[शतशब्दकथा स्पर्धा] शीर्षकविहीन

चिगो's picture
चिगो in स्पर्धा
3 Aug 2015 - 9:16 pm

आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता.

तिचंही मन थार्‍यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं..

तिच्याकडे बघतांना त्याच्या डोळ्यांसमोरून आख्खा भूतकाळ तरळून गेला. ती पहिली नजरभेट, ती चोरट्या प्रेमाची वाढती खुमारी.. सगळे विरोध पत्करून घडलेलं मिलन. तिच्या मखमली, उबदार मिठीत निवलेल्या रात्री.. अन् वाफाळत्या कॉफीच्या साक्षीनं रंगवलेली स्वप्नं !

तिच्या स्वतःपासून दूर होण्याच्या विचारानेच त्याचा श्वास कोंडला. गदगदून तिला पाठमोरं मिठीत घेत तो हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला, "आय लव्ह यू.... अ लॉट, डार्लिंग !"
.
.
.
.
.
.
.
पुढच्याच क्षणी तिच्या मानेवरून सर्र्कन् सुरी फिरवण्याआधी !!

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2015 - 12:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

सिक्वेल येणार आहे हे माहित नसते तरी सुध्दा स्वतंत्र कथा म्हणुन आवडली.
कथे मध्ये वाचकांच्या प्रत्येक प्रश्र्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे थोडेच आहे?
काही उत्तरे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडता येतात.

पैजारबुवा

पैसा's picture

5 Aug 2015 - 12:52 pm | पैसा

+१

कथा आवडली. तसे तर माणूस मेला तरी त्याची कथा सगळी लोकांसमोर येत नाही. की पुरी होत नाही. या १०० शब्दात एक कथा नक्कीच आहे. इथून पुढे अनेक प्रकारच्या कलाटण्या देता येतील. जर हा २०० शब्दांच्या कथेचा अर्धा भाग असता तर एकच कलाटणी संभवली असती. तसे नाहीये.

पाटील हो's picture

5 Aug 2015 - 1:47 pm | पाटील हो

+१

नूतन सावंत's picture

6 Aug 2015 - 9:52 pm | नूतन सावंत

+१.

कोमल's picture

6 Aug 2015 - 9:54 pm | कोमल

+१

माधुरी विनायक's picture

7 Aug 2015 - 1:19 pm | माधुरी विनायक

+१

पद्मावति's picture

7 Aug 2015 - 3:57 pm | पद्मावति

+१

नावातकायआहे's picture

7 Aug 2015 - 4:24 pm | नावातकायआहे

+१

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 9:33 pm | बहिरुपी

+१

नितिन५८८'s picture

10 Aug 2015 - 11:13 am | नितिन५८८

+१

मिठाचा खडा लागल्यासारखं वाटलं शेवटी.