खंडांळ्याची पार्टी - एका बातमीच्या निमित्ताने

विकास's picture
विकास in काथ्याकूट
29 Aug 2008 - 4:55 am
गाभा: 

गेले एक-दोन कस्टममधील २२ अधिकार्‍यांना खंडाळ्याला पार्टीला गेलेले असताना पकडल्याची बातमी (म.टा. मधील मूळ बातमी) येत आहे. त्यातील प्रमुख भाग खाली चिकटवत आहे:

विदेशी मद्य... ब्ल्यू फिल्म... लॅपटॉप... कोऱ्या करकरीत नोटा, अशी सारी तजवीज करून मुंबईतील बारबालांसोबत थंड हवेच्या खंडाळ्यातील खासगी बंगल्यात रंग उधळणाऱ्या कस्टम विभागातील बड्या अधिकाऱ्यांना ११ बारबालांसह मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे सारे अधिकारी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असून त्यात १२ कस्टम सुप्रिंटेंडंट व १० इन्स्पेक्टरांचा समावेश असून सर्वांना जामिनावर सोडण्यात आले....कस्टम अधिकाऱ्यांच्या या 'पराक्रमा'ची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. सुप्रिंटेंडंट रवींद कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर सुदार दरेकर, सहायक इन्स्पेक्टर ए. डी. फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ पोलिसांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास 'ताज कॉटेज' वर धडकले तेव्हा बेधुंद होऊन, अर्धनग्न अवस्थेत नाचणारे अधिकारी त्यांना पाहायला मिळाले. त्यातील एका कस्टम अधिकाऱ्याकडे ५५ हजार रुपये, तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे २५ हजाराची रोकड होती. त्यापैकी ५२ हजार रुपयांची रोकड त्यांनी बारबालांवर उधळल्याचे फडतरे यांनी सांगितले....

आता ही बातमी पाहीली तर ठिक वाटेल... पण त्या पुढे जाऊन यातील सर्व अधिकार्‍यांची नावे नंतरच्या बातमीत जाहीर केली आहेत. त्यामुळे विशेष करून प्रश्न पडले:

  1. सर्व प्रथम वर वर्णन केलेली पार्टी आणि त्यातील अधिकार्‍यांचे वर्तन हे नैतिकतेच्या दृष्टीने कदाचीत चुकीचे असेल. त्यांनी नक्की काय केले हे अजून सिद्ध न झाल्याने "कदाचीत" म्हणत आहे. पण म्हणून पोलीसांना तसे अटक करण्याचा हक्क आहे का?
  2. हे कस्टम अधिकारी इतर सर्व सरकारी अधिकार्‍यांप्रमाणे स्वतःच्या "पॉवरच्या" रेशो मध्ये भ्रष्ट असतीलही... पण हे वरील वर्तनातून सिद्ध होते का?
  3. इतर अशा किती ठिकाणी धाडी घातल्या जातात?
  4. त्याहूनही महत्वाचे जो पर्यंत असले आरोप हे "कथीत" असतात, तो पर्यंत त्यांचे नाव, गाव, वय आणि काही बाबतीत रहातात ती सोसायटी जाहीर करणे योग्य आणि त्याहूनही महत्वाचे कायदेशीर आहे का?
  5. अशी नावे सिंहगडला पकडलेल्या मुलांची तरी जाहीर केली गेली होती का?

एक स्पष्टीकरणः माझा यातील अथवा कुठल्याच कस्टम अधिकार्‍याशी संबंध नाही. भ्रष्टाचार नक्की होत असेल जरी मी कधी अनुभवला नसला तरी. पण हा मुद्दा मी वेगळ्या कारणाने करत आहे - केवळ असे काही तरी सनसनाटी पद्धतीने नको तेथे पकडणे (त्यांना लाच घेताना वगैरे पकडलेले नाही), त्याच्या बातम्या करणे आणि नंतर नावे छापणे हे कायद्याने अथवा कुठल्याही कारणाने योग्य वाटते का?

प्रतिक्रिया

कोलबेर's picture

29 Aug 2008 - 5:03 am | कोलबेर

तिनेक वर्षापूर्वी ह्या कस्टम वाल्यांनी काहीही कारण नसताना तंगवुन धरले होते. परदेशी गेल्या नंतर पहिल्यांदाच घरी येत होतो आणि त्यामूळे कस्टम्सचे सोपस्कार लवकरात लवकर आटपुन बाहेर येण्यासाठी आतुर असताना निव्वळ काहीतरी वरकमाई करता यावी ह्या उद्देशाने तंगवुन धरले होते. शेवटी माझ्याकडून काहीच सुटत नाही म्हंटल्यावर चरफडत सोडून दिले होते.

कारवाई योग्य असो वा अयोग्य, ही बातमी वाचल्यावर एक सूप्त आनंद झाला हे नक्की. :)

ऋषिकेश's picture

29 Aug 2008 - 9:14 am | ऋषिकेश

अगदी हेच म्हणतो :)
-(सुप्तानंदीत) ऋषिकेश

धनंजय's picture

29 Aug 2008 - 7:15 am | धनंजय

पण "संशयित" आणि "आरोपी" आणि "गुन्हेगार" यांच्यात फरक केला पाहिजे याबाबत सहमत.

सहज's picture

29 Aug 2008 - 8:17 am | सहज

जर सबळ पुरावा असेल जसे चित्रीकरण / सीसीटिव्ही फूटेज तर असे नाव जाहीर करायला काही वाईट नाही खरे तर, म्हणजे विशेषता सरकारी सेवकांचे.

अश्या धाडींचे छायाचित्रीकरण झाले तर खटला बळकट व्हायला कदाचित मदत होईल.

:-)

अवांतर - जेव्हा इंजीनियर लोकांचा एव्हरेज पगार ३००० रु महीना होता तेव्हा एक ओळखीतले कस्ट्म अधीकारी दर आठवड्याला ५० हजाराचे पुडके आणायचे "म्हणे" ;-). आता काय रेट असेल कोणास ठावूक?

सुचेल तसं's picture

29 Aug 2008 - 9:10 am | सुचेल तसं

जो पकडला जातो तोच चोर. अशा अनेक पार्ट्या सर्रास होत असणार. पण पोलिसांना ज्याची खबर लागते तिथेच धाड पडते. सिंहगड रेव्ह पार्टीच्या वेळीही असच घडलं होतं. ज्याने पार्टी आयोजित केली होती त्याचं कोणाशी तरी भांडण झालं आणि त्यानी पोलिसांना खबर दिली. तसच काहीसं ह्या कस्टमवाल्यांच्या केसमधे घडलं असणार.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

भास्कर केन्डे's picture

29 Aug 2008 - 7:26 pm | भास्कर केन्डे

पण पोलिसांना ज्याची खबर लागते तिथेच धाड पडते.
- - - मला वाटते जिथे पोलिसांचे हात ओले न करता अशा पार्ट्या केल्या जातात व जेथे एखादा पो. अधिकारी की ज्याला प्रमोशन पाहिजे वा खरेच थोडा-प्रामाणिक आहे तेथेच अशा धाडी पडतात. बाकी वेळ सगळे अलबेल भासवले जाते.

आपला,
(साशंक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Aug 2008 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

१) याला खात्यांतर्गत भाषेत 'समरी पॉवर' म्हणतात. पण कायदेशीर कक्षेत हे अधिकार सहज आणता येतात.
२) येथील प्रत्येक घटक कमी अधिक प्रमाणात भ्रष्ट च असतो. भ्रष्टाचाराच्या कायदेशीर /नैतीक चौकटीत तार्किक दृष्ट्या हे सहज सिद्ध होते.
३) अशा धाडी पुर्व नियोजित असतात. उघड उघड चालणार्‍या गोष्टी दबा धरुन पकडण्याचा हा फार्स असतो. प्रत्यक्ष घडणार्‍या गोष्टी पेक्षा हे प्रमाण अगदीच नगण्य असते.
४) त्यांना आरोपीच म्हटले आहे गुन्हेगार नव्हे. सिद्ध झालेवर गुन्हेगार. सिद्ध होण्याची प्रक्रिया व कालावधी सुज्ञ लोक जाणतातच.
५) सिंहगडाच्या रेव्ह पार्टीत पकडलेल्या मुलांची नावे वर्तमान पत्रात जाहीर केली होती. मुलींची नावे मात्र वगळली होती. पुरुष प्रधान संस्कृती त त्यांना तुलनेने अधिक त्रास झाला असता म्हणुन. हे तत्कालीन पोलीस अधिक्षक नांगरे पाटीलांनी कार्यक्रमात सांगितले आहे.

या घटनेकडे वास्तववादी दृष्टीने पाहिले तर हे फक्त पकडले गेले. न पकडले गेलेले किती तरी आहेत.त्यांना हु श्य झाले असेल. अनेक गुन्हेगार हे लोकप्रतिनिधी म्हणून उजळ माथ्याने वावरताना दिसतात कारण आरोप सिद्ध होईपर्यंत तो निरपराध आहे असेच मानले जाते. ते नैतिक व कायदेशीर दृष्टया योग्यही आहे. अपराध सिद्ध होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत त्याचे आयुष्य सुद्धा सरुन जाते. न्यायालयाचा निकाल लागून समजा दोषारोप सिद्ध झाला तरी त्यामुळे जे काही 'गमवावे` लागते ते 'कमावले`ल्याच्या मानाने नगण्य असते. त्यामुळे हा 'सौदा` घाटयाचा होत नाही.


कारवाई योग्य असो वा अयोग्य, ही बातमी वाचल्यावर एक सूप्त आनंद झाला हे नक्की

हा अज्ञाता तला आनंद आहे. जनमानसाची स्मरणशक्ति ही तात्कालीन असते. लहान मुलगा धावता धावता एखाद्या ठिकाणी पडला कि तो रडु लागतो. त्या निर्जीव ठिकाणी फटका मारुन आई म्हणते "हात रे मेल्या आमच्या शोन्याला पाडतो का? " की रडणारे मुल त्या निर्जीव टिकाणाला शिक्षा झाल्याच्या आनंदात आपले दु:ख विसरते.

अश्या धाडींचे छायाचित्रीकरण झाले तर खटला बळकट व्हायला कदाचित मदत होईल.


सहमत आहे. निदान प्रायमा फेसी तरी केस बळकट होईल.

प्रकाश घाटपांडे

सखाराम_गटणे™'s picture

29 Aug 2008 - 9:17 am | सखाराम_गटणे™

+१
आम्हाला आपल्या अशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे.

भास्कर केन्डे's picture

29 Aug 2008 - 7:44 pm | भास्कर केन्डे

घाटपांडे साहेब,

आपल्या कडून अशाच माहितीपूर्ण प्रतिक्रियेची अपेक्षा होती. आम्हा सामन्य लोकांना पोलिस, राजकारणी, स. अधिकारी (त्यात हे कस्टमवाले आले) हे बहुतांशी सगळेच चोर व देशद्रोही वाटतात... नव्हे तसा माझा विश्वास आहे, विषेशतः पोलिसांबद्दल. अर्थात आपल्यासारख्या काही पोलिसी लोकांमुळे कधिकधी हा विश्वास डळमळीत होतो. पण बहुसंख्य पोलीस त्यांच्या कु-कर्तुत्वाने पुन्हा त्याला आढळ बनवतात. :(

विषयांतर - सध्या गाजत असलेली आमच्या मराठवाड्यातली दरोडा/बलात्काराची काठोडा-केस बघितली तर राजकारणी/पोलिसांची किळस आल्यावाचून रहात नाही.

आपला,
(सरकारी यंत्रणेबद्द्ल कटू मत असलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सुनील's picture

29 Aug 2008 - 9:22 am | सुनील

हे कस्टम विभागातील अंतर्गत हेवेदाव्याचे प्रकरण दिसते. आणि त्यासाठी मटाला हाताशी धरले असावे. कारण काल ठळक बातमी आणि आज त्यावर अग्रलेख?

बातमी वाचून काही प्रश्न मनात आले -
१) हे अधिकारी "ऑन ड्युटी" होते का?
२) बारबाला अल्पवयीन होत्या का?
३) पार्टी उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी सुरू होती का?
४) तेथे दारूव्यतिरिक्त अन्य कोणते अंमली पदार्थ सापडले का?

वरील प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर नक्की कोणाचा काय गुन्हा होता हे कळत नाही. बंदिस्त जागी (स्वतःच्या अथवा रीतसर भाड्याने घेतलेल्या) मद्यपान करणे, अपुर्‍या कपड्यात वावरणे वा सज्ञान मुलीसमवेत राहणे हे भारतात बेकायदेशीर आहे, असे वाटत नाही.

म्हणूनच हा त्या कस्टम अधिकार्‍यांच्या बदनामीचा कट वाटतो.

असो, माझा यात कोणताही हितसंबंध नाही हे डिस्क्लेमर देतो!!

तसा मला कस्टमवाल्यांचा वाईट अनुभव नाही. एकतर माझ्या सामानात नियमबाह्य असे काही नसते. आणि दुसरे म्हणजे आमचे ध्यानच असे, की मी चुकून जरी रेड चॅनलच्या दिशेने वळलो की तोच सांगेल - "बाबारे, ग्रीन चॅनल त्या बाजूला आहे!".

अर्थात, तेथे सापडलेल्या पैशाचा त्या अधिकार्‍यांच्या अधिकृत उत्पनांशी मेळ लागत नाही, हे साहजिकच आहे. बारबालांवर उधळला जाणारा पैसा हा फार क्वचित कष्टाने कमावलेला असतो!

(कायदेशीर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

29 Aug 2008 - 9:51 am | विकास

वरील प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर नक्की कोणाचा काय गुन्हा होता हे कळत नाही. बंदिस्त जागी (स्वतःच्या अथवा रीतसर भाड्याने घेतलेल्या) मद्यपान करणे, अपुर्‍या कपड्यात वावरणे वा सज्ञान मुलीसमवेत राहणे हे भारतात बेकायदेशीर आहे, असे वाटत नाही.

सुनीलच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. पण वरील मुद्दा या संदर्भात अगदी महत्वाचा आहे. कस्टमवाले पैसे खातात तर त्याबद्दल शिक्षा न होता जेंव्हा नैतिक पोलीसगिरी होते ती पटत नाही. कारण उद्या ती कुणाबरोबर कशाचाही बाबतीत घडू शकेल. एका प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना (लाच घेणे) आळा घालण्याचा नादात त्यासाठी दुसरे बेकायदेशीर कृत्य झाल्यासारखे वाटले. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांनी ती पार्टी दिली ते कथीत गुन्हेगार म्हणून पकडले गेले का हे समजत नाही - "रिश्वत लेना और देना, दोन्हो पाप है!" पण येथे तसे झालेले दिसत नाही.

बाकी मला देखील कस्टमचा एकंदरीत चांगला अनुभव आलेला आहे. आज पर्यंत कधी थांबावे लागले नाही. कदाचीत सुनीलने म्हणल्याप्रमाणे माझ्या कडे पाहून पण हा आणून आणून काय आणणार असे वाटत असेल तर आश्चर्य वाटायला नको :-)

घाटपांडे साहेबांची उत्तरे आवडली आणि त्यातून आपले पोलीस कसे वागतात/विचार करतात ते समजले. माझा मुद्दा हा केवळ कायदेशीर आहे आणि कायदा रक्षकाने पण कायदा हातात घेऊ नये असे वाटते इतकाच त्याचा संदर्भा आहे.

मराठी_माणूस's picture

29 Aug 2008 - 10:57 am | मराठी_माणूस

मद्यपान करणे, अपुर्‍या कपड्यात वावरणे वा सज्ञान मुलीसमवेत राहणे हे भारतात बेकायदेशीर आहे, असे वाटत नाही.

ह्या सर्वा मधे जेवढ्या पैशांचि उधळण झालि तो सर्व पैसा कायदेशीर मार्गाने कमावला होता का ? आणि हे त्या सज्ञान (?) मुलीना माहित नव्हते का ?

विकास's picture

29 Aug 2008 - 5:05 pm | विकास

ह्या सर्वा मधे जेवढ्या पैशांचि उधळण झालि तो सर्व पैसा कायदेशीर मार्गाने कमावला होता का ?

अहो साहेब, असे कोणीच म्हणत नाही! ज्यांना पकडले ते साधूसंत आहेत असे देखील मला अथवा इतरांना वाटत नाही... आक्षेप हा पद्धत आणि कायदा अयोग्य पद्धतीने हाताळण्याला आहे. उद्या १००% नाही पण मला ९९% खात्री आहे की ह्यातील एकावरही लाच खाल्ली असा आरोप सिद्ध होवू शकणार नाही... फार तर फार कायद्याप्रमाणे असभ्य वर्तन (ऑब्सिनिटी) सिद्ध होऊ शकते, त्याचीही शक्यता कमिच कारण जे काही झाले ते खाजगी जागेत, कामावर नसताना...

मग त्यातून काय मिळाले? जे आरोप सिद्ध होऊन काहीतरी चांगले होईल ते पण होणारच नाही. घाटपांडे वर म्हणल्याप्रमाणे शिक्षा ही गुन्ह्यापेक्षा (तो सिद्ध होऊ न शकल्यामुळे) अतिशय लहानच रहाणार आणि मग परत "संथ वाहते कृष्णामाई..." लाईफ गोज ऑन - असे होणार.

भास्कर केन्डे's picture

29 Aug 2008 - 7:52 pm | भास्कर केन्डे

श्री. विकास,

आपले मूळ लेखातले तसेच प्रतिसादातले मुद्दे १००% पटणारे आहेत. पण वर उल्लेख केला गेला तसे या कस्टम अधिकार्‍यांना पकडले व त्यांची नावे देखील प्रसिद्ध झाली त्यामुळे मला सुद्धा सुप्त आनंद होत आहे.

लाच घेणारे लोक तो काळा पैसा या अशा काळ्या कामांसाठी वापरतात. जर त्यांना या घटनेने जरब बसत असेल तर चांगलेच आहे. काळा पैसा खर्च करायला मार्गच नाही ठेवले तर लोक तो कमावताना थोडा विचार करतील असे वाटते. अर्थात याची शक्यता कमीच आहे.

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मराठी_माणूस's picture

29 Aug 2008 - 9:35 am | मराठी_माणूस

आता ही बातमी पाहीली तर ठिक वाटेल...

फक्त ठीक वाटले ? खेद नाहि झाला ?

त्यांनी नक्की काय केले हे अजून सिद्ध न झाल्याने

त्याना खालिल वस्तु सह रंगे हात पकडले आहे . ह्या वस्तु सह काय नैतिक कॄत्य करता येउ शकेल ह्याचा विचार करत आहे.

विदेशी मद्य... ब्ल्यू फिल्म... लॅपटॉप... कोऱ्या करकरीत नोटा, अशी सारी तजवीज करून मुंबईतील बारबालांसोबत

इतर अशा किती ठिकाणी धाडी घातल्या जातात?

घातल्या जात असतिल पण हे जबाबदार सरकारि अधिकारि असल्यामुळे आम जनतेच्या माहितिसाठि हे जगजाहिर होणे अत्यावश्यक आहे.

त्याहूनही महत्वाचे जो पर्यंत असले आरोप हे "कथीत" असतात, तो पर्यंत त्यांचे नाव, गाव, वय आणि काही बाबतीत रहातात ती सोसायटी जाहीर करणे योग्य आणि त्याहूनही महत्वाचे कायदेशीर आहे का?

समाजस्वास्थ्याच्या दृष्टिने योग्य आहे. आपल्या आजुबाजुला कसे लोक रहतात हे सोसायटिला माहित असणे गरजेचे आहे. कदाचित जर हे कायद्याच्या कचाट्यातुन सुटले तर (हिच शक्यता अधिक) समाजात जी मानहानि झालि त्याने तरि ईतराना जरब बसेल. कारण खुप पैसा मिळवण्याचे कारण समजात प्रतीष्ठा मिळवणे हे सुध्दा अनेक कारणा पैकि एक असते आणि तिच धुळिला मिळालि कि सगळे संपल्या सारखे वटते.

अशी नावे सिंहगडला पकडलेल्या मुलांची तरी जाहीर केली गेली होती का?

हि तुलना अप्रस्तुत . त्या मुलांचि वये ह्या लोकाएव्हढि परिपक्व(?) होति का ? ह्यातलि बरिच जण पन्नाशिच्या आसपास आहेत्.आपण काय करत आहोत त्याचे परिणाम काय होउ शकतात ह्यची ह्याना पुर्ण कल्पना होति.

हे सर्व अतिरिक्त , विनामेहनत पैश्या मुळे होत आहे.

वेताळ's picture

29 Aug 2008 - 10:20 am | वेताळ

त्यामुळे हे अधिकारी निर्दोष सुटणार, परतु त्या अधिकारयाची नावे जनतेसमोर, त्याच्या नातलगासमोर्.त्याच्या बायकापोरांसमोर आली हे एक बरे झाले निदान ही बोचणी त्याना आयुष्यभरासाठी तर राहिल.

विसुनाना's picture

29 Aug 2008 - 11:53 am | विसुनाना

कस्टमच्या अधिकार्‍यांनी उधळण्यासाठी आणलेल्या नोटा, बारबालांना देण्यात येणारी रक्कम आणि विदेशी मद्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठी लागलेले पैसे भ्रष्टाचार करून (पक्षी वरकड पैसे घेऊन आयात शुल्कात सूट देऊन) मिळवलेले असतील हे पुराव्यानिशी सिद्ध करणे अवघड आहे. (ते अधिकारी भ्रष्ट नसतीलच से मला मुळीच म्हणायचे नाही.)

शिवाय खासगी बंगल्यात कोण काय करतो त्याचा इतरांना जोवर उपद्रव होत नाही तोवर ते कायद्याने लक्ष घालण्यासारखे प्रकरण होत नाही. पोलिसांना एखाद्याच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करण्यासाठी कायदेशीर संमती घ्यावी लागते किंवा कुणीतरी त्याबाबत तक्रार दाखल करावी लागते.(घाटपांडेसाहेब याबाबत सांगतीलच.)
बारबालांना बारमध्ये नाचायला बंदी असेल/नसेल पण खासगी ठिकाणी कोणीही नाचायला कुणाची कायद्याने हरकत नसावी.दोन उदाहरणे : १. ग्रामिण भागातले पुढारी वाड्यावर बैठकीची लावणी करतात. २. काही सज्ञान आणि समविचारी व्यक्ती खासगी ठिकाणी कट्टे करून मद्यपान करतात. या दोन्ही उदाहरणात कायद्याचे उल्लंघन होते असे वाटत नाही.

नैतिकतेच्या दृष्टीने म्हणाल तर 'कोणी काय करावे? नैतिक काय आणि अनैतिक काय?' यासारखे प्रश्न एखाद्याचे वर्तन जोवर लिखित कायद्याच्या मर्यादेत बसते तोवर व्यक्तीसापेक्ष आहेत असे माझे मत आहे. एखाद्याच्या दृष्टीने अनैतिक असलेले कृत्य दुसर्‍याच्या दृष्टीने नैतिक असू शकते. (आणि व्हा.व्ह.) (माझ्या दृष्टिने ते अनैतिक आहे हे स्पष्ट करतो.)
हे सर्व प्रकरण कस्टम अधिकार्‍यांनी डिवचलेल्या एखाद्या स्मगलरने कट करून मुद्दाम त्यांची बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी उघडकीस आणले असावे असा दाट संशय येतो.

मनीषा's picture

29 Aug 2008 - 12:50 pm | मनीषा

कदाचित तेथे काही अक्षेप घेण्याजोग्या वस्तु असण्याची बातमी कळली असावी म्हणून ती कारवाई केली गेली असावी...
पण जेव्हा त्याना तेथे काही मिळाले नाही ... तर त्यांनी त्यात सापडलेल्या व्यक्तिंची नावे जाहीर करणे म्हणजे सरळ सरळ व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.
"त्यामुळे हे अधिकारी निर्दोष सुटणार, परतु त्या अधिकारयाची नावे जनतेसमोर, त्याच्या नातलगासमोर्.त्याच्या बायकापोरांसमोर आली हे एक बरे झाले निदान ही बोचणी त्याना आयुष्यभरासाठी तर राहिल."
हे अजिबात पटत नाही... तुम्ही काय लोकांचे खासगी आयुष्य सुधारण्याचा ठेका घेतला आहे का?
(यात सापडलेल्या व्यक्तीबद्दल मला अजिबात सहानुभूती नाही ... किंवा ते करत असलेले कृत्य योग्य आहे असे माझे म्हणणे नाही )
पण ----"नैतिकतेच्या दृष्टीने म्हणाल तर 'कोणी काय करावे? नैतिक काय आणि अनैतिक काय?' यासारखे प्रश्न एखाद्याचे वर्तन जोवर लिखित कायद्याच्या मर्यादेत बसते तोवर व्यक्तीसापेक्ष----" हे ही तितकेच खरे आहे .. आणि संपूर्ण सत्य कळायच्या आधी कोणाचीही अशी (कु) प्रसिद्धी करण योग्य नाही.
नुक्त्याच झालेल्या आरुषी तलवार हत्याकांडा बाबत पण असेच घडले... त्या १३-१४ वर्षाच्या मुलीच्या चारित्र्याबद्दल पोलीस आणि मिडियाने अनेक तारे तोडले... तिच्या वडिलांवर त्यांच्याच एका सहकारी डॉक्टर बरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचे आरोप केले गेले... आणि आता काही वेगळेच सत्य समोर आले आहे.. आणि त्यांना पत्रकार परिषदेत आरुषी ही एक चांगल्या चारित्र्याची मुलगी होती असा निर्वाळा द्यावा लागला... पण त्या आधी तीच्या संबधित लोकांना किती मानसिक क्लेष भोगावे लागले? त्याला कोण जबाबदार ?

"केवळ असे काही तरी सनसनाटी पद्धतीने नको तेथे पकडणे (त्यांना लाच घेताना वगैरे पकडलेले नाही), त्याच्या बातम्या करणे आणि नंतर नावे छापणे हे कायद्याने अथवा कुठल्याही कारणाने योग्य वाटते का?"
अजिबात नाही... हा काही चॅनेल वाल्यांचा त्यांचा घसरलेला टीआरपी वाढवण्याचा उद्योग वाटतो .

मराठी_माणूस's picture

29 Aug 2008 - 1:53 pm | मराठी_माणूस

तुम्ही काय लोकांचे खासगी आयुष्य सुधारण्याचा ठेका घेतला आहे का?

डान्स बार परत चालु करावेत, हुक्का बार मधे अल्पवयीन मुले सापडलि , करु द्या त्याना काय करायचे ते.

अनैतिक मार्गाने आलेला पैसा चैनिचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो . डान्सबार त्या पैकि एक. ते आज बंद आहेत म्हणून त्यानि अशा खाजगि पार्ट्या केल्या. आणि हे वेळच्या वेळि ठेचले नाहि तर अशा पार्ट्या आम होतिल , त्यांचे पण काँट्रॅक्ट दिले घेतले जातिल.

मिसंदीप's picture

29 Aug 2008 - 2:48 pm | मिसंदीप

कस्टम अधिकार्यांचे हे "प्रराक्रम" वाचुन खेद वाटला.

अशा अक्षम्य कृत्यास क्षमा नसावी, पण भारतीय दंड नियमावली इतकी पुचाट आहे , कि त्यात अश्या समाज लांछनास्पद गुन्ह्यांना जामीन उपलब्ध आहे.
नेमके हेच या बाबतीत घडले आणि मानवरुपी "दगड" सही सलामत सुटले. मि सुटले असे म्हणतो कारण यांच्यावर खटला दाखल होउन त्यांना शिक्षा होईपर्यंत, त्याचा आघात (मानवी मन या संकल्पनेत मि आजुनही विश्वास ठेवतो) फारच क्षुल्लक असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2008 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खंडाळाच्या पार्टीतले सिमाशुल्क अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, असे ग्रहीत धरले तर, इतक्या दिवस त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध अधिका-यांनी त्यांच्या कार्यालयात काम करतांना धाड का टाकली नाही. ते सर्व एकत्र मौजमजा करण्यासाठी पुण्याला येत आहेत ही बातमी कोणी तरी, ज्याला बरे वाटले नाही त्याने दिली . आणि परस्पर काटा काढला. असो,
आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना आरोपी म्हणु नये असे वाटते. त्यांच्या बदनामीने ते आणि त्यांचे कुटूंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली असतील, तेव्हा प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत त्यांच्यावर निलंबीत करण्याची कार्यवाही करता येते, असे असतांना
वृत्तपत्रातले संपादक, पत्रकार आपल्या सोयीनुसार बातमी छापतात, त्यावर अंकुश असला पाहिजे असेही यानिमित्ताणे वाटले.

एखाद मोठ काम केल असेल म्हणून ती श्रमपरिहाराची पार्टी असेल. जसे की शस्त्रास्तांची , स्फोटकांची कंसाईमेंट उतरवुन घेतली असेल. स्वतःच्या पॅश्याने हे लोक थोडीच अशी पार्टी
करणार आहेत? खरे काय आहे ते पोलीस शोधुन काढतीलच, म्हणुन त्यांची बदनामी होतेय म्हणण्यात काही अर्थ नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2008 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरं समजा, स्वत:च्या पैशांनी त्यांच अधिकार्‍यांनी पुण्याला जाण्याऐवजी सुप्याला एखाद्या कलाकेंद्रावर 'लावण्यांच्या कार्यक्रमाला ' किंवा 'तमाशाला' हजेरी लावली असती....वेळेचे बंधन पाळून कलाकारांवर पैसे उडवले असते, तर हीच कारवाई त्यांच्यावर झाली असती का ? अर्थात सामान्य माणूस म्हणुन आपण त्यांच्या अवांतर मिळकतीचा विचार करुन बरं झालं असे म्हणतो. तेव्हा अशा अधिकार्‍यांच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही, पण त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी चालू आहे,अनेक बडी मंडळी अशा कार्यक्रमाचा आस्वाद बड्या बंगल्यात घेत असतील, त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. काल की परवा ' आबांच्या समोर' परदेशातील बारबाला एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचल्याची बातमी अजून तितकी जूनी झाली नाही. आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना आरोपी म्हणुन नये इतकेच म्हणने आहे.

आनंद's picture

29 Aug 2008 - 8:49 pm | आनंद

आरोप सिद्ध झल्यावर गुन्हेगार म्हणतात, सिद्ध होई पर्यंत आरोपीच म्हणतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2008 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आरोप सिद्ध झल्यावर गुन्हेगार म्हणतात, सिद्ध होई पर्यंत आरोपीच म्हणतात.

गुन्हेगार म्हणावेत इतके त्यांच्यावर आरोप सिद्ध व्हायचे आहेत ना ? अगदी नावासकट सर्व डिटेल्स म्हणजेच बदनामीची गरज होती का ?

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Aug 2008 - 7:59 am | llपुण्याचे पेशवेll

केवळ नावे आली म्हणजे बदनामी झाली असे मला वाटत नाही. जर ते लोक गुन्हेगार नसतील म्हणजे त्यानी हे सर्व काम स्वकष्टार्जित उत्पन्नातून केले असेल तर त्याना तोंडे लपवायची गरजच काय? जर असेल त्यांची बाजू खरी तर उजळ माथ्याने कारवाईला सामोरे जावे ना. चेहरे लपविले म्हणजे काहीतरी काळेबेरे होतेच ना त्यात?
पुण्याचे पेशवे

रेवती's picture

29 Aug 2008 - 8:31 pm | रेवती

अधिकार्‍यांचा गुन्हा दुसराच काहीतरी असेल जो वर्तमानपत्रात छापलेला नसेल (अनेक गोष्टी छुप्या असतातच की). पण बेकायदेशीर कृत्ये करून त्याबद्द्ल पार्ट्या करणे काही नविन नाही. नावे जाहीर होतात ही भीती जरी वाटली तरी खूप झाले. ते काहीही असो मला आनंद झाला आहे कारण काही वर्षांपुर्वी मला मुंबई एयरपोर्टवर त्यांनी काही कारण नसताना अडकवले होते कि मी दोन किलोंपेक्षा जास्त सोने घेऊन जात आहे असा आरोप ठेऊन. प्रत्यक्षात मात्र काहीही नव्ह्ते. माझा मुलगा त्यावेळी लहान होता. मला मदत तर सोडाच पण नीट बोलण्याचेही सौजन्य दाखवले नव्ह्ते.

रेवती

हल्ली संयुक्त राज्यांत (यू एस मध्ये) एका मोठ्या गुन्हा प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली.

मागे काही वर्षांपूर्वी (२००१ साली) दोन खासदारांना आणि काही वर्तमानपत्रांच्या कार्यालयांत कोणीतरी अत्यंत जहाल रोगकारक अँथ्रॅक्स कीटाणूंची भुकटी पत्रांत घालून पाठवली. आधी अल कायदा वरती संशय होता, पण मग ते कीटाणू सं.रा.च्या सैन्याकडे असलेल्यांपैकीच होते असे दिसून आले.

मग कित्येक वर्षे विषाणूतज्ञ श्री. स्टीव्हन हॅटफिल यांच्यावर संशय होता - सं.रा.च्या गृहमंत्र्याने (अटॉर्नी जनरलने) मुद्दामून पत्रकार परिषद बोलावून ही माहिती दिली. त्यांचे घर धुंडाळले, वगैरे, तेव्हा पत्रकारांना माहिती दिली गेली, रेलचेल होती, बोभाटा झाला.

त्याला नोकरी मिळेनाशी झाली, त्याची व्यावसायिक पत ढळली.

पुढे असे दिसून आले, की या प्रकाराशी त्याचा काहीच संबंध नव्हता. तरी त्याची व्यावसायिक पत कोण परत आणणार?

याच्यावरून संशय काढून श्री आयव्हिन्स या कीटाणूतज्ञावर संशय गेला. तो विक्षिप्त वागायचा. पण संशय कळल्यावर त्याने आत्महत्त्या केली. सं.रा.मध्ये व्यक्ती एकदा मेली की तिच्याविरुद्ध खटला चालवण्यास मनाई आहे. त्यामुळे या दुसर्‍या संशयिताने तरी खरेच गुन्हा केला होता की नाही, याबद्दल वाद आहेत.

"निष्पाप असेल तर पुढे कधी सिद्ध होईलच" एवढे म्हणण्यापेक्षा अधिक काळजी घेऊन मगच संशयितांची नावे प्रसिद्ध करावीत.

वरील मुद्दे आणि उदाहरण हेच या चर्चेच्या मुळाशी असावे असे वाटत होते.

त्यावरून सुब्रम्हण्यम स्वामींची एक गोष्ट आठवली, जी राहूल गांधींच्या बाबतीतील आहे: खालील माहीती जशीच्या तशी जनता पार्टीच्या संकेतस्थळावरून घेतली आहे.

Boston airport on Sept 27, 2001 with 160,000 dollars in cash. He was traveling with his Colombian girlfriend, Veronique Cartelli. Cartelli name, he says belongs to drug mafia. FBI held him for 9 hours and refused to let him go. It is only after Indian government intervened and Condelezza Rice was informed that it will affect Indo-US relations was he allowed to go after being told that he should appear anytime in US courts whenever called for. Dr. Swamy attempted to get FBI records and was told that it requires Rahul"s permission. He wrote to Rahul to provide the permission to prove there is no such thing happened, but he has never gotten any response. (Note: This was reported in Indian media in 2001).

यातील राहूल गांधी कसा आहे वगैरे राजकीय आणि अ-राजकीय भाग कृपया सोडून द्या. पण अमेरिकन धोरण लक्षात घ्या (जे नक्की सत्य आहे, बाकी बातमीत कितीही सत्याअसत्यता असू शकत असली तरी) तेव्हढ्याच मर्यादीत उद्देशाने पहा: जरी राहूल गांधीला बॉस्टनला पकडले असले तरी त्याबाबतची माहीती आता सरकार सांगत नाही. अगदी माहीती अधिकाराखाली पण कारण त्यात व्यक्तिगत माहीती होती. तशी व्यक्तिगत माहीती जर जाहीर करायची असली तर त्या साठी त्यात गुंतलेल्या व्यक्तीची परवानगी लागते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2008 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"निष्पाप असेल तर पुढे कधी सिद्ध होईलच" एवढे म्हणण्यापेक्षा अधिक काळजी घेऊन मगच संशयितांची नावे प्रसिद्ध करावीत.

सहमत आहे.

याबाबतीतला एक किस्सा...एका संशोधन मार्गदर्शकाकडे एका पीएच.डी करणार्‍या विद्यार्थींनीने मार्गदर्शकावर शोषणाचा आरोप केला. मार्गदर्शकावर गुन्हा नोंदवण्यात आला, पोलिसांकडे ओले जळते आणि वाळलेलेही.. मार्गदर्शकाच्या कॅबीनमधे काही अश्लील पुस्तके सापडली असा शोध पोलिसांनी लावला. प्रचंड बदनामी संबंधीत प्राध्यापकाची झाली. संबधीत प्राध्यापकाला निलंबीत करण्यात आले. संबधीत प्राध्यापकाला तुरुंगात जावे लागले. पुढे चौकशी होत राहिली. संबधीत विद्यार्थीने कोणतेच संशोधनाचे काम केलेले नव्हते, कामात प्रगती नव्हती, ते सिद्ध झाले. संशोधनाचे काम पुर्ण व्हावे म्हणुन तिने तो आरोप केला. आता संबंधीत प्राध्यापक कामावर रुजू आहेत, पण आजही लोक त्यांच्याकडे संशयाच्याच नजरेने बघतात, त्यांची झालेली बदनामी आता भरुन निघेल का !

खादाड_बोका's picture

29 Aug 2008 - 11:19 pm | खादाड_बोका

ज्या परिस्थीतीत हे लोक तिथे सापडले, त्या अर्थी ते नक्कीच त्या नागड्या बारबालांची आरती उतरवायला गेले नव्हते. पोलीसांनी जर आणंखी थोड्यावेळानी कारवाई केली असती तर सगळे प्रत्यक्ष अश्लील काम करताना पकडले गेले असते. ह्या सर्वांनी हे सर्व करायच्या आधी स्वतः आणी स्वतःच्या परीवारचा विचार करायला हवा होता.
आता भोगा आपल्या कर्मांची फळ. ~X( ~X(

जे पेराल तेच उगेल....

सर्किट's picture

30 Aug 2008 - 12:23 am | सर्किट (not verified)

ह्या बातमीतल्या एका गोष्टीकडे अद्याप कुणाचेही लक्ष गेलेले नाही. आश्चर्य आहे.

हे सगळे कष्टम अधिकारी, तिथे लॅपटॉप घेऊन का गेले होते बॉ ?

दर दहा पंधरा मिण्टांनी मिसळपावावर आपल्या लेखनाला नवीन प्रतिसाद आले की नाही, हे चेक करायला का ?

एनीवे, माझ्या मते ह्या अधिकार्‍यांनी कुठल्याही कायद्याचा भंग केला नव्हत. त्यामुळे त्यांना अटक का व्हावी हे कळले नाही.

उधळले जाणारे पैसे भष्टाचारातून मिळाले होते, असा वहीम घेऊन ही अटक झाली असेल, तर मग शिर्डीला लाख लाख रुपयांच्या देणग्या देताना, किंवा बालाजीच्या हुंडीत लाखभर रुपये टाकताना कष्ह्टम अधिकार्‍यांना अटक का करू नये ?

-- सर्किट

सुधारक's picture

30 Aug 2008 - 9:21 pm | सुधारक

काम संपवून डायरेक्ट लोणावळा गाठलं तेव्हा लॅपटॉप बरोबरच असणार !

विकास's picture

30 Aug 2008 - 12:41 am | विकास

ह्या चर्चेतील रोख कस्टम अधिकारी चांगले का वाईट, भ्रष्ट का नाही असा होत आहे. वास्तवीक तो मुद्दा येथे नाही. त्यांना कोणीच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील असे प्रमाणपत्र देत नाही आहे. असो.

उधळले जाणारे पैसे भष्टाचारातून मिळाले होते, असा वहीम घेऊन ही अटक झाली असेल, तर मग शिर्डीला लाख लाख रुपयांच्या देणग्या देताना, किंवा बालाजीच्या हुंडीत लाखभर रुपये टाकताना कस्टम अधिकार्‍यांना अटक का करू नये ?

मस्त मुद्दा!

अवांतर - त्यात फक्त मजेशीर भाग सांगतो: कस्टम अधिकार्‍यांसंदर्भात नाही तर उद्योजकांसंदर्भात. अनेक उद्योजक (विशेष करून दाक्षिणात्य) हे आपल्या धंद्यात तिरूपती बालाजीस ऑफिशियल पार्टनर करतात. त्याला ते हक्काचा समभाग देतात का कमी ते माहीत नाही, पण हे चालू शकते.

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 7:18 am | विसोबा खेचर

त्या मुली जर १८ वर्षांवरील असतील आणि त्या स्वत:हून, कोणतीही जबरदस्ती न करता त्या अधिकार्‍यांसोबत खंडाळ्याला गेल्या असतील तर त्यात त्या अधिकार्‍यांची काय चूक?

हां, आता ती अधिकारी मंडळी जे पैसे त्या मुलींवर उधळीत होते ते त्यांच्यापाशी कसे आले, कुठून आले हे विचारायचा अधिकार आयकर विभागाला निश्चितच आहे. त्यात पोलिसांचा काय संबंध?

शिवाय तो बंगला खाजगी होता. याचाच अर्थ त्या बंगल्यात जे काही सुरू होते ते त्या बंगल्याच्या मालकाच्या परवानगीनेच सुरू होतं. मग यात पोलिसांचा संबंध आलाच कुठे? जोरजोरात नाचगाणी, गोंगाट आणि त्याचा त्रास आजूबाजूच्या मंडळींना होत होता का?

आणि जेव्हा मुंबईत बाँबस्फोट होऊन अनेक निरपराध माणसं मरतात तेव्हा हे पोलिस कुठे असतात??

तात्या.

मराठी_माणूस's picture

30 Aug 2008 - 10:17 am | मराठी_माणूस

पोलिसानि कार्यवाहि करताना ह्यापुढे हजार वेळा विचार करावा.
पोलिस स्टेशन मधे व इत्ररत्र लावलेलि खिसेकापु, चेन पळवणारे ई. चि छाया चित्रे लाउ नयेत कारण गुन्हा सिध्द व्हायचा आहे . उगिच सभ्य लोकांचि नावे , गावे, फोटो छापणे , रेल्वे स्टेशन वर, बस स्टँड वर कोणालाहि हटकणे अयोग्य आहे . (ह.घे. न.)