माहिती हवी आहे - महिला रोजगार

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
29 Aug 2008 - 8:28 pm
गाभा: 

आपल्याकडे कला पदवीधरांचे पीक बेसुमार आहे. हा एक असा मोठा गट आहे जो सध्याच्या प्रगतीच्या वार्‍यापासून कोसो दूर रहिला आहे. शेती परवडत नाही, व्यवसायासाठी भांडवल/मार्गदर्शन नाही, इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्‍या मिळत नाहीत, कॉमर्स शिकल्याले नसल्याने बँकांच्या/वित्तीय संस्थांच्या नोकर्‍या मिळत नाहीत, विज्ञान/तंत्रशिक्षण झालेले नसल्याने कारखान्यांमध्ये नोकर्‍या मिळत नाहीत... अशी या पदवीधरांची शोकांतिका आहे. हा तरुण वर्ग मग कारखाण्यांमध्ये कामगार बनतो वा कारकून/चपराशी/हवालदार अशा नोकर्‍या मिळवण्यासाठी लाखोंची गर्दी करतो (उदा. या आठवड्यातली पोलीस भरती).

रोजगार मिळवण्यात सर्वांत जास्त हाल होतात ते कला विषयातल्या महिला पदवीधारकांना. कारण वरील सर्व सामाजिक समस्यांबरोबरच त्यांना घरातल्या समस्यांना/जबाबदार्‍यांना तोंड द्यावे लागते. लग्न, नवरा, मुलेबाळे, घरकाम या सगळ्या कसरती करत त्या बिचार्‍यांनी रोजगाराच्या नव्या संधींचा शोध कसा घ्यावा?

पुण्यात माझ्या परिचयातल्या बर्‍याच कुटुंबात हा प्रश्न आहे. तरुण महिलांना स्वतः काहीतरी करायचे आहे पण काय करता येऊ शकेल याची कल्पना नाही. अशा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही संस्था आहेत का? अथवा तुम्हाला कोणाला या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करता येईल का?

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत....

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

30 Aug 2008 - 9:03 am | प्रकाश घाटपांडे

ज्यांना मार्गदर्शन हव आहे त्यांना शोध घेणे पुण्यात काहीच अवघड नाही.
रोज दै. सकाळ वाचला तर त्यात मार्गदर्शन करणारे भरपुर निवेदने व जाहिराती असतात.
स्वयंसेवी सेवी संघटना आहेत. महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र शेतकी महाविद्यालयाच्या आवारात आहे.
प्रकाश घाटपांडे

मनीषा's picture

30 Aug 2008 - 12:05 pm | मनीषा

१ )मिटकॉन
कुबेरा चेंबर्स .. जंगली महाराज रोड पुणे ..
इथे स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणा-यांना मार्गदर्शन देतात .. (प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा /लोन ऍप्लिकेशन इ.)

२)शेतकी महाविद्यालय -- महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र

खट्याळ's picture

30 Aug 2008 - 1:03 pm | खट्याळ

इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्‍या मिळत नाहीत

हे आता फारसं खरं नाही कारण आजकाल कॉलसेंटरकडून मराठी, हिंदी किंवा प्रादेशिक भाषांतही सुविधा पुरवल्या जातात.त्यामुळे शुद्ध मराठी किंवा हिंदी बोलता येणार्‍या लोकांनाही तिथे नोकर्‍या मिळतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2008 - 1:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

केण्डेसाहेब, कदाचित तुमच्या ओळखीतल्या, माहितीतल्या लोकांसाठी ही माहिती उपयुक्त नसेल पण तुम्ही बेअरफुट कॉलेजचं नाव ऐकलय का?
http://www.barefootcollege.org/
आपल्या दूरदर्शनवरच मी याबद्दल एक माहितीपट पाहिला होता म्हणून कळलं.
आता मी फार खोदून या वेबसाईटवर पाहिलं नाही, आणि त्या माहितीपटामधलं फारसं आठवत नाही; गेली अनेक वर्ष या ठिकाणी ग्रामीण भागातल्या वीज, पाणी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. सौर उर्जेवर चालणारे कंदिल बनवणं, त्यांची काळजी घेणं इत्यादी गोष्टी या 'बेअरफुट अभियंत्यां'ना शिकवल्या जातात. नाममात्र फी आकारून महिला सक्षमीकरणासाठी हे काम केलं जात आहे. अनेक मागास, आफ्रिकन, दक्षिण अमेरीकन देशातल्या महिलाही इथे शिकून गेल्या आहेत.

अदिती

भाग्यश्री's picture

3 Sep 2008 - 6:01 am | भाग्यश्री

बेअरफुट कॉलेजचा विषय निघालाय म्हणून, ही लिंक देतीय.. http://www.maayboli.com/node/2411
अप्रतिम लेख आहे.. कॉलेजची संकल्पनाही बेस्ट!

http://bhagyashreee.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

3 Sep 2008 - 1:55 am | भास्कर केन्डे

घाटपांडे साहेब, मनीषा, खट्याळराव व अदिती ताई,

आपल्या सर्वांच्याच सूचना विचार सुरु करण्यासाठी पूरक आहेत. चला, लागतो कामाला... आणखी माहिती मिळवून तुम्हाला सांगतो.

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.