड आणि ओव्हरप्रोजेक्ट केलेला. अमेरिकेला आम्ही मुस्लिमांसाठी काही करतोय हे दाखवायसाठी वापरलेली एक बाहुली. लाखोंनी लोकं दहशतवादी हल्ल्यांमधे अपंग झाली. एकट्या मलाला ला अमेरिकेमधे नेउन स्पेशल प्लास्टिक सर्जरी अन थेट नोबेल प्राईझ? जगामधे ह्याचं कारणासाठी काम करणारी आणि मलाला पेक्षा खुप जास्तं प्रोडक्टिव्ह काम केलेली शेकडो लोकं आहेत. त्यांची सिनिऑरिटी डावलुन थेट नोबेल? =)) बात कुछ हजम नहि हुई बॉस. आणि त्यातुनही कैलाश सत्यार्थी (भारतीय) आणि मलाला (पाकिस्तानी) ह्या दोघांना एकाचं वेळी पारितोषिक मिळावं हा योगायोग नक्कीचं नाही. हि सुत्रं बरीचं वरुन हाललेली आहेत. काय माहित कदाचित मलाला सी.आय.ए. ची एखादी एजंटही बनलेली असु शकेल.

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 7:22 am | dadadarekar

मलाला एजंट असू शकेल असे तुम्हाला वाटते म्हणून ती नोबेल मिळवायला अपात्र ठरते ! वा !

ऋतुराज चित्रे's picture

10 Oct 2015 - 4:59 pm | ऋतुराज चित्रे

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा मला आदर च आहे. पण त्यांचा पूर्ण रोख हा हिंदू धर्मावर च होता. आपल्या मुलाचे नाव " हमीद" असे ठेवण्य वतिरिक्त त्यांनी मुस्लिम धर्मात काहीच इंटरेस्ट दाखवला नाही.

बाप्पूसाहेब, खालील विडिओत आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे डॉ.नरेन्द्र दाभोलकर यानी उत्तर दिले आहे. त्यासाठी आपल्याला पुर्ण ९ मि.०३ से. विडिओ ऐकावा लागेल.

प्रदीप's picture

10 Oct 2015 - 8:48 pm | प्रदीप

ह्या क्लिपचा दुवा आपण अगोदरही दिला होतात, तेव्हा त्यांचे भाषण पाहिले. त्यांतून काही प्रश्न मनात आलेले आहेत, पण येथे ते सर्व अवांतर आहे, तेव्हा इथे लिहीत नाही.

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 9:12 pm | बॅटमॅन

भारतातील अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी मिळून आयसिस ही इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढल्याची न्यूज़ होती बॉ मध्ये.

असा फतवा काढणारे धर्मगुरू हेच खरे भारतीय मुस्लिम आहेत. आणि त्यांना मी एक भारतीय म्हणून "आपले" मानतो.,
परंतु त्याचवेळी आपल्या भारतात याकुब च्या फाशीला विरोध करणारे, त्याला सोडून द्या म्हणणारे, अफजल गुरु निर्दोष आहे (होता) असे म्हणणारे पण धर्मगुरू आणि राजकीय नेते आहेत.. त्यांचे काय करावे बॉ ?

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 9:43 pm | बॅटमॅन

त्यांचे काय करावे बॉ ?

काय करणार....त्यांच्यावर कडक टीका झालीच पाहिजे.

dadadarekar's picture

9 Oct 2015 - 11:11 pm | dadadarekar

अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली.

एक मुद्दा संपला.

पण दुसर्‍याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ?

ऑलरेडी हिस्सा दिला गेलाय हो १९४७ ला...काशि घाला तिकडे...अरे तुम्हि त्यावेळेस नसाल गेलात बरोबर आहे सुंता झालि नव्हति ना तेव्हा :)

विजुभाऊ's picture

10 Oct 2015 - 8:48 am | विजुभाऊ

इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच.
इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक.

dadadarekar's picture

10 Oct 2015 - 10:10 am | dadadarekar

सहमत

बाकी, चालू दे

दत्ता जोशी's picture

10 Oct 2015 - 10:26 am | दत्ता जोशी

फुलथ्रॉटल जिनियस - Fri, 09/10/2015 - 21:20

, नथुराम गोडसे सुंता करुन आणि दाढी वाढवून गांधीहत्या करायला कशासाठी गेला होता? मुस्लिमांना बद्नाम करण्यासाठीच ना? तसेच आहे हे आयसिसचे

^^^^^^^^^^^^ सगळं काल्पनिकच कसं असतं हो तुमच्या पुस्तकांमध्ये ?
=========================================================================

अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली.

एक मुद्दा संपला.

पण दुसर्‍याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ?

__/\__जिनियस !!. हाडाचे जिनियस.........!!!!
=============================================================================
इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच.
इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक.

==========================================================================

अत्यंत विनोदी व्हायला लागला आहे धागा हळूहळू. .. ते हॉलीवूड चित्रपटात "रोमेडी" म्हणून प्रकार असतो न तसंच. " रोम्यांटिक कॉमेडी " किंवा " कॉमेडी रोमान्स" म्हणूया हवं तर . प्रेम आंधळ असतं असं ऐकलं होतं खरं. पण आंधळ्यांच प्रेम भन्नाटच.

हाफशेंच्युरी निमीत्त तुडतुडी आणी दादा दरेकर यांचा सत्कार सिरीयाच वनवे तिकीट देऊन करण्यात येत आहे.

-शुभेच्छुक- जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Oct 2015 - 4:36 pm | बिपिन कार्यकर्ते

’तमाम कार्यकर्ते’

मला वगळा हं यातून. प्लीज. शुभेच्छुक होण्याइतकाही वेळ नाही माझ्याकडे यांच्याकरता! ;)

अजया's picture

10 Oct 2015 - 12:47 pm | अजया

ही कल्पना सुचलेल्या जेपीला संपादक केलेच पाहिजे!

नीलमोहर's picture

10 Oct 2015 - 1:08 pm | नीलमोहर

१००% अणूमोदण (च्चं काय शब्द आहे बरं तो)

नाखु's picture

10 Oct 2015 - 2:53 pm | नाखु

किमान अखिल मिसळपाव सार्वजनीक सत्कार संपादक तरी !!!

स्वगत : "जे पी" वळख असू द्या गरीबाची .

तर्राट जोकर's picture

10 Oct 2015 - 3:38 pm | तर्राट जोकर

सांगितली कारणं . आता उपायांवर बोला .

उपाय तुम्हीच सांगितलेत मिपावर आजवर कित्येक प्रतिसादांतून, त्यामुळे मुसलमानांचं काय नाही झालं पण तुमचे प्रतिसाद गेले......

तुडतुडी's picture

11 Oct 2015 - 2:03 pm | तुडतुडी

भारत पाकिस्तान एकत्र हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणणारा गोडसे हिरो ठरतो.
दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीने हेच स्वप्न पाहिले तर तो मात्र क्रिमिनल !

पाकिस्तान हि मुस्लिमांची नाही , हिंदूंची भूमी आहे . मुस्लिमांनी तोडलेला लचका आहे तो . तेव्हा गोडसे सारख्या देशभक्ताला तो लचका तुटू नये वाटलं तर ते बरोबरच आहे . मुळात इस्राइल हि ज्यू आणि ख्रिश्चनांची भूमी आहे .त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र . अरब मुस्लिमांनी ती बळकावली . अर्थातच अत्याचार , सक्तीचं धर्मांतर , हत्याकांड, बलात्कार ब्ला ब्ला ब्ला . आता ज्यू ती भूमी परत मिळवत असतील तर त्यात काहीच चूक नाही . मुस्लिमांनी अनेक देशांवर आणि धर्मांवर जे अनन्वित अत्याचार केलेत तेच आता त्यांच्यावर उलटत आहेत . इस्राइलने केवळ प्यालेस्ताईनच नाही तर जॉर्दन सुधा घ्यायला हवा . इस्राइल , अमेरिकेला शिव्या घालणं बंद करा.
हमीद दलवाईनच कार्य महान आहेच . त्यांचा दाभोलकरांच्या मुलाशी काही संबंध नाही . In Fact ज्या मुस्लिमांनी भारतासाठी काही केलं आहे त्यांना भारतीय हिंदूंनी मुस्लिमांपेक्षा जास्त सन्मान दिला आहे .

दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.

इतर धर्मियांनी दाभोल्कारांबद्दल बोलणे हास्यास्पद आहे .विषय इसीस चा चाललेला असताना काही दीडशहाण्या लोकांनी दाभोलकर वगेरे irrelative मुद्दे काढून मुद्दा भरकटव्लाय

फुलथ्रॉटल जिनियस यांचे एक से एक हास्यास्पद प्रतिसाद आपण त्या अफ्जुल्य्याच्या धाग्यावर वाचलेलेच आहेत तेव्हा त्यांच्या बालिश बडबडीकडे दुर्लक्ष करणंच चांगलं .

उपाय तुम्हीच सांगितलेत मिपावर आजवर कित्येक प्रतिसादांतून, त्यामुळे मुसलमानांचं काय नाही झालं

आधी म्हणता करणं सांगा . मग म्हणता उपाय मीच सांगितलेत . तुमचं तुम्हाला तरी कळतंय का काय बोलताय ते . आणि मुसलमानांचं काय होणार हि नाही . चंबू गबाळं उचलून ह्या जगाला टाटा बाय बाय फक्त करावं लागणार
सुबोध खरे साहेब खूप धन्यवाद

dadadarekar's picture

11 Oct 2015 - 2:13 pm | dadadarekar

मुसौलमानाना असे शिव्याशाप देणारे अनेक होऊन गेले. बुडाला रंग्याचाचा पापी / म्लेंछ्संहार जाहला ..... असं बडबडलं म्हणून कुणाला काहीही फरक पडला नाही.

भूमी ही व्यक्तींची असते. त्या व्यक्तीनी धर्म बदलला तरी त्यांचा हक्क अबाधितच रहातो.

तुमचा मूळचा आचरटपणा जात नाही, तसंच काहीसं ना?

दादुनां ..मिपाचा विनोदविर पुरस्कार देण्यात यावा..

>>बुडाला रंग्याचाचा पापी>>> ठ्ठो =)))

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 8:19 am | dadadarekar

पुरस्कार तर घोषणावीर हिंदुत्ववाद्याना द्यायला हावा.

आजची बातमी वाचली का ? ३७० रद्द करता येणार नाही असे कोर्टाने सांगितले.

५६ इंची छाती ताणुन कोकलणारे कुठे गेले ?

जेपी's picture

12 Oct 2015 - 6:09 pm | जेपी

जोवर राज्याची विधानसभा भंग होण्यापुर्वी ती हे कलम रद्द करण्याची शिफारस करत नाही,तोवर हे कलम रद्द करणे कलम 35अ अन्वये करणे शक्य नाही.

हे जेके उच्चन्यायालयाचे मत आहे.

जेपी's picture

12 Oct 2015 - 6:15 pm | जेपी

न्यायालय पुढे म्हणते की कलम 370 (3) अन्वये राष्ट्रपती जाहीर अधिसुचना काढुन कलम 370 रद्द करु शकते.
यासाठी विधानसभेची शिफारस हवी.

सुबोध खरे's picture

12 Oct 2015 - 6:33 pm | सुबोध खरे

ओ हितेसराव
शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निस्संदिग्ध शब्दात सांगितले होते कि भारतीय घटनेप्रमाणे मुसलमान स्त्रीला पण पोटगी मिळाली पाहिजे. तेन्व्हा तुमच्या आवडत्या राजीव गांधी साहेबांनी निर्णायक बहुमताचा दुरुपयोग करून दाढी कुरवळण्याचे धंदे करून घटना दुरुस्ती केली ना? मग उगाच उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन कसला बुभुक्कार करता आहात?
३७० कलम रद्द करता येणार नाही असे जर "घटनेत" लिहिले असते तर इतकी वर्षे काश्मीरचे लोक त्याबद्दल घाबरून कलम रद्द केलेले आम्हाला चालणार नाही असे कंठशोष करून ओरडले नसते. घटनेतील काही मुळ कलमेच( मुलभूत अधिकार) फक्त रद्द करता येणार नाहीत बाकी सर्व घटनादुरुस्ती करून रद्द करता येतील ३७० हे (रद्द करता येण्याजोगे आहे) त्यात येते. ३७० हा "मुलभूत" नसून "विशेष" अधिकार आहे.
जरा कायदा वाचा व्यवस्थितपणे.

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 11:28 pm | काळा पहाड

दादादा रेकर साहेब, ३७० कलम रद्द करायला मुसलमानांचा विरोध आहे का? कारण ते कलम तर काश्मीर ला उगीचच विशेष दर्जा देतं असं भारतातल्या देशभक्त जनतेचं मत आहे. हे मत रद्द करायला काश्मीरींचा (आणि पर्यायाने पाकिस्तानचा ही विरोध आहे). तेव्हा रेकर साहेब, तुमची निष्ठा इथेच आहे, की सीमापार मधून रुपये येतात अकाऊंट मध्ये?

बाकी एक क्लियर करूया. प्रत्येक काश्मीरी (आणि ३७० रद्द करायला विरोध करणारा प्रत्येकजण) मारावा लागला तरी चालेल. पण काश्मीर आम्ही हातातून जावू देणार नाही. फारच झालं तर तिथे अणुबाँब टाकून ती भूमी सपाट करून टाकू. आणि तो टाकण्यापूर्वी इथल्या काही जणांना काश्मीरची सैर (जबरदस्तीनं) करवली जाईलच. पण त्यांना स्वातंत्र्य बितंत्र्य मिळणार नाही. पुन्हा सांगतो. रत्येक काश्मीरी (आणि ३७० रद्द करायला विरोध करणारा प्रत्येकजण) मारावा लागला तरी चालेल.

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 11:34 pm | तर्राट जोकर

कश्मिरी पंडीतांना पळावं लागलं तेव्हा कुठे होता हा अभिनिवेश? हाच प्रश्न मी सतत विचारतोय किती दिवस झाले.

तुम्ही तरी उत्तर द्याल अशी आशा आहे ब्वा...?

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 11:58 pm | काळा पहाड

आपण २० वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. त्यावेळी हिंदू आत्ता जसे जागृत आहेत तसे नव्हते. मी बहुधा शाळेत असावा आणि देशातल्या गोष्टी कानावर येत असल्या तरी एकूणच ज्ञानाच्या दृष्टीनं आनंदी आनंदच होता. दूर्दर्शन हे डॉमिनंट चॅनल होतं. पेपर ही गोष्ट दुसर्‍याच्या घरी जावून वाचली जायची. निम्न मध्यम वर्गाला पहिली भ्रांत पोटाची असते. मी कॉलेज मध्ये जाईपर्यंत बहुधा पंडित बाहेर पडले होते. काँग्रेस प्रणित सरकार नावाची गोष्ट सगळंच दडपत होती. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण आता बदललंय. जम्मू सुद्धा आता एकसंध हिंदू प्रदेश म्हणून काश्मीरची रसद रोखून धरतो. पंडितांच्या घटनेबद्दल राग आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच. आणि वेळ येताच ते व्यक्तही होतील.

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 12:06 am | तर्राट जोकर

या प्रतिसादाच्या वाक्यावाक्यावर बोलण्यासारखे बरेच आहे.

थोड्या सवडीने येतो. धागा वाचनमात्र होऊ देउ नका...

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 5:43 am | dadadarekar

अणुबाँब टाकून भूमी सपाट करताय ? करा बुवा ! अणुबॉम्बाशिवाय अजुन ब्रह्मास्त्र , हनुमानास्त्र वगओरे असेल तर तेही टाका .

पण टाका !

अरे हो! पण मोदीजी बोल्लेत ... मुसुलमानाविरुद्ध नको , हिंदूनी गरीबीविरोधात लढावे , त्याचे काय करणार ?

तर्राट जोकर's picture

11 Oct 2015 - 3:48 pm | तर्राट जोकर

म्हणजे गुजरातचीच मोडस ऑपरेंडी आवश्यक आहे असे तुमचे मत आहे तर....

तुडतुडी's picture

12 Oct 2015 - 3:19 pm | तुडतुडी

@दादू
येणारा काळ सांगेलच काय ते . कालची अजून १ बातमी . २० वर्षांच्या एका भारतीयाने इसीस मधून भारतात परतण्यासाठी कुटुंबियांशी संपर्क साधलाय . दुबैतल्या मित्राने त्याला सिरीयाला पोहचवल खरं . पण तिथे होणाऱ्या रशियन हल्ल्यांना घाबरून हा परत यायचं म्हणतोय . दुसरी बातमी - पाकिस्तानमध्ये मंजूर झालेल्या माहिती अधिकाराच्या कायद्यातून हिंदूंना वगळलं . गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध केला म्हणून कोकलणारे आता कुठं शेपूट घालून बसलेत .

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 3:29 pm | dadadarekar

पाकिस्तानचा बंदोबस्त करु हे आश्वासन देऊन मोदी व कमळाबाइ निवडून आली ना ?

आता हेच लोक गुलाम अली आणि तो कोण तो पाकिस्तानी पुस्तक लिहिलेला त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 4:27 pm | तर्राट जोकर

तिथल्या हिंदूंची फार काळजी हो तुम्हांस... इथल्या मुस्लिमांनी तीच काळजी दाखवली की तुमचे काळजात कट्यार घुसते, का..?

नाव आडनाव's picture

12 Oct 2015 - 9:43 pm | नाव आडनाव

तर्राटराव, लै अवघड परस्न ईचारायलेत तुम्ही. असं न्हाई करायचं :)

d

तुडतुडे , तो मियादाद आहे बरं का. रोजाच्या अरविंदस्वामीसारखा दिसतो नै ?

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 6:06 pm | dadadarekar

फोटू नेटवरून आमच्या माईनी शोधून काढलाय बरं का !

नाव आडनाव's picture

12 Oct 2015 - 6:08 pm | नाव आडनाव

आमच्या ?

बॅटमॅन's picture

12 Oct 2015 - 6:12 pm | बॅटमॅन

हेवर्ड्सचे जनक सापडले तर =))

नाव आडनाव's picture

12 Oct 2015 - 9:31 pm | नाव आडनाव

:)

मॉ$$$$$$$य्य्य्य्य्यी....... लोब्ब्ब्बा$$$$ड :)

नाखु's picture

13 Oct 2015 - 10:01 am | नाखु

आमच्या ?

यामधून विणाकारण सा"माई"क असा अर्थ निघत आहे. होबासरावांनी पुढील तपास करावा ही विनंती.

मिपा याचकांची पत्रे आणि चिठ्या चपाट्या मधून साभार.

प्यारे१'s picture

12 Oct 2015 - 10:02 pm | प्यारे१

तुडतुडी दादूस चा या पहिल्या शतकी खेळीबद्दल सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो मिपाचे 'झालंशतककीकरसत्कारसमिती'चे अध्यक्ष जे पी यांना (कधीसंन्यस्तअसतंकधीनसतंकधीकधीजेपीच्नस्तंकारणतेब्यान्केतअसतं)

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 10:44 pm | dadadarekar

वाचनमात्र करायला सावरकर गोडसे गांधी उतरावे लागतात.

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 11:37 pm | तर्राट जोकर

धागा वाचनमात्र करायचा का...?

पुढच्या किती प्रतिसादांमधे हा धागा वाचनमात्र होइल?
१. १०
२. ५०
३. ७८६

माझ्याकडे जी आकडेवारी आत्ता आहे त्यावरून असं दिसतं की......

जौदे यार त्या कागाळेची आठोन पन नक्को.....